जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 135/2020. तक्रार दाखल दिनांक : 25/08/2020. तक्रार आदेश दिनांक : 23/03/2021. कालावधी: 00 वर्षे 06 महिने 26 दिवस
बन्सी उत्तमराव मोटे, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती व
घरकाम, रा. पारगाव, ता. भुम, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) शाखा व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
उस्मानाबाद, शाखा : पारगाव, ता. भुम, जि. उस्मानाबाद.
(2) व्यवस्थापक, उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,
उस्मानाबाद, मुख्य शाखा, उस्मानाबाद, ता. जि. उस्मानाबाद. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- (1) श्री. किशोर दत्तात्रय वडणे, अध्यक्ष
(2) श्री. मुकुंद भगवान सस्ते, सदस्य
तक्रारकर्ता यांचेतर्फे विधिज्ञ :- एस.एच. सय्यद
विरुध्द पक्ष यांचेतर्फे प्रतिनिधी
आदेश
1. दि.4/11/2020 रोजी उभय पक्षांमध्ये झालेल्या तडजोडपत्राचे अवलोकन केले असता विरुध्द पक्ष यांनी पूर्तता करण्याची अंतीम तारीख दि.4/9/2022 आहे. तडजोड पुरसीसनुसार दि.4/12/2020 ते दि.4/9/2022 या कालावधीमध्ये तक्रारकर्ता यांच्या बचत खाते क्र.2245 मधील रकमेचे प्रत्येकी रु.21,300/- याप्रमाणे एकूण 8 हप्त्यांमध्ये विरुध्द पक्ष यांनी रक्कम अदा करावयाची आहे.
2. अभिलेखावर दाखल तडजोडपत्राचे अवलोकन केले असता उभय पक्षांमध्ये परस्पर सामंजस्याने व समन्वयाने तडजोड झालेली आहे. तडजोडपत्रावर तक्रारकर्ता व विरुध्द पक्ष यांची स्वाक्षरी आहे. असे दिसते की, उभयतांनी अटीदर्शक तडजोडपत्र तयार केलेले आहे.
3. विरुध्द पक्ष यांनी लेखी अर्जाद्वारे विनंती केली की, तडजोडीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना 2 हप्ते दिलेले आहेत आणि ग्राहक तक्रार निकाली काढावी. त्यापृष्ठयर्थ त्यांनी खाते उतारा दाखल केला आहे.
4. आमच्या मते, तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम अदा न केल्यास त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने देय रक्कम मिळण्यास तक्रारकर्ता पात्र राहतील, अशा निर्देशासह ग्राहक तक्रार निकाली काढणे न्यायोचित आहे. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) उभय पक्षांतील तडजोडपत्रास अधीन राहून ग्राहक तक्रार निकाली काढण्यात येते.
(2) उभय पक्षांतील तडजोडपत्रानुसार विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ता यांना रक्कम अदा न केल्यास संबंधीत देय असणारी रक्कम त्या-त्या देय तारखेपासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने देय राहील.
(श्री. मुकुंद भ. सस्ते) (श्री. किशोर दत्तात्रय वडणे)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, उस्मानाबाद.
-oo-
(संविक/स्व/21521)