Complaint Case No. CC/20/175 | ( Date of Filing : 08 Sep 2020 ) |
| | 1. प्रतिभा श्रीरंग इनामदार | वडूज, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. सरव्यवस्थापक यशोदीप ग्रामिण बिगरशेती पतसंस्था मर्या. | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 2. चेअरमन तोरो मकरंद रामचंद्र यशोदीप ग्रामिण बिगरशेती पतसंस्था मर्या. | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 3. 3.संदीप मोहनराव महाडिक | दहिवडी ता. माण जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 4. 4. राजाराम विलास कचरे | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 5. 5. महादेव रामचंद्र देशमुख | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 6. 6.रविंद्र रामचंद्र बाबर | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 7. 7. अपासाहेब रामचंद्र देशमुख | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 8. 8. सतिश सदाशिव राऊत | वडुज ता खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 9. 9. सुनिता राजकुमार महामुनी | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 10. 10. मंगल प्रताप चैथे | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 11. 11.शैलेशचंद्र बालाजी घोरपडे | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 12. 12. प्रमोद दत्ताीत्रय महामुनी | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 13. 13. सुभाष बाबुराव सोमदे | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 14. 14. तुषार जयसिंग भिसे | मायणी, ता. खटाव जि. सातारा | सातारा | महाराष्ट्र | 15. 2.संस्थापक डॉ.दिलीप येळगावकर | रा.मायणी,ता.खटाव,जि.सातारा. | सातारा | महाराष्ट्र |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | न्या य नि र्ण य द्वारा – मा. श्रीमती भारती सं. सोळवंडे, अध्यक्ष 1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली आहे. 2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे – जाबदार क्र.1 ही नोंदणीकृत सहकारी पतसंस्था आहे. जाबदार क्र.2 ते 15 हे सदर संस्थेचे पदाधिकारी आहेत. तक्रारदारांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांनी जाबदार पतसंस्थेचे वडूज शाखेमध्ये ठेव योजनेमध्ये रकमा गुंतविल्या आहेत. त्यांचा तपशील पुढील प्रमाणे – अ.क्र. | पावती क्र. | खाते क्र. | ठेव ठेवलेची तारीख | पैसे मिळणारी तारीख | गुंतविलेली रक्कम रु. | परत मिळणारी रक्कम | 1 | 24133 | 3626 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 2 | 22028 | 4259 | 03/10/07 | 03/10/08 | 3,000/- | 3,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 3 | 24136 | 3629 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 4 | 24135 | 3628 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 5 | 24137 | 3630 | 03/04/08 | 03/05/10 | 25,000/- | 25,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 6 | 24134 | 3627 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 7 | 24138 | 3621 | 05/04/08 | 05/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 8 | 24129 | 3622 | 05/04/08 | 05/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 9 | 24139 | 3632 | 05/04/08 | 05/05/10 | 17,500/- | 17,500/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 10 | 23790 | 4371 | 06/02/08 | 06/02/10 | 2,100/- | 2,100/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 11 | 19013 | 4096 | 24/07/06 | 24/07/10 | 1,85,000/- | 1,85,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 12 | 24129 | 3623 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 13 | 11743 | 4525 | 02/05/08 | 02/05/10 | 2,000/- | 2,500/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 14 | 22226 | 4157 | 01/10/07 | 01/10/08 | 11,000/- | 11,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 15 | 24132 | 3625 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 16 | 11710 | 4492 | 09/04/08 | 09/04/08 | 4,000/- | 4,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 17 | 24131 | 3624 | 03/04/08 | 03/05/10 | 20,000/- | 20,000/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | 16 | 24133 | 4164 | 02/11/07 | 02/11/08 | 1,500/- | 1,500/- + 13% प्रमाणे होणारी रक्कम | | | | | | एकूण रु. | 4,05,600 + होणारे व्याज |
श्रीपाद सदाशिव इनामदार हे दि. 16/08/2008 रोजी मयत झाले असून तक्रारदार त्यांची सून या नात्याने कायदेशीर वारस आहेत. सदर ठेवीची मुदत संपलेनंतर तक्रारदारांनी ठेव रक्कम व त्यावरील व्याजाची मागणी केली असता जाबदारांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सबब, तक्रारदारांनी याकामी जाबदार यांचेकडून ठेवीची होणारी एकूण रक्कम रु.4,05,600/- व सदर रकमेवर रक्कम प्रत्यक्ष वसूल होऊन मिळेपर्यंत द.सा.द.शे. 13 टक्के दराने व्याज मिळावे, शारिरिक व मानसिक त्रासापोटी तसेच अर्जाचे खर्चापोटी रु.40,000/- जाबदारांकडून मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी याकामी केली आहे. 3. तक्रारदारांनी तक्रारअर्जासोबत शपथपत्र तसेच कागदयादीसोबत ठेवपावत्यांच्या प्रती, जाबदार संस्थेच्या संचालक मंडळाच्या यादीची प्रत, तक्रारदार हिने जाबदार यांना पाठविलेल्या नोटीसची प्रत, सदर नोटीसच्या पावती व पोहोचपावत्या इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रारदारांनी दाखल केलेल्या ठेवपावत्यांच्या झेरॉक्सप्रती या अस्पष्ट आहेत. तक्रारदारांना वारंवार समज देवूनही त्यांनी सदर ठेवपावत्यांच्या मूळ प्रती पडताळणीसाठी दाखल केल्या नाहीत. 4. जाबदार क्र. 1 व 3 ते 15 यांनी याकामी हजर होवून म्हणणे दाखल केले. जाबदार यांचे कथनानुसार, तक्रारदार यांनी त्यांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांचे वारस असलेबाबतचा योग्य त्या न्यायालयाकडून दाखला घेवून यावा व ठेव रक्कम घेवून जावी अशी समज तक्रारदारांना दिली होती. परंतु त्याची पूर्तता तक्रारदारांनी केलेली नाही. तक्रारदार या जाबदार यांच्या ग्राहक नाहीत. तक्रारदारांनी दिलेली नोटीस जाबदारांना मिळालेली नाही. तक्रारदारांच्या ठेवींची मुदत सन 2010 मध्ये संपलेली आहे. त्यानंतर 2 वर्षांचे आत तक्रारदारांनी कायदेशीर कारवाई करणे गरजेचे होते. परंतु तशी कारवाई वेळेत तक्रारदारांनी केली नसलेने सदर तक्रारीस मुदतीच्या कायद्याची बाधा येते. सबब, तक्रारअर्ज फेटाळणेत यावा अशी मागणी जाबदार यांनी केली आहे. 5. तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, दाखल कागदपत्रे व युक्तिवाद तसेच जाबदार क्र.1 व 3 ते 15 यांचे म्हणणे व युक्तिवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी उपस्थित होतात. अ.क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | तक्रारदार या जाबदार यांच्या ग्राहक आहेत काय ? | नाही. | 2 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
कारणमिमांसा मुद्दा क्र.1 6. तक्रारदार यांचे तक्रारअर्जातील कथन व त्यांनी दाखल केलेल्या ठेवपावतींचे अवलोकन करता, सदरच्या ठेवपावत्या या तक्रारदार यांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांचे नावे असल्याचे दिसून येते. सदरचे श्रीपाद सदाशिव इनामदार हे दि. 16/08/2008 रोजी मयत झाले आहेत. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जात सदरचे ठेवपावत्यांना तक्रारदार म्हणजेच त्यांची नात्याने असलेली सून ही कायदेशीर वारस “नॉमिनी” आहेत असे कथन केले आहे. तथापि सदरचे ठेवपावत्यांना तक्रारदार या नॉमिनी आहेत हे दाखविणारा कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही. तसेच तक्रारदार या त्यांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांच्या एकमेव कायदेशीर वारस आहेत हे दर्शविणाराही कोणताही पुरावा तक्रारदार यांनी याकामी दाखल केलेला नाही. कायद्याचे तत्वानुसार सून ही सास-यांची श्रेणी-1 (Class-1) मधील वारस होत नाही. श्रीपाद सदाशिव इनामदार यांना अन्य कोणी श्रेणी-1 (Class-1) मधील वारस आहेत किंवा कसे याबाबत तक्रारदारांनी तक्रारअर्जात कोणतेही कथन केलेले नाही. तक्रारदारांनी त्यांचे तक्रारअर्जातील कलम 4 मध्ये तक्रारदारांचे पतीचे वैद्यकीय उपचारासाठी मोठया रकमेची तात्काळ आवश्यकता आहे असे कथन केले आहे. परंतु तक्रारदारांचे पती हे श्रीपाद सदाशिव इनामदार यांचे सरळ व कायदेशीर वारस असतानाही तक्रारदारांनी त्यांचे पतींना याकामी तक्रारदार म्हणून सामील का केले नाही याचा कोणताही खुलासा तक्रारदार यांनी केलेला नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार या सून या नात्याने त्यांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांच्या कायदेशीर वारस किंवा नॉमिनी आहेत या कथनावर पुराव्याअभावी विश्वास ठेवता येणार नाही असे या आयोगाचे मत आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे म्हणणेमध्ये, तक्रारदार यांनी त्यांचे सासरे श्रीपाद सदाशिव इनामदार यांचे वारस असलेबाबतचा योग्य त्या न्यायालयाकडून दाखला घेवून यावा व ठेव रक्कम घेवून जावी अशी समज तक्रारदारांना दिली होती. परंतु त्याची पूर्तता तक्रारदारांनी केलेली नाही. सदरचे कथन तक्रारदार यांनी योग्य तो पुरावा दाखल करुन खोडून काढलेले नाही. तक्रारदार या मयत श्रीपाद इनामदार यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत असे कथन तक्रारदारांनी तक्रारीत केलेचे दिसून येत नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार या ठेवीदार यांच्या वारस आहेत ही बाब याकामी शाबीत होत नाही असे या आयोगाचे मत आहे. सबब, तक्रारदार या जाबदार यांच्या ग्राहक आहेत ही बाब याकामी शाबीत होत नाही. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देण्यात आले आहे. तक्रारदार या जाबदार यांच्या ग्राहक होत नसलेने प्रस्तुतची तक्रार या आयोगासमोर चालणेस पात्र नाही. सबब, श्रीपाद सदाशिव इनामदार यांच्या वर नमूद वादातील ठेवपावत्यांबाबत त्यांचे कायदेशीर वारसांना दाद मागण्याची मुभा देवून, प्रस्तुतची तक्रार निकाली काढण्याचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. सबब आदेश. आदेश - वादातील ठेवपावत्यांबाबत ठेवीदाराचे कायदेशीर वारसांना दाद मागण्याची मुभा देवून प्रस्तुतची तक्रार निकाली काढण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाहीत.
- सदर आदेशाच्या प्रती विनाशुल्क उभय पक्षकारांना द्याव्यात.
| |