(पारीत व्दारा श्री भास्कर बी.योगी, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक-21 नोव्हेंबर , 2022)
01. तक्रारकर्तीने प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे कलम 35 खाली विरुध्दपक्ष क्रं 1) विमा कंपनी आणि ईतर एक यांचे विरुध्द तिचे पतीचे मृत्यू संदर्भात जीवन विमा पॉलिसी अंतर्गत विमा रक्कम मिळावी तसेच ईतर अनुषंगीक मागण्यांसाठी प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्ती ही मृतक श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे यांची पत्नी असून नॉमीनी व कायदेशीर वारसदार या नात्याने तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी विरुध्द उर्वरीत विम्याची रककम मिळावी म्हणून प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेली आहे. तिचे पती हे शिक्षक होते आणि त्यांनी अधिकृत विमा एजंटचे मार्फतीने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून जीवन विमा पॉलिसी क्रं-01272512 काढली होती आणि सदर विमा पॉलिसीचा हप्ता वार्षिक रुपये-50,000/- होता. विमा रक्कम रुपये-5,00,000/- होती. तिचे पतीला ताप आल्याने दिनांक-23.02.2019 रोजी स्पर्श मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल भंडारा येथे भरती करण्यात आले होते, तेथे कावीळ या आजाराचे निदान झाले व वैद्दकीय उपचार दवाखान्यात सुरु असताना दिनांक-05.03.2019 रोजी मृत्यू झाला होता व ही बाब मृत्यू प्रमाणपत्रावरुन सिध्द होते. तिचे पतीचे मृत्यू नंतर तिने विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी मध्ये विमा दावा दाखल केला असता विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दिनांक-23.04.2019 रोजी पत्र देऊन विमा दाव्याची छाननी केल्या नंतर विमा रक्कम देण्यात येईल असे कळविले. दिनांक-02.08.2019 रोजी विरुदध्पक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीचे कॅनरा बॅंक शाखा मोहदुरा जिल्हा भंडारा येथील बॅंक खाते क्रं-3791101001691 मध्ये रुपये-50,456/- ई.एफ.टी.व्दारे जमा केली. तिने संपूर्ण विमा रक्कम रुपये-5,00,000/- पैकी उर्वरीत रक्कम रुपये-4,49,544/- देण्याची विनंती केली परंतु प्रतिसाद दिला नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तिला दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तिला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणून शेवटी तिने प्रस्तुत तक्रार जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षां विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- तक्रारकर्तीला तिचे पतीचे जीवन विमा पॉलिसी क्रं-01272512 अन्वये उर्वरीत विमा रक्कम रुपये-4,49,544/- आणि सदर रकमेवर दिनांक-05.03.2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्के दराने व्याज विरुध्दपक्षांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या देण्याचे आदेशित व्हावे.
- तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-30,000/- व तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- विरुध्दपक्षांनी देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद त्यांचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03 विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेल्या लेखी उत्तरात नमुद केले की, विमा कंपनीची स्थापना ही कंपनी कायदया अन्वये झालेली असून तिचे नोंदणीकृत कार्यालय 11 वा मजला, विश्वरुप, आय.टी.पार्क, प्लॉट क्रं 34, 35 व 38 सेक्टर 30 ए आय.आय.पी. वाशी, नवि मुंबई-400703 येथे असल्याचे नमुद केले. त्यांनी असे नमुद केले की, तक्रारकर्तीचा मृतक पती विमाधारक श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे याने विमा प्रस्ताव फार्म भरुन देताना त्याचे आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आरोग्याच्या बाबी लपवून ठेवल्यात. मृतक विमाधारक हा Hypertension , DMII & Chronic Alcoholic या आजाराने दहा वर्षा पासून ग्रस्त होता. तसेच त्याचे आरोग्याचे ईतिहासा प्रमाणे History of PTB & Asthma हा आजार होता. स्पर्श हॉस्पीटल, भंडारा येथील वैद्दकीय दस्तऐवजा प्रमाणे मृतक हा दिनांक-04.02.2019 ते दिनांक-09.02.2019 या कालावधीत भरती होता आणि तेथे तो अल्कोहोलीक असल्याने कावीळ झाल्याचे निदान झाले होते. विमाधारकास विमा पॉलिसी काढण्यापूर्वी आजार होता परंतु त्याने ही बाब प्रस्ताव फार्म भरुन देताना लपवून ठेवली. आपले लेखी उत्तरा मध्ये विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने खालील मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडयांचा उल्लेख करुन भिस्त ठेवली-
- Export Credit Guarantee Corporation of India Ltd.-Versus-Garg Sons International-2013 (1) SCALE 410
- P.C. Chacko and Anr –Versus-Chairman Life Insurace Corporation of India & Others-AIR 2008 SC 424
- Life Insurance Corporation of India-Versus-Smt. G.M. Channabasamma – AIR 1991 SC 392
- Satwant Kaur Sandhu-Versus- New India Assurance Company Ltd.-(2009) 8 SCC 316
जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे सदर निवाडयाचे अवलेाकन करण्यात आले. नमुद अक्रं 4 मधील निवाडया मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने विमा प्रस्तावा मध्ये आरोग्य विषयक विचारलेल्या प्रश्नांची खरीउत्तरे विमाधारकाने देणे आवश्यक आहे आणि विमा प्रस्तावाचे आधारे विमा पॉलिसी देण्यात येते आणि विमा करार हा उभय पक्षां मधील परस्पर विश्वासावर अवलंबून असतो असे नमुद केलेले आहे.
विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने लेखी उत्तरात पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्ती ही स्वच्छ हाताने जिल्हा ग्राहक आयोगा समक्ष आलेली नाही. तक्रारनिहाय परिच्छेदाला उत्तर देताना विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने असे नमुद केले की, विमाधारक श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे यास विमा पॉलिसी क्रं 01272512 दिनांक-12.12.2018 रोजी जारी केली होती आणि विमाधारकाने रुपये-50,456/- विमा हप्त्याची रक्कम अदा केली होती. विमा पॉलिसी रुपये-3,00,000/- एवढया रकमेची होती. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा हप्त्याची रक्कम रुपये-50,456/- तक्रारकर्तीला परत केलेली आहे. तक्रारकर्तीने विमा रक्कम रुपये-5,00,000/- असलयाचे नमुद केले ते चुकीचे आहे. सबब तक्रारकर्तीची तक्रार खारीज करण्यात यावी असे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने उत्तरा मध्ये नमुद केले.
04. विरुध्दपक्ष क्रं 2 रमीझ मुनीर शेख, राहणार वरठी, तहसिल मोहाडी, जिल्हा भंडारा याचे नावे दैनिक लोकजन दिनांक-05.04.2022 रोजीचे वृत्तपत्रातून जाहिर नोटीस प्रसिध्द करण्यात आली परंतु अशी नोटीस प्रसिध्द झाल्या नंतरही विरुध्दपक्ष क्रं 2 उपस्थित झाला नसल्याने त्याचे विरुध्द प्रकरणात दिनांक-18.08.2022 रोजी एकतर्फी आदेश पारीत करण्यात आला.
05. तक्रारकर्ती तसेच विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे लेखी उत्तर तसेच तक्रारकर्ती आणि विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने दाखल केलेले दस्तऐवजाचे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्ती तर्फे वकील श्री एम.बी. बहादुरे यांचा तर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे वकील श्री निचकवडे यांचा मौखीक युक्तीवाद ऐकला, त्यावरुन जिल्हा ग्राहक आयोगाचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे.
-निष्कर्ष -
06. तक्रारकर्तीचे मृतक पती श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे याचे दिनांक-05.02.2018 रोजीची विमा प्रस्ताव फार्मची प्रत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने प्रकरणात दाखल केली त्यामध्ये विमा रक्कम रुपये-3,00,000/- नमुद आहे. सदर विमा प्रस्ताव फार्म मध्ये खालील प्रश्न विचारलेला आहे-
Do you consume or have ever consumed tobacco, alcohol or any narcotics” if Yes, please give details-
Tobacco- No
Alcohol – Yes
Type Consumed- Wine
Quantity- Glasses
असे स्पष्टपणे उत्तर विमाधारकाने दिलेले आहे आणि सदर विमा प्रस्ताव फार्मची प्रत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीनेच दाखल केलेली आहे. यावरुन विमाधारकाने विमा पॉलिसी काढते वेळी विमा प्रस्तावा मधील प्रश्नास खरे उत्तर दिलेले आहे ही बाब सिध्द होते.
07. विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने आपले लेखी उत्तरात विमाधारकास विमा पॉलिसी घेण्या अगोदर पासून Diabetes Mellitus Type 2 (DM2) Hypertension & Chronic Alcoholic असल्याने संपूर्ण विमा रक्कम दिली नाही तर फक्त विमाधारकाने भरलेली एक विमा हप्तयाची रक्कम तक्रारकर्तीचे कॅनरा बॅंक शाखा मोहदुरा जिल्हा भंडारा येथील बॅंक खाते क्रं 3791101001691 मध्ये नेफ्टव्दारे रुपये-50,456/- जमा केली होती आणि सदर बाब ही तक्रारकर्तीचे बॅंक खाते उता-या वरुन सिध्द होते.
08. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे प्रकरणातील अभिलेखाचे सुक्ष्म अवलोकन केले. विमाधारकाने विमा प्रस्तावा मध्ये त्याला हायपर टेंशन, मधुमेह आजार नसल्याचे नमुद केले ही बाब विमा प्रस्तावाचे प्रतीवरुन सिध्द होते. स्पर्श हॉस्पीटल भंडारा येथील दिनांक-23.02.2019 रोजीचे वैद्दकीय नोंदीचे दस्तऐवजा मध्ये Chronic Alcoholic असे नमुद आहे परंतु वर नमुद केल्या प्रमाणे विमाधारकाने विमा प्रस्ताव फार्म मध्ये तो Type Consumed-Wine Quantity Glasses मद्दार्काचे सेवन करतो असे स्पष्टपणे मान्य केलेले आहे. त्याच बरोबर जिल्हा ग्राहक आयोगाचे असे स्पष्ट मत आहे की, Diabetes Mellitus Type 2 (DM2) Hypertension हे सदरचे आजार वयाची पस्तीशी ओलांडल्या नंतर आजचे आधुनिक धकाधकीचे जीवनात बहुतांश लोकांना योग्य व्यायामाचा अभाव आणि सकस आहाराचे अभावी आहेत आणि सदर आजार असलेल्या व्यक्तीचे आर्युमान किती राहील हे सुध्दा सांगता येत नाही. सदर आजार असलेली व्यक्ती नियमित औषधाचे सेवनामुळे दिर्घकाळ सुध्दा जीवन जगणारी आहेत आणि असे आजार असलेली व्यक्ती मृत्यू झाल्या नंतरच विमा कंपनीला विमा राशी दयावी लागते म्हणजे विम्याचे जोखीम पोटी विमा रक्कम दयावी लागते. थोडक्यात असा आशय आहे की, मधुमेह हायपर टेंशन असलेल्या प्रत्येक विमाधारकाचे प्रकरणात विमा कंपनीला विम्याचे जोखीम पोटी विमा रक्कम दयावी लागते असे होत नाही. हातातील प्रकरणात विमाधारकाचा मृत्यू झाल्या नंतर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला विमा रक्कम देण्याची जबाबदारी आलेली आहे परंतु विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कारणे पुढे करुन विमा रक्कम देण्याची जबाबदारी टाळत आहे असे दिसून येते. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर करुन तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिल्याची बाब सिध्द होते.
09. जिल्हा ग्राहक आयोगाव्दारे स्पष्ट करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्रं 2 रमीझ मुनीर शेख याची या प्रकरणात काय भूमीका आहे? हे तक्रारीवरुन स्पष्ट होत नाही परंतु अशी शक्यता आहे की, विरुध्दपक्ष क्रं 2 हा विमा कंपनीचा एजंट असावा म्हणून त्यास तक्रारी मध्ये प्रतीपक्ष केलेले आहे. तसेच विरुध्दपक्ष क्रं 2 याने तक्रारकर्तीला कशाप्रकारे दोषपूर्ण सेवा दिली याचे विवेचन तक्रारी मध्ये नाही त्यामुळे विरुध्दपक्ष क्रं 2 विरुध्द तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. दुसरी बाब अशी आहे की, विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्यांचे दिनांक-06 ऑगस्ट, 2019 रोजीचे पत्रान्वये विमाधारकाने विमा प्रस्तावा मध्ये चांगले आरोग्य आहे तसेच त्याला मधुमेह व हायपरटेंशन आजार नसल्याचे नमुद केलेले असलयाने विमा दावा नामंजूर केला असल्याचे नमुद केले. परंतु उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता विमाधारकाने विमा प्रस्ताव फार्म मध्ये तो मद्दार्काचे सेवन करीत असल्याची बाब लपवून ठेवलेली नसल्याचे स्पष्ट होते. तसेच मधुमेह, हायपरटेंशन हे आजार आजचे बदलत्या आधुनिक शैलीमुळे व्यायामाचा अभाव, योग्य आहार नसलयाचे कारणावरुन बहुतांश लोकांना झालेले असतात. अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्तीला विमाधारकाची विमा पॉलिसी प्रमाणे भरलेली एक वार्षिक हप्त्याची रक्कम रुपये-50,456/- परत केलेली आहे परंतु विमा पॉलिसी प्रमाणे संपूर्ण विमा रक्कम रुपये-3,00,000/- परत केलेली नाही त्यामुळे तक्रारकर्तीला तिचा विमाधारक पती श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे याचे मृत्यू पःश्चात कायदेशीर वारसदार आणि नॉमीनी या नात्याने विमा पॉलिसी क्रं-01272512 प्रमाणे विम्याची उउर्वरीत रक्कम रुपये-2,49,544/- आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्याचा दिनांक-06 ऑगस्ट, 2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल तसेच तक्रारकर्तीला विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- तसेच तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे जिल्हा ग्राहक आयोगाचे मत आहे.
10. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
::अंतिम आदेश::
- तक्रारकर्ती श्रीमती रमा प्रमोद शेन्द्रे यांची तक्रार विरुध्दपक्ष क्रं 1 STAR UNION DAI-ICHI LIFE INSURANCE COMPANY LTD. Registered Office- 11th Floor, Vishwaroop IT Park, Plot No. 34, 35 & 38, Sector 30 A of IIP , Vashi, Navi Mumbai-400703 मार्फत शाखा प्रबंधक, स्टार युनियन दाई-ईची लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, गोंदीया, तालुका जिल्हा गोंदीया यांचे विरुध्द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्दपक्ष क्रं 1 STAR UNION DAI-ICHI LIFE INSURANCE COMPANY LTD. Registered Office- Vashi, Navi Mumbai-400703 मार्फत शाखा प्रबंधक, स्टार युनियन दाई-ईची लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, गोंदीया, तालुका जिल्हा गोंदीया यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला तिचा विमाधारक पती श्री प्रमोद हरिकिशन शेन्द्रे याचे मृत्यू पःश्चात कायदेशीर वारसदार आणि नॉमीनी या नात्याने विमा पॉलिसी क्रं-01272512 प्रमाणे विम्याची उर्वरीत रक्कम रुपये-2,49,544/- (अक्षरी उर्वरीत रक्कम रुपये दोन लक्ष एकोणपन्नास हजार पाचशे चौरेचाळीस फक्त) आणि सदर रकमेवर विरुध्दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दावा नामंजूर केल्याचा दिनांक-06 ऑगस्ट, 2019 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्के दराने व्याज दयावे.
- विरुध्दपक्ष क्रं 1 STAR UNION DAI-ICHI LIFE INSURANCE COMPANY LTD. Registered Office- Vashi, Navi Mumbai-400703 मार्फत शाखा प्रबंधक, स्टार युनियन दाई-ईची लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, गोंदीया, तालुका जिल्हा गोंदीया यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारकर्तीला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) तसेच तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) अशा रकमा अदा कराव्यात.
- विरुध्दपक्ष क्रं 1 STAR UNION DAI-ICHI LIFE INSURANCE COMPANY LTD. Registered Office- Vashi, Navi Mumbai-400703 मार्फत शाखा प्रबंधक, स्टार युनियन दाई-ईची लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, गोंदीया, तालुका जिल्हा गोंदीया यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी प्रस्तुत निकालपत्रातील अंतीम आदेशाचे अनुपालन निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
- विरुध्दपक्ष क्रं 2 रमीझ मुनीर शेख याचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
- निकालपत्राच्या प्रथम प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
- सर्व पक्षां तर्फे दाखल अतिरिक्त फाईल्स त्यांनी जिल्हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून घेऊन जाव्यात.