जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 2/2019.
मंकाबाई विठ्ठल मुरकुटे (मयत) तर्फे वारस
(1) बाबाराव विठ्ठल मुरकुटे, वय 66 वर्षे, व्यवसाय : शेती.
(2) जनार्धन पिता विठ्ठल मुरकुटे, वय 65 वर्षे, व्यवसाय : शेती.
(3) त्र्यंबक पिता विठ्ठल मुरकुटे, वय 63 वर्षे, व्यवसाय : शेती.
(4) दत्तात्रय पिता विठ्ठल मुरकुटे, वय 49 वर्षे, व्यवसाय: शेती.
(5) कुशावतीबाई भ्र. दशरथ गुट्टे, वय 67 वर्षे, व्यवसाय : घरकाम.
(6) भागीरथी भ्र. श्रीहरी गुट्टे, वय 52 वर्षे, सर्व रा. देवकरा,
ता. अहमदपूर, जि. लातूर.
(7) गंगाबाई भ्र. विठ्ठल दहीफळे, वय 56 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. कोळेवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर. अर्जदार
विरुध्द
(1) दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि., द्वारा : शाखाधिकारी, लातूर.
(2) विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी, देवकरा, ता. अहमदपूर.
(3) लातूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., द्वारा : जनरल मॅनेजर, लातूर. गैरअर्जदार
गणपूर्ती : मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
मा. श्रीमती रेखा जाधव, सदस्य
आदेश
(दिनांक : 5/8/2021)
मा. श्री. कमलाकर अ. कोठेकर, अध्यक्ष यांचेद्वारा न्यायकक्षामध्ये :-
1. उभय पक्षांच्या वकिलांचे निवेदन विचारात घेतले. मुळ प्रकरण क्र.30/2003 यात या मंचाचा आदेश दि.13/10/2003 नुसार काही रक्कम जमा करण्यात आलेली आहे. त्या प्रकरणात अर्जदार मुळ तक्रारदार होते. त्यांच्यापैकी तक्रारदार क्र.1 मंकाबाई मयत झाल्या. तिचे वारस व इतर तक्रारदार यांनी या अर्जाद्वारे जमा रक्कम रु.25,000/- मिळावी, अशी विनंती केली.
2. रेकॉर्डनुसार असे दिसते की, त्या प्रकरणात अपील झाले होते. परंतु नंतर ते अपील नियमीत झालेले आहे.
3. विरुध्द पक्षाच्या वकिलांनी देखील असे निवेदन केले की, जमा असलेले पैसे तक्रारदारांना देण्यास त्यांची हरकत नाही. ब-याच जुन्या प्रकरणामध्ये कालांतराने असा अर्ज देण्यात आला म्हणून संबंधीतांचे निवेदन सविस्तर विचारात घेऊन आता हे आदेश पारीत करण्यात येत आहेत.
4. तक्रारदारांनी असे संमतीपत्र सादर केले आहे की, सर्व तक्रारदारांसाठी मिळून जमा रक्कम तक्रारदारक्र.4 दत्तात्रय यांचे नांवे देण्यात यावी. अशा सर्व बाबी विचारात घेऊन खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आदेश
(1) मुळ प्रकरण क्र. 30/2003, निर्णय दिनांक 13/10/2003 यात या अर्जाप्रमाणे जर रक्कम रु.25,000/- जमा असेल तर ती सर्व तक्रारदारांसाठी म्हणून तक्रारदार क्र.4 दत्तात्रय मुरकुटे यांना नियमाप्रमाणे अदा करण्यात यावी. रक्कम अदा करण्यापूर्वी त्या प्रकरणात पुढील अपील झाले किंवा कसे, याबद्दलचा तपशील तक्रारदारांनी सादर करावा.
(श्रीमती रेखा जाधव) (श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्री. कमलाकर अ. कोठेकर)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/श्रु/5821)