जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 104/2023. तक्रार नोंदणी दिनांक : 09/05/2023.
तक्रार दाखल दिनांक : 15/05/2023. तक्रार निर्णय दिनांक : 18/09/2024.
कालावधी : 01 वर्षे 04 महिने 09 दिवस
भदाडे टुर्स ॲन्ड ट्रॅव्हल्स्, प्रो. अतुल तुळसीदास भदाडे,
वय 26 वर्षे, व्यवसाय : स्वंयरोजगार,
रा. मावलगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर. :- तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, आय सी आय सी आय लोम्बार्ड
जनरल इन्शुरन्स कं. लि., हॉटेल व्यंकटेशच्या वर,
तिसरा मजला, औसा रोड, लातूर.
(2) व्यवस्थापक, आय सी आय सी आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.,
इंटरफेस बिल्डींग नं. 16/601/602, सहावा मजला, न्यू लिंक रोड,
मालाड (पश्चिम), मुंबई - 400 064.
(3) व्यवस्थापक, आय सी आय सी आय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि.,
414, आय सी आय सी आय लोम्बार्ड हाऊस, वीर सावरकर मार्ग,
सिध्दीविनायक मंदिराच्या मुख्य गेटजवळ, प्रभादेवी, मुंबई - 400 025. :- विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष
श्रीमती वैशाली म. बोराडे, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. एस. जी. डोईजोडे
आदेश
श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्यक्ष यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांनी त्यांच्या क्षतीग्रस्त वाहन क्र. एम. एच. 12 आर. एन. 2025 चा विमा दावा विरुध्द पक्ष यांनी नामंजूर केल्यामुळे विमा रक्कम मिळण्याकरिता प्रस्तुत ग्राहक तक्रारपत्र दाखल केलेले आहे.
(2) आज दि.18/9/2024 रोजी तक्रारकर्ता, त्यांचे विधिज्ञ व विरुध्द पक्ष यांचे विधिज्ञ जिल्हा आयोगापुढे उपस्थित होऊन त्यांनी संयुक्त पुरसीस दाखल केली आणि ग्राहक तक्रारपत्रातील अनुतोष मागणीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना 45 दिवसांच्या आत रु.1,60,000/- देण्याचे व न दिल्यास तक्रारपत्र दाखल केल्याच्या तारखेपासून 9 टक्के दराने व्याज देण्याचे मान्य केलेले आहे. तसेच, उभय पक्षांनी त्यांना प्रकरण चालविण्याचे नसल्यामुळे बंद करण्याबद्दल नमूद केले.
(3) उभय पक्षांचे निवेदन व दाखल करण्यात आलेल्या पुरसीसचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये सामंजस्याने तडजोड झाल्याचे निदशर्नास येते. करिता, उभयतांच्या संयुक्त पुरसीसच्या अनुषंगाने ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येऊन बंद करण्यात येते.
(श्रीमती वैशाली म. बोराडे) (श्री. अमोल बा. गिराम)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-