जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 86/2021. आदेश दिनांक : 18/01/2023.
शालिनीदेवी विनायकराव गायकवाड (पाटील),
वय 65 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. सोमाणी हॉस्पिटलजवळ, लातूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ती
विरुध्द
शाखा प्रबंधक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,
शाखा कार्यालय, लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,
सिंध टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर - 413 512. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ती यांच्या पतीच्या मृत्यूपश्चात अपघात विमा योजनेनुसार रु.2,00,000/- विमा रक्कम देण्याकरिता विरुध्द पक्ष यांनी नकार दिल्यामुळे तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यात आली आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. त्यानंतर विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी होण्यासाठी तक्रारकर्ती यांचेतर्फे उचित कार्यवाही करण्यात आलेली नाही. तसेच तक्रारकर्ती व विधिज्ञ सातत्यपूर्ण अनुपस्थित आहेत. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. परंतु तक्रारकर्ती यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रार कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता उचित कार्यवाहीअभावी ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-