जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 148/2019. आदेश दिनांक : 12/07/2022.
लक्ष्मीबाई बाबुराव बोराळे, वय 49 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. कोल्हे नगर, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, फेनोमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेस लि.,
शाखा : महानगरपालिका कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट, लातूर, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापकीच संचालक, फेनोमिनल हेल्थकेअर सर्व्हीसेस लि.,
सिटी एस. नं. 733, फेनोमिनल हाऊस, ए.के. रोड,
मरोळ, अंधेरी (पु.), मुंबई - 400 059. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- बालाजी व्ही. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी फेनोगोल्ड मेंबरशीप - सिंगल इकोनॉमी पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल झाल्यानंतर ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. परंतु सूचनापत्राची बजावणी होऊ शकली नाही. तक्रारकर्ता यांच्या विनंती अर्जानुसार विरुध्द पक्ष यांना दैनिक वृत्तपत्राद्वारे जाहीर प्रगटनाद्वारे सूचनापत्र प्रसिध्द करण्याचे आदेश करण्यात आले. सूचनापत्राच्या प्रसिध्दीकरणासाठी तक्रारकर्ता यांनी सूचनापत्र स्वीकारले. त्यानंतर वेळोवेळी संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना वर्तमानपत्राद्वारे सूचनापत्र बजावणी होण्याकरिता तक्रारकर्ता यांनी पूर्तता केलेली नाही. तसेच अनेक तारखांपासून तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित राहिले. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्यासाठी आवश्यक पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/12722)