(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 26 एप्रिल 2017)
तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. विरुध्दपक्षाची संस्था ही मागील काही वर्षापासून लोकांच्या ठेवी स्विकारुन त्यावर व्याज देण्याबाबत निरनिराळ्या योजना राबवीतात. विरुध्दपक्ष त्यांचे संस्थेमध्ये रक्कम गुंतविण्या हेतु लोकांना जाहिरातीव्दारे आंमञित करीत होती. त्या जाहिरातीवर विश्वास ठेवून तक्रारकर्त्यांनी विरुदपक्षाच्या योजनेत रक्कम गुंतविली. ही रक्कम निर्धारीत महिण्यांनी निर्धारीत व्याजासह परत करण्याची हमी सुध्दा दिली. तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्ष संस्थेच्या हमीवर विश्वास ठेवून खालील नमूद रकमा संस्थेमध्ये गुतविल्या आहेत.
‘‘परिशिष्ठ – अ’’
अ.क्र. | गुंतवणूकदाराचे नांव | रक्कम ठेवल्याची तारीख | गुंतविलेली रक्कम | गुंतवणूकीचा कालावधी | परिपक्वता तारीख | परिपक्वता रक्कम |
1 | गोपाल बापुरावजी ईटनकर | 22.7.2006 | 5,000/- | 66 महिने | 22.1.2012 | 10,106/- |
2 | गोपाल बापुरावजी ईटनकर | 10.1.2009 | 50,000/- | 6 महिने | 9.7.2009 | 56,000/- |
3 | सौ.कविता गोपाल ईटनकर | 10.1.2009 | 50,000/- | 6 महिने | 9.7.2009 | 56,000/- |
2. तक्रारकर्त्यांनी एकूण गुंतविलेली रक्कम रुपये 1,05,000/- आहे. तक्रारकर्त्यांनी वरील नमूद रकमा विरुदपक्ष संस्थेकडे गुंतविल्याबाबत विरुध्दपक्ष संस्थेने त्यांच्या नावे रितसर पावत्या सही व शिक्यानिशी तक्रारकर्त्यांस दिलया आहेत. त्यानंतर, तक्रारकर्ते नमूद करतात की, त्याने दिनांक 25.4.2009 रोजी सदर विरुदपक्ष संस्थेच्या कारभारात घोटाळा झाल्याने, नेमलेल्या प्रशासकाच्या नावाने अयोध्या नगर शाखेच्या माध्यमातून विरुध्दपक्ष संस्थेकडे अर्ज करुन त्यांना आर्थिक घरगुती अडचणीमुळे उपरोक्त गुंतविलेल्या रकमांची गरज असल्याने मागणी केली. त्याचप्रमाणे, या परिस्थितीत तक्रारकर्ता यांनी विरुदपक्ष संस्थेच्या शाखेशी, तसेच संबंधीत पदाधिका-यांशी वेळोवेळी भेटून वरील नमूद रकमांची आर्थिक अडचणीमुळे गरज असल्याने मागणी केली. परंतु सदर रकमा तक्रारकर्त्याच्या मागणी प्रमाणे विरुध्दपक्ष संस्थेने परत न केल्याने, त्यांनी त्यांच्या व्यवसायात अथवा सेवेत अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आहे असे स्पष्टपणे दिसते. तक्रारकर्ता नमूद करतो की, सदर तक्रारीस कारण विरुध्दपक्ष संस्थेने तक्रारीतील नमूद रकमा त्यांच्या परिपक्वता दिनांकानंतर म्हणजेच दिनांक 22.1.2012, दिनांक 9.7.2009 नंतर अद्याप पर्यंत परत दिले नसल्याने घडले आहे. सदर रकमा अद्यापपर्यंत विरुदपक्ष संस्थेकडे जमा असून त्यावरील व्याज सुध्दा विरुध्दपक्ष संस्थेकडे जमा आहे. परिणामतः विरुध्दपक्ष संस्था जोपर्यंत सदर रकमा तक्रारकर्त्यांना व्याजासह परत करीत नाही, तोपर्यंत सदर तक्रारीस कारण कायम आहे. तक्रारकर्त्यांनी खालील प्रमाणे प्रार्थना केली आहे.
1) विरुदपक्ष संस्थेने तक्रारकर्त्यांच्या गुंतविलेल्या रकमा निर्धारीत मुदतीनंतर परिपक्वता रकमेसह तक्रारकर्त्यांना त्यांच्या मागणीनुसार परत न केल्याने त्यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवेत ञुटी केली आहे असे घोषीत करावे.
2) विरुध्दपक्ष संस्थेने तक्रारकर्त्यांची तक्रारीतील नमूद परिपक्वता रक्कम रुपये 1,22,106/- परिपक्वता दिनांकानंतर वार्षीक 18 % टक्के व्याजाने तक्रारकर्त्यांस रक्कम प्रतयक्ष हातात येईपर्यंत अदा करावे.
3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यांना झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे, असे आदेश करावे.
3. तक्रारकर्त्यांच्या तक्रारीनुसार विरुध्दपक्ष यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली, तसेच विरुदपक्ष यांचे विरुध्द नोटीस ‘सकाळ’ दैनिक वृत्तपञातून प्रसिध्द करण्यात आली, तरीसुध्दा विरुध्दपक्ष मंचात हजर झाले नाही. त्यामुळे मंचाने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चे विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर दिनांक 10.1.2015 ला पारीत केला.
4. तक्रारकर्त्यांच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. सदर प्रकरणातील अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
5. तक्रारकर्ता व त्याची पत्नी यांनी विरुध्दपक्ष संस्थेकडे वेगवेगळ्या योजने अंतर्गत तक्रारीतील नमूद ‘परिशिष्ठ - अ’ प्रमाणे विविध रकमा निर्धारीत मुदतीकरीता गुंतविलेल्या होत्या. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्षाने दिलेल्या हमीवर विश्वास ठेवून उपरोक्त रकमा विरुध्दपक्ष संस्थेकडे गुंतविलेली होती. विरुध्दपक्ष संस्थेच्या दिनांक 25.4.2009 रोजी आर्थिक व्यवहारात घोटाळा झाल्याने, तक्रारकर्त्याने प्रशासकाच्या नावे अर्ज करुन उपरोक्त रकमेची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्ष संस्था व संबंधीत प्रशासकाने कुठलाही योग्य प्रतिसाद तक्रारकर्त्यांस दिला नाही. त्याच्रपमाणे तक्रारकर्त्याला आर्थिक अडचणीमुळे उपरोक्त गुंतविलेल्या रकमेची अत्यंत गरज असल्याने त्यांनी दिनांक 15.2.2010 रोजी विरुध्दपक्ष संस्थेकडे अर्ज करुन रकमेची मागणी केली. परंतु, विरुध्दपक्षाने त्यांची रक्कम परत करण्यास नकार दिला, त्यामुळे तक्रारकर्ता सदर मंचात तक्रार दाखल करण्यास बाध्य झाला.
6. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षांकडे दाखल दस्त क्र.1, 2 व 3 नुसार अनुक्रमे रुपये 5,000/-, 50,000/-, व 50,000/- त्यांची अनुक्रमे पावती क्रमांक 4629, 23278, 23279 प्रमाणे रकमा गुंतविलेल्या आहेत. त्याचप्रमाणे मंचाने विरुध्दपक्षांना दिनांक 29.7.2013 रोजी मंचात उपस्थित राहण्याकरीता नोटीस पाठविली, परंतु विरुध्दपक्ष क्र.1 व 2 हजर झाले नाही. त्यानंतर, विरुध्दपक्षांना दिनांक 3.9.2014 ला ‘सकाळ’ या दैनिक वृत्तपञातून दि.10.12.2014 रोजी मंचात उपस्थित राहण्यासाठी नोटीस प्रसिध्द केला होता. तरी सुध्दा विरुदपक्ष क्र.1 व 2 उपस्थित झाले नाही, करीता दिनांक 10.1.2015 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेविरुद प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश निशाणी क्रमांक 1 करण्यात आला.
7. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे रुपये 1,05,000/- दस्त क्र.1, 2 व 3 प्रमाणे विरुदपक्षाकडे वेगवेगळ्या योजनेमध्ये गुंतविले होते व त्याची शेवटची तारीख 10.1.2009 अशी होती. परंतु अंदाजे 9 वर्ष लोटूनही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास त्यांची जमा रक्कम निर्धारीत व्याजाप्रमाणे दिली नाही. यावरुन विरुध्दपक्षाने सेवेत ञुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते, असे मंचाला वाटते. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या, तक्रारकर्त्यांनी विरुध्दपक्षांकडे गुंतविलेली ‘परिशिष्ठ -अ’ प्रमाणे एकूण जमा रक्कम रुपये 1,05,000/- त्याचे परिपक्वता दिनांकानंतरची एकूण रक्कम रुपये 1,22,106/- या रकमेवर द.सा.द.शे. 6 % टक्के व्याजदराने येणारी रक्कम तक्रारकर्त्यांचे हातात पडेपावेतो द्यावे.
(3) तसेच विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या तक्रारकर्त्यांस झालेल्या शारीरीक व मानसिक ञासापोटी प्रत्येकी रुपये 5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये 2,000/- तक्रारकर्त्यांना द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 26/04/2017