Maharashtra

Ahmednagar

CC/19/187

श्री.धाेंंडीराम बाजीराव सुलताने - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, रॉयल सुंदरम अलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि. - Opp.Party(s)

कुंभकर्ण बी. ए.

17 Sep 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. CC/19/187
( Date of Filing : 26 Jun 2019 )
 
1. श्री.धाेंंडीराम बाजीराव सुलताने
रा.सदनिका क्र.७, जयशंकर अपार्टमेेंट, जाधव कॉलनी, पंचवटी, नाशिक
नाशिक
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, रॉयल सुंदरम अलायन्‍स इन्‍शुरन्‍स कंपनी लि.
माधव प्‍लाझा, शॉप क्र. ६, किनारा हॉटेल जवळ, मुंबई नाका, मुंबई-आग्रा रोड, नाशिक-४२२ ००९
नाशिक
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 17 Sep 2019
Final Order / Judgement

निकालपत्र

 (द्वारा मा.अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदार यांनी सामनेवालेकडून त्‍याच्‍या मालकीची ट्रक क्र. एम.एच-१५-डी.के. ८७०० करता दिनांक ३१-०१-२०१६ ते ३०-०१-२०१७ पावेतो इन्‍शुरन्‍स  पॉलिसी उतरविली होती. दिनांक २८-०९-२०१६ रोजी रात्री ११.३० ते दिनांक    २९-०९-२०१६ रोजी सकाळी ६.३० वाजेच्‍या सुमारास सदर ट्रक चोरीस गेला.  तक्रारदाराने चोरी गेलेला ट्रक या वाहनाची नुकसान भरपाई मिळणेसाठी सामनेवाले यांच्‍याकडे कागदपत्रासह विमा दावा दाखल केला. सदर विमा सामनेवाले यांनी नाकारला असल्‍याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्‍यात आलेली आहे.

३.   तक्रारदारातर्फे सदर तक्रारीत प्राथमीक युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदारातर्फे युक्तिवादात असे कथन करण्‍यात आले की, दिनांक २७-०१-२०१६ रोजीपासून श्रावण नंदु घोडे यांना सदरील मालट्रक चालविण्‍यासाठी दिलेला होता. तक्रारदाराने त्‍यासंदर्भात दिनांक ३०-०८-२०१९ रोजी दस्‍तऐजव दाखल केलेले आहेत. सदर दस्‍तऐवजाची पडताळणी करतांना असे दिसून आले की, तक्रारदाराने श्रावण नंदु घोडे यांना खरेदी पावती करून करारनामाद्वारे सदर ट्रक विकलेला होता. त्‍यामुळे चालविण्‍यास दिलेल्‍या वादातील ट्रकवर तक्रारदाराचा हक्‍क राहीलेला नाही, असे दिसून येते. म्‍हणून सामनेवाले यांनी दिनांक ०८-०३-२०१८ रोजी दिलेल्‍या पत्राप्रमाणे तक्रारदारच्‍या विम्‍यावर कोणताही हक्‍क राहीलेला नाही, असे कारण देऊन तक्रारदाराचा विमा दावा नाकारून कोणतीही सेवेत त्रुटी दिली नाही, असे प्रथमताह स्‍पष्‍ट होते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश.

 

आदेश

  1. तक्रारकर्ताची तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे.

      2. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

  1. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.
  1. तक्रारकर्ता यांना सदस्‍यांची फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.