जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 333/2019. आदेश दिनांक : 03/08/2022.
भारत पिता वैजनाथ शेरे, वय 63 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त,
रा. विठ्ठल नगर, शेल्हाळ रोड, उदगीर, ता. उदगीर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखाधिकारी / मॅनेजर, फेनोमिनल इंडस्ट्री लि.,
मिनी मार्केट, महानगरपालिका कॉम्प्लेक्स, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापकीय संचालक, फेनोमिनल इंडस्ट्री लि.,
101/अ, दिव्यस्मृति, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई - 400 064. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- बालाजी व्ही. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी फेनोगोल्ड मेंबरशीप - जॉईंट इकॉनॉमी पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. परंतु विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी न होता परत आले. त्यानंतर तक्रारकर्ता यांना उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांच्यावर सूचनापत्र बजावणीकरिता आवश्यक पूर्तता केली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ मागील अनेक तारखांपासून सातत्याने अनुपस्थित आहेत. तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-