जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 233/2022. आदेश दिनांक : 03/10/2022.
रियाजोद्दीन पि. निजामोद्दीन शेख, वय 35 वर्षे,
व्यवसाय : स्थापत्य अभियंता, रा. सोहेल नगर,
नवीन रेल्वे स्टेशनच्या बाजुला, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
शौकत मिस्त्री, वय सज्ञान, व्यवसाय : गुत्तेदार,
रा. सोमवंशी नगर, सरस्वती क्लासेसच्या पुढील मारुती मंदिराजवळ,
मेडीकल कॉलजच्या समोरील गल्ली, लातूर, ता. जि. लातूर. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- इर्शाद ए. शेख
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत प्रकरणामध्ये आज दि.3/10/2022 रोजी तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांनी पुरसीस दाखल केलेली असून ज्यामध्ये नमूद करण्यात आले की, प्रकरण दाखल करतेवेळी अनावधानाने व नजरचुकीने काही बाबी नमूद करण्याचे राहिलेले असल्यामुळे प्रकरण काढून घेऊन नव्याने दाखल करण्यासाठी परवानगी मिळावी.
(2) प्रस्तुत प्रकरण दाखलपूर्व युक्तिवादासाठी ठेवलेले होते. सद्यस्थितीत प्रकरण दाखल करुन घेतलेले नव्हते आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचे आदेश झालेले नाहीत. अशा स्थितीत, तक्रारकर्ता यांना त्यांच्या पुरसीसप्रमाणे नव्याने दाखल करण्यासाठी प्रकरण काढून घेण्याची परवानगी देणे न्यायोचित वाटते. त्या अनुषंगाने प्रकरण परत घेण्यासाठी व नव्याने दाखल करण्यासाठी तक्रारकर्ता यांना परवानगी देण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-