Maharashtra

Additional DCF, Nagpur

CC/12/164

सतिश पिता राजेश सिंग - Complainant(s)

Versus

शाखा प्रबंधक,युनियन बँक ऑफ इंडिया - Opp.Party(s)

बाळाप्रसाद वर्मा

11 Mar 2014

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,NAGPUR
NEW ADMINISTRATIVE BUILDING
3RD FLOOR, CIVIL LINES,
NAGPUR-440 001 . P.H.NO. 0712-2546884
 
Complaint Case No. CC/12/164
 
1. सतिश पिता राजेश सिंग
रा.व्‍दारा तिरुपती बालाजी किराणा राजीवनगर ग्राम पंचायत वानाडोंगरी वार्ड.न. 3 नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखा प्रबंधक,युनियन बँक ऑफ इंडिया
हिंगणा, आडेगांव शाखा मेन रोड नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Manohar G.Chilbule PRESIDENT
 HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

::निकालपत्र::

(पारीत व्‍दारा- श्री मनोहर गोपाळराव चिलबुले, मा.अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक-11 मार्च, 2014 )

01.   तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बँके कडून रुपये-97,255/- दि.05.07.2012 पासून द.सा.द.शे.20% दराने व्‍याजासह परत देण्‍याचे आदेशित व्‍हावे व इतर अनुषंगीक मागण्‍यांसाठी  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली मंचा समक्ष दाखल केली.

02.     तक्रारकर्त्‍याचे तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

       तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बँकेत दि.07.03.2009 रोजी बचत खाते उघडले असून त्‍याचा खाते क्रं-443802010420057 असा आहे आणि त्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्ष बँकेचा ग्राहक आहे.

       तक्रारकर्त्‍याची मुख्‍य तक्रार अशी आहे की, त्‍याचे वि.प.बँकेच्‍या खात्‍यात धनादेश वटेल एवढी पुरेशी रक्‍कम असल्‍यामुळे त्‍याने विरुध्‍दपक्ष बँके कडून पुरविण्‍यात आलेल्‍या धनादेश पुस्‍तीकेतील एक अकाऊंट पेई धनादेश   क्रं-9405, दि.05.07.2012 रक्‍कम रुपये-45,000/- चा श्री योगेश सोनवणे नावाचे व्‍यक्‍तीस दिला होता.

       श्री योगेश सोनवणे यांनी तक्रारकर्त्‍या कडून प्राप्‍त झालेला धनादेश पुढे त्‍यांचे बिलासपूर येथील युनियन बँक ऑफ इंडीया, मुख्‍य शाखा बिलासपूर येथील खाते क्रं -31694026347 मध्‍ये वटविण्‍यासाठी जमा केला असता, अकाऊंट गोठविण्‍यात (Account frozen) आल्‍या बाबतचा मेमो/अहवाल दि.07.09.2012 रोजी प्राप्‍त झाला. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या चुकीमुळे योगेश सोनवणे यांना रक्‍कम रुपये-45,000/- सर्व दंड व खर्चासह द्दावी लागली.

       तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याचे विरुध्‍दपक्ष बँकेतील बचतखाते गोठविण्‍यात आल्‍याची बाब समजल्‍यावर त्‍याने वि.प.बँकेच्‍या कार्यालयात भेट दिली असता त्‍याचे बचतखात्‍यातील एकूण रक्‍कम                    रुपये-97,255/- अकाऊंट गोठवून जप्‍त केल्‍याचे वि.प.बँकेच्‍या कर्मचा-यांनी  सांगितले व पंजाब नॅशनल बँकेस तात्‍काळ रक्‍कम रुपये-1,05,000/- जमा करण्‍यास सांगितले. तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, तो फक्‍त           विरुध्‍दपक्ष बँकेचा ग्राहक आहे आणि दुस-या बँकेच्‍या म्‍हणजे पंजाब नॅशनल

बँकेच्‍या पत्रावरुन तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍यातील रक्‍कम  विरुध्‍दपक्ष युनियन बँक ऑफ इंडीया, आडेगाव शाखा, हिंगणा, नागपूर यांना गोठविता येणार नाही. अशाप्रकारे विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्त्‍यास दोषपूर्ण सेवा दिली आहे.

        तक्रारकर्त्‍याने पुढे असे नमुद केले की, त्‍याने विरुध्‍दपक्ष बँके कडून कोणतेही कर्ज घेतलेले नसताना त्‍याचेच बचतखात्‍यात असलेली रक्‍कम             रुपये-97,225/- त्‍याच खर्च करता येत नसून विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍याचे ए.टी.एम.सुध्‍दा निःष्‍प्रभ करुन टाकले. विरुध्‍दपक्ष युनियन बँक ऑफ इंडीया आणि पंजाब नॅशनल बँकेचे कर्मचारी आजही विनाकारण दुरध्‍वनीव्‍दारे व वैयक्तिकरित्‍या संपर्क साधून रुपये-1,05,000/- पंजाब नॅशनल बँकेत जमा करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍यास त्रास देत आहेत. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे जवळील ए.टी.एम.कॉर्ड क्रं 3493 दि.12.10.2012 रोजी 15.10 मिनिटास उपयोगात आणले असता अनाधिकृत कॉर्ड उपभोक्‍ता असा अभिप्राय आला असून शिल्‍लक रक्‍कम रुपये-97,255.40 दर्शविली आहे. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष बँकेस दि.22.10.2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु आज पर्यंत तक्रारकर्त्‍याचे बचत खात्‍यातील रक्‍कम त्‍यास दिली नाही वा नोटीसचे उत्‍तर सुध्‍दा देण्‍यात आले नाही म्‍हणून तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार न्‍यायमंचा समक्ष सादर केली.

 तक्रारकर्त्‍याची प्रार्थना-

1)         विरुध्‍दपक्ष बँकेनी रुपये-97,225/- दि.05.07.2012 पासून

           द.सा.द.शे.20% व्‍याजासह त.क.ला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

2)         तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या मानसिक, शारिरीक त्रासा बद्दल

           रुपये-30,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च म्‍हणून

           रुपये-20,000/- विरुध्‍दपक्ष बँकेनी त.क.ला देण्‍याचे आदेशित

           व्‍हावे.

 

03.      विरुध्‍दपक्ष शाखा प्रबंधक, युनियन बँक ऑफ इंडीया, शाखा हिंगणा, जिल्‍हा नागपूर यांनी प्रतिज्ञालेखावरील लेखी उत्‍तर न्‍यायमंचा समक्ष सादर केले.  तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमुद केल्‍या नुसार विरुध्‍दपक्ष बँकेत त.क.चे बचत खाते असल्‍याची बाब मान्‍य केली. वि.प.बँकेनी नमुद केले की, ती एक राष्‍ट्रीयकृत बँक असून बँकिंग रेग्‍युलेशन नुसार तिचे कामकाज चालते. विरुध्‍दपक्ष बँकेस मे.पंजाब नॅशनल बँकेच्‍या दि.12.07.2012 रोजीचे पत्राव्‍दारे कळविण्‍यात आले की, वि.प.बँकेचे खातेदार श्री सतिश राजेशसिंग (तक्रारदार)


 

यांचे बचतखात्‍यात श्री अजीजुल हक व्‍दारे धनादेश क्रं-741181, दि.20.05.2012 अन्‍वये रक्‍कम जमा करण्‍याची चुक ही पंजाब नॅशनल बँकेच्‍या संगणक यंत्रणेस लागलेल्‍या आगिमुळे त्‍यांची संगणक यंत्रणा काम करीत नसल्‍याने घडली होती. सदरचा धनादेश हा अनादरीत होऊन परत आला त्‍यामुळे मे.पंजाब नॅशनल बँकेनी तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात चुकीने जमा झालेली रक्‍कम रुपये-2,00,000/- परत करण्‍याची वि.प.बँकेकडे  मागणी केली. म्‍हणून विरुध्‍दपक्ष बँकेनी त्‍यांचे दि.12.07.2012 रोजीचे पत्राव्‍दारे तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा असलेली रक्‍कम रुपये-96,331.40/- अधिक रुपये-1,05,000/- अशी मागणी केली व पंजाब नॅशनल बँके कडून चुकीने जमा झालेली रक्‍कम तक्रारकर्त्‍याने काढून घेऊ नये म्‍हणून खाते फ्रीज केल्‍या बाबत माहिती दिली.

      विरुध्‍दपक्ष बँकेनी पुढे असे नमुद केले की, तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा केलेली  धनादेशाची रक्‍कम रुपये-2,00,000/- दि.23.05.2012 ही पंजाब नॅशनल बँकेच्‍या संगणक कक्षात लागलेल्‍या आगीमुळे चुकीने  तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा करण्‍यात आली होती. वास्‍तविक तक्रारकर्त्‍याने खात्‍यात जमा करण्‍यासाठी दिलेला पंजाब नॅशनल बँकेचा धनादशे अनादरीत झाल्‍यामुळे सदर धनादेशाची चुकीने जमा झालेली रक्‍कम रुपये-2,00,000/- तक्रारकर्त्‍याच्‍या मालकीची नसल्‍याने सदर रकमेचा उपभोग घेण्‍याचा तक्रारकर्त्‍याचा कोणताही कायदेशीर हक्‍क नाही. तक्रारकर्त्‍याने मंचाची दिशाभूल करुन विरुध्‍दपक्ष बँक व पंजाब नॅशनल बँक यांचेशी धोखाघडी करुन ज्‍या रकमेवर त्‍याचा हक्‍क नाही त्‍याचा फायदा घेण्‍याचा प्रयास केला आहे, सबब तक्रारकर्त्‍याची खोटी तक्रार खारीज व्‍हावी अशी विनंती विरुध्‍दपक्ष बँके तर्फे करण्‍यात आली.

 

04.     विरुध्‍दपक्ष बँक युनियन बँक ऑफ इंडीया तर्फे पंजाब नॅशनल बँक, किंग्‍जवे नागपूर यांना प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये प्रतिपक्ष करण्‍या बाबत मंचा समक्ष  नि.क्रं 10 प्रमाणे दि.13.02.2013 रोजीचा अर्ज सादर करण्‍यात आला होता. सदर अर्जास तक्रारदाराने तिव्र विरोध केला. त्‍यामुळे ज्‍या पंजाब नॅशनल बँके कडून वि.प.बँके मार्फत तक्रारदाराने रुपये-2,00,000/- अनादरीत झालेल्‍या धनादेशापोटी जमा करुन घेतले त्‍या बँकेला त्‍यांचे म्‍हणणे सादर करण्‍याची संधी देता आली नाही.  

 

05.     प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारकर्त्‍या तर्फे वकील श्री बाळासाहेबत वर्मा तर विरुध्‍दपक्ष बँके तर्फे वकील श्री लाला यांचा  युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

 

 

 

 

 

06.      तक्रारकर्त्‍याची तक्रार, वि.प.बँकेचे लेखी उत्‍तर, प्रकरणातील उपलब्‍ध दस्‍तऐवजांचे काळजीपूर्वक अवलोकन करण्‍यात आले असता, न्‍यायमंचाचे विचारार्थ  उपस्थित होणारे मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्ष खालील प्रमाणे आहेत-

              मुद्दा                             उत्‍तर

(1)                  विरुध्‍दपक्ष बँकेनी तक्रारकर्त्‍याचे बचत खाते

 गोठवून आपले सेवेत त्रृटी ठेवली आहे

 काय?.............................................................नाही.

   (2)   अंतिम  आदेश काय ?.................................... तक्रार खारीज.

 

::कारण मिमांसा::

मु्द्दा क्रं 1 बाबत-

07.   तक्रारकर्त्‍याचे विरुध्‍दपक्ष बँकेत बचत खाते क्रं-443802010420057 आहे ही बाब विरुध्‍दपक्ष बँकेस मान्‍य आहे. तक्रारकर्त्‍याची तक्रार, विरुध्‍दपक्ष बँकेचे उत्‍तर आणि उपलब्‍ध दस्‍तऐवज यावरुन या प्रकरणातील घटनाक्रम खालील प्रमाणे दिसून येतो-

08.   तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या विरुध्‍दपक्ष बँकेच्‍या पासबुका वरुन तक्रारकर्त्‍याचे वरील बचतखात्‍यात दि.25.05.2012  रोजी BY INST 741181 :MICR OUTWARD CLG CREDIT RS.2,00,000/- दर्शविण्‍यात आलेले आहे. तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍ता श्री वर्मा यांनी आपल्‍या युक्‍तीवादात सांगितले की, सदर रकमेचा पंजाब नॅशनल बँक शाखा बिलासपूरचा धनादेश तक्रारकर्त्‍याचे मित्राने त्‍यास दिला होता व तो तक्रारदाराने विरुध्‍दपक्ष युनियन बँकेत आपल्‍या खात्‍यात जमा केल्‍यावरुन सदरची नोंद झालेली आहे.  त्‍या बाबतची जमा पावती तक्रारकर्त्‍याने पावती पान क्रं 15 वर दाखल केली आहे. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदर बचत खात्‍यातून वेळोवेळी पैसे काढले असून दि.03.08.2012 रोजी बाकी रक्‍कम रुपये-97,255.40 असल्‍याचे पासबुक मध्‍ये दिसून येते. तक्रारकर्त्‍याने दि.05.07.2012 योगेश सोनवणे यास अकाऊंट पेई धनादेश क्रं-41009405 आपल्‍या युनियन बँक ऑफ इंडीया, हिंगणा अडेगाव,


 

नागपूर शाखेचा दिला. सदर धनादेश स्‍टेट बँक ऑफ इंडीया रेल्‍वे                कॉलनी शाखा, बिलासपूर  येथे वसूलीसाठी लावला असता तो युनियन बँकेच्‍या

बिलासपूर शाखेकडे कलेक्‍शनसाठी पाठविण्‍यात आला असता  “A/c frozen” अशा शे-यासह दि.07.09.2012 रोजी अनादरीत होऊन परत आला.  सदर अनादरीत धनादेशाची प्रत व चेक रिर्टन मेमोची प्रत तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केली आहे. तसेच तक्रारकर्त्‍याने दि.12.10.2012 रोजी 15.13 वाजता युनियन बँक, गोकूलपेठ, नागपूरच्‍या ए.टी.एम. मध्‍ये पैसे काढण्‍यास गेला असता  “Transaction Declined. Unauthorized card user”  अशा शे-यासह ए.टी.एम. मधून पैसे नाकारण्‍यात आले. सदर व्‍यवहाराची ए.टी.एम.स्लिप तक्रारदाराने दाखल केली आहे.

09.    वि.प.ने दि.12 जुलै, 2012 रोजी तक्रारकर्त्‍यास पत्र पाठविले की, पंजाब नॅशनल बँक, नागपूर कडून त्‍यांना कळविण्‍यात आले की, तक्रारकर्त्‍याने जमा केलेला धनादेश क्रं-741181 दि.20.05.2012 रुपये-2,00,000/- त्‍यांच्‍या कडून काही तांत्रिक चुकीमुळे चुकीने पास करण्‍यात आला.  परिणामतः  तुमच्‍या खात्‍यात रुपये-2 लक्ष चुकीने जमा करण्‍यात आले होते. सध्‍या तुमच्‍या खात्‍यात रुपये-96331.40 शिल्‍लक आहेत. पंजाब नॅशनल बँकेस परत करण्‍यासाठी उर्वरीत रक्‍कम रुपये-1,05,000/- जमा करावे. तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेस करावयाच्‍या भरण्‍यासाठी पैसे वसुल होई पर्यंतच्‍या कालावधीसाठी गोठविण्‍यात येत आहे. सदर पत्र तक्रारकर्त्‍याने दाखल केले आहे. वि.प.बँकेने तक्रारकर्त्‍यास वरील पत्रा सोबत पंजाब नॅशनल बँके कडून प्राप्‍त झालेले दि.12.07.2012 चे पत्र पाठविले त्‍यात नमुद आहे की, तक्रारदाराच्‍या खात्‍यात वसुलीसाठी जमा केलेला धनादेश क्रं-741181 दि.20.05.2012 त्‍याच्‍या बँकेच्‍या दिल्‍ली येथील आय.टी. विभागात लागलेल्‍या आगीमुळे कनेक्‍टीव्हिटी अभावी परत करण्‍यात आला नाही व त्‍यांच्‍या खात्‍यास नावे टाकण्‍यात आला. परंतु खातेदार Ajajul Haque याने त्‍याच्‍या खात्‍यात पैसे भरले नसल्‍याने त्‍याच्‍या खात्‍यास धनादेशाची रक्‍कम नावे टाकता आली नाही. वरील परिस्थितीमुळे आमचे पैसे वसुल होई पर्यंत सतिश सिंग यांना त्‍यांच्‍या खात्‍यातून पैसे काढू देऊ नये. सदर पत्र देखील तक्रारकर्त्‍याने दाखल केले आहे.

 

10.     तक्रारकर्त्‍याचे अधिवक्‍त्‍यांचा युक्‍तीवाद असा आहे की, तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात पुरेशी रक्‍कम शिल्‍लक असताना त्‍याने दिलेल्‍या धनादेशाचे शोधन न


 

करणे किंवा ए.टी.एम. मधून पैसे न देणे आणि त्‍याचे खाते गोठवून व्‍यवहार बंद करणे  ही बँकेने ग्राहकाप्रती आचलेली सेवेतील न्‍यूनता व अनुचित व्‍यापार

पध्‍दतीचा अवलंब आहे. त्‍यांनी आपल्‍या युक्‍तीवादाचे पुष्‍टयर्थ खालील न्‍यायनिर्णयाचा दाखला दिला आहे-               

N (2013) CPJ 36 (Maha)

Arti Krishnan

–V/s-

H.D.F.C.Bank

 

       सदरच्‍या निर्णयातील वस्‍तुस्थिती अशी होती की, तक्रारकर्ती हिच्‍या हरवलेल्‍या क्रेडिट कॉर्ड बाबत उभय पक्षात समझोता होऊन तक्रारकर्तीने 29,000/- रुपये वि.प.ला एकूण चार हप्‍त्‍यात देण्‍याचे कबुल केले व पहिला हप्‍ता रुपये-4000/- चा दिला, तो वि.प.ने स्विकारला. उर्वरीत रुपये-25,000/- तीन हप्‍त्‍यात द्दावयाचे ठरले असताना वि.प.ने स्‍टेटमेंट ऑफ अकाऊंट मध्‍ये रुपये-50,802/- बाकी दर्शविली.  तक्रारकर्तीने ती बाकी अमान्‍य केली म्‍हणून वि.प.ने त्‍यांच्‍याकडे असलेले तक्रारकर्तीचे सेव्हिंग खाते गोठविले आणि तक्रारकर्तीस कोणतीही नोटीस न देता कॉर्ड अकाऊंटचे देणे वसुल करण्‍यासाठी रुपये-80,488/- सेव्हिंग खात्‍यातून काढले. तसेच अतिरिक्‍त रुपये-350/- सेव्हिंग्‍स खात्‍यास नावे टाकले. तक्रारकर्तीस नोटीस न देता तिचे खाते गोठविण्‍याची व खात्‍यातून पैसे काढण्‍याची कृती नैसर्गिक न्‍यायाचे विरुध्‍द असून सेवेतील न्‍यूनता व अनुचित व्‍यापार पध्‍दतीचा अवलंब असल्‍याचे मा.राज्‍य आयोगाने म्‍हटले आहे.

 

11.    या उलट विरुध्‍दपक्ष बँकेचे अधिवक्‍ता यांनी युक्‍तीवादात असे सांगितले की, वि.प.बँक रिर्झव्‍ह बँकेच्‍या रेग्‍युलेशन नुसार कार्य करते. पंजाब नॅशनल बँके कडून त्‍यांना प्राप्‍त झालेल्‍या पत्रा नुसार त्‍यांनी कार्यवाही केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने वि.प.मार्फत जो धनादेश वसुलीसाठी पाठविला होता त्‍याचे पैसे सदर धनादेश देणा-या व्‍यक्‍तीचे खात्‍यातून वसूल झाले नव्‍हते परंतू पंजाब नॅशनल बँकेने तो धनादेश चुकीने पास केला होता. प्रत्‍यक्षात जो धनादेश तक्रारदाराने वसुलीसाठी पाठविला होता तो अनादरीत झाला असल्‍याने तक्रारदाराचे खात्‍यात पंजाब नॅशनल बँके कडून वि.प. मार्फत चुकीने जमा झालेल्‍या पैशावर तक्रारकर्त्‍याचा कोणताही कायदेशीर अधिकार नसून               अशी  चुकीने  जमा  झालेली रक्‍कम परत करण्‍याची तक्रारकर्त्‍याची कायदेशीर


 

 

जबाबदार आहे. आवश्‍यकता वाटल्‍यास धनादेश देणा-य व्‍यक्तिकडून रक्‍कम वसुलीची कारवाई करण्‍याचा मार्ग तक्रारकर्त्‍यास उपलब्‍ध आहे. मात्र तक्रारदाराने

अनाधिकाराने सदर रकमेचा वापर केला असून  2 लाख रुपयापैकी खात्‍यात केवळ रुपये-97,000/- शिल्‍लक असल्‍याने चुकीने तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा झालेले रुपये-2,00,000/- पंजाब नॅशनल बँकेकडे जमा करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍या कडून परत घेणे ही सहव्‍यवसायी बँक म्‍हणून वि.प.ची नैतीक व कायदेशीर जबाबदारी आहे आणि यासाठीच वि.प.ने सदर रक्‍कम वसुलीसाठी तक्रारदाराचे खाते गोठविले असून उर्वरीत रक्‍कम रुपये-1,05,000/- भरण्‍या बाबत नोटीस व सोबत पंजाब नॅशनल बँकेचे पत्र तक्रारदारास पाठविले आहे. परंतु तक्रारकर्त्‍याने त्‍याचा कायदेशीर हक्‍क नसलेली पंजाब नॅशनल बँके कडून चुकीने त्‍याच्‍या खात्‍यात जमा झालेली रक्‍कम बेकायदेशीरपणे काढून घ्‍यावयाची असल्‍याने त्‍याने मित्रास धनादेश दिला व स्‍वतः ए.टी.एम.मधून रक्‍कम काढण्‍याचा प्रयत्‍न केला आहे व तो प्रयत्‍न वि.प.ने रोखला म्‍हणून खोटी तक्रार दाखल केली आहे.

 

12.    तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या न्‍याय निर्णयातील वस्‍तुस्थिती व आमचे समोरील प्रकरणातील वस्‍तुस्थिती दोन्‍ही भिन्‍न आहेत. वरील न्‍याय  निर्णयात तक्रारदाराच्‍या बचतखात्‍यात जी रक्‍कम होती ती कायदेशीररित्‍या तक्रारकर्तीच्‍या मालकीची होती. सदर रकमेतून पूर्वीच्‍या क्रेडीट कॉर्ड अकाऊंट पोटी वादग्रस्‍त देणे रक्‍कम तक्रारकर्तीच्‍या संमती शिवाय तिच्‍या बचत खात्‍यातून परस्‍पर वसूल करणे ही वि.प.ची कृती निश्‍चीतच सेवेतील न्‍यूनता व अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब ठरते.

13.    मात्र आमचे समोरील प्रकरणात तक्रारदारास त्‍याचा मित्र अजिजूल हक याने त्‍याच्‍या बिलासपूर येथील बँकेचा जो धनादेश क्रं-741181                रुपये-2,00,000/- चा दिला होता तो अजिजूल हक याचे खात्‍यात पैसे नसल्‍याने अनादरीत झाला आहे.  परंतु पंजाब नॅशनल बँकेच्‍या दिल्‍ली येथील कार्यालयात आय.टी.सेक्‍शला लागलेल्‍या आगीमुळे कनेक्‍टीव्हिटी अभावी चुकीने सदर धनादेशाचे पैसे वि.प.बँके मार्फत तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात आले. सदर चुक पंजाब नॅशनल बँकेच्‍या लक्षात येताच त्‍यांनी वि.प.बँकेला पत्र लिहून चुकीने तक्रारदाराच्‍या खात्‍यात जमा झालेले पैसे वसुल करुन            देण्‍याची विनंती केली आहे व त्‍याप्रमाणे पंजाब नॅशनल बँके कडून

 

तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात चुकीने जमा झालेल्‍या रक्‍कमेच्‍या वसुलीसाठी वि.प.बँकेने  रुपये-1,05,000/- भरावे  म्‍हणून  तक्रारकर्त्‍यास  नोटीस  दिली.  तसेच रुपये-2,00,000/- पैकी तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात शिल्‍लक असलेली रक्‍कम पंजाब नॅशनल बँकेच्‍या वसुलीसाठी गोठवली यात वि.प.ची चुक आहे किंवा त्‍यांनी तक्रारदाराला न्‍यूनतापूर्ण सेवा दिली आहे असे म्‍हणता येत नाही व म्‍हणून सदर प्रकरणातील भिन्‍न वस्‍तुस्थितीमुळे तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या मा.राज्‍य ग्राहक आयोगाच्‍या न्‍याय निर्णयाचा तक्रारकर्त्‍यास लाभ मिळू शकत नाही. ज्‍या धनादेशाची रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात जमा झाली तो धनादेश अनादरीत झाल्‍यामुळे सदर धनादेशापोटी जमा झालेली रक्‍कम वापरण्‍याचा तक्रारकर्त्‍यास कोणताही कायदेशीर अधिकार नाही. अनादरीत झालेल्‍या धनादेशाची रक्‍कम रुपये-2,00,000/- तक्रारकर्त्‍या कडून वसुलीसाठी वि.प.बँकेने नोटीस/पत्र दिल्‍यावर तक्रारकर्त्‍याने त्‍यास ज्‍या व्‍यक्तिने धनादेश दिला होता त्‍याच्‍या विरुध्‍द कोणतीही कारवाई केली असल्‍याचा पुरावा सादर केलेला नाही.  यावरुन ज्‍याने दिलेला धनादेश अनादरीत झाल्‍यामुळे बँकेने वसुलीची कारवाई केली आहे त्‍या अजिजूल हक विरुध्‍द तक्रारदाराची कोणतीही तक्रार नाही असेच दिसून येते. धनादेश अनादरीत झाल्‍याने सदर धनादेशाची चुकीने जमा झालेली रक्‍कम वापरण्‍याची व ती वापरण्‍यास कायदेशीररित्‍या प्रतिबंध केला म्‍हणून ग्राहक तक्रार दाखल करण्‍याची तक्रारदाराची कृती असमर्थनीय आहे.  वरील कारणांमुळे वि.प.ची कारवाई नियमा नुसार असून सदर कारवाईमुळे तक्रारदारास त्रृटीपूर्ण सेवा दिली या तक्रारकर्त्‍याच्‍या आरोपात कोणतेही तथ्‍य आढळून येत नाही. म्‍हणून मुद्दा क्रं 1 वरील निष्‍कर्ष नकारार्थी नोंदविला आहे.

मु्द्दा क्रं 2 बाबत-  

14.      मु्द्दा क्रं 1 वरील निष्‍कर्षा प्रमाणे वि.प.ने तक्रारकर्त्‍यास कोणतीही न्‍यूनतापूर्ण सेवा दिली नाही किंवा अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला नाही म्‍हणून तक्रारकर्ता मागणी केल्‍या प्रमाणे कोणतीही दाद मिळण्‍यास पात्र नाही.

 

15.     वरील निष्‍कर्षस अनुसरुन मंच खालील प्रमाणे प्रकरणात आदेश पारीत करीत आहे-

                     ::आदेश::

 

1)      तक्रारकर्त्‍याची ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खालील

        तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

 

 

 

2)      उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.

3)      निकालपत्राची प्रमाणित प्रत उभय पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

        देण्‍यात यावी.

              

 

 
 
[HON'ABLE MR. Manohar G.Chilbule]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.