Maharashtra

Thane

CC/71/2013

श्री मदन सुदाम भक्‍ता - Complainant(s)

Versus

श्री आनंद कंन्‍ट्रक्‍शन, बिल्‍डर व डेव्‍हलपर्स - Opp.Party(s)

ए बि जहागीरदार

10 Aug 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/71/2013
 
1. श्री मदन सुदाम भक्‍ता
इंडेल संकुल, रूम नं. 11,गेट नं. 196, प्‍लॉट नं.115, समर्थ मंदिर जवळ, श्रमिक नगर, सतपन, नाशिक, 400012 मो नं.9881019080
नाशिक
ठाणे
...........Complainant(s)
Versus
1. श्री आनंद कंन्‍ट्रक्‍शन, बिल्‍डर व डेव्‍हलपर्स
श्री उमाशंकर मिश्री, श्री संदीप वाले, नेताजी नगर, निरंकारी मंदीर जवळ, टाटा पॉवर,अडवली गाव,कल्‍याण (ईस्‍ट)मो.नं. 9527168331,9224366668
ठाणै
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

              न्‍यायनिर्णय   

               (द्वारा श्री. ना.द.कदम -मा.सदस्‍य)

 

 

  1. सामनेवाले ही बांधकाम भागीदारी संस्‍था आहे. तक्रारदार हे नाशिक येथील रहिवासी आहेत. तक्रारदारांनी सामनेवाले यांजकडून विकत घेतलेल्‍या सदनिकेबाबत प्रस्‍तुत वाद निर्माण झाला आहे

  2. सामनेवाले यांनी कल्‍याण येथील नांदिवली भोलेनाथ नगर येथे विकसित केलेल्‍या चाळ नं. 1 मधील 300 चौ.फू. क्षेत्रफळाची खोली नं. 1 रु. 2.75 लाख इतक्‍या किंमतीस विकत घेण्‍याचा व्‍यवहार सामनेवाले यांचेशी करुन एकूण किंमत रु. 2.75 लाख सामनेवाले यांना धनादेश तसेच रोखीद्वारे अदा केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांशीदि. 14/02/2012 रोजी नोटराईज्‍ड करारनामा केला. त्‍यामध्‍ये खोली विकण्‍याच्‍यासंदर्भात पूर्ण किंमत मिळाल्‍याचे त्‍यांनी मान्‍य केले आहे. सदर करारनाम्‍यानुसार सामनेवाले यांनी खोलीचा सुस्थितीत ताबा देण्‍याचे मान्‍य केले होते. तथापि, अनेकवेळा विनंती करुनसुध्‍दा सामनेवाले यांनी खोलीचा ताबा दिला नाही. उलट किंमतीपोटी दिलेली रक्‍कम परत घेण्‍याचा सातत्‍याने आग्रह चालू ठेवला. त्‍यानुसार सामनेवाले रु. 90,000/- प्रत्‍येकी प्रमाणे 3 धनादेश तक्रारदारांना दिले. मात्र सदर धनादेश बँकेमध्‍ये जमा केला असता अपुरा निधी या कारणाने परत आले. यानंतर तक्रारदारांनी अनेकवेळा विनंतीकरुनसुध्‍दा सामनेवाले यांनी कोणतीही कार्यवाही न केल्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन सामनेवाले यांनी नोंदणीकृत करारनामा करावा, नुकसान भरपाई रु. 5 लाख मिळावी व तक्रार खर्च रु. 40,000/- मिळावा अशा मागण्‍या तक्रारदारांनी केल्‍या आहेत.

  3. सामनेवाले यांचेवतीने अॅड. दुबे यांनी दि. 21/11/2013 रोजी वकालतनामा दाखल केला तसेच दि. 21/11/2013 रोजीच्‍या अर्जान्‍वये कैफियत दाखल करणेकामी मुदतीची विनंती केली. ती त्‍यांना देण्‍यात आली. यानंतर त्‍यांना बराच काळ संधी मिळूनही कैफियत दाखल न केल्याने दि. 17/04/2014 रोजी त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले

  4. यानंतर त‍क्रारदारांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या सर्व कागदपत्रांचे सुक्ष्‍म वाचन मंचाने केले. त्‍यांचा तोंडी युक्‍तीवादही ऐकण्‍यात आला. त्‍यावरुन प्रकरणामध्‍ये खालीलप्रमाणे निष्‍कर्ष निघतातः

    1. तक्रारदारांनी तक्रारीमधील परिच्‍छेद 2 मध्‍ये असे नमूद केले आहे की, कल्‍याण येथील नांदिवली भोलेनाथनगर येथे चाळ नंबर 1 मधील खोली नंबर 1 ही रु. 2.75.000/- रकमेस विकत घेतली व ही रक्‍कम पूर्णतः सामनेवाले यांना अदा केली. तक्रारदारांच्‍या या कथनाच्‍यापृष्‍ठयर्थ तक्रारदारांनी शपथेवर दोन पावत्‍या दाखल केल्‍या आहेत. पावती क्र. 079 दि. 14/03/2011 व पावती क्र. 1 दि. 19/03/2012. सदर पावत्‍यांचे अवलोकन केले असता दि. 14/03/2011 रोजीच्‍या पावती क्र. 079 तक्रारदारांनी चाळ क्र. 1 मधील 250 चौ.फू. क्षेत्रफळाची खोली क्र. 6 विकत घेण्‍यासाठीरु. 30,000/- सामनेवाले यांना दिले होते. मात्र तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्छेद 2 मध्‍ये चाळ नं. 1 मधील 300 चौ.फू. क्षेत्रफळाची खोली नं.1 विकत घेतल्‍याची बाब नमूद करुन पूर्ण तक्रारीमध्‍ये, तसेच, मागण्‍यांमध्‍ये (Prayer) खोली क्र. 6 चा कुठेही उल्‍लेख केला नाही. खोली क्र. 6 चे क्षेत्रफळ 250 चौ.फू. तर तक्रारीमधील खोली क्र. 1 चे क्षेत्रफळ 300 चौ.फू. असल्‍याने व पावती क्र. 079 दि. 14/03/2011 संबंधी कोणताही वाद तक्रारदारांनी उपस्थित केला नसल्‍याने सदरील पावती विचारात घेता येणार नाही.

       

      1. दि. 19/03/2012 रोजीची पावती क्र. 1 अन्‍वये सामनेवाले यांनी चाळ नं.1, खोली क्र. 1 च्‍या विक्रीसंदर्भात प्रत्‍येकी रु. 5,000/- रकमेचे, पुढील तारखेचे 19 धनादेश स्विकारल्‍याचे नमूद केले आहे. मात्र, सदर पावतीअन्‍वये एकूण रु. 1,50,000/- स्विकारल्‍याची पोच दिली आहे. सदर पावतीमधील तपशिलानुसार प्रत्‍येकी रु. 5,000/- चे 19 धनादेश म्‍हणजे एकूण रु. 95,000/- रकमेचे धनादेश मिळाले असतांना पोच मात्र रु. 1,50,000/- इतक्‍या रकमेची दिली आहे. सबब एकाच पावतीवरील दोन वेगवेगळया रकमांचा उल्‍लेख असल्‍याने तसेच तक्रारदारांना सदर 19 धनादेशांचे अधिदान सामनेवाले यांना झाल्‍याबाबत कोणताही पुरावा सादर न केल्‍याने सदरील पावती विचारात घेणे योग्‍य होणार नाही असे मंचाचे मत आहे.

  5. तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद क्र. 4 मध्‍ये सामनेवाले यांनी दि. 14/02/2012 रोजी खोली विक्रीचा नोटराईज्‍डकरारनामा करुन दिल्‍याचे स्‍पष्‍ट करुन सदर करारनाम्‍यामध्‍ये सामनेवाले यांनी रु. 2.75 लाख इतकी रक्‍कम स्विकारल्‍याची पोच तक्रारदारांनी दिल्‍याचे नमूद केले आहे. संचिकेची संपूर्ण पडताळणी केली असता तक्रारदारांनी दि. 14/02/2012 रोजीचा नोटराइज्ड करारनामा दाखल केल्‍याचे कुठेही आढळून आले नाही अथवा लिस्‍ट ऑफ डॉक्‍युमेंटमध्‍ये तसा उल्‍लेखही नाही. त्‍यामुळे सामनेवाले यांना रु. 2.75 लाख मिळाल्‍याची बाब ग्राहय धरता येणार नाही. शिवाय तक्रारदारांनी रु. 2.75 लाख दिल्‍याबाबत अन्‍य कोणताही पुरावा सादर न केल्‍याने सदर रक्‍कम सामनेवाले यांना दिल्‍याचे तक्रारदारांचे कथन अग्राहय आहे.

  6. तक्रारदारांनी तक्रारीच्‍या परिच्‍छेद 5 मध्‍ये असे नमूद केले आहे की सामनेवाले यांनी तक्रारदारांस प्रत्येकी रु. 90,000/- रकमेचे तीन धनादेश दिले व ते बँकेत जमा केले असता अनादर होऊन ते परत आले. तक्रारदारांनी या कथनापृष्‍ठयर्थ सदरील तीन धनादेश एच.डी.एफ.सी. बँकेमधील तक्रारदारांच्‍या खात्‍यामध्‍ये पेईंग इन स्‍लीपद्वारे जमा केल्‍याबाबत तीन काऊंटर स्‍लीपस् दाखल केल्‍या आहेत. मात्र सदर धनादेश सामनेवालेकडूनच प्राप्‍त झाल्‍याचा इतर कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केला नाही. इतकेच नाही तर सदर धनादेश अनादर झाल्‍याबाबत बँकेने पाठलेल्‍याइंटिमेशन अथवा बँक पासबुकामधील नोंदी अथवा अनादरीत धनादेशाच्‍या छायाप्रती यापैकी कोणताही पुरावा दाखल केला नाही. त्‍यामुळे सदर धनादेश अनादर झाले हे तक्रारदारांचे शाब्दिक कथन पुराव्‍याअभावी विचारात घेता येणार नाही.

  7. उपरोक्‍त चर्चेनुरुप व निकषानुसार स्‍पष्‍ट होते की तक्रारदारांनी आपल्‍या तक्रारीमधील कथनाच्‍या अथवा मागणींच्‍यासंदर्भात विश्‍वासार्ह असा कोणताही पुरावा दाखल न केल्‍याने सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्रुटीची सेवा दिली या निष्‍कर्षाप्रत मंच येऊ शकत नाही. त्‍यावरुन खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

  8.               आ दे श

  9. तक्रार क्र. 71/2013 खारीज करण्‍यात येत आहे.

  10. खर्चाबाबत आदेश नाही.

  11. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब विनाशुल्‍क देण्‍यात याव्‍यात.

  12. सामनेवाला यांचा एकतर्फा आदेश रद्द करण्‍याबाबतचा अर्ज, तदतुदीअभावी खारीज करण्‍यात आला आहे.

  13. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदारांना परत करावे.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.