Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/150

श्री.किरण आनंदराव देवाळकर - Complainant(s)

Versus

श्रीराम जनरल इन्‍शुरंन्‍स कंपनी लि. - Opp.Party(s)

अमोल बी पोंगडे

22 Jan 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/150
 
1. श्री.किरण आनंदराव देवाळकर
रा.प्‍लॉट नं.90 राहाटे ले-आऊट परसोडी तह.उमरेड
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. श्रीराम जनरल इन्‍शुरंन्‍स कंपनी लि.
कार्यालय इ-8 इपीआर. रीक्‍को इंडस्ट्रियल एरीया सितापुर
जयपुर
राजस्‍थान
2. श्रीराम जनरल इन्‍शुरंन्‍स कंपनी लि.
स्‍थानिक कार्यालय टी-5 श्रध्‍दा हाऊस तिसरा मजला 345 किंग्‍जवे रोड नागपुर
नागपूर - 01
महाराष्‍ट्र
3. शाखा अधिकारी कोटक महिन्‍द्रा बँक लि
पाचवा माळा उषा कॉम्‍प्‍लेक्‍स 345 किंग्‍जवे रोड नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

(पारीत दिनांक-22 जानेवारी, 2014 )

1.    तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षा कडून वाहनाचे विम्‍या संबधीची रक्‍कम मिळावी व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.

2.     तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

       विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी असून, विरुध्‍दपक्ष क्रं-2 हे विमा कंपनीचे स्‍थानिक शाखा कार्यालय आहे. तक्रारकर्त्‍याचा रेती आणि गिटटी पुरविण्‍याचा व्‍यवसाय आहे. त्‍या अनुषंगाने तक्रारकर्त्‍याने टाटा कंपनीचा टिप्‍पर हे वाहन विकत घेण्‍याचे ठरविले. वाहनाची एकूण किंमत रुपये-12,06,678/- पैकी तक्रारकर्त्‍याने स्‍वतः रुपये-3,00,000/- जमा केले आणि उर्वरीत रक्‍कम रुपये-09,06,678/- चे अर्थ सहाय्य विरुध्‍दपक्ष क्रं-3 कडून घेऊन वाहन खरेदी केले. सदर वाहनाचा इंजीन क्रं-697 T.C.56, GRZ 838892 आणि चेचीस क्रं-373135 GRZ 730083 असा असून, वाहनाचा नोंदणी क्रं-MH-40/N-342 असा आहे. सदर वाहनाचा विमा सुरुवातीस नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी कडून काढण्‍यात आला होता. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दि.29.10.2011 ते 28.10.2012 या कालावधी करीता विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 कडून सदर वाहनाची  विमा पॉलिसी उतरवली.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दि.27.11.2011 रोजी ग्राहकास गिटटी पुरविण्‍यासाठी त.क.चे वाहनचालक महेश मिसाळ याने मंगरुळ फाटया जवळून विमाकृत वाहनात गिटटी भरली व दुसरे दिवशी सकाळी गिटटी उतरवावयाची असल्‍याने विमाकृत वाहन तक्रारकर्त्‍याचे घरासमोर उभे केले व चाबी तक्रारकर्त्‍याकडे जमा करुन वाहनचालक निघून गेला.  दुसरे दिवशी दि.28.11.2011 रोजी वाहनचालक तक्रारकर्त्‍याचे घरी आला व वाहनाची चाबी


 

घेऊन गेला असता त्‍याला विमाकृत वाहन न दिसल्‍याने अवघ्‍या दोन मिनिटात घरी परत आला व वाहन दिसत नसल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याने जवळपास विमाकृत वाहनाचा शोध घेतला असता वाहन आढळून न आल्‍याने तक्रारकर्ता पोलीस स्‍टेशन, उमरेड येथे रिपोर्ट देण्‍यासाठी गेला असता तेथील पोलीस निरिक्षक श्री मधुकर गिते यांनी प्रथम वैयक्तिक पातळीवर वाहनाचा शोध घेण्‍यास सुचित केले व वाहन आढळून न आल्‍यास नंतर रिपोर्ट देण्‍यास सांगितले. विमाकृत वाहन चोरी गेल्‍या संबधीचे वृत्‍त दैनिक लोकमत मध्‍ये दि.30.11.2011 रोजी प्रकाशित झाले. विमाकृत वाहनाचा वैयक्तिक पातळीवर शोध घेऊनही ते आढळून न आल्‍याने तक्रारकर्त्‍याने त्‍या संबधीचे पत्र पोलीस स्‍टेशनला दि.04.12.2011 रोजी दिले. त्‍यानुसार पोलीस निरिक्षक श्री गिते यांनी जवळपासचे परिसरात विमाकृत वाहना संबधाने वायरलेस संदेश देण्‍यास सांगितले. वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍या संबधीची सुचना तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनीस टोल नंबरवरुन त्‍वरीत दिली त्‍याच बरोबर वि.प.क्रं 3 यांना व आर.टी.ओ.ग्रामीण नागपूर यांना सुध्‍दा सुचना दिली.

     तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, वैयक्तिक पातळीवरुन सुध्‍दा विमाकृत वाहन आढळून न आल्‍याने पोलीस स्‍टेशन, उमरेड यांचेकडे वाहनाचा रिपोर्ट नोंदविण्‍यास विनंती केल्‍या नंतर, पोलीस स्‍टेशन, उमरेड यांनी दि.22.12.2011 रोजी विमाकृत वाहनाचे चोरी संबधीचा रिपोर्ट नोंदविला. परंतु पोलीसानां सुध्‍दा विमाकृत वाहन आढळून आले नाही व पुढे तसा अहवाल न्‍यायालयात पोलीसानीं सादर केला.

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, दि.01.12.2012 रोजी ( सदर दिनांक तक्रारकर्त्‍याने चुकीचा नमुद केला असून तो दिनांक 01.12.2011 असा आहे असे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे पत्राचे प्रती वरुन स्‍पष्‍ट होते.) विरुध्‍दपक्ष क्रं 2 यांनी तक्रारकर्त्‍याकडे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांना पाठविले. इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे मागणी नुसार तक्रारकर्त्‍याने दि.15.12.2011 रोजी यादी नुसार दस्‍तऐवज श्री राजन यांचेकडे सादर केलेत. त्‍यावरुन वि.प.क्रं 1 व 2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा क्‍लेम नोंदवून घेतला आणि त्‍याचा क्रमांक-10000/31/12/C/044214 असा आहे. वि.प.विमा कंपनीने लवकरात लवकर विमा दाव्‍या संबधी निर्णय घेतल्‍या जाईल असे सांगितले. दरम्‍यानचे काळात तक्रारकर्त्‍याने वारंवार विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे कार्यालयास विमा दाव्‍या संबधी भेटी दिल्‍यात व वेळोवेळी आवश्‍यकते नुसार दस्‍तऐवजांची पुर्तता केली. वाहन चोरीस गेल्‍या नंतर सुध्‍दा कर्ज तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 या वित्‍तीय कंपनीकडे परतफेडीचे हप्‍ते वेळोवेळी जमा केलेत व हप्‍ता थकीत ठेवला नाही.

 

 

 

 

      तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, अशी स्थिती असताना विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे शाखा कार्यालयाने दि.18.06.2012 रोजीचे पत्र तक्रारकर्त्‍यास पाठवून त्‍याव्‍दारे विमाकृत वाहन चोरीची तक्रार दि.01.12.2011 व पोलीसानीं दि.22.12.2011 रोजी दिली त्‍यामुळे विमा दावा नाकारण्‍यात आला आहे. विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची घटना विलंबाने दिल्‍या बद्दल तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारला ही वि.प.क्रं 1 व 2 विमा कंपनीची कृती पूर्णतः निरर्थक आहे. म्‍हणून तक्रारकतर्याने वि.प.क्रं 1 व 2 विमा कंपनीस दि.28.08.2012 रोजी अधिवक्‍त्‍याचे मार्फतीने कायदेशीर नोटीस पाठविली, सदर नोटीस प्राप्‍त होऊनही वि.प.क्रं 1 व 2 ने नोटीसचे उत्‍तरही दिले नाही.     तक्रारकर्त्‍याचा विमा दावा वि.प.विमा कंपनीने फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षाने अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारकर्त्‍याची फसवणूक केली. म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने मंचा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.

तक्रारकर्त्‍याची प्रार्थना-

1)         विरुध्‍दपक्ष  क्रं 1 व 2 विमा कंपनीस, तक्रारकर्त्‍यास

           विमाकृत वाहनाचे चोरी संबधाने विमा दावा रक्‍कम

           रुपये-7,50,000/- व त्‍यावर विमा क्‍लेम दाखल दिनांका पासून

           द.सा.द.शे.12% दराने व्‍याज यासह रक्‍कम देण्‍याचे आदेशित

           व्‍हावे.

2)         तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल नुकसान

           भरपाई म्‍हणून रुपये-1,50,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च

           रुपये-15,000/- विरुध्‍दपक्षानीं देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

3)         विरुध्‍दपक्षाने सेवेत त्रृटी आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब

           केल्‍यामुळे 10 महिन्‍याचे व्‍यवसायिक हानी संबधाने रुपये-

           6,30,000/- आणि विरुध्‍दपक्षाने वारंवार बोलाविल्‍यामुळे कामधंदा

           सोडून भेटी द्दाव्‍या लागल्‍यामुळे रुपये-50,000/- विरुध्‍दपक्षा कडून

           मिळावेत.

 

 

 

 

 

3.      विरुध्‍दपक्ष क्रं -1 व 2 विमा कंपनी तर्फे एकत्रितरित्‍या प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर नि.क्रं 11 अनुसार न्‍यायमंचा समक्ष सादर करण्‍यात आले. वि.प.विमा कंपनीने प्राथमिक आक्षेप घेतला की, तक्रारकर्त्‍याने चुकीची आणि सत्‍य वस्‍तुस्थिती लपवून प्रस्‍तुत तक्रार मंचा समक्ष दाखल केलेली असल्‍याने ती खारीज व्‍हावी. विमा पॉलिसीतील अटी व शर्ती नुसार ते विमा दावा मंजूर करतात. वि.प.विमा कंपनीने पॉलिसीतील अट क्रं 5 कडे लक्ष वेधून तक्रारकर्त्‍याने सदर अटीचा भंग केल्‍याचे नमुद केले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात पॉलिसीतील अट क्रं-5 उदधृत केली आहे-

 

“ The insured shall take all reasonable steps to safeguard the vehicle from loss or damage and or to maintain it in efficient condition and the Company shall have at all times free and full access to examine the vehicle or any part thereof or any driver or employee of the insured.  In the event of any accident or breakdown, the vehicle shall not be left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if the vehicle be driven before the necessary repairs are effected any extension of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at the insured’s own risk”.  

 

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे चोरी संबधीची सुचना घटना घडल्‍या पासून 05 दिवस संपल्‍या नंतर विमा कंपनीस दिलेली आहे आणि पोलीसानां चोरीची सूचना 20 दिवस उशिराने दिलेली आहे. पॉलिसीतील अट क्रं-1 चे तक्रारकर्त्‍याने उल्‍लंघन केलेले आहे.  वि.प.विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात पॉलिसीतील नमुद अट खालील प्रमाणे उदधृत केली आहे-

               Notice shall be given in writing to the company immediately  

               upon  the occurrence of any accidental loss or damage in the

               event of any claim and thereafter the insured shall give all such

               information and assistance as the company shall require.

 

          पॉलिसीतील शेडयुल मध्‍ये नमुद केल्‍या नुसार चोरीची घटना घडल्‍या पासून त्‍वरीत लेखी सुचना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस देणे बंधनकारक आहे आणि त्‍यानंतर विमाधारकाने योग्‍य ती माहिती आणि सहकार्य विमा कंपनीस


 

 

करणे आवश्‍यक आहे. चोरीचे घटनमध्‍ये त्‍वरीत लेखी नोटीस पोलीसांकडे देणे आवश्‍यक आहे.

       वि.प.विमा कंपनीने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्रांवर आपली भिस्‍त ठेवली.  वि.प.विमा कंपनीचे संक्षीप्‍त म्‍हणणे असे आहे की, विमा दाव्‍या संबधाने चोरीची घटना घडल्‍या नंतर   लेखी सूचना त्‍वरीत विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस आणि त्‍वरीत लेखी सुचना पोलीसानां देणे आवश्‍यक आहे, पोलीसानां त्‍वरीत सुचना दिल्‍यामुळे पोलीस यंत्रणा कार्यास लागून चोरीचे वाहन मिळू शकते, जे वैयक्तिक पातळीवर शक्‍य नाही. प्रस्‍तुत तक्रार प्रकरणात चोरीची घटना त्‍वरीत पोलीसां कडे नोंदविलेली नसल्‍यामुळे विमा अटी व शर्तीचा भंग झालेला आहे म्‍हणून तक्रारकर्त्‍यास विमा दावा देय नाही.

      वि.प.विमा कंपनीने पुढे असे नमुद केले की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिलेली नाही. तक्रारकर्त्‍याचे वाहन दि.26.11.2011 रोजी चोरीस गेले आणि त्‍या बद्दलची सुचना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस दि.01.12.2011 रोजी म्‍हणजे 06 दिवसा नंतर उशिराने देण्‍यात आली, जे पॉलिसीतील नमुद अटी व शर्तीचे विरुध्‍द आहे. तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची सुचना उशिरा दिल्‍यामुळे चोरी संबधीची सत्‍य वस्‍तुस्थिती समोर येऊ शकली नाही आणि त्‍यामुळे चोरीची घटना ही संशयास्‍पद वाटते. तक्रारकर्त्‍याची तक्रार चुकीची असल्‍याने ती खर्चासह खारीज व्‍हावी, असा उजर विरुध्‍दपक्ष क्रं 1 व 2 विमा कंपनी तर्फे घेण्‍यात आला.

 

4.     विरुध्‍दपक्ष क्रं-3 शाखा अधिकारी, कोटक महिंद्रा लिमिटेड, पाचवा माळा, उषा कॉम्‍प्‍लेक्‍स, नागपूर या नाव आणि पत्‍त्‍यावर मंचा तर्फे रजिस्‍टर नोटीस पाठविली असता ती विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना प्राप्‍त झाल्‍या बद्दलची पोच नि.क्रं-8 वर उपलब्‍ध आहे. परंतु नोटीस तामील होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 3 मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही सादर केले नाही म्‍हणून वि.प.क्रं 3 विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश मंचाने प्रकरणात दि.27.09.2013 रोजी पारीत केला.

 

 

 

 

 

 

 

 

5.    तक्रारकर्त्‍याने तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली. सोबत यादी नुसार दस्‍तऐवज दाखल केले, ज्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने  विमाकृत वाहनाचे नोंदणी संबधीचे दस्‍तऐवज, आरटीओ नागपूर यांनी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस दिलेले पत्र, विमा पॉलिसीची प्रत, विमाकृत वाहन चालकाचा वाहन चालविण्‍याचा परवाना, पोलीस स्‍टेशन यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेले पत्र, विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या बाबत वृत्‍तपत्रातील बातमी, तक्रारकर्त्‍याने आरटीओ ग्रामीण नागपूर यांना दिलेले पत्र, इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांचे पत्र, एफआयआर प्रत, अंतिम अहवाल, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा फेटाळल्‍या बद्दल दिलेले पत्र, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस पाठविलेली नोटीस, पोच अशा दस्‍तऐवजांच्‍या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्‍याने नि.क्रं 12 अनुसार प्रतीउत्‍तर दाखल केले.

 

6.    विरुध्‍दपक्ष क्रं-1 व 2 विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तर प्रतिज्ञालेखावर दाखल केले. अन्‍य दस्‍तऐवज दाखल केले नाहीत. तसेच मा.वरिष्‍ठ न्‍यायालयाचे निकालपत्र दाखल केले.

 

7.   प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री अमोल पोंगडे तर विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे वकील श्री सचिन जयस्‍वाल यांचा  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

8.    तक्रारकर्त्‍याची तक्रार, वि.प.विमा कंपनीचे लेखी उत्‍तर, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे निर्णयार्थ उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दे                              उत्‍तर

(1)                 वि.प.विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा

       विमा दावा नाकारुन आपले

       सेवेत त्रृटी ठेवली आहे काय?............................होय.

   (2)   काय आदेश?.............................................. अंतिम आदेशा नुसार

 

 

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 बाबत-

9.     यातील विमाकृत वाहनाची पॉलिसी, पॉलिसीचे कालावधीत विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची बाब उभय पक्षानां मान्‍य आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची (विरुध्‍दपक्ष विमा कंपनी म्‍हणजे- वि.प.क्रं-1) श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी मर्यादित जयपूर आणि वि.प.क्रं-2) श्रीराम जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, नागपूर असे वाचण्‍यात यावे)  मुख्‍य विवादीत मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन, ज्‍याचा नोंदणी क्रं- MH-40/N-342 असा आहे हा तक्रारकर्ता राहत असलेल्‍या उमरेड, तालुका जिल्‍हा नागपूर येथून दि.27 -28/11/2011 चे रात्रीस कोणीतरी अज्ञात ईसमाने चोरी करुन नेला. चोरीस गेलेल्‍या वाहनाचा विमा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे काढलेला असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विमा दावा आवश्‍यक दस्‍तऐवजांसह सादर केला असता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दि.18 जून, 2012 रोजीचे पत्रान्‍वये तक्रारकर्त्‍याचा विमा दावा ज्‍याचा  पॉलिसी क्रमांक- 215034/31/12/005911 आणि क्‍लेम नं. 10000/31/12/ C/044214 असा आहे, फेटाळला. सदर पत्रामध्‍ये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा फेटाळल्‍याचे कारण खालील प्रमाणे नमुद केले-

 

        Notice shall be given in writing to the company immediately  

               upon  the occurrence of any accidental loss or damage in the

               event of any claim and thereafter the insured shall give all such

                information and assistance as the company shall require.

10.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने आपले उत्‍तरात नमुद केले की, तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहनाचे चोरी संबधीची सुचना घटना घडल्‍या पासून 05 दिवस संपल्‍या नंतर विमा कंपनीस दिलेली आहे आणि पोलीसानां चोरीची सूचना 20 दिवस उशिराने दिलेली आहे आणि त्‍यामुळे पॉलिसीतील अट क्रं-1 चे तक्रारकर्त्‍याने उल्‍लंघन केलेले आहे.

 

11.   या संदर्भात तक्रारकर्त्‍याचे तक्रारीनुसार असे म्‍हणणे आहे की, तो पोलीस स्‍टेशन, उमरेड येथे विमाकृत वाहनाचे चोरीचा रिपोर्ट देण्‍यासाठी गेला असता तेथील पोलीस निरिक्षक श्री मधुकर गिते यांनी प्रथम वैयक्तिक पातळीवर वाहनाचा शोध घेण्‍यास सुचित केले व वाहन आढळून न आल्‍यास

 

 

 

नंतर रिपोर्ट देण्‍यास सांगितले. विमाकृत वाहन चोरी गेल्‍या संबधीचे            वृत्‍त दैनिक  लोकमत  मध्‍ये दि.30.11.2011 रोजी प्रकाशित झाले. विमाकृत वाहनाचा वैयक्तिक पातळीवर शोध घेऊनही ते आढळून न आल्‍याने तक्रारकर्त्‍याने त्‍या संबधीचे पत्र पोलीस स्‍टेशनला दि.04.12.2011 रोजी दिले. त्‍यानुसार पोलीस निरिक्षक श्री गिते यांनी जवळपासचे परिसरात विमाकृत वाहना संबधाने वायरलेस संदेश देण्‍यास सांगितले. वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍या संबधीची सुचना तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनीस टोल नंबरवरुन त्‍वरीत दिली त्‍याच बरोबर वि.प.क्रं 3 यांना व आर.टी.ओ.ग्रामीण नागपूर यांना सुध्‍दा सुचना दिली.

 

12.   तक्रारकर्त्‍याने आपले तक्रारीत पुढे असे नमुद केले की, वैयक्तिक पातळीवरुन सुध्‍दा विमाकृत वाहन आढळून न आल्‍याने पोलीस स्‍टेशन, उमरेड यांचेकडे वाहनाचा रिपोर्ट नोंदविण्‍यास विनंती केल्‍या नंतर, पोलीस स्‍टेशन, उमरेड यांनी दि.22.12.2011 रोजी विमाकृत वाहनाचे चोरी संबधीचा रिपोर्ट नोंदविला. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 25 वर दैनिक लोकमत दि.30 नोव्‍हेंबर, 2011 चे वृत्‍तपत्र दाखल केले, ज्‍यामध्‍ये विमाकृत वाहनाचे चोरीचे वृत्‍त छापलेले आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 26 वर आरटीओ ग्रामीण, नागपूर यांना दि.15.12.2011 रोजी विमाकृत वाहन चोरी गेल्‍या बद्दल दिलेल्‍या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली. तसेच पान क्रं 27 वर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी तक्रारकर्त्‍यास दिलेले दि.01.12.2011 रोजीचे पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली, ज्‍यामध्‍ये विमा दाव्‍या संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवजाचे यादी नुसार दस्‍तऐवज सादर करण्‍यास तक्रारकर्त्‍यास सुचित करण्‍यात आलेले आहे. तक्रारकर्त्‍याने पान क्रं 28 ते 30 वर एफ.आय.आर.ची प्रत दाखल केली, ज्‍यामध्‍ये अपराधाची घटना (Occurrence of offence) रविवार तारीख पासून (Date from) 27/11/2011 तारीख पर्यंत(Date To)-28/11/2011 वेळेचा अवधी पासून(Time From)-19.00 पर्यंत(Time To) -06.00 पोलीस स्‍टेशनवर माहिती मिळाल्‍याची तारीख (Information received at P.S.Date) 22/12/2011 वेळ 12.30 वाजता नमुद आहे.

 

13.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा नुसार, तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन जरी दि.27/11/2011 ते 28/11/2011 मध्‍यरात्री चोरीस गेले             तरी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस विमाकृत वाहनाचे चोरी संबधाने


 

दि.01.12.2011 रोजी कळविल्‍याचे नमुद केले आहे. कारण विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी तक्रारकर्त्‍यास विमा क्‍लेम संबधाने दस्‍तऐवज पुरविण्‍या  संदर्भात दि.01.12.2011 रोजीचे पत्र  दिले आहे.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे हे म्‍हणणे सर्वसामान्‍य व्‍यवहारात न पटण्‍या सारखे आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या नुसार विमाकृत वाहन चोरीस गेल्‍या नंतर त्‍याने त्‍वरीत त्‍याची सुचना दि.28.11.2011 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं-2 विमा कंपनीस टोल नंबरवरुन  दिली आणि अशी सुचना त्‍यांना मिळाल्‍यानंतर त्‍यांनी 01-02 दिवसातच इन्‍व्‍हेस्‍टीगेटरची नियुक्‍ती केली आणि त्‍यावरुन इन्‍व्‍हेस्‍टीगेटर यांनी विमा दाव्‍या संबधाने आवश्‍यक दस्‍तऐवज पुरविण्‍याचे दि.01.12.2011 चे पत्र तक्रारकर्त्‍यास दिल्‍याची बाब पूर्णतः स्‍पष्‍ट आणि सिध्‍द होते.

 

14.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असेही म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची सूचना पोलीस विभागास तब्‍बल 20 दिवस उशिराने दिली आणि अशी सुचना त्‍वरीत पोलीस विभागास मिळाली असती तर त्‍यांनी विमाकृत वाहनाचे चोरीचा तपास लावला असता. यासाठी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने एफ.आय.आर. चा आधार घेतला, ज्‍यामध्‍ये अपराधाची घटना (Occurrence of offence) रविवार तारीख पासून (Date from) 27/11/2011 तारीख पर्यंत(Date To)-28/11/2011 वेळेचा अवधी पासून(Time From)-19.00 पर्यंत(Time To) -06.00 पोलीस स्‍टेशनवर माहिती मिळाल्‍याची तारीख (Information received at P.S.Date) 22/12/2011 वेळ 12.30 वाजता नमुद आहे.

 

15.   या संदर्भात तक्रारकर्त्‍याने आपले तक्रारी सोबत पोलीस निरिक्षक            श्री मधुकर गिते, पोलीस स्‍टेशन, उमरेड यांनी दि.04.12.2011 रोजीचे तक्रारकर्त्‍याचे नावे दिलेले पत्र अभिलेखावर पान क्रं 23 वर दाखल केले. सदर पत्रात पोलीस निरिक्षक श्री मधुकर गिते यांनी तक्रारकर्त्‍यास स्‍पष्‍टपणे उद्देश्‍यून नमुद केले की, तुमच्‍या दि.28.11.2011 च्‍या ट्रक  चोरी संबधातील तक्रारी नुसार ट्रक ज्‍याचा नोंदणी क्रं- MH-40/N-342  असा आहे व जो               दि.27-28/11/2011 चे मध्‍यरात्री अज्ञात इसमाने परसोडी, उमरेड येथून चोरुन नेला, त्‍याची नोंद उमरेड पोलीस स्‍टेशन मध्‍ये घेतली असून त्‍याचा तपास चालू असल्‍याचे स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे तसेच चौकशी अंती योग्‍य ती कार्यवाही करण्‍यात येईल असे सुध्‍दा स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे. याचाच अर्थ स्‍पष्‍टपणे


 

 

असा आहे की, तक्रारकर्त्‍याने पोलीस विभागास विमाकृत वाहन चोरीस गेल्‍याची सुचना  त्‍वरीत दिली होती. मंचाचे मते सर्वसाधारण सामान्‍य व्‍यवहारात एखादी वस्‍तु चोरीस गेल्‍या नंतर जेंव्‍हा पोलीस स्‍टेशनला संबधित व्‍यक्‍ती रिपोर्ट  देण्‍यासाठी  जातो तेंव्‍हा  पोलीस  विभाग प्रथम त्‍या व्‍यक्‍तीस चोरीस गेलेल्‍या वस्‍तुचा आसपास शोध घेण्‍यास सांगतात आणि त्‍यानंतरही चोरी गेलेली वस्‍तु न सापडल्‍यास शेवटी एफ.आय.आर. नोंदवितात. त्‍यामुळे एफ.आय.आर.उशिरा नोंदविल्‍या गेला म्‍हणून पोलीस विभागास चोरीची सुचना त्‍वरीत देण्‍यात आली नव्‍हती असे जे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणणे आहे ते सर्वसामान्‍य दैनंदिन व्‍यवहार पाहता पटण्‍यासारखे नाही. सदर चोरी गेलेले विमाकृत वाहन तपासाअंती मिळून न आल्‍यामुळे पोलीस विभागाने न्‍यायालयात अंतिम अहवाल सुध्‍दा दि.21.04.2012 रोजी दाखल केलेला आहे तो पान क्रं 34 व 35 वर दाखल आहे. तक्रारकर्त्‍याचा विमाकृत वाहनाचा विमा दावा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून फेटाळल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीस दि.28.08.2012 रोजी अधिवक्‍ता यांचे मार्फतीने नोटीस पाठविल्‍याची प्रत आणि पोच अभिलेखावर दाखल केली आहे.

 

मु्द्दा क्रं 2 बाबत-

16.     तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनाचा अंतिम अहवाल पोलीस विभागा तर्फे न्‍यायालयात दाखल झालेला आहे.विमा पॉलिसीचे दाखल प्रतीवरुन तक्रारकर्त्‍याचे वाहनाचा विमा हा दिनांक- 29.10.2011 ते 28.10.2012 या कालावधी करीता काढलेला आहे आणि पॉलिसी जारी करण्‍याची तारीख 31/10/2011 ही दर्शविलेली आहे, पॉलिसी जारी करण्‍याचा दि.31.10.2011 असून या दिवशी तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनाची विमा कंपनीने निर्धारीत केलेली रक्‍कम IDV (Insurance declared value)  For the Vehicle रुपये-6,70,000/- दर्शविण्‍यात आलेली आहे  आणि तक्रारकर्त्‍याचे वाहन हे पॉलिसी जारी केल्‍या नंतर लगेच एक महिन्‍याचे आत म्‍हणजे  दि.27/11/2011 ते 28/11/2011 मध्‍यरात्री चोरीस गेलेले आहे. पॉलिसीचे प्रतीवरुन सदर वाहन हे सन-2008 मधील (Year of Manufacturing) निर्मित आहे.  तक्रारकर्ता विमाकृत वाहनाचे पॉलिसी नुसार निर्धारीत केलेली रक्‍कम रुपये-6,70,000/-  एवढी रक्‍कम वि.प.विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारल्‍याच्‍या                       दिनांक-18 जून,2012 पासून द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र ठरतो. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने चुकीचे कारण दर्शवून तक्रारकर्त्‍याचा विमा दावा फेटाळल्‍याची बाब पूर्णतः सिध्‍द झालेली आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्‍यास

 

झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-7000/- आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-3000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मिळण्‍यास पात्र आहे, असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. प्रस्‍तुत प्रकरणातील न्‍यायमंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍दपक्ष क्रं 3 वित्‍तीय कंपनी तर्फे कोणीही उपस्थित झाले नाही वा आपले लेखी निवेदनही न्‍यायमंचा समक्ष सादर केलेले नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 3 चे विरुध्‍द प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये एकतर्फी आदेश पारीत झालेला आहे, अशा परिस्थितीत विरुध्‍दपक्ष क्रं-3 यांचे प्रस्‍तुत प्रकरणात काहीही म्‍हणणे नाही असे समजून त्‍यांना मुक्‍त करणे उचित राहिल, असे न्‍यायमंचाचे मत आहे.

 

17.   वरील सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही, प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

               ::आदेश::

 

        तक्रारकर्त्‍याची तक्रार वि.प.क्रं-1 व 2 विरुध्‍द वैयक्तिक आणि

        संयुक्तिकरित्‍या अंशतः मंजूर करण्‍यात येते.

1)     विरुध्‍दपक्ष क्रं-1 व क्रं-2 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास विमाकृत

              वाहना संबधाने विमा दावा रक्‍कम रुपये-6,70,000/-(अक्षरी रुपये-

        सहा लक्ष सत्‍तर हजार फक्‍त)  विमा दावा नाकारल्‍याचा

        दि.18.06.2012 पासून द.सा.द.शे.12% दराने व्‍याजासह

        द्दावी. 

2)      विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने, तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक, मानसिक

        त्रासा बद्दल  रु.-7000/-(अक्षरी रुपये सात हजार फक्‍त) आणि

        तक्रारखर्च म्‍हणून रु.-3000/-(अक्षरी रु. तीन हजार फक्‍त) द्दावेत.

3)      सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सदर

        निकालपत्राची प्रत प्राप्‍त  झाल्‍या पासून 30 दिवसाचे आत करावे.

4)      विरुध्‍दपक्ष क्रं 3 यांना सदर प्रकरणातून मुक्‍त करण्‍यात येते.

5)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.