::निकालपत्र::
(पारीत व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदसया )
(पारीत दिनांक–03 मार्च, 2018)
1. उपरोक्त नमुद तक्रारीं मधील तक्रारदारानीं विरुध्दपक्षां कडून करारानुसार भूखंडाचे नोंदणीकृत विक्रीपत्र करुन मिळण्यासाठी तसेच अन्य अनुषंगीक मागण्यांसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये उपरोक्त नमुद स्वतंत्र तक्रारी दाखल केलेल्या आहेत. उपरोक्त नमुद तक्रारीं मधील तक्रारदार हे जरी वेगवेगळे असले तरी या प्रकरणां मधील विरुध्दपक्ष हे एकसारखे आहेत आणि तपशिलाचा थोडा फार भाग वगळता ज्या कायदेशीर तरतुदींच्या आधारावर हया तक्रारी निकाली निघणार आहेत, त्या कायदेशीर तरतुदी सुध्दा एक सारख्याच आहेत आणि म्हणून आम्ही या सर्व तक्रारीं मध्ये एकत्रितरित्या निकाल पारीत करीत आहोत-
02. तक्रारदारांचे संक्षीप्त कथन खालील प्रमाणे-
उपरोक्त नमुद प्रकरणां मधील विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) हे मौजा भोकारा, तहसिल नागपूर (ग्रामीण) जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-12-अ, नविन खसरा क्रं-95/2 आणि जुना खसरा क्रं-58/2, आराजी 2 एकरचे मालक असून त्यांनी ही शेती श्रीमती लता भगवानदास दामानी यांचे कडून दिनांक-26/02/2001 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे खरेदी केली होती व खरेदी नंतर सदर शेतजमीनीच्या फेरफाराची नोंद सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचे नावावर घेण्यात आली होती. विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी सदर शेतीवर प्रस्तावित ले आऊट पाडून भूखंड विक्री करणे सुरु केले. उपरोक्त नमुद तक्रारदारानीं विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांचे कडून दिनांक-25/07/2002 रोजी नोंदणीकृत खरेदीखता व्दारे मौजा भोकारा, तहसिल नागपूर ग्रामीण जिल्हा नागपूर येथील प्रस्तावित ले आऊट मधील भूखंड प्रत्येकी 1200 चौरसफूटा प्रमाणे, प्रत्येकी एकूण रुपये-12,000/- एवढया किमतीत खरेदी केलेत व विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी विक्रीपत्रामध्ये त्यांना भूखंडाचे मोबदल्याची संपूर्ण रक्कम उपरोक्त तक्रारदारां कडून मिळाल्याची बाब उपरोक्त नमुद तक्रारदारानां स्वतंत्रपणे नोंदवून दिलेल्या विक्री खतां मध्ये मान्य केलेली आहे.
तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी जरी नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे भूखंडांची विक्री त्या-त्या तक्रारदारांचे नावे नोंदवून दिलेलेली असती तरी आज पर्यंत त्यांच्या-त्यांच्या भूखंडांचे ताबे दिलेले नाहीत तसेच घर बांधण्यासाठी विरुध्दपक्ष त्यांना परवानगी देत नाहीत. तक्रारदारांना सन-2002 मध्ये असे समजले की, तक्रारदारांनी नोंदणीकृत खरेदीव्दारे खरेदी केलेले भूखंड विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) यांनी अन्य व्यक्तींना विकलेत.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, विरुध्दपक्ष क्रं-1 ते क्रं-3 यांचे कडे खरेदी केलेल्या भूखंडांचे ताबे मिळण्या बाबत सातत्याने पाठपुरावे केले असता विरुध्दपक्ष क्रं-1) श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे (मृतक) तर्फे कायदेशीर वारसदार म्हणून त्याचा मुलगा अमित दशरथ डांगोरे, विरुध्दपक्ष क्रं-2) शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-3) अनुक्रमे गणेश पंजाबराव कुदावळे यांनी विक्री केलेल्या भूखंडांचे मोबदल्यात सर्व तक्रारदारांचे नावाने आपसी समझोत्याने स्वतंत्र आपसी करारनामे दिनांक-22/06/2012 रोजी नोटरी समोर नोंदवून दिलेत, या आपसी करारनाम्याच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत आणि या स्वतंत्र आपसी करारनाम्याव्दारे तिन्ही विरुध्दपक्षानीं प्रत्येक तक्रारदारास भूखंडाचे मोबदल्यात रुपये-5,00,000/- प्रमाणे दिनांक-22/10/2012 पर्यंत देण्याचे कबुल केलेले आहे. अशाप्रकारे प्रत्येक विरुध्दपक्षा कडून रुपये-5,00,000/- या प्रमाणे, एकूण 03 विरुध्दपक्षाव्दारे प्रत्येक तक्रारकर्त्यास एकूण रुपये-15,00,000/- भूखंडापोटी घेणे आहेत परंतु दिनांक-21/12/2002 रोजी विरुध्दपक्ष क्रं-3) याने प्रत्येक तक्रारकर्त्यास रुपये-15,000/- अशी रक्कम दिलेली असल्याने प्रत्येक तक्रारकर्त्यास आपसी समझोता करारा नुसार अद्दापही प्रत्येकी रुपये-14,85,000/- एवढी रक्कम घेणे बाकी आहे.
तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नथ्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी त्यांचे मालकीची जमीन श्री राजेश अमृत वसानी यांना (पूर्वी तक्रारदारांनी नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेल्या भूखंडाची जमीन) दिनांक-25/02/2008 रोजीचे नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये विकली, ज्याची रजिस्टर नोंद क्रं-1127/2008 आहे, तक्रारदारांनी सदर विक्रीपत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली, ज्यामध्ये शेतजमीन खसरा क्रं-57/1-अ व 57/1-ब एकूण आराजी 2.16 हेक्टर आर पैकी 1.96 हेक्टर आर जमीन श्री राजेश अमृत वसानी यांना विकली, त्या शेतजमीनीचे वर्णन मौजा भोकारा, पटवारी हलका क्रं-12-अ, तहसिल नागपूर ग्रामीण येथील भूमापन क्रं-57/1-ब, आराजी-1.20 हेक्टर आर असे आहे. तक्रारदारांनी पुराव्यार्थ विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-2) यांनी श्री राजेश वसानी यांना विक्री केलेल्या विक्रीपत्राचे दस्तऐवजाची प्रत दाखल केलेली आहे.
तक्रारदारांनी पुढे असे नमुद केले की, त्यांनी नोंदणीकृत खरेदीखतान्वये विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांचे कडून विकत घेतलेली जमीन विरुध्दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी परस्पर विरुध्दपक्ष क्रं-4) श्री राजेश अमृत वसानी यांचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये विकलेली असल्याने, विरुध्दपक्षानीं दोषपूर्ण सेवा दिली आणि फसवणूक केलेली आहे म्हणून तक्रारदारांना जिल्हा ग्राहक मंचा समोर तक्रार दाखल करण्या शिवाय पर्याय उरला नसल्याने त्यांनी या तक्रारी दाखल करुन विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केलेल्या आहेत-
(1) विरुध्दपक्षांना तक्रारदारांनी नोंदणीकृत खरेदी खतान्वये विकत घेतलेल्या भूखंडांचे ताबे देण्याचे आदेशित व्हावे आणि ते शक्य नसल्यास विरुध्दपक्षांनी आपसी समझोत्या नुसार मान्य केलेली आणि उर्वरीत देणे असलेली रक्कम प्रत्येक तक्रारकर्त्याला रुपये-14,85,000/- प्रमाणे दिनांक-22/06/2012 पासून वार्षिक-24% दराने व्याजासह परत करण्याचे विरुध्दपक्षानां आदेशित व्हावे.
(2) तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-50,000/- या प्रमाणे रकमा विरुध्दपक्षानीं देण्याचे आदेशित व्हावे.
3. विरुध्दपक्ष क्रं-(1) दशरथ रामप्रसाद डांगोरे (मयत) याचे तर्फे त्याचा मुलगा अमीत दशरथ डांगोरे याने तक्रारनिहाय उत्तर दाखल केले. त्याचे लेखी उत्तरा नुसार त्याचे वडील श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि अन्य दोन म्हणजे मयत शंकर नत्थु निवते आणि गणेश कुदावले यांनी तक्रारदारांचे नावे भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिलेले असल्याने तक्रारदार हे त्याचे (अमीत डोंगरे याचे) ग्राहक होऊ शकत नाहीत, त्याने कोणताही व्यवहार/करार तक्रारदारां सोबत केलेला नाही. मयत श्री दरशथ डांगोरे यानां पत्नी, 2 मुली व 2 मुले आहेत परंतु त्या सर्वांना तक्रारी मध्ये प्रतिपक्ष केलेले नाही केवळ मयत दशरथ डांगारे याचा मुलगा म्हणून अमीत डांगोरे याला प्रतिपक्ष केलेले आहे. पोलीस स्टेशन कोराडी येथील पोलीसांच्या दबावाखाली अमीत डांगोरे याने व इतरानीं म्हणजे मयत शंकर नत्थु निवते आणि गणेश कुदावले यांनी तक्रारदारांचे नावे दिनांक-22/06/2012 रोजीच्या आपसी करारनाम्याचे आधारावर ही तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष बेकायदेशीररित्या दाखल केलेली आहे तसेच तक्रारी या 11 वर्षा नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्या असल्याने मुदतबाहय आहेत. तक्रारदारांचे नावे ज्या दिवशी विक्रीपत्र नोंदविल्या गेली होती, त्याच दिवशी भूखंडांचे ताबे सुध्दा त्यांना दिले होते, ज्यादिवशी विक्रीपत्र नोंदवून दिलेत त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं-1) अमीत डांगोरे याचे वडील श्री दशरथ डांगेरे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मयत शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-3) गणेश पंजाबराव कुदावले यांचे मालकी हक्क संपुष्टात आले होते. तक्रारदारांनी कोणतेही लेखी नोटीस न देता सरळ सरळ या तक्रारी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्या आहेत. विक्रीपत्रांमध्ये स्पष्ट नमुद केलेले आहे की, भूखंडांची मोजणी करुन प्रत्यक्ष्य ताबा दिलेला आहे. तक्रारदारांनी विकत घेतलेल्या प्रत्येक भूखंडाची किम्मत ही रुपये-12,000/- असताना प्रत्येक तक्रारदारास रुपये-15,00,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे प्रयोजन उदभवत नाही. घर बांधकामास परवानगी ही बाब ग्राम पंचायत बोखारा यांचे अधिकारातील बाब आहे. उपरोक्त नमुद कारणास्तव ग्राहक मंचाला या तक्रारी चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याने या सर्व ग्राहक तक्रारी दंडासह खारीज करण्यात याव्यात अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) मयत दरशथ डांगोरे तर्फे त्याचा मुलगा अमीत डांगोरे यांनी केली.
04. विरुध्दपक्ष क्रं-1 अ) अमीत दशरथ डांगोरे (मयत श्री दशरथ डांगोरे यांचा मुलगा) याचे आक्षेपा नंतर विरुध्दपक्ष क्रं-1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे यांचे कायदेशीर वारसदार अभिलेखावर घेण्यात आलेत व त्यानुसर विरुध्दपक्ष क्रं-(1) (अ) ते (1) (फ) तर्फे एकत्रित लेखी उत्तर दाखल करण्यात आले. त्यांनी लेखी उत्तरात नमुद केले की, तक्रारदारानीं भूखंड मोबदल्याची रक्कम विरुध्दपक्ष क्रं-(1) (अ) ते (1) (फ) यांचे विरुध्दपक्ष क्रं-(1) मयत वडील श्री दशरथ डांगारे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) व क्रं-(3) यांना दिली होती, त्यांचेशी तक्रारदारांनी भूखंडा संबधी कोणताही व्यवहार केलेला नाही त्यामुळे तक्रारदार हे त्यांचे ग्राहक ठरीत नाहीत. तसेच तक्रारी या 11 वर्षा नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्या असल्याने मुदतबाहय आहेत. तक्रारदारांचे नावे ज्या दिवशी विक्रीपत्र नोंदविल्या गेली होती, त्याच दिवशी भूखंडांचे ताबे सुध्दा त्यांना दिले होते, ज्यादिवशी विक्रीपत्र नोंदवून दिलेत त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (फ) यांचे वडील मयत श्री दशरथ डांगेरे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मयत शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-3) गणेश पंजाबराव कुदावले यांचे मालकी हक्क संपुष्टात आले होते. तक्रारदारांनी कोणतेही लेखी नोटीस न देता सरळ सरळ या तक्रारी ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्या आहेत. विक्रीपत्रांमध्ये स्पष्ट नमुद केलेले आहे की, भूखंडांची मोजणी करुन प्रत्यक्ष्य ताबा दिलेला आहे. तक्रारदारांनी विकत घेतलेल्या प्रत्येक भूखंडाची किम्मत ही रुपये-12,000/- असताना प्रत्येक तक्रारदारास रुपये-15,00,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे प्रयोजन उदभवत नाही. घर बांधकामास परवानगी ही बाब ग्राम पंचायत बोखारा यांचे अधिकारातील बाब आहे. उपरोक्त नमुद कारणास्तव ग्राहक मंचाला या तक्रारी चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याने या सर्व ग्राहक तक्रारी दंडासह खारीज करण्यात याव्यात अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-1) मयत दरशथ डांगोरे तर्फे त्यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (फ) यांनी केली.
5. विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत शंकर नत्थु निवते याचे तर्फे त्याचे कायदेशीर वारसदार क्रं-(2) (अ) ते (2) (ग) यांनी लेखी जबाब तक्रार निहाय दाखल केला. त्यांनी सुध्दा विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (फ) प्रमाणेच लेखी उत्तर दाखल केले. त्यांचे म्हणण्या नुसार तक्रारदारांनी त्यांचे वडील विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत श्री शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) मयत श्री दशरथ डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) गणेश पंजाबराव कुदावले यांचे सोबत भूखंड विक्रीचे व्यवहार केलेले आहेत, त्यामुळे त्यांनी म्हणजे मयत विरुध्दपक्ष क्रं-(2) शंकर नत्थु निवते तर्फे त्याचे कायदेशीर वारसदार यांनी भूखंडाचा कोणताही मोबदला तक्रारदारांकडून घेतलेला नसल्याने आणि तक्रारदारांशी कोणतेही व्यवहार केलेले नसल्याने तक्रारदार हे त्यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. तक्रारदारांचे नावे ज्या दिवशी विक्रीपत्र नोंदविल्या गेली होती, त्याच दिवशी भूखंडांचे ताबे सुध्दा त्यांना दिले होते, ज्यादिवशी विक्रीपत्र नोंदवून दिलेत त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं-1) मयत श्री दशरथ डांगेरे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मयत श्री शंकर नथ्यु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-3) श्री गणेश पंजाबराव कुदावले यांचे मालकी हक्क संपुष्टात आले होते. केवळ पोलीस स्टेशन कोराडी येथील पोलीसांच्या दबावाखाली अमीत डांगोरे याने व मयत श्री शंकर नथ्यु निवते आणि श्री गणेश शंकर कुदावले यांनी तक्रारदारांचे नावे दिनांक-22/06/2012 रोजीच्या करुन दिलेल्या आपसी करारनाम्याचे आधारावर ही तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष बेकायदेशीररित्या दाखल केलेली आहे तसेच तक्रार 11 वर्षा नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली असल्याने मुदतबाहय आहे. तक्रारदारांनी विकत घेतलेल्या प्रत्येक भूखंडाची किम्मत ही रुपये-12,000/-असताना प्रत्येक तक्रारदारास रुपये-15,00,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे प्रयोजन उदभवत नाही. प्लॉटचा ताबा देणे ही बाब जिल्हा ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात नाही. घर बांधकामास परवानगी ही बाब ग्राम पंचायत बोखारा यांचे अधिकारातील बाब आहे. उपरोक्त नमुद कारणास्तव ग्राहक मंचाला या तक्रारी चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याने या सर्व ग्राहक तक्रारी दंडासह खारीज करण्यात याव्यात अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-2) मयत शंकर नत्थु निवते याचे कायदेशीर वारसदार क्रं-(2) (अ) ते (2) (ग) यांनी केली.
06. विरुध्दपक्ष क्रं-3) गणेश कुदावले याने तक्रार निहाय लेखी उत्तर दाखल केले, त्याने लेखी उत्तरात असे नमुद केले की, तक्रारदारांचे नावे ज्या दिवशी विक्रीपत्र नोंदविल्या गेली होती, त्याच दिवशी भूखंडांचे ताबे सुध्दा त्यांना दिले होते, ज्यादिवशी विक्रीपत्र नोंदवून दिलेत त्याच दिवशी विरुध्दपक्ष क्रं-1) मयत श्री दशरथ डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-2) मयत शंकर नत्थु निवते व विरुध्दपक्ष क्रं-3) श्री गणेश कुदावले यांचे मालकी हक्क संपुष्टात आले होते. केवळ पोलीस स्टेशन कोराडी येथील पोलीसांच्या दबावाखाली अमीत डांगोरे याने व इतरानीं म्हणजे मयत शंकर नत्थु निवते आणि गणेश कुदावले यांनी तक्रारदारांचे नावे दिनांक-22/06/2012 रोजीच्या आपसी करारनाम्याचे आधारावर ही तक्रार अतिरिक्त ग्राहक मंचा समक्ष बेकायदेशीररित्या दाखल केलेली आहे तसेच तक्रार 11 वर्षा नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेली असल्याने मुदतबाहय आहे. तक्रारदारांनी विकत घेतलेल्या प्रत्येक भूखंडाची किम्मत ही रुपये-12,000/-असताना प्रत्येक तक्रारदारास रुपये-15,00,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे प्रयोजन उदभवत नाही. प्लॉटचा ताबा देणे ही बाब जिल्हा ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात नाही. घर बांधकामास परवानगी ही बाब ग्राम पंचायत बोखारा यांचे अधिकारातील बाब आहे. उपरोक्त नमुद कारणास्तव ग्राहक मंचाला या तक्रारी चालविण्याचे अधिकारक्षेत्र येत नसल्याने या सर्व ग्राहक तक्रारी दंडासह खारीज करण्यात याव्यात अशी विनंती विरुध्दपक्ष क्रं-3) गणेश पंजाबराव कुदावळे याने केली.
07. विरुध्दपक्ष क्रं- (4) श्री राजेश अमृत वसानी याचे नावे दैनिक लोकशाही वार्ता दिनांक-16/07/2017 रोजी जाहिर नोटीस प्रसिध्द होऊनही विरुध्दपक्ष क्रं-4) तर्फे कोणीही ग्राहक मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही दाखल केले नाही म्हणून उपरोक्त नमुद तक्रारी या विरुध्दपक्ष क्रं 4) याचे विरुध्द एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक-29/08/2012 रोजी पारीत करण्यात आला.
08. तक्रारदारांच्या तक्रारी, तक्रारदारानीं दाखल केलेले दस्तऐवज ज्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी विकत घेतलेल्या भूखंडांचे विक्रीपत्राच्या प्रती, वादातीत जमीन विरुध्दपक्ष क्रं- 4) याचे नावे विक्रीपत्रान्वये विकलेल्या विक्रीपत्राची प्रत, विरुध्दपक्षानीं तक्रारदारांचे नावे करुन करुन दिलेल्या आपसी समझोता पत्राच्या प्रती याचे तसेच विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत दशरथ डांगारे यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं-(1) (अ) ते (1) (फ) ,विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत शंकर नत्थु निवते यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं-(2) (अ) ते (2) (ग) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) यांची लेखी उत्तरे यांचे अवलोकन करण्यात आले. तक्रारदारां तर्फे वकील श्री अवचट यांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत दशरथ डांगारे यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (फ), विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत शंकर नत्थु निवते यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (2) (अ) ते (2) (ग) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) तर्फे मौखीक युक्तीवादाचे वेळी कोणीही उपस्थित नव्हते. दाखल दस्तऐवज आणि मौखीक युक्तीवाद यावरुन अतिरिक्त ग्राहक मंचाचा निष्कर्ष पुढील प्रमाणे-
::निष्कर्ष::
09. विरुध्दपक्ष क्रं- (1) ते क्रं-(3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नत्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले हे मौजा भोकारा, तहसिल नागपूर (ग्रामीण) जिल्हा नागपूर येथील पटवारी हलका क्रं-12-अ, नविन खसरा क्रं-95/2 आणि जुना खसरा क्रं-58/2, आराजी 2 एकरचे मालक असून त्यांनी ही शेती श्रीमती लता भगवानदास दामानी यांचे कडून दिनांक-26/02/2001 रोजी नोंदणीकृत विक्रीपत्राव्दारे खरेदी केली होती व खरेदी नंतर सदर शेतजमीनीच्या फेरफाराची नोंद सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं- (3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नत्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांचे नावावर घेण्यात आली होती. विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं- (3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नत्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी सदर शेतीवर प्रस्तावित ले आऊट पाडून भूखंड विक्री करणे सुरु केले.
10. उपरोक्त नमुद तक्रारदारानीं विरुध्दपक्ष क्रं- (1) ते क्रं- (3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नत्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांचे कडून नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये खरेदी केलेल्या भूखंडांचा संपूर्ण तपशिल परिशिष्ट-अ प्रमाणे पुढील प्रमाणे आहे-
परिशिष्ट-अ
अक्रं | ग्राहक तक्रार क्रमांक | तक्रारदाराचे नाव | भूखंड विक्रीपत्र नोंदणीचा दिनांक | भूखंड क्रंमाक | भूखंडाचे क्षेत्रफळ व भूखंडाचा दर प्रतीचौरसफूट | भूखंडाची एकूण किम्मत | भूखंडापोटी विक्रीपत्र नोंदणीचे वेळी अदा केलेली एकूण रक्कम | शेरा |
1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 |
01 | RBT/CC/13/219 | सौ.जयमाला प्रकाश पाटील, | 25/07/2002 | 20 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
02 | RBT/CC/13/220 | सौ.ज्योती प्रभाकर सोमकुंवर, | 25/07/2002 | 21 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
03 | RBT/CC/13/221 | आनंद रामदास आवडे | 25/07/2002 | 44 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
04 | RBT/CC/13/222 | सौ.किरण पुरुषोत्तम सोनारे | 25/07/2002 | 08 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
05 | RBT/CC/13/223 | नामदेव मारोतराव चांदुरकर | 25/07/2002 | 09 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
06 | RBT/CC/13/224 | सौ.वंदना मुकूंदाजी सोनारे, | 25/07/2002 | 45 | 1200 Sq.Ft. | 12,000/- | 12,000/- | |
11. तक्रारदारांनी नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये खरेदी केलेली भूखंडाची जमीन विरुध्दपक्ष क्रं- (1) ते क्रं- (3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नत्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी परस्पर विरुध्दपक्ष क्रं (4) श्री राजेश अमृत वसानी याचे नावे विक्री केल्या संबधाने
तक्रारदारांचे म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(1) ते क्रं-(3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नथ्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी त्यांचे मालकीची जमीन श्री राजेश अमृत वसानी यांना (पूर्वी तक्रारदारांचे नावे नोंदणीकृत खरेदीखतान्वये विकत घेतलेल्या भूखंडाची जमीन) दिनांक-25/02/2008 रोजीचे नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये परस्पर विकली, ज्याची रजिस्टर नोंद क्रं-1127/2008 आहे, तक्रारदारांनी सदर विक्रीपत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली, ज्यामध्ये शेतजमीन खसरा क्रं-57/1-अ व 57/1-ब एकूण आराजी 2.16 हेक्टर आर पैकी 1.96 हेक्टर आर जमीन श्री राजेश अमृत वसानी यांना विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नथ्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी विकली, त्या शेतजमीनीचे वर्णन मौजा भोकारा, पटवारी हलका क्रं-12-अ, तहसिल नागपूर ग्रामीण येथील भूमापन क्रं-57/1-ब, आराजी-1.20 हेक्टर आर असे आहे. तक्रारदारांनी पुराव्यार्थ विरुध्दपक्ष क्रं-1) ते क्रं-2) यांनी श्री राजेश वसानी यांना विक्री केलेल्या विक्रीपत्राचे दस्तऐवजाची प्रत दाखल केलेली आहे, त्यावरुन तक्रारदारांच्या कथनात सत्यता असल्याचे दिसून येते. अशाप्रकारे दाखल पुराव्या वरुन विरुध्दपक्ष क्रं-(1) ते (3) अनुक्रमे मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, मयत श्री शंकर नथ्थु निवते आणि श्री गणेश पंजाबराव कुदावले यांनी तक्रारदारांचे नावे पूर्वी विक्रीपत्रान्वये नोंदवून दिलेल्या भूखंडाची जमीन परस्पर विरुध्दपक्ष क्रं- (4) राजेश अमृत वसानी याचे नावे नोंदवून देऊन तक्रारदारांची एक प्रकारे फसवणूक तर केलीच आणि अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब सुध्दा केलेला आहे.
दरम्यानचे काळात तक्रारदारांचे नावे भूखंडाची विक्रीपत्रे ज्यांनी नोंदवून दिलीत, त्यातील विरुध्दपक्ष क्रं- (1) श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) श्री शंकर नत्थुजी निवते यांचे निधन झाल्या बाबत ग्राम पंचायत बोखारा यांचे मृत्यू प्रमाणपत्राच्या प्रती अभिलेखावर दाखल करण्यात आलीत. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं-(1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत श्री शंकर नत्थुजी निवते यांचे कायदेशीर वारसदार म्हणून त्यांची नावे तक्रारी मध्ये चढविलीत.
12. आपसी समझोता पत्रा बाबत-
तक्रारदारांच्या म्हणण्या प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-1) श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे (मृतक) तर्फे कायदेशीर वारसदार म्हणून त्याचा मुलगा अमित दशरथ डांगोरे, विरुध्दपक्ष क्रं-2) शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-3) अनुक्रमे गणेश पंजाबराव कुदावळे यांनी विक्री केलेल्या भूखंडांचे मोबदल्यात सर्व तक्रारदारांचे नावाने आपसी समझोत्याने स्वतंत्र आपसी करारनामे दिनांक-22/06/2012 रोजी नोटरी समोर नोंदवून दिलेत, या आपसी करारनाम्याच्या प्रती पुराव्यार्थ दाखल केलेल्या आहेत आणि या स्वतंत्र आपसी करारनाम्याव्दारे तिन्ही विरुध्दपक्षानीं प्रत्येक तक्रारदारास भूखंडाचे मोबदल्यात रुपये-5,00,000/- प्रमाणे दिनांक-22/10/2012 पर्यंत देण्याचे कबुल केलेले आहे.
13 आपसी समझोता पत्रावर घेतलेल्या आक्षेपा बाबत
विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगारे याचा मुलगा अमीत दशरथ डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत शंकर नत्थु निवते तर्फे कायदेशीर वारसदार आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांनी आपसी समझोता पत्रां मधील मजकूर पूर्णपणे अमान्य केला, त्यांचे लेखी उत्तरा नुसार विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगारे याचा मुलगा अमीत दशरथ डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांनी कोराडी पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचारी यांचे दबावाखाली असे आपसी समझोता पत्र लिहून दिलेले आहे, तक्रारदारांनी विकत घेतलेल्या प्रत्येक भूखंडाची किम्मत ही रुपये-12,000/-असताना प्रत्येक तक्रारदारास रुपये-15,00,000/- प्रमाणे नुकसान भरपाई देण्याचे प्रयोजन उदभवत नसल्याचे नमुद केले.
अतिरिक्त मंचा तर्फे या आपसी समझोता पत्रांचे अवलोकन करण्यात आले, आपसी समझोता पत्रावर सही करणारे एक विरुध्दपक्ष क्रं-(2) श्री शंकर नत्थु निवते याचे निधन झालेले आहे तर विरुध्दपक्ष क्रं-(1) श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे याचे सुध्दा निधन झालेले असल्याने त्याचे तर्फे त्याचा मुलगा अमीत दशरथ डांगोरे याने सदर समझोता पत्रांवर सही केलेली आहे. ज्याअर्थी समझोता पत्रावर सही केलेली आहे, त्याअर्थी तक्रारदारांनी विरुध्दपक्षां विरुध्द तक्रारीत केलेले आरोप विरुध्दपक्षां विरुध्द सिध्द होतात. समझोता पत्रावर विरुध्दपक्षां तर्फे कोणतीही कार्यवाही झालेली नाही फक्त अत्यल्प आंशिक रक्कम तक्रारदारांना दिलेली आहे.
14. मुदतीचे आक्षेपाचे संदर्भात-
विरुध्दपक्ष क्रं-(1) मयत दशरथ डांगारे यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं-(1) (अ) ते (1) (फ), विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत शंकर नत्थु निवते यांचे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (2) (अ) ते (2) (ग) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) यांचे उत्तरा नुसार तक्रारदारांनी विक्रीपत्र नोंदवून दिल्या नंतर या तक्रारी जवळपास 11 वर्षा नंतर ग्राहक मंचा समक्ष दाखल केलेल्या असल्याने त्या मुदतबाहय आहेत.
या संदर्भात हे ग्राहक मंच तक्रारी मुदतीत दाखल आहेत या संबधी पुढील मा.राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या निवाडयावर आपली भिस्त ठेवीत आहे-
“Juliet V. Quadros-Versus-Mrs.Malti
Kumar and Ors.” - 2005(2) CPR-1 (NC).
उपरोक्त मा.वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयां मध्ये असे नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करणारा विकासक करारा प्रमाणे भूखंडाचा कब्जा संबधित ग्राहकास देण्यास किंवा त्याने जमा केलेली रक्कम परत करण्यास असमर्थ ठरला तर तक्रार दाखल करण्यास सतत कारण (Continuous cause of action) घडत असते. मा. राष्ट्रीय ग्राहक आयोगाचे निवाडयात असेही नमुद केले आहे की, जर भूखंडाचा विकास करण्यास विकासक/बांधकाम व्यवसायिक काही प्रयत्न करीत नसेल किंवा त्याठिकाणी कुठलेच बांधकाम होत नसेल तर खरेदीदारास मासिक हप्ते नियमित भरणे अपेक्षित नाही. त्यामुळे असा आक्षेप जर विरुध्दपक्ष घेत असेल तर त्या आक्षेपाचा कुठलाही विचार करण्याची गरज नसते.
15. सिव्हील कायद्दातील तरतुदी अंतर्गत मृतकाचे कायदेशीर वारसदारांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येते काय या मुद्दा संबधात-
विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत श्री शंकर नत्थु निवते यांचे निधन झालेले आहे आणि तक्रारदारांची मयत श्री दशरथ डांगारे आणि मयत श्री शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांनी फसवणूक करुन तक्रारदारांचे नावे नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये नोंदवून दिलेल्या भूखंडाची जमीन परस्पर विरुध्दपक्ष क्रं- (4) श्री राजेश अमृत वसानी याचे नावे विक्री केलेली असल्याने मयत श्री दशरथ डांगोरे आणि मयत श्री शंकर निवते यांचे फसवणूकीचे व्यवहारा संबधाने त्यांचे कायदेशीर वारसदारांची तक्रारदारांची झालेली नुकसानी भरुन देण्याची जबाबदारी येते काय हा येथे महत्वाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित होतो.
या संदर्भात मंचा तर्फे स्पष्ट करण्यात येते की, मृतकाने फसवणूक केलेल्या फौजदारी कृत्य संबधी जरी त्याचे कायदेशीर वारसदारांची जबाबदारी येत नसली तर मृतकाने केलेल्या फसवणूकीच्या मालमत्तेच्या व्यवहारा संबधाने दिवाणी कायदा अंतर्गत नुकसान भरपाई संबधाने जी काही रक्कम देय असेल ती फेडण्याची जबाबदारी ही मृतकाचे कायदेशीर वारसदार म्हणून त्याचे वारसदारांची येते कारण मृतकाचा मृत्यू झाल्या नंतर त्याचे तर्फे त्याचे कायदेशीर वारसदार हे मृतकाचे मालमत्ते मध्ये मालक झालेले असतात. अशाप्रकारचे अनेक मा.वरिष्ठ न्यायालयाचे निर्णय दिलेले आहेत, त्यामुळे
आम्ही विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत श्री शंकर नत्थु निवते यांनी फसवणूक केल्याने तक्रारदारांचे जे काही आर्थिक नुकसान झालेले आहे, त्या संबधाने नुकसान भरपाई देण्यास त्यांचे कायदेशीर म्हणजे विरुध्दपक्ष क्रं-(1) (अ) ते (1) (ड), विरुध्दपक्ष विरुध्दपक्ष क्रं-(2) (अ) ते (2) (इ) यांना सुध्दा विरुध्दपक्ष क्रं-(3) सोबत जबाबदार ठरवित आहोत.
विरुध्दपक्ष क्रं-(1) श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे यांचे निधन झालेले आहे, त्यांच्या विवाहित मुली विवाहा नंतरचे नाव विरुध्दपक्ष क्रं-(1) (इ) सौ.शितल राजु सहारे आणि विरुध्दपक्ष क्रं-(1) (फ) सौ.सोनम प्रमोद कुदावळे यांनी लेखी उत्तरा मध्ये त्यांची या प्रकरणात जबाबदारी येत नसल्या बाबत तसेच त्यांना वडीलांचे व्यवहारा बाबत काहीच कल्पना नसल्याचे नमुद केलेले आहे, या मुली विवाहित आहेत, त्यांचा या जमीन व्यवहाराशी कोणताही संबध दिसून येत नसल्याने त्यांना या तक्रारीं मधून मुक्त करणे योग्य राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्रं-(2) श्री शंकर नत्थु निवते यांचे सुध्दा निधन झालेले आहे, त्यांच्या विवाहित मुली विवाहा नंतरचे नाव विरुध्दपक्ष क्रं-(1) (फ) सौ.इंदिरा मदन कुंदावळे आणि विरुध्दपक्ष क्रं- (1) (ग) सौ.रंजना तुळशीराम चौरसे यांनी सुध्दा लेखी उत्तरा मध्ये त्यांची या प्रकरणात जबाबदारी येत नसल्या बाबत तसेच त्यांना वडीलांचे व्यवहारा बाबत काहीच कल्पना नसल्याचे नमुद केलेले आहे, या मुली विवाहित आहेत, त्यांचा या जमीन व्यवहाराशी कोणताही संबध दिसून येत नसल्याने त्यांना या तक्रारीं मधून मुक्त करणे योग्य राहिल असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
16. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) मयत श्री शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) गणेश पंजाबराव कुदावळे यांचे कडून नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये विकत घेतलेल्या भूखंडाची जमीन, विरुध्दपक्ष क्रं- (1) ते (3) यांनी परस्पर पणे विरुध्दपक्ष क्रं- (4) राजेश अमृत वसानी याचे नावे विक्री केलेली असल्याने आता तक्रारदारांच्या नावे भूखंडाचे ताबे देण्याचा आदेश देता येणार नाही मात्र प्रत्येक तक्रारदारानीं भूखंडापोटी भूखंडाची पूर्ण किम्मत प्रत्येकी रक्कम रुपये-12,000/- विक्रीपत्र नोंदणी दिनांक-25/07/2002 दिनांकाला दिलेली आहे परंतु तक्रारदारांनी विकत घेतलेल्या भूखंडाची जमीन विरुध्दपक्ष क्रं- (1) ते क्रं- (3) यांनी परस्पर विरुध्दपक्ष क्रं- 4) याला विकलेली असल्याने तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे त्यांनी विकत घेतलेल्या भूखंडाचे ताबे देण्याचे आदेशित करता येणार नाही, त्यामुळे प्रत्येक तक्रारदाराने भूखंडापोटी दिलेली रक्कम रुपये-12,000/- दिनांक-25/07/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह मिळून येणारी भूखंडाची रक्कम प्रत्येक तक्रारदार परत मिळण्यास तसेच तक्रारदारांनी नोंदणीकृत विक्रीपत्रान्वये खरेदी केलेले भूखंड परस्पर तक्रारदारांना कोणतीही कल्पना न देता विरुध्दपक्ष क्रं-(4) श्री राजेश अमृत वसानी याचे नावे विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांनी विक्री करुन अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केल्याने तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-1500/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-1500/- या प्रमाणे नुकसान भरपाईच्या रकमा विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे तर्फे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (ड) आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते तर्फे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं- (2) (अ) ते (2) (इ) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) गणेश पंजाबराव कुदावळे हे वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या देण्यास जबाबदार आहेत,असे मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्षां तर्फे आपसी समझोत्यापोटी अत्यल्प आंशिक रक्कम तक्रारदारांना दिलेली आहे, त्या रकमेचे योग्य ते समायोजन उभय पक्षां तर्फे करण्यात यावे.
मंचा तर्फे येथे स्पष्ट करण्यात येते की, तक्रारदारानीं भूखंड खरेदी संबधाने जे काही विक्रीपत्र नोंदणीचे व्यवहार केलेले आहेत, ते विरुध्दपक्ष क्रं-(1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे, विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांचेशी केलेले आहेत आणि त्यानंतर विरुध्दपक्ष क्रं- (1) ते क्रं- (3) यांनी वादातीत भूखंडाची जमीन ही परस्परपणे फसवणूकीने विरुध्दपक्ष क्रं- (4) श्री राजेश अमृत वसानी याचे नावे विक्री केलेली आहे, तक्रारदारांच्या व्यवहाराशी विरुध्दपक्ष क्रं- (4) याचा प्रत्यक्ष्य कोणताही संबध आलेला नसल्याने विरुध्दपक्ष क्रं- (4) श्री राजेश अमृत वसानी याचे विरुध्दच्या तक्रारी खारीज करण्यात येतात.
17. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारीं मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे-
::आदेश::
1) उपरोक्त नमुद ग्राहक तक्रार क्रं- RBT/CC/13/219 TO RBT/CC/13/224 मधील तक्रारदार सौ.जयमाला प्रकाश पाटील आणि इतर-05 यांच्या तक्रारी, उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे तर्फे कायदेशीर वारसदार क्रं- (1) (अ) ते (1) (ड) आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते तर्फे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं-(2) (अ) ते (2) (इ) आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांचे विरुध्द वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या अंशतः मंजूर करण्यात येतात.
2) “ उपरोक्त नमुद विरुध्दपक्षानां” आदेशित करण्यात येते की, प्रत्येक तक्रारदाराने भूखंडाचे विक्रीपोटी दिलेली रक्कम प्रत्येकी रुपये-12,000/- प्रमाणे दिनांक-25/07/2012 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-12% दराने व्याजासह मिळून येणारी भूखंडाची रक्कम प्रत्येक तक्रारदाराला निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत परत करावी. विरुध्दपक्षां तर्फे आपसी समझोत्यापोटी अत्यल्प आंशिक रक्कम तक्रारदारांना दिलेली आहे, त्या रकमेचे योग्य ते समायोजन उभय पक्षां तर्फे करण्यात यावे.
3) उपरोक्त नमुद तक्रारदारांना झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल प्रत्येकी रुपये-1500/- (अक्षरी प्रत्येकी रुपये एक हजार पाचशे फक्त) आणि तक्रारीचा खर्च म्हणून प्रत्येकी रुपये-1500/-(अक्षरी प्रत्येकी रुपये एक हजार पाचशे फक्त) उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष क्रं- (1) (अ) ते (1) (ड) आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) (अ) ते (2) (इ) आणि विरुध्दपक्ष क्रं-(3) यांनी तक्रारदारांना द्दावेत.
4) सदर आदेशाचे अनुपालन उपरोक्त नमुद विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे तर्फे कायदेशीर वारसदार क्रं-(1) (अ) ते (1) (ड) आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते तर्फे कायदेशीर वारसदार विरुध्दपक्ष क्रं-(2) (अ) ते (2) (इ) आणि विरुध्दपक्ष क्रं- (3) गणेश पंजाबराव कुदावळे यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिकरित्या (Jointly and Severally) निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्या पासून 30 दिवसांचे आत करावे.
5) विरुध्दपक्ष क्रं- (1) मयत श्री दशरथ रामप्रसाद डांगोरे यांच्या विवाहित मुली विवाहा नंतरचे नाव विरुध्दपक्ष क्रं- (1) (इ) सौ.शितल राजु सहारे आणि विरुध्दपक्ष क्रं- (1) (फ) सौ.सोनम प्रमोद कुदावळे आणि विरुध्दपक्ष क्रं- (2) मयत श्री शंकर नत्थु निवते यांच्या विवाहित मुली विवाहा नंतरचे नाव विरुध्दपक्ष क्रं-(2) (फ) सौ.इंदिरा मदन कुंदावळे आणि विरुध्दपक्ष क्रं-(2) (ग) सौ.रंजना तुळशीराम चौरसे यांचा जमीन व्यवहाराशी कोणताही प्रत्यक्ष्य संबध दिसून येत नसल्याने त्यांना या तक्रारीं मधून मुक्त करण्यात येते.
6) विरुध्दपक्ष क्रं- (4) श्री राजेश अमृत वसानी याचे विरुध्दच्या तक्रारी उपरोक्त नमुद कारणास्तव खारीज करण्यात येतात.
7) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन
देण्यात याव्यात.निकालपत्राची मूळ प्रत ग्राहक तक्रार क्रं-RBT/CC/13/219 मध्ये लावण्यात यावी, अन्य ग्राहक तक्रारीं मध्ये प्रमाणित प्रती लावण्यात याव्यात.