Maharashtra

Bhandara

CC/22/58

भाग्‍यशाला हनुधोज डोरले. - Complainant(s)

Versus

शाखा व्‍यवस्‍थापक, भारतीय जिवन बिमा निगम. - Opp.Party(s)

श्री.आर.एस.देशमुख.

16 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/22/58
( Date of Filing : 29 Apr 2022 )
 
1. भाग्‍यशाला हनुधोज डोरले.
रा.तांडा पो.मोरगांव तह.मौदा जि.नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र.
...........Complainant(s)
Versus
1. शाखा व्‍यवस्‍थापक, भारतीय जिवन बिमा निगम.
भंडारा.
भंडारा.
महाराष्‍ट्र.
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Jan 2023
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

                     

   

01.  तक्रारकर्तीने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या  कलम 35 खाली विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे विरोधात अपघाती मृत्‍यू  दाव्‍याची रक्‍कम मिळण्‍यासाठी आणि इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी दाखल केलेली आहे.

 

02.  तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे

      तक्रारकर्तीचे तक्रारी  प्रमाणे तिचा मृतक पती श्री हनुधोज हिरामण डोरले याने तो हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कडून  दोन विमा पॉलिसी  काढल्‍या होत्‍या, त्‍यापैकी एक विमा पॉलिसी क्रं -976420636  Date of Commence-28/12/2008 Plan Term 179/16  विमा रक्‍कम रुपये-50,000/- आहे तर दुसरी विमा पॉलिसी क्रं-910170580 Date of Commence-28/03/2018 Plan Term -835/25  विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- होती. तिच्‍या पतीचा  शॉक लागून अपघाती मृत्‍यू हा सातोना येथे दिनांक-14.02.2020 रोजी झाला होता. पतीने मृत्‍यू नंतर तिने आवश्‍यक दस्‍तऐवज पुरवून विमा दाव्‍याव्‍दारे विमा रकमेची मागणी केली असता सदर दोन्‍ही विमा पॉलिसी मध्‍ये अपघाती विम्‍याची तरतुद असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीने फक्‍त नैसर्गिक मृत्‍यू दावा मंजूर केला व अपघाती विमा दावे नाकारण्‍यात आलेत. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-05.10.2021 रोजीचे पत्रान्‍वये मृतका जवळ ईलेक्‍ट्रीक कामे  करण्‍याचा परवाना नव्‍हता असे कारण दर्शवून विमा रकमेच्‍या लाभा पासून तिला वंचीत ठेवले म्‍हणून तिने  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-10.02.2022 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.  परिणामी  तिला आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून तिने शेवटी  प्रस्‍तुत  तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा   समक्ष  दाखल करुन त्‍याव्‍दारे  विरुध्‍दपक्ष जिवन बिमा निगम कंपनी विरुध्‍द पुढील प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

1.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्तीला आर्थिक नुकसान भरपाई रक्‍कम रुपये-2,50,000/- तसेच मानसिक व आर्थिक त्रासा बाबत नुकसान भरपाई रुपये-1,00,000/- असे मिळून एकूण रुपये-3,50,000/- नुकसान भरपाई वार्षिक-18 टक्‍के दराने व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे

 

2.    प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-15,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मिळावा. या शिवाय योग्‍य  ती दाद तिचे  बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.    विरुध्‍दपक्ष भारतीय जीवनबिमा निगम कंपनी तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केले. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे तक्रारकतीचा मृतक पती आणि विमाधारक हा मंडप डेकोरेटेर म्‍हणून काम करीत होता व त्‍याचेकडे विद्दुत उपकरणे हाताळण्‍याचा किंवा ईलेक्ट्रिशियनचे काम करण्‍याचा परवाना व प्रशिक्षण नव्‍हते. असे असताना त्‍याने जोखीम पत्‍करुन ईलेक्ट्रिकचे काम केले असल्‍या कारणने तक्रारकर्तीचा विमा दावा हा दिनांक-05.10.2021 रोजीचे पत्रान्‍वये नाकारण्‍यात आला. विमा पॉलिसीतील शर्ती व अटीचे अवलोकन केले असता अट क्रं 11 (ब) (i) मध्‍ये असे नमुद आहे की, विमाधारकाने हेतुपुरस्‍परपणे स्‍वतःला ईजा करुन घेतली तर अशा परिस्थितीत  अपघाती विमा दावा देणे बंधनकारक नसते. तक्रारकर्तीची तक्रार खोटी असून तिने  तक्रारी मधून विरुध्‍दपक्ष विमा कंपनी विरुध्‍द केलेल्‍या सर्व मागण्‍या या नाकारण्‍यात येतात. आपले विशेष कथनात असे नमुद केले की, तक्रारकर्तीचा पती हा रोज मजूरीवर मंडप डेकोरेशनचे काम करायाचा असे विधान गुन्‍हयाच्‍या  तपशिलाचा नमुना 174 सी.आर.पी.सी. अंतर्गत दाखल कथनातून आलेले आहे. असे असताना त्‍यास कोणीतरी सांगितले की, मंडप उभारलेल्‍या लोखंडी पोल मध्‍ये विद्दुत करंट आलेला आहे, त्‍यावेळेस  मृतका जवळ कोणतेही ईलेक्ट्रीशियनचे  प्रशिक्षण नसताना आणि त्‍या बाबत कोणताही परवाना नसताना  लोखंडी पाईपचे निरिक्षण केले व स्‍वतःचा जिव  हेतुपुरस्‍पर धोक्‍यात टाकून लोखंडी पाईपला हात लावला आणि त्‍यातच मृतक विमाधारकाचा विद्दुत शॉक लागून मृत्‍यू झाला. अशाप्रकारे मृतक विमाधारकाचा  अपघाती मृत्‍यू हा त्‍याचे चुकीमुळे झालेला असल्‍याने  तक्रारकर्तीला अपघाती मृत्‍यू विमा दाव्‍याची  रक्‍कम नामंजूरक केली मात्र दोन्‍ही विमा पॉलिसी  अंतर्गत मूळ लाभाची  रक्‍कम  तिला दिलेली आहे.अशाप्रकारे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने दोन्‍ही विमा पॉलिसीपोटी  अपघाती मृत्‍यू दाव्‍याची रक्‍कम नाकारली.  सबब तक्रार खारीज करावी असे विरुध्‍दपक्ष भारतीय जिवन ‍बिमा निगम कंपनी तर्फे नमुद करण्‍यात आले.

 

04.  तक्रारकर्तीची तक्रार, विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनीचे लेखी उत्‍तर व लेखी युक्‍तीवादतसेच उभय पक्षां व्‍दारे दाखल दस्‍तऐवज  याचे अवलोकन  करण्‍यात आले. तक्रारकर्ती   तर्फे  वकील श्री आर.एस. देशमुख  तर  विरुध्‍दपक्ष  विमा कंपनी तर्फे वकील विनय भोयर  यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहे- 

 

                                                                             ::निष्‍कर्ष::

 

05.   तक्रारकर्तीचा  मृतक पती श्री हनुधोज हिरामण डोरले याने तो हयातीत असताना विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कडून  दोन विमा पॉलिसी  काढल्‍या होत्‍या, त्‍यापैकी एक विमा पॉलिसी क्रं -976420636  Date of Commence-28/12/2008 Plan Term 179/16  विमा रक्‍कम रुपये-50,000/- आहे तर दुसरी विमा पॉलिसी क्रं-910170580 Date of Commence-28/03/2018 Plan Term -835/25  विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- होती. तिच्‍या पतीचा  शॉक लागून अपघाती मृत्‍यू हा सातोना येथे दिनांक-14.02.2020 रोजी झाला होता या बाबी संबधाने उभय पक्षां मध्‍ये कोणताही  विवाद नाही.

 

 

06.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे तक्रारकर्तीचा पती हा रोज मजूरीवर मंडप डेकोरेशनचे काम करायाचा असे विधान गुन्‍हयाच्‍या  तपशिलाचा नमुना 174 सी.आर.पी.सी. अंतर्गत दाखल कथनातून आलेले आहे.असे असताना त्‍यास कोणीतरी सांगितले की, मंडप उभारलेल्‍या लोखंडी पोल मध्‍ये विद्दुत करंट आलेला आहे, त्‍यावेळेस  मृतका जवळ कोणतेही ईलेक्ट्रीशियनचे  प्रशिक्षण नसताना आणि त्‍या बाबत कोणताही परवाना नसताना  लोखंडी पाईपचे निरिक्षण केले व स्‍वतःचा जिव  हेतुपुरस्‍पर धोक्‍यात टाकून लोखंडी पाईपला हात लावला आणि त्‍यातच मृतक विमाधारकाचा विद्दुत शॉक लागून मृत्‍यू झाला. अशाप्रकारे मृतक विमाधारकाचा  अपघाती मृत्‍यू हा त्‍याचे चुकीमुळे झालेला असल्‍याने  तक्रारकर्तीला अपघाती मृत्‍यू विमा दाव्‍याची  रक्‍कम नामंजूर केली मात्र दोन्‍ही विमा पॉलिसी  अंतर्गत मूळ लाभाची  रक्‍कम  तिला दिलेली आहे. अशाप्रकारे  विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा भंग झाल्‍याने दोन्‍ही विमा पॉलिसीपोटी  अपघाती मृत्‍यू दाव्‍याची रक्‍कम नाकारली. विमा पॉलिसीतील शर्ती व अटीचे अवलोकन केले असता अट क्रं 11 (ब) (i) मध्‍ये असे नमुद आहे की, विमाधारकाने हेतुपुरस्‍परपणे स्‍वतःला ईजा करुन घेतली तर अशा परिस्थितीत  अपघाती विमा दावा देणे बंधनकारक नसते.

 

 

    विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी तर्फे विमा पॉलिसीचे अटी व शर्तीचा दस्‍तऐवज पुराव्‍यार्थ दाखल करण्‍यात  आला त्‍यामध्‍ये PART C BENEFITS खाली नमुद आहे-


1-A -  Death Benefit:  

      If the Life assued is involved in an accident at any time when this Rider is in force and such injury shall within 180 days of its occurrence solely, direcly and independently of all othere causes result in death of the Life Assured and the same is proved to the satisfaction of  the Corporation, a sum equal to the Accident Benefit Sum Assured shall be payable under this Rider subject to the following-

 

i)    The Rider shall have to be inforce at the the time of accident ie. all due premimum should have been paid as on the date of accident

 

ii)  Conditions and Restrictions mentioned in condition 4 Part C of this Endorsement.

 

 

07.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते, सदर अपघाती मृत्‍यू लाभाचे वाचन  केले असता असे दिसून येते की, पॉलिसी प्रमाणे अपघाती मृत्‍यू लाभ हा  घोषीत विमा रकमेच्‍या बरोबरी ईतकीच रक्‍कम देय राहिल असे स्‍पष्‍टपणे नमुद आहे. विमा पॉलिसीच्‍या अट व शर्त क्रं 11 –ब (i) मध्‍ये जानबुझकर स्‍वयंको चोट पहुंचाने, आत्‍महत्‍या के प्रयास , पागलपन या अनैतिकता के कारण या बिमीत व्‍यक्‍तीके शराब नशीली दवा या मादक पदार्थ के प्रभाव या उपयोग के अधीन रहने के दौरान होती है असे नमुद  आहे.

 

     विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, विमाधारकाने जाणूनबुजून हेतुपुरस्‍पर कोणताही परवाना नसताना ईलेक्ट्रिकचे काम केल्‍यानेशॉक लागून मृत्‍यू झाल्‍याने  तक्रारकर्तीला अपघाती मृत्‍यू दावा रक्‍कम देय नाही.



08.     जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे दस्‍तऐवजाचे अवलोकन करण्‍यात आले, मेडीकल ऑफीसर जनरल हॉस्‍पीटल भंडारा यांचे  दिनांक-15.02.2020 रोजीचे शव विच्‍छेदन अहवालात  मृतकाचे मृत्‍यूचे कारण हे “Death Due to Eectracution” असे नमुद केलेले आहे. पोलीस स्‍टेशन वरठी, भंडारा यांचे दिनांक-15.02.2020 रोजीचे घटनास्‍थळ पंचनाम्‍यात असे नमुद  आहे की, मृतक अनुभोज हिरामण डोरले हा मंडप डेकोरेशनचे काम करीत असताना मंडपाच्‍या लोखंडी पाईपला स्‍पर्श झाल्‍याने विद्दुत करंट लागून मृत्‍यू उपचारा दरम्‍यान झाला तसेच पुढे असे नमुद आहे की,  मृतक हा मंडप डेकोरेशनचे काम करीत असताना कार्यक्रमाला आलेल्‍या लोकांनी लोखंडी पाईपला करंट आहे असे सांगितल्‍या वरुन यातील मृतक हा वायर चेक करण्‍या कामी गेला असता त्‍याला लोखंडी पाईपला स्‍पर्श लागल्‍याने विद्दुत करंट लागून चिकटून राहिला परंतु तेथील लोकांनी विद्दुत प्रवाह बंद केल्‍याने  मृतक हा खाली पडला व सरकारी दवाखाना भंडारा येथे उपचारा दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला असे नमुद आहे.

 

09.   जिल्‍हा ग्राहक आयोगाने सदर पोलीस दस्‍तऐवजाचे बारकाईने अवलोकन केले असता असे  दिसून येते की, मृतकाने  मुद्दामून  विद्दुत  प्रवाह असलेल्‍या लोखंडी पाईपला स्‍पर्श  केला असे कुठेही नमुद नाही तर मृतक हा वायर चेक करण्‍या कामी गेला असता त्‍याला लोखंडी पाईपचा स्‍पर्श लागल्‍याने विद्दुत करंट लागला असेच नमुदआहे.  दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे म्‍हणण्‍या प्रमाणे  मृतका जवळ ईलेक्ट्रिक कामे करण्‍याचा परवाना नव्‍हता तरी त्‍याने विजेचे काम  केल्‍याने  त्‍याचा मृत्‍यू झाला आणि त्‍या मध्‍ये त्‍याचाच दोष आहे. मृतका जवळ घटनेच्‍या वेळी इलेक्ट्रिक काम करण्‍याचा परवाना  असता  तर त्‍याचा अपघाती मृत्‍यू झाला नसता असे म्‍हणता येणार नाही, होणारी  अपघाती  घटना  ही  कशीही  होऊ शकते. मृतकाचा  इलेक्ट्रिक शॉक लागून  अपघाती  मृत्‍यू झाला या बाबी पोलीस दस्‍तऐवज व शवविच्‍छेदन  अहवाला वरुन सिध्‍द झालेल्‍या आहेत. मृतकाने  इलेक्‍ट्रीक प्रवाह बंद  करते वेळी त्‍याचा लोखंडी पोलला स्‍पर्श झाला व शॉक बसला  असे पोलीस दस्‍तऐवजा मध्‍ये  नमुद  आहे.  हातातील प्रकरणात पोलीस दस्‍तऐवजा वरुन मृतकाचा अपघाती मृत्‍यू मध्‍ये निष्‍काळजीपणा होता  ही बाब सिध्‍द झालेली नाही.

 

      क्षणभरासाठी  असेही गृहीत धरले की, पोलीस दस्‍तऐवजा प्रमाणे  मृतकाचा  ईलेक्‍ट्रीक शॉक  लागण्‍या मागे त्‍याचाच निष्‍काळजीपणा  होता  परंतु पोलीसांनी  नोंदविलेल्‍या दस्‍तऐवजावर  विसंबून न राहता  विमा कंपनीने विमा दावा  हा प्रत्‍यक्ष  परिस्थिती  पाहून  निश्‍चीत करावा अशा आशयाची  अनेक निकालपत्रे / न्‍यायनिवाडे मा. वरिष्‍ठ  न्‍यायालयांनी वेळोवेळी पारीत  केलेली आहेत.

     

10.   जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे खालील  मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे निवाडयांवर भिस्‍त ठेवण्‍यात येते  त्‍यातील संक्षीप्‍त निरिक्षणे खालील प्रमाणे आहेत-

 

  1. IV (2011) CPJ 243 (NC)- “New India Assurance Co.Ltd.-Versus-M.S.Venkatesh Babu”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने असे नमुद केले की, पोलीसानीं नोंदविलेला एफआयआर आणि जबाब हा पुराव्‍याचे कायद्दा नुसार भक्‍कम पुरावा आहे असे म्‍हणता येणार नसल्‍याने पोलीसांचे दस्‍तऐवजाचा विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला फायदा घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                ***** 

 

  1. 2007 (3) CPR 142 -“New India Assurance Co.Ltd.-Versus-Hausabai Pannalal Dhoka

      सदर प्रकरणात मा.राज्‍य ग्राहक आयोग, मुंबई यांनी असे नमुद केले की,  पोलीसानीं गुन्‍हयाचे प्रकरणात नोंदविलेला जबाब हा पुरावा म्‍हणून ग्राहय धरता येणार नाही जो पर्यंत ग्राहक मंचा तर्फे जबाब देणा-याची साक्ष घेतल्‍या जात नाही असे मत नोंदविले.

                               ***** 

 

  1.  III (2016) CPJ-574 (NC) “S.B.I.Life Insurance Co.-Versus-Sudesh     Khanduja & Anr.”

      सदर प्रकरणात मा.राष्‍ट्रीय ग्राहक आयोगाने डॉक्‍टरांचा अहवाला वरुन मृतकाने विष घेतले किंवा नाही हे स्‍पष्‍ट होऊ शकले नाही. पोलीसांनी घेतलेल्‍या जबाबाचा आधार हा विमा दावा नामंजूर करताना विमा कंपनीला घेता येणार नसल्‍याचे मत नोंदविले.

                                    *****    

 

 

11.    उपरोक्‍त मा. वरिष्‍ठ न्‍यायालयांचे न्‍यायनिवाडे पाहता विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला तक्रारकर्तीचे पतीचे अपघाती मृत्‍यूसंबधात पोलीस दस्‍तऐवजाचा आधार घेता येणार नाही, त्‍यासाठी स्‍वतंत्र असा पुरावा  जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  तपासणे आवश्‍यक  होते परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही. मृतकाने  मुद्दामून हेतुपुरस्‍पर जीवंत विद्दुत प्रवाह असलेल्‍या लोखंडी खांबास स्‍पर्श् केला होता  ही बाब योग्‍य त्‍या पुराव्‍या अभावी सिध्‍द झालेली नसल्‍याने  तक्रारकती  ही तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधात दोन्‍ही विमा पॉलिसी प्रमाणे देय विमा रक्‍कम मिळण्‍यास पात्र आहे  आणि सदर विमा रकमेवर  विमा दावा नाकारल्‍याचे  दिनांका पासून द.सा.द.शे.9 टक्‍के दराने व्‍याज मिळण्‍यास पात्र आहे. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्तीला   झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/-  आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

12.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थितीचा विचार करुन आम्‍ही प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करीत आहोत-

 

                                                                                     ::अंतिम आदेश::

 

  1. तक्रारकर्ती श्रीमती भाग्‍यशाला हनुधोज डोरले यांची तक्रार विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा भंडारा  यांचे  विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी  तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय, भंडारा   यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्तीला तिचे पतीचे अपघाती मृत्‍यू संबधाने विमा पॉलिसी क्रं -976420636  Date of Commence-28/12/2008 Plan Term 179/16  प्रमाणे देय विमा रक्‍कम रुपये-50,000/- (अक्षरी रुपये पन्‍नास हजार फक्‍त) आणि विमा पॉलिसी क्रं-910170580 Date of Commence-28/03/2018 Plan Term -835/25 प्रमाणे  देय विमा रक्‍कम रुपये-2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लक्ष फक्‍त) अशा रकमा अदा कराव्‍यात  आणि सदर दोन्‍ही विमा  रकमांवर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  विमा दावा नाकारलयाचा दिनांक-05.10.2021 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याजाची रक्‍कम तक्रारकर्तीला   अदा करावी.

 

 

  1. तक्रारकर्तीला   झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी  तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय, भंडारा  यांनी तक्रारकर्तीला  अदा करावेत.

 

 

  1. सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष भारतीय जीवन बिमा निगम कंपनी  तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय, भंडारा   यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झालयाचे  दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.

 

  1. निकालपत्राच्‍या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकांराना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. उभय पक्षकारांनी अतिरिक्‍त संच  जिल्‍हा आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.