ग्राहक तक्रार अर्ज क्र. 368/2013
दाखल दिनांक. 21/01/2014
अंतीम आदेश दि. 21 /02 /2014
अतिरीक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, जळगाव.
विलास भागवत पाटील, तक्रारदार
उ.व. 68, धंदा – सेवानिवृत्त (अॅड.किशोर रा.भारंबे)
रा. 15, मित्रनगर, ख्वॉंजामियॉं नगर समोर,
जिल्हापेठ, जळगांव, ता.जि. जळगांव.
विरुध्द
संपादक,
महाराष्ट्र टाईम (जळगांव आवृत्ती), सामनेवाला
12, बळीराम पेठ, सानेगुरुजी चौक, (कोणीही नाही)
एम.जी. रोड, जळगांव, ता.जि. जळगांव. व इतर 1.
(चंद्रकांत एम.येशीराव,सदस्य, यांनीनिशाणी क्र. 01 वरील आदेश पारीत केले)
आज रोजी तक्रारदार व त्यांचे वकील हजर, तक्रारदारांनी सामनेवाला यांच्याशी बोलणी होवून सामनेवाल्यांनी न चुकता पेपर टाकण्याची हमी दिल्यामुळे व गेल्या दोन महिन्यांपासून पेपर सुरळीत मिळत असल्यामुळे, प्रस्तुत तक्रार अर्ज चालविणे नाही. तो काढून घेण्यास परवानगी मिळावी असा अर्ज नि. 12 ला दाखल केला. तो पडताळून मंजूर करण्यात आला. सबब, प्रस्तुत तक्रार अर्ज मागे घेण्यास परवानगी देण्यात येते. याप्रमाणे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते.
दि. 21/02/2014
(श्री. सी.एम.येशीराव) (श्री.एम.एस.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव