आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2 गैरअर्जदारांनी निकाल कळाल्या पासून 30 दिवसांच्या आत अर्जदाराकडून विद्युत
देयकापोटी वसूल केलेली रक्कम रु. 1610/- मधून विद्युत पुरवठा तात्पुरता
खंडीत केलेल्या कालावधीसाठी प्रचलित स्थीर आकार प्रतिमहा प्रमाणे रक्कम
कपात करुन उर्वरित रक्कम पूढील महिन्याच्या विद्युत देयका मध्ये
समायोजित करावी.
3 गैरअर्जदारांनी अर्जदारास दिलेली जानेवारी 2014 चे रक्कम रु. 1520/- चे
विद्युत देयक रद्दबातल करण्यात येते. गैरअर्जदारांनी प्रत्यक्ष रिडींग घेवुन
अर्जदारास त्याच्या विज वापरानुसार विद्युत देयक देण्याचे गैरअर्जदारांना
आदेशीत करण्यात येत आहे.
4 गैरअर्जदारांनी सेवात्रुटीपोटी रक्कम रु. 1000/- फक्त व तक्रार अर्जाच्या
खर्चापोटी रक्कम रु. 1000/- फक्त आदेश मुदतीत अर्जदारास द्यावी.
5 दोन्ही पक्षांना निकालाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
6 वरील आदेशाच्या पुर्ततेचा अहवाल दोन्ही पक्षकारानी निकालाच्या तारखे पासून 45
दिवसाच्या आत मंचात दाखल करावा, प्रकरण 45 दिवसानंतर आदेशाच्या पुर्ततेसाठी
ठेवण्यात यावे.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. प्रदीप.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.