Maharashtra

Bhandara

CC/21/112

शिवदास शंकर गायधने - Complainant(s)

Versus

शाखा प्रबंधक. नॅशनल इंंन्‍सुरन्‍स कं.‍ लि. - Opp.Party(s)

श्री.अरीफ खान

16 Jan 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/112
( Date of Filing : 08 Nov 2021 )
 
1. शिवदास शंकर गायधने
रा.भगतसिंग वार्ड. नविन टाकळी. भंडारा तह.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा प्रबंधक. नॅशनल इंंन्‍सुरन्‍स कं.‍ लि.
जिल्‍हा परिषद चौक. तह.भंडारा.
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 16 Jan 2023
Final Order / Judgement

(पारीत व्‍दारा श्री नितीन माणिकराव घरडे, मा.सदस्‍य)

 

01.    तक्रारकर्त्‍याने  विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी  विरुध्‍द विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहनाचे दुरुस्‍तीचा खर्च मिळावा तसेच अन्‍य अनुषंगिक मागण्‍यां साठी ग्राहक संरक्षण कायदा-2019 चे कलम-35 खाली प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केली आहे.

 

02.   तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे त्‍याचे मालकीचा टिप्‍पर असून त्‍याचा नोंदणी     क्रमांक-MH-36/AA-3093 असा आहे. त्‍याने  सदर वाहनाचा विमा विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी कडे काढला होता. सदर वाहनाचे विमा पॉलिसीचा     क्रं-281303311910004833 असा असून विम्‍याचा कालावधी  हा दिनांक-04.01.2020 ते दिनांक-03.01.2021 पर्यंत होता.      सदर विमाकृत वाहनावर श्री ईश्‍वरदास मते हा   वाहन चालक म्‍हणून कार्य करीत  होता. तक्रारकर्त्‍याचे मालकीचा  सदर  टिप्‍पर हा  दिनांक-07.05.2020 रोजी नवेगाव बांध येथून बजरी साकोलीला आणण्‍यासाठी पाठविला होता.  दुपारी 3.00 वाजता नवेगाव बांध येथे रॅम्‍पवर चढत असताना सदर विमाकृत टिप्‍पर  उलटल्‍याने वाहनाचे फार मोठया  प्रमाणावर नुकसान झाले.  अपघाताचे घटने  बाबत वाहन चालकाने तक्रारकर्त्‍यास कळविले वरुन तक्रारकर्त्‍याने वाहनास झालेल्‍या अपघाता बाबत विमा अभिकर्ता श्री राष्‍ट्रपाल नाईक यांना  सांगितले त्‍यानुसार विमा अभिकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीस लेखी स्‍वरुपात विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता बाबत कळविले. अपघाताचे दुसरे दिवशी म्‍हणजे दिनांक-08.05.2020 रोजी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी  पाहणी करुन तक्रारकर्त्‍यास  क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहन दुरुस्‍त करण्‍यास सांगितले, त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहन टाटा रिपअरींग वर्क्‍स, फुलमोगरा, भंडारा येथे दुरुस्‍त केले. त्‍यानंतर लॉकडाऊनचा कालावधी होता, विमाकृत वाहनाचे अंतीम निरिक्षणासाठी विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री अजय  झोड यांची सात दिवस वाट पाहूनही ते न आल्‍याने दुरुस्‍त केलेले विमाकृत वाहन   बेला भंडारा येथील टाईल्‍सच्‍या दुकानात उभे केले.  त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री झोड  आलेत व त्‍यांनी  वाहनाचे निरिक्षण करुन व फोटो काढून घेतले.  तक्रारकर्त्‍याने  विमा मिळण्‍यासाठी विमा दावा प्रपत्र भरुन  दिले परंतु  विम्‍याची रक्‍कम मिळाली नाही. त्‍यानंतर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने दिनांक-11.11.2020  रोजीचे पत्रान्‍वये घटनास्‍थळावर रॅम्‍प फोटोग्राफ  मध्‍ये दिसून  आला नाही या कारणास्‍तव तक्रारकर्त्‍याचा  विमा दावा नामंजूर केला.  तक्रारकर्त्‍याचे  असे म्‍हणणे  आहे की, त्‍याला विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहन हे  घटनास्‍थळा वरुन दुरुस्‍ती करीता फुलमोगरा  भंडारा  येथे टोचन करुन आणावे  लागले त्‍यासाठी रुपये-5000/- खर्च आला. क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहन दुरुस्‍तीचा खर्च  रुपये-1,10,000/- आला तसेच वाहन सात दिवस  उभे असल्‍याने प्रती दिवस रुपये-5000/- प्रमाणे सात दिवसा करीता रुपये-35,000/- चे नुकसान  झाले. अशाप्रकरे तकारकर्त्‍याचे एकूण रुपये-1,50,000/- रकमेचे नुकसान झाले आणि एवढी नुकसान भरपाईची रक्‍कम विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून त्‍याला मिळणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष विमा कंपनीला दिनांक-02.07.2021 रोजीची नोटीस पाठवून  विमा रकमेची मागणी केली परंतु विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने नोटीसला खोटे उत्‍तर पाठविले तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केल्‍याने  त्‍याला आर्थिक,शारिरीक व मानसिक त्रास सहन करावालागतआहे म्‍हणून शेवटी  तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा  समक्ष दाखल करुन  त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्ष विमा कंपनी  विरुध्‍द खालील  प्रमाणे मागण्‍या केल्‍यात-

 

1.   विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍यास क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहन  नोंदणी क्रं-MH-36/AA-3093 चे दुरुस्‍ती संबधात  विमा रक्‍कम रुपये-1,50,000/- देण्‍याचे आणि सदर रकमेवर  अपघात दिनांक-07.05.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 18 टक्‍के दराने व्‍याज देण्‍याचे  आदेशित व्‍हावे.

 

2..   तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व  मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसानी बाबत रुपये-20,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून  देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

3.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-20,000/- देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

           4.   या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर  करण्‍यात यावी.

 

        

 

03.   विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी तर्फे  लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष  दाखल करण्‍यात आले.  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तरा प्रमाणे  तक्रारकर्त्‍याची तक्रार खोटी असून  तक्रारकर्त्‍याने त्‍यांना कोणतेही पत्र पाठविले नसल्‍याचे नमुद केले.  आपले खास कथना मध्‍ये  असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याचे कथना  प्रमाणे विमाकृत वाहनास झालेला अपघात हा वाहन रैम्‍पवर चढताना झाला परंतु सर्व्‍हेअर मोक्‍यावर  गेले असता त्‍यांना वाहना जवळ कुठलाही रॅम्‍प दिसून आला नाही यावरुन स्‍पष्‍ट होते की,  तक्रारकर्ता हा खोटे बोलत आहे. दुसरी बाब अशी आहे की, सर्व्‍हेअर जेंव्‍हा विमाकृत वाहनाची पाहणी करण्‍या करीता गेले होते त्‍यावेळी त्‍यांचे पाहणीचे आधीच विमाकृत वाहन दुरुस्‍त करुन ठेवले होते त्‍यामुळे क्षतीग्रस्‍त वाहनाचा सर्व्‍हे होऊ न शकल्‍याने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नामंजूर केला.  पॉलिसी नुसार जर तक्रारकर्त्‍याला  विमा दावा दयावयाचा असेल तर तो फक्‍त रुपये-43,439.36 एवढया रकमेचा देय राहिल.  तक्रारकर्त्‍याने विमा दाव्‍या बाबत केलेली मागणी रुपये-1,50,000/- चुकीची आहे त्‍यामुळे  तक्रार खारीज करण्‍यात यावी असे नमुद केले

 

 

04.   तक्रारकर्त्‍याची  तक्रार, त्‍याचा शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद तसेच विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे लेखी उत्‍तर शपथे वरील पुरावा त्‍याच बरोबर उभय पक्षां तर्फे दाखल दस्‍तऐवजाचे जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे अवलोकन  करण्‍यात आले त्‍यावरुन  जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील  प्रमाणे आहे-

                                                                                                 निष्‍कर्ष  

 

05    तक्रारकर्त्‍याचा विमा दावा नाकारताना  विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनीने  दोन मुद्दे उपस्थित केलेत. पहिला मुद्दा असा आहे की, तक्रारकर्त्‍याचे  कथना प्रमाणे विमाकृत वाहन रॅम्‍पवर चढताना अपघात झाला परंतु सर्व्‍हेअर यांनी  केलेल्‍या पाहणी मध्‍ये  तसेच फोटो मध्‍ये घटनास्‍थळावर कोठेही रॅम्‍प आढळून आला नाही  त्‍यामुळे  तक्रारकर्ता हा खोटे बोलत आहे.  दुसरा मुद्दा असा आहे की, ज्‍यावेळी  सर्व्‍हेअर यांनी क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहनाची पाहणी केली, त्‍यावेळी विमाकृत वाहन दुरुस्‍त झालेले असल्‍याने सर्व्‍हे करता आला नाही.

 

 

06     जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे विरुदपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला जे विमा दावा नामंजूरीचे  दिनांक-11.11.2020 रोजीचे पत्र पाठविले आहे त्‍याचे अवलोकन करण्‍यात आले,  त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद केलेले आहे-

 

      We have onlce again examined the issues and regret to inform you that your above mentioned claim stands Repudiated by us for the following reasons:-

      As per the claim form submitted by you, the incidence was happened whild climbing on ram, but while going through the spot survey report & photographs there was no ram  nearby insured vehicle and not also mentioned by the spot surveyor.  At the time of accident the insured vehicle was empty but spot photos shows that the hydraulic jack was in open condition.  As per Final Survey Report dated 27/09/2020 it came to know that when surveyour reached Navegaonbandh for survey he saw that the insured vehicle was already repaird.

 

 

07     तक्रारकर्त्‍याने आपले शपथे वरील पुराव्‍यात असे नमुद केलेले आहे की, दिनांक-07.05.2020 रोजी विमाकृत वाहन दुपारी 3.00 वाजता नवेगाव बांध येथे रॅम्‍पवर चढत असताना सदर टिप्‍परने पलटी मारली व नुकसान झाले. अपघाताचे दुसरे दिवशी सर्व्‍हेअर   श्री गणेश थोरात यांनी वाहनाचे नुकसानीचे निरिक्षण केले व त्‍यांनी क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहन दुरुस्‍ती करण्‍यास सांगितले, त्‍यांचे सांगण्‍या नुकसार टाटा रिपेअरींग वर्क्‍स फुल मोगरा भंडारा येथे वाहन दुरुस्‍त केले.  त्‍यानंतर लॉकडाऊन सुरु झाले. विमा कंपनीस वाहनाचे काम पूर्ण झाले असल्‍याचे सांगितले.  श्री अजय झोड  विमा कंपनीचे सर्व्‍हेअर हे सात दिवस वाट पाहून सुध्‍दा न आल्‍याने दुरुस्‍त केलेले वाहन बेला, भंडारा येथील टाईल्‍सचे दुकानात उभे केल्‍या नंतर विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री झोड आलेत व त्‍यांनी विमाकृत वाहनाचे निरिक्षण केले.

 

 

08.     तक्रारकर्त्‍याचे शपथे वरील पुराव्‍या वरुन असे दिसून येते की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री गणेश थोरात ज्‍यांचे सांगण्‍या वरुन  तक्रारकर्त्‍याने विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहन हे टाटा रिपेअरींग वर्क्‍स फुलमोगरा भंडारा येथे दुरुस्‍त केले त्‍या श्री गणेश थोरात यांना  विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तपासलेले नाही वा श्री गणेश थोरात यांचा पुरावा  दाखल केलेला नाही. विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, जेंव्‍हा तिचे सर्व्‍हेअर श्री झोड हे वाहन तपासणीसाठी  गेले होते तेंव्‍हा विमाकृत वाहन हे दुरुस्‍त केलेले आढळले  परंतु  सदर वाहन हे सर्व्‍हेअर श्री गणेश थोरात यांचे सांगण्‍या वरुन तक्रारकर्त्‍याने दुरुस्‍त केले होते तेंव्‍हा  सर्व्‍हेअर श्री गणेश थोरात यांना या संबधात विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तपासणे जरुरीचे होते परंतु त्‍यांनी तसे केलेले नाही. तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे नवेगाव बांध येथे रॅम्‍पवर विमाकृत वाहन जात असताना ते उलटल्‍याने अपघात झाला होता तर विरुध्‍दपक्ष  विमा कंपनीचे  असे म्‍हणणे आहे की, त्‍यांचे सर्व्‍हेअर यांनी जेंव्‍हा मोक्‍यावर फोटो घेतले त्‍यावेळी त्‍यांना रॅम्‍प आढळून आला नाही.  नवेगाव बांध येथे रॅम्‍पच नाही ही बाब विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने योग्‍य असा पुरावा देऊन  सिध्‍द  केलेली नाही.

 

 

09.   तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहनास दिनांक-07.05.2020 रोजी अपघात झाला होता आणि  तक्रारकर्त्‍याने विमाकृत वाहन टाटा रिपेअरींग वर्कशाप, फुलमोगरा, भंडारा यांचे कडून दुरुस्‍त करुन घेतले. अभिलेखावर दाखल टाटा रिपेअरींग वर्कशॉप यांचे दिनांक-05.06.2020 रोजीचे बिल रक्‍कम रुपये-31,500/- तसेच दिनांक-05.06.2020 रोजीचे बिल रुपये-81,817/- याची बेरीज केली असता ती रुपये-1,13,317/- येते. या शिवाय तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहन हे टाटा रिपेअरींग वर्कशॉप फुलमोगरा, भंडारा येथे आणण्‍यासाठी त्‍याला टोचन म्‍हणून रुपये-5000/- खर्च आला तसेच दुरुस्‍ती नंतर विमाकृत वाहन हे विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री झोड यांचे निरिक्षणा करीता 07 दिवस तसेच उभे ठेवल्‍याने प्रती दिन रुपये-5000/- प्रमाणे सात दिवसा करीता रुपये-35,000/- उत्‍पन्‍नाचे नुकसान झाले असे मिळून  तक्रारकर्त्‍याने एकूण नुकसान भरपाई रुपये-1,50,000/- ची मागणी केली आहे.

 

10.    विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने सर्व्‍हेअर श्री जयंत एम. झोड यांचा दिनांक-27.09.2020 रोजीचा सर्व्‍हे अहवाल अभिलेखावर दाखल केला त्‍यामध्‍ये खालील प्रमाणे नमुद आहे-

Total of Labour Charges Allowed

10,000/-

Less Excess

4000/-

 

6000/-

Total of New  Parts Allowed

43,439.36

Less Salvage

2439.36

Net Amount Payble toInsured

49,439.36

Under the instructions of National Insurance Company Nagpur, the undersigned reinspected the above mentioned vehicle ondated-16/05/2020 M/S Tata Auto Repairing Work Shop Bhandara . Parts replaced and shown at the time of re inspection and condition of the IVis good and ready worthy according to the final survey report are as

 

Parts Name

Replaced

Shown During Re inspection      

HYDRAULIC JACK ASSY

YES

YES

TENSIONROD AT LEFT

YES

YES

HANGER

YES

YES

 

Policy No.-281303311910004833, Period of Insurance-04/01/2020 to  03/01/2021 .Sum Insured Rs.-29,24,000/-  असे सर्व्‍हे अहवालात नमुद आहे. विमाकृत वाहनास दिनांक-07.05.2020 रोजी अपघात झाला याचाच अर्थ विमा पॉलिसीचे वैध कालावधी मध्‍ये अपघात झालेला आहे.

 

 

11.   जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, विरुध्‍दपक्ष विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांनी विमा कंपनीचे बाजूने अहवाल दिलेला असून फार कमी नुकसान भरपाई मंजूर केलेली आहे. वस्‍तुतः अभिलेखावरील दाखल बिला प्रमाणे  तक्रारकर्त्‍यास टाटा मोटर रिपेअरींग वर्कशॉप यांचे कडून विमाकृत वाहन दुरुसतीसाठी एकूण  रुपये-1,13,317/- एवढा खर्च लागलेला आहे. या शिवाय तक्रारकर्त्‍यास विमाकृत क्षतीग्रस्‍त वाहन अपधात स्‍थळा वरुन टाटा वर्कशाप फुलमोगरा, भंडारा येथे आणण्‍या करीता टोचन म्‍हणून रुपये-5000/- लागलेला आहे असे तक्रारकर्त्‍याचे म्‍हणणे आहे त्‍यामुळे वाहन दुरुस्‍तीची रक्‍कम रुपये-1,13,117/- अधिक टोचनचे रुपये-5000/- असे मिळून एकूण रुपये-1,18,117/- एवढा प्रत्‍यक्ष खर्च आला आहे.  या शिवाय तक्रारकर्त्‍याचे असेही म्‍हणणे आहे की,  विमा कंपनीचे र्व्‍हेअर पाहणी करता वेळेत न आल्‍यामुळे त्‍याला 07 दिवस वाहन उभे ठेवावे लागल्‍याने प्रतीदिन रुपये-5000/- प्रमाणे सात दिवसाचे रुपये-35,000/- नुकसान झालेले आहे.

 

 

12.    जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, सर्वसाधारण व्‍यवहारात विमाधारकांचा जास्‍तीत जास्‍त कल हा क्षतीग्रस्‍त विमाकृत वाहनाची जास्‍तीची दुरुस्‍ती करण्‍या कडे असतो.  तक्रारकर्त्‍यास विमाकृत वाहन दुरुस्‍तीसाठी आलेला एकूण खर्च रुपये-1,18,117/- चे 75 टक्‍के म्‍हणजे रुपये-88,588/- एवढी विमा रक्‍कम आणि सदर विमा रकमेवर विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-11.11.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 7 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. त्‍याच बरोबर तक्रारकर्त्‍याला जो शारिरीक  व मानसिक त्रास झाला त्‍या बाबत रुपये-10,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- विरुध्‍दपक्ष विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

 

13.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन प्रस्‍तुत  तक्रारी मध्‍ये जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे  खालील प्रमाणे  अंतीम आदेश पारीत  करण्‍यात  येतो-

 

                                                            :: अंतीम आदेश ::

 

  1.  तकारकर्ता श्री शिवदास शंकर गायधने यांची तक्रार विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय भंडारा  यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते  की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याचे विमाकृत वाहन नोंदणी क्रं- MH-36/AA-3093 चे विमा पॉलिसी क्रं-281303311910004833 प्रमाणे विमाकृत वाहनास झालेल्‍या अपघाता संबधाने दुरुस्‍तीचा खर्च म्‍हणून विमा रक्‍कम रुपये-88,588/- (अक्षरी रुपये अठ्ठयाऐंशी हजार पाचशे अठ्ठयाऐंशी फक्‍त)  तक्रारकर्त्‍याला अदा करावी आणि सदर रकमेवर विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने  विमा दावा नाकारल्‍याचा दिनांक-11.11.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक 7 टक्‍के दराने व्‍याज विरुध्‍दपक्ष विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याला अदा करावे.

 

 

  1.  विरुध्‍दपक्ष नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते  की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास   शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल  रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/-(अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त)  अशा रकमा  तक्रारकर्त्‍यास द्दाव्‍यात.

 

 

  1.  सदर आदेशाचे अनुपालन नॅशनल इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक, शाखा कार्यालय भंडारा यांनी प्रस्‍तुत  निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे  दिनांका पासून 30 दिवसांचे  आत करावे.

 

 

  1.  उभय पक्षकारांना प्रस्‍तुत निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत निःशुल्क उपलब्‍ध करुन दयावी

 

 

  1. उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हाग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  
 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.