जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 216/2022. आदेश दिनांक : 03/10/2022.
नरसिह पिता मारुती सौदागर, वय 38 वर्षे, व्यवसाय : मोटार मेकॅनिक,
प्रोप्रा. न्यू शिवम मोटर्स, कन्हेरी चौक, रिंग रोड, मोरे नगर,
लातूर, ता. जि. लातूर - 413512, रा. मु.पो. बाभळगाव, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) एच.डी.एफ.सी. इर्गो हेल्थ इन्शुरन्स लि. तर्फे शाखा व्यवस्थापक,
तिसरा मजला, निर्मल हाईटस्, औसा रोड, नंदी स्टॉप,
लातूर - 413 512.
(2) एच.डी.एफ.सी. इर्गो हेल्थ इन्शुरन्स लि. तर्फे शाखा व्यवस्थापक,
पहिला मजला, एचडीएफसी हाऊस, 165/66, बॅकबे रिक्लेमेशन,
एच.टी. पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई - 400 020. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- ओमप्रकाश बी. पंडीत
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- सतिश जी. दिवाण
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) प्रस्तुत प्रकरणमध्ये उभय पक्षांतर्फे तडजोड पुरसीस दाखल करण्यात आलेली आहे. तडजोड पुरसीसनुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना तडजोड आदेशापासून 30 दिवसाच्या आत रु.1,04,252/- देण्याचे ठरलेले आहे. तसेच, तक्रारकर्ता यांनी अन्य अनुतोष मागण्यांवरील हक्क सोडून दिल्याचे नमूद केले. तक्रारकर्ता यांच्यासह उभय पक्षांच्या विधिज्ञांची तडजोड पुरसीसवर स्वाक्षरी आहे. उभय पक्षांतील विवाद परस्पर मिटल्यामुळे तडजोड पुरसीसच्या अनुषंगाने प्रस्तुत ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-