Maharashtra

Bhandara

CC/20/35

सिमा ज्ञानेश्‍वर धरमशहारे - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, भारतीय जिवन विमा निगम - Opp.Party(s)

श्री.एस.जे.चव्‍हान

27 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/35
( Date of Filing : 11 Mar 2020 )
 
1. सिमा ज्ञानेश्‍वर धरमशहारे
रा. बजाज शाळेजवळ. कृष्‍णापूरा वार्ड. भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, भारतीय जिवन विमा निगम
भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 27 Aug 2021
Final Order / Judgement

                          (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                                    (पारीत दिनांक- 27 ऑगस्‍ट, 2021)

   

01.  तक्रारकर्तीने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी विरुध्‍द तिचे विमाधारक पतीचे मृत्‍यू संबधात विमा पॉलिसीची रक्‍कम मिळावी  आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-      

          तक्रारकर्तीचा पती मृतक श्री ज्ञानेश्‍वर सहादेव धरमशहारे हा दुग्‍ध फेडरेशन, जमनी (दाभा) येथे वाहन चालक म्‍हणून नौकरीत होता, त्‍याने हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम शाखा  भंडारा येथून दिनांक-31.05.2018 रोजी उत्‍कर्ष योजना विमा पॉलिसी काढली होती . सदर विमा पॉलिसीचा क्रं-910208952 असा आहे आणि विमा पॉलिसीची वार्षिक किस्‍तीची रक्‍कम रुपये-7,621/- त्‍याने जमा केली होती. सदर पॉलिसी अधिकृत विमा एजंटचे मार्फतीने काढली होती आणि विमा पॉलिसी काढताना विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे पॅनल वर असलेल्‍या नोंदणीकृत डॉक्‍टरा कडून त्‍याची वैद्दकीय तपासणी झाली होती. विमा पॉलिसी काढते वेळी त्‍याला कोणताही आजार नव्‍हता.

    तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, तिचे पती श्री ज्ञानेशवर सहादेव धरमशहारे याची प्रकृती बिघडल्‍यामुळे त्‍याला दिनांक-12.02.2019 रोजी श्‍लोक हॉस्‍पीटल भंडारा येथे भरती करण्‍यात आले होते. त्‍यानंतर दिनांक-17.02.2019 रोजी लक्ष हॉस्‍पीटल, भंडारा येथील डॉ.सव्‍वालाखे यांना दाखविण्‍यात आले होते व त्‍यास दिनांक-19.02.2019 रोजी डिसचॉर्ज देण्‍यात आला होता. त्‍यानंतर दिनांक-24.02.2019 रोजी पुन्‍हा प्रकृती अस्‍वास्‍थामुळे त्‍याला स्‍पर्श मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पीटल, भंडारा येथे भरती करण्‍यात आले होते व दिनांक-03.03.2019 रोजी डिसचॉर्ज देण्‍यात आला होता, त्‍यानंतर दुसरेच दिवशी दिनांक-04.03.2019 रोजी त्‍याचा मृत्‍यू झाला होता. तिच्‍या पतीचे मृत्‍यू नंतर तिने पत्‍नी व नॉमीनी या नात्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीकडे विमा दाव्‍याची रक्‍कम  रुपये-3,00,000/- मिळण्‍यासाठी आवश्‍यक दस्‍तऐवजांसह विमा दावा दाखल केला होता परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-18 जानेवारी, 2020 रोजीचे पत्रान्‍वये चुकीचे व खोटे कारण दर्शवून तिचा विमा दावा नामंजूर केला असल्‍याचे कळविले व पत्रा सोबत विमा दावा प्रस्‍ताव परत पाठविला. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूरीचे पत्रात दिनांक-12.02.2019 रोजीच्‍या श्‍लोक हॉस्‍पीटल यांचे माहिती प्रमाणे तसेच लक्ष हॉस्‍पीटल यांचे दिनांक-17.02.2019 चे माहिती नुसार मृतक श्री ज्ञानेश्‍वर सहादेव धरमशहारे हा “Chronic Alcoholic>10 Years” या आजाराने ग्रस्‍त होता तसेच त्‍याने विमा पॉलिसी प्रस्‍तावा मध्‍ये दिलेल्‍या प्रश्‍नाची उत्‍तरे खोटी दिली होती असे नमुद केले.

     तक्रारकर्तीने पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍यांचे दिनांक-18 जानेवारी, 2020 रोजीचे पत्रात विमा दावा नामंजूरी बाबत जी कारणे नमुद केलेली आहेत ती संपूर्णतः खोटी व बनावटी स्‍वरुपाची आहेत. तिचा पती हा आध्‍यात्‍मीक असून तो दारुचे व्‍यसन करीत नव्‍हता तसेच तो सन-2019 चे पूर्वी कोणत्‍याही आजाराने ग्रस्‍त नव्‍हता व त्‍याला त्‍यापूर्वी कुठल्‍याही दवाखान्‍यात भरती करण्‍यात आले नव्‍हते परंतु माहे फेब्रुवारी-2019 मध्‍ये त्‍याच्‍या प्रकृती मध्‍ये बिघाड आल्‍याने त्‍यास भरती केले होते व तेथील डॉक्‍टरांनी वैद्दकीय तपासणी करुन पुढील त्रास असल्‍याचे नमुद केले-Chronic Liver Parenchymal Disease, Hepatorenal Syndrome, Hepatic Encephalopathy, Spesis, Portal Hypertension Ascitis परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दावा नामंजूरीचे पत्रात आजाराचे कारण Chronic Alcoholic>10 Years  असे नमुद केले. वस्‍तुतः   Chronic Liver Parenchymal Disease  हा आजार वेगवेगळया कारणा मुळे घडू शकतो, वरील आजारा करीता खालील घटक कारणीभूत असू शकतात-

Viral Causes- # Hepatitis-B,  #Hepatitis-C, Cytomegalovirus (C.M.V.), Epstein Barr Virus (E.B.V.) and Yellow Fever Viruses Cause Acute Hepatitis अशाप्रकारे चुकीचा अर्थ काढून तिचे मृतक पतीचा विमा दावा नामंजूर करुन विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने दोषपूर्ण सेवा दिली म्‍हणून शेवटी तिने प्रस्‍तुत तक्रार विरुध्‍दपक्ष भारतीय जिवन बिमा निगम कंपनी  विरुध्‍द जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल करुन त्‍याव्‍दारे  विरुध्‍दपक्षा विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

  1. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीला आदेशित करण्‍यात यावे की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे मृत्‍यू पःश्‍चात जीवन लक्ष विमा पॉलिसी क्रं-910208952 ची संपूर्ण विमा रक्‍कम रुपये-3,00,000/-  आणि सदर विमा रकमेवर मृत्‍यू दिनांक-04.03.2019 पासून ते रकमेच्‍या अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिलेल्‍या सेवेतील त्रृटीमुळे तिला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-1,00,000/- तसेच  तक्रारीचा खर्च  रुपये-50,000/-  विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून तिला अदा करण्‍याचे आदेशित व्‍हावे. या शिवाय योग्‍य ती दाद तिचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

03.   विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे लेखी उत्‍तर   जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विमा कंपनीने आपले लेखी उत्‍तरात तक्रारीचे कारण जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यक्षेत्रात घडले असल्‍याची बाब नामंजूर केली. तक्रारकर्तीचा मृतक पती श्री ज्ञानेशवर सहादेव धरमशहारे हा दुग्‍ध फेडरेशन येथे ड्रायव्‍हर म्‍हणून कार्यरत होता तसेच दिनांक-12.02.2019 पासून ते त्‍याचा मृत्‍यू दिनांक-04.03.2019 पर्यंत भंडारा येथे त्‍याचेवर झालेले वैद्दकीय उपचार अभिलेखाचा भाग असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्तीचे पतीने विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम शाखा भंडारा येथून दिनांक-31 मे, 2018 रोजी जीवन लक्ष पॉलिसी काढली होती व तिचा विमा पॉलिसी क्रं-910208952  असा आहे तसेच विमा राशी रुपये-3,00,000/- होती आणि विमा पॉलिसी मध्‍ये नॉमीनी म्‍हणून तक्रारकर्ती सिमा धरमशहारे हिचे नाव होते या बाबी मान्‍य केल्‍यात.  विमाधारकाने पॉलिसीचे प्रिमियमची रक्‍कम रुपये-14,586/- भरली होती हा अभिलेखाचा भाग आहे. विमा पॉलिसी काढते वेळी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे वैद्दकीय अधिकारी यांनी तिचे पतीची फक्‍त प्राथमिक वैद्दकीय तपासणी केली होती. विमाधारकाने विमा प्रस्‍तावा मध्‍ये आरोग्‍य विषयक प्रश्‍नांची खरी उत्‍तरे दिली असती तर त्‍यांनी त्‍याच्‍या अधिकच्‍या वैद्दकीय तपासण्‍या केल्‍या असत्‍या किंवा त्‍याचा विमा प्रस्‍ताव फॉर्म स्विकारला नसता. विमा पॉलिसी काढण्‍याचे पूर्वी पासून विमाधारकास कोणताही आजार नव्‍हता हे विधान नामंजूर करण्‍यात येते. तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजा वरुन विमाधारक हा विमा पॉलिसी काढते वेळी “Chronic Liver Parenchymal Disease” या आजाराने ग्रस्‍त होता. तक्रारकर्तीने विमा दावा दाखल करताना तिचे पतीचे आजारा संबधी संपूर्ण दस्‍तऐवज दाखल केले नाहीत. विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक-04 मार्च, 2019 रोजी झाला  होता आणि विमा पॉलिसी जोखीम सुरु होण्‍याचा दिनांक-31 मे, 2018 असा होता, यावरुन असे दिसून येते की, विमाधारकाचा मृत्‍यू विम्‍याची जोखीम स्विकारल्‍याचे दिनांका पासून तीन वर्षाचे आत झाल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमा दाव्‍या संबधी अधिक चौकशी केली असता असे लक्षात आले की, विमा पॉलिसी काढते वेळी विमा प्रस्‍तावा मध्‍ये विमाधारकाने त्‍याचे प्रकृती संबधी विचारलेल्‍या प्रश्‍नांची खोटी उत्‍तरे दिलेली होती. सदर विमा प्रस्‍तावा मध्‍ये विमाधारक हा दारु पित होता काय असे विचारले असता त्‍याने नाही असे उत्‍तर दिले. विमाधारकाची तब्‍येत नेहमी कशी असते असे विचारले असता त्‍याने चांगली प्रकृती असे उत्‍तर दिले होते.

 

    विरुध्‍दपक्ष विमा कंपनी तर्फे पुढे असे नमुद करण्‍यात आले की, श्‍लोक हॉस्‍पीटल, भंडारा यांच्‍या दिनांक-12 फेब्रुवारी, 2019 रोजीच्‍या अॅडमिशन नोटस आणि लक्ष हॉस्पिटल भंडारा यांच्‍या दिनांक-17 फेब्रुवारी,2019 रोजीच्‍या ट्रीटमेंट पेपर्स नुसार मृतक विमाधारक हा “Chronic Alcoholic>10 Years” आजाराने ग्रस्‍त होता तसेच स्‍पर्श हॉस्पिटल भंडारा यांच्‍या दिनांक-03 मार्च, 2019 रोजीच्‍या डिसचॉर्ज समरी मध्‍ये विमाधारक हा “Chronic Lever Parenchymal disease”   या आजाराने ग्रस्‍त असल्‍याचे नमुद केलेले आहे. जनरल हॉस्पिटल भंडारा यांच्‍या मेडीकल अटेंडन्‍स सर्टीफीकेट जे तक्रारकर्तीने दाखल केलेले आहे, त्‍यामध्‍ये सुध्‍दा मृत्‍यूचे प्राथमिक कारण हे   “Chronic Lever disease”  असे नमुद केलेले आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने त्‍यांचे तज्ञ डॉक्‍टरांकडून मत घेतले होते व त्‍यांचे मता नुसार विमाधारकास “Chronic Liver disease” झाला होता आणि त्‍यामुळे त्‍याचे शरिरात गुंतागुंत निर्माण झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला होता. विमाधारक हा 10 वर्षाच्‍या अगोदर पासून “Chronic Alcoholic” होता. मृतक विमाधारक हा Chronic Liver Parenchymal Disease, Hepatorenal Syndrome, Hepatic Encephalopathy, Spesis, Portal Hypertension Ascitis या आजारोन ग्रस्‍त होता असे त्‍याचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवजा वरुन दिसून येते. Chronic Liver Parenchymal Disease होण्‍याचे  सामान्‍य कारण “Alcoholism” असे आहे. लक्ष हॉस्पिटल भंडारा यांचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवजा मध्‍ये स्‍पष्‍टपणे “Chronic Alcoholic>10 Years” असे  नमुद आहे म्‍हणजेच विमाधारक विमा पॉलिसी काढण्‍याचे फार पूर्वी पासून दारुचे सेवन करीत होता व त्‍याने ही बाब विमा प्रस्‍ताव फॉर्म मध्‍ये लपवून ठेवून त्‍याच्‍या आरोग्‍य विषयाच्‍या विचारलेल्‍या प्रश्‍नांना खोटी उत्‍तरे दिलीत आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विमा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो. विमाधारकाने विमा प्रस्‍तावा मध्‍ये खोटी माहिती दिली होती. सदर्हू विमा पॉलिसी एकल/सिंगल प्रिमियम पॉलिसी होती त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने कलम 45 अनुसार जमा प्रिमियमची रक्‍कम रुपये-14,586/- ही दिनांक-13.02.2020 रोजी तक्रारकर्तीला परत केलेली आहे.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याने तक्रार खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले.

 

04.   तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे विमा दावा नामंजूरीचे पत्र, मृतकाचा विमा दावा प्रस्‍ताव फॉर्म, विमा दावा फॉर्म, पॉलिसी डिटेल्‍स, मृतकाचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवज, मृत्‍यू प्रमाणपत्र्, मृतकाचे आधारकार्ड, तक्रारकर्तीचे आधारकार्ड अशा प्रतीचा समावेश आहे.  तक्रारकर्तीने स्‍वतःचे पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्‍तीवादा बाबत पुरसिस दाखल केली.

 

05.    विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे दस्‍तऐवज यादी नुसार पॉलिसी स्‍टेटस रिपोर्ट तसेच मृतक विमाधारकाचे उपचाराचे अभिप्राय व उपचार नोंदपत्र दाखल केले.  तसेच लेखी युक्‍तीवाद दाखल केला .

 

06.   तक्रारकर्ती तर्फे वकील श्री एस.एस.चव्‍हाण यांचा तर विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे वकील श्रीमती सुषमा सिंग यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजाचे अवलोकन करण्‍यात आले, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अ.क्रं

मुद्दा

उत्‍तर

01

विमाधारकास विमा पॉलिसी घेण्‍यापूर्वी आजार असल्‍याची बाब आणि त्‍याने ही बाब विमा प्रस्‍ताव भरताना लपवून ठेवल्‍याची बाब   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने पुराव्‍यानिशी सिध्‍द केली काय

-होय-

02

विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करुन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय

-नाही-

03

काय आदेश

अंतिम आदेशा नुसार

 

                                                                              ::कारणे व मिमांसा::

मुद्दा क्रं 1 व क्रं 2

 

07.  या प्रकरणा मध्‍ये निर्णय देताना हे तपासून पाहणे आवश्‍यक आहे की, विमाधारकास विमा पॉलिसी घेण्‍याचे अगोदर पासूनच आजार होता काय आणि ही बाब त्‍याने विमा पॉलिसी प्रस्‍ताव फार्म भरुन देताना त्‍याचे आरोग्‍य विषयक विचारलेल्‍या प्रश्‍नांना उत्‍तरे देताना लपवून ठेवली होती काय?. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने विमाधारकास विमा पॉलिसी काढण्‍यापूर्वी पासून आजार होता व तो दहा वर्षा पासून दारुचे सेवन करीत होता आणि अति दारुचे सेवनामुळे त्‍याचे लिव्‍हर क्षतीग्रस्‍त झाले होते आणि त्‍यातच त्‍याचा मृत्‍यू झाला होता ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी विमाधारकाचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवजावर आपली भिस्‍त ठेवली- श्‍लोक हॉस्‍पीटल, भंडारा यांच्‍या दिनांक-12 फेब्रुवारी, 2019 रोजीच्‍या अॅडमिशन नोटस आणि लक्ष हॉस्पिटल भंडारा यांच्‍या दिनांक-17 फेब्रुवारी,2019 रोजीच्‍या ट्रीटमेंट पेपर्स नुसार मृतक विमाधारक हा “Chronic Alcoholic>10 Years” आजाराने ग्रस्‍त होता तसेच स्‍पर्श हॉस्पिटल भंडारा यांच्‍या दिनांक-03 मार्च, 2019 रोजीच्‍या डिसचॉर्ज समरी मध्‍ये विमाधारक हा “Chronic Lever Parenchymal disease”   या आजाराने ग्रस्‍त असल्‍याचे नमुद आहे. जनरल हॉस्पिटल भंडारा यांच्‍या मेडीकल अटेंडन्‍स सर्टीफीकेट त्‍यामध्‍ये सुध्‍दा मृत्‍यूचे प्राथमिक कारण हे   “Chronic Lever disease”  असे नमुद आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे तज्ञ डॉक्‍टर यांचे मता नुसार विमाधारकास “Chronic Liver disease” झाला होता आणि त्‍यामुळे त्‍याचे शरिरात गुंतागुंत निर्माण झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला होता. विमाधारक हा 10 वर्षाच्‍या अगोदर पासून “Chronic Alcoholic” होता. मृतक विमाधारक हा Chronic Liver Parenchymal Disease, Hepatorenal Syndrome, Hepatic Encephalopathy, Spesis, Portal Hypertension Ascitis या आजारोन ग्रस्‍त होता असे त्‍याचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवजा वरुन दिसून येते. Chronic Liver Parenchymal Disease होण्‍याचे  सामान्‍य कारण “Alcoholism” असे आहे. लक्ष हॉस्पिटल भंडारा यांचे वैद्दकीय उपचाराचे दस्‍तऐवजा मध्‍ये स्‍पष्‍टपणे “Chronic Alcoholic>10 Years” असे  नमुद आहे म्‍हणजेच विमाधारक विमा पॉलिसी काढण्‍याचे फार पूर्वी पासून दारुचे सेवन करीत होता व त्‍याने ही बाब विमा प्रस्‍ताव फॉर्म मध्‍ये लपवून ठेवून त्‍याच्‍या आरोग्‍य विषयाच्‍या विचारलेल्‍या प्रश्‍नांना खोटी उत्‍तरे दिलीत आणि त्‍यामुळे तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर केला. विमा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो.

 

 08.    आम्‍ही श्‍लोक हॉस्पिटल भंडारा यांचे दिनांक-12 फेब्रुवारी, 2019 रोजीचे डिसचॉर्ज कॉर्डचे अवलोकन केले त्‍यामध्‍ये विमाधारकास “Hepatomegaly with Cirrhosis thickened gallbladder bilateral renal parenchymal disease. Splenomegaly, Scanty ascites” असा आजार झाल्‍याचे नमुद केलेले आहे. थोडक्‍यात विमाधारकाचे लिव्‍हरची साईझ वाढलेली असून ते डॅमेज झालेले होते. ग्‍वालब्‍लॅडर (पित्‍ताशय) थिकनेस झाले होते आणि किडन्‍या गेलेल्‍या होत्‍या असे निदान केलेले आहे.

 

09.    आम्‍ही लक्ष हॉस्पिटल भंडारा येथील डॉ.निरज आर. सव्‍वालाखे यांचे कडील दिनांक-17 फेब्रुवारी, 2019 रोजीचे उपचाराचे दस्‍तऐवजाचे अवलोकन केले त्‍यामध्‍ये विमाधारका हा “Chronic Alcoholic>10 years” Impression-ALD (Alcoholic Liver Disease) CLD (Chronic Liver Disease) Alcoholic Hepatitis –Ascites “ विमाधारक हा ब-याच वर्षा पासून दारुचे सेवन करीत होता त्‍यामुळे त्‍याचे लिव्‍हर खराब झाले होते आणि त्‍यास जलोदर झालेला होता असे निदान केलेले आहे. विमाधारकाने पॉलिसी घेतल्‍या पासून 09 महिन्‍यात त्‍याचा लिव्‍हरचे आजाराने मृत्‍यू झालेला आहे आणि लिव्‍हरचा गंभीर आजार हा एवढया अल्‍प कालावधी मध्‍ये विकसित होत नाही असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे स्‍पष्‍ट मत आहे.  

 

10.   स्‍पर्श हॉस्‍पीटल भंडारा येथील डॉ.राजदिप चौधरी यांचे दिनांक-03 मार्च, 2019 रोजीचे डिसचॉर्ज समरी मध्‍ये विमाधारकाचे Final Diagnosis-Spet.2019-Chronic Liver Parenchymal Disease, Mar.2019- Hepatorenal Syndrome, Hepatic Encephalopathy, Mar 2019-Sepsis, Portal Hypertension, Ascitis” असे निदान केलेले आहे. तीव्र यकृत पॅरेन्‍काइमल रोग तसेच हिपॅटोरेनल सिंड्रोम  आणि यकृताचा एन्‍सेफॅलोपॅथी रोग , सेप्‍सीस (पस होणे), पोर्टल उच्‍च रक्‍तदाब, जलोदर  झाल्‍याचे  निदान आहे.

 

11.     विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने त्‍यांचे तज्ञ डॉक्‍टरांचे लेखी मत अभिलेखावर दाखल केलेले आहे, त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-Haemogram, LFT (Liver Function Test) BST (Blood Serological Test) USG (Ultrasound  Sonography) Abdomen या रिपोर्ट वरुन त्‍यांनी परिक्षण केले आणि DLA (Deceased Life Assured) died of Alcoholic Liver Disease and its complication. He was Chronic Alcoholic since more than 10 years which is prior to DOC (Date of commencement) विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे तज्ञ डॉक्‍टर यांचे मता नुसार विमाधारकास “Chronic Liver disease” झाला होता आणि त्‍यामुळे त्‍याचे शरिरात गुंतागुंत निर्माण झाल्‍याने त्‍याचा मृत्‍यू झाला होता असे निदान केलेले आहे.

 

12.   विमा धारकाचे विमा पॉलिसी जोखीम सुरु होण्‍याचा दिनांक-31 मे, 2018 असा होता, आणि विमाधारकाचा मृत्‍यू दिनांक-04 मार्च, 2019 रोजी झाला  होता यावरुन असे दिसून येते की, विमाधारकाची विम्‍याची जोखीम स्विकारल्‍याचे दिनांका पासून एक वर्षाचे आतच त्‍याचा मृत्‍यू वर नमुद केल्‍या प्रमाणे गंभिर आजाराने झालेला आहे  या बाबी दाखल वैद्दकीय दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द होतात परंतु विमाधारकाने विमा पॉलिसी घेते वेळी विमा प्रस्‍तावा मध्‍ये त्‍याच्‍या आरोग्‍य विषयक विचारलेल्‍या प्रश्‍नांना योग्‍य उत्‍तरे न देता त्‍याचे आरोग्‍य विषयक बाबी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवल्‍याची बाब सिध्‍द होते. विमा पॉलिसीचे स्‍टेटस रिपोर्ट प्रमाणे विमा पॉलिसीचा क्रं-910208592 असून विमा प्रिमीयम रुपये-7293/- असा नमुद असून दिनांक-13.02.2020 ला रुपये-14,586/- एवढी रक्‍कम चेक क्रं-0002187 व्‍दारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने अदा केल्‍याचे नमुद आहे.

 

13.    विमाधारकाने दिनांक-30 मे, 2018 रोजी भरुन दिलेल्‍या विमा प्रस्‍ताव फॉर्म मध्‍ये त्‍याच्‍या आरोग्‍य विषयक विचारलेल्‍या प्रश्‍नांची उत्‍तरे खालील प्रमाणे दिलेली आहेत-

3

Peptic Ulcer/…., jaundice, anaemia, piles, dysentery or any other disease of stomach, liver, spleen, gall bladder or pancreas/digestive disorder.

NO

11 (f)

Do your use or have you even used Alcoholic drinks

NO

11 (g)

What has been your usual State of Health?

Good

 

 

14.   या संदर्भात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोग, नवि दिल्‍ली यांनी पारीत केलेल्‍या खालील न्‍यायनिवाडयावर आपली भिस्‍त ठेवीत आहोत-

 

HON’BLE NATIONAL CONSUMER DISPUTES REDRESSAL  COMMISSION  NEW DELHI-REVISION PETITION NO. 1797 OF 2016   Order Dated-26th August, 2020-GURPREET KAUR  W/O. RUPINDER SINGH-VERSUS- LIFE INSURANCE CORPORATION

                                    

 "......In more recent cases it has been held that all-important element in such a declaration is the phrase which makes the declaration the "basis of contract".  These words alone show that the proposer is warranting the truth of his statements, so that in the event of a breach this warranty, the insurer can repudiate the liability on the policy irrespective of issuers of materiality"

        We are not impressed with the submission that the proposer was unaware of the contents of the form that he was required to fill up or that in assigning such a response to a third party, he was absolved of the consequence of appending his signatures to the proposal.  The proposer duly appended his signature to the proposal form and the grant of the insurance cover was on the basis of the statements contained in the proposal form.  We are of the view that the failure of the insured to disclose the policy of insurance obtained earlier in the proposal form entitled the insurer to repudiate the claim under the policy."Consequently the revision petition No. 1797 of 2016 is dismissed.

    उपरोक्‍त नमुद मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाच्‍या न्‍यायनिवाडया मध्‍ये स्‍पष्‍टपणे नमुद केलेले आहे की, विमा प्रस्‍तावावर विमाधारकाचे घोषणापत्र आणि सही  (Declaration & Signature) असते की, त्‍यांनी विमा प्रस्‍तावा मध्‍ये भरुन दिलेली माहिती खरी आहे आणि सदर घोषणापत्राचे आधारावर विमा दावा प्रस्‍ताव स्विकारल्‍या जातो. विमा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो, त्‍यामुळे जर विमाधारकाने विमा दावा प्रस्‍ताव फॉर्म भरुन देताना काही बाबी लपवून ठेवल्‍या असतील तर विमाकंपनीला विमा दावा नामंजूर करण्‍याचा अधिकार आहे.

 

     जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे खालील मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडयावर भिस्‍त ठेवण्‍यात येते-

      Hon’ble Supreme Court of India-Civil Appeal No-2776 of 2002- Decided on-10.07.2009-“Satwant Kaur Sandhu-Versus-New India Assurance Company Ltd.”

 

     सदर मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवाडया प्रमाणे विमाधारकाने विमा प्रस्‍ताव पस्‍ताव भरुन देताना त्‍याचे आरोग्‍याच्‍या बाबी लपवून विमा पॉलिसी मिळवली होती या कारणा वरुन अपिलार्थीचे अपील खारीज केले.

 

     आमचे समोरील हातातील प्रकरणात सुध्‍दा विमाधारकाने विमा दावा प्रस्‍ताव भरुन देताना त्‍याच्‍या आरोग्‍य विषयक प्रश्‍नांची उत्‍तरे देताना त्‍याच्‍या आरोग्‍य विषयक बाबी विरुध्‍दपक्ष विमा कंपनी पासून लपवून ठेवलेल्‍या आहेत ही बाब दस्‍तऐवजी पुराव्‍या वरुन सिध्‍द होते म्‍हणून आम्‍ही मुद्दा क्रं 1 चे उत्‍तर होकारार्थी नोंदवित आहोत. विमा करार हा विश्‍वासावर आधारीत असतो त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीची तक्रारकर्तीचा विमा दावा नामंजूर करण्‍याची कृती कायदेशीर असून विमा कंपनीने तक्रारकर्तीला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नसल्‍याची बाब सिध्‍द होते महणून आम्‍ही मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर नकारार्थी नोंदवित आहोत. मुद्दा क्रं 2 चे उत्‍तर नकारार्थी आल्‍यामुळे आम्‍ही मुद्दा क्रं 3 अनुसार  तक्रारकर्तीची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

15.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन, आम्‍ही प्रकरणात खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                             :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्तीची तक्रार  विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा-भंडारा यांचे  विरुध्‍द खारीज करण्‍यात येते.

 

  1. खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

 

(03) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध   करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(04) उभय पक्षां तर्फे दाखल अतिरिक्‍त फाईल्‍स त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जाव्‍यात.              

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.