Maharashtra

Beed

CC/13/179

राम माधवराव नागरगोजे, - Complainant(s)

Versus

शाखाधिकारी,स्‍टेट बँक ऑफ इंडिया - Opp.Party(s)

18 Nov 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/179
 
1. राम माधवराव नागरगोजे,
रा.म.रा.परिवहन महामंडळ कार्यालय,बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. शाखाधिकारी,स्‍टेट बँक ऑफ इंडिया
शाखा जालना रोड,बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. Manjusha Chitalange PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. R.S.Rathodkar MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 18.11.2014

                (द्वारा- श्री.रविंद्र राठोडकर, सदस्‍य)

            तक्रारदार राम माधवराव नागरगोजे यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे म्‍हणून  नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

      तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात खालीलप्रमाणे, तक्रारदार हे बीड येथील रहिवाशी असून वाहतूक नियंत्रक, म.रा.प.मं.बीड येथे कार्यरत आहेत. तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असून खातेदार आहेत. तक्रारदाराचा खाते क्रं.10969583893 असा असून या खात्‍यावर ए.टी.एम.सुविधा उपलब्‍ध आहे. दि.07.12.2008 रोजी 19.54  वाजता तक्रारदार हे स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेच्‍या ए.टी.एम.मधून रक्‍कम रु.5000/- काढण्‍यासाठी गेले असता सदरील रक्‍कम ए.टी.एम मशीन मधून तक्रारदारास मिळाली नाही. त्‍यावेळी संगणकावर “Sorry to unable process”   असे दशविले, परंतू ती रक्‍कम तक्रारदार यांचे बचत खात्‍यामधून त्‍यांना न मिळता वजा झाली.

 

            तक्रारदाराने वरील घटनेबाबत सामनेवालाकडे व्‍यक्‍तीशः कागदोपत्री अर्जाद्वारे चौकशी केली. तरीही ती रक्‍कम तक्रारदारास परत मिळाली नाही किंवा तक्रारदाराच्‍या खात्‍यावर जमा झाली नाही. म्‍हणून तक्रारदाराने दि.01.01.2009 रोजी त्‍यांचे विधिज्ञामार्फत तक्रारदाराचे खाते असलेल्‍या सामनेवाला व ज्‍या  बँकेच्‍या ए.टी.एम.द्वारे रक्‍कम काढली त्‍या शाखा व्‍यवस्‍थापकास नोटीस पाठवून चौकशी केली. त्‍यानंतर सामनेवाला यांनी दि.19.01.2009 रोजी तक्रारदाराची वजा झालेली रक्‍कम रु.5000/- तक्रारदाराच्‍या खात्‍यावर जमा केली असल्‍याचे पत्राद्वारे कळविले.

            त्‍यानंतर सामनेवाला यांनी पोस्‍टामार्फत दि.01.03.2012 ते दि.31.03.2012 पर्यंतचे विवरणपत्र तक्रारदारास पाठवून ओ.डी.ची रक्‍कम रुपये 5000/- दर्शविली आहे. त्‍या संदर्भात तक्रारदाराने दि. 04.05.2012 रोजी सामनेवाला यांचेकडे अर्ज करुन तक्रारदाराकडे कोणत्‍याही प्रकारची ओ.डी.नसल्‍याबाबतचा खुलासा करुन आपण कशामुळे पत्र पाठविले याचा खुलासा सामनेवाला यांचेकडून मागितला, तरीही सामनेवाला यांनी तक्रारदारास त्‍याबाबतचे कोणतेही विवरणपत्र येणार नाही असे कळवून सुध्‍दा दि.01.04.2013 ते 30.04.2013 पर्यंतची रक्‍कम रु.5000/- ओ.डी.बाबतचे विवरणपत्र तक्रारदारास पाठवून कोणतेही कारण न देता रक्‍कम रुपये 744/- कपात केली व वजा रक्‍कम रु.4234/- दाखविली. त्‍यानंतर तक्रारदार यांनी दि.05.07.2013 रोजी सामनेवाला यांचेकडे अर्ज करुन परस्‍पर कपात केलेली रक्‍कम रु.744/- परत मिळावी आणि वजा दाखवलेली रक्‍कम रु.4234/- ही खात्‍यातून  परस्‍पर कपात करु नये. त्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाला यांना वेळोवेळी भेटून व अर्ज देवूनही कोणतीही कार्यवाही केली नाही. या उलट सामनेवाला यांनी दि.01 मे ते 30 मे 2013 संदर्भातील विवरणपत्र रक्‍कम रु.5000/- चे तक्रारदारास पाठवून दिले. त्‍यामुळे तक्रारदारास अत्‍यंत मनःस्‍तापास सामोरे जावे लागत आहे. सामनेवाला येथेच न थांबता पुनहा दि.23.09.2013 रोजी ओ.डी. संदर्भात रक्‍कम रु.5000/- भरावी असे तक्रारदारास कळविले व तसे न केल्‍यास सदरील रक्‍कम आपल्‍या  खात्‍यामधून वजा करण्‍यात येईल अशी सुचना तक्रारदारास सामनेवाला यांनी दिली.

            सामनेवाला यांची बँक ही राष्‍ट्रीयकृत असून त्‍यांच्‍याकडून चांगल्‍या  सेवेची अपेक्षा तक्रारदारास होती, परंतू सामनेवाला यांच्‍या अशा कृत्‍यामुळे मागील चार, पाच वर्षापासून तक्रारदारास आर्थिक व मानसिक त्रासास सामोरे जावे लागले आहे. तक्रारदार हा प्रतिष्‍ठीत शासकीय नोकरदार असून काही कारण नसताना विनाकारण त्रासास बळी पडलेला आहे. शेवटी तक्रारदाराने दि.28.11.2013 रोजी सामनेवाला यांना वरील ओ.डी.संदर्भात पाठवलेल्‍या विवरणाबाबत नोटीस पाठवून खुलासा मागविला. ती नोटीस सामनेवाला यांना मिळूनही त्‍यांनी अद्यापपर्यंत कोणतेही समाधानकारक उत्‍तर दिले नाही. म्‍हणून तक्रारदार यांनी सामनेवाला विरुध्‍द सेवेत त्रुटी ठेवली आहे म्‍हणून तक्रार दाखल केली.

 

            सबब तक्रारदार यांनी अशी मागणी केली की कोणतीही बाकी नसलेली रक्‍कम रु.5000/- ही सामनेवाला यांनी वजा करु नयेत, तसेच मागील चार पाच वर्षापासून होणा-या मानसिक, आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रु.75000/- व इतर खर्च रु.25000/- असे एकूण रक्‍कम रु.1,00,000/- तक्रार दाखल केल्‍यापासून 10 टक्‍के व्‍याजाने मिळावी अशी मागणी केली आहे.

 

            सामनेवाला यांना या मंचाची नोटीस मिळूनही ते या मंचासमोर हजर झाले नाहीत. म्‍हणून त्‍यांच्‍याविरुध्‍द दि.24.02.2014 रोजी निशाणी क्र.1 वर एकतर्फा आदेश करण्‍यात आला.

 

            तक्रारदार यांचे विधिज्ञ आर.व्‍ही.देशमुख यांचा युक्‍तीवाद ऐकला. त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तांचे अवलोकन केले असता न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

               मुददे                                   उत्‍तर

1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्‍या

   सेवेत त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी

   शाबीत केली काय ?                                    नाही.

2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली नुकसान

   भरपाई मिळणेस पात्र आहेत काय?                        नाही.

3) काय आदेश ?                                अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः- तक्रारदार यांचे विधिज्ञ श्री.रघुराज व्‍ही.देशमुख यांनी या मंचाचे लक्ष तक्रारदाराची तक्रार, शपथपत्र, कागदपत्रे याकडे वेधले. तक्रारदाराचे विधिज्ञ श्री.देशमुख यांनी  असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार हा बीड येथे वाहतूक नियंत्रक या पदावर असून ते सामनेवाला यांच्‍या बँकेचा खातेदार असून त्‍यांचा अकाऊंट नं. 10969583893 असा आहे. त्‍यासोबत तक्रारदार हे ए.टी.एम. या सुविधांचा लाभ घेतात. म्‍हणून तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहे. तक्रारदाराने दि.07.12.2008 रोजी स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेच्‍या  ए.टी.एम.मधून रु.5000/- काढण्‍यासाठी गेले असता सदरील ए.टी.एम.मधून रु.5000/- मिळालेले नाही, परंतू ते तक्रारदार यांचे खात्‍यातून वजा दाखविण्‍यात येऊन “Sorry to unable process” असे दर्शविले म्‍हणून तक्रारदाराने अर्जाद्वारे सामनेवाला यांच्‍याकडे पाठपुरावा करुनही सामनेवाला यांनी सदरील रक्‍कम तक्रारदाराच्‍या खात्‍यात जमा केली नाही. त्‍यानंतर तक्रारदाराने दि.01.01.2009 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून सदरील रकमेची चौकशी केली. त्‍यानंतर सामनेवाला यांनी आपली चुक लक्षात आल्‍यामुळे सदरील रक्‍कम रु.5000/- तक्रारदाराच्‍या खात्‍यात जमा केल्‍याचे दि.19.01.2009 रोजी तक्रारदारास पत्राद्वारे कळविले. पुढे असा युक्‍तीवाद केला की, सामनेवाला यांनी 01 मार्च 2012 ते 31 मार्च 2012 पर्यंतचे विवरण पोस्‍टामार्फत तक्रारदारास पाठवून रक्‍कम रु.5000/- ओ.डी.ची रक्‍कम दाखविण्‍यात आली. त्‍या संदर्भात सामनेवाला यांच्‍याकडे तक्रारदाराने दि.04.05.2012 रोजी अर्ज देऊन ओ.डी.च्‍या रकमेबाबत खुलासा मागितला, परंतू सामनेवाला यांनी असे सांगितले की, या पुढे आपणास असे काहीही विवरणपत्र येणार नाही. असे कळवूनही पुन्‍हा दि.01.04.2013 ते 30.04.2013 पर्यंतचे रक्‍कम रु.5000/- चे ओ.डी.बाबतचे विवरण तक्रारदारास सामनेवाला यांनी पाठविले आणि तक्रारदाराला कुठलीही कल्‍पना न देता रक्‍कम रु.744/- कपात केली व वजा रक्‍कम रु.4234/- दाखविली.

 

            वरील बाब तक्रारदारास समजल्‍यानंतर त्‍याने दि.05.06.2013 रोजी सामनेवाला यांच्‍याकडे अर्ज देऊन रक्‍कम रु.744/- परत मिळावी आणि रक्‍कम रु.4234/- ही तक्रारदाराच्‍या खात्‍यातून कपात करु नये असा अर्ज दिला. पुढे  असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदाराने सामनेवाला यांना वारंवार भेटून व अर्ज देऊनही सामनेवाला यांनी कसलीही दखल घेतली नाही. या उलट पुन्‍हा सामनेवाला यांनी दि.01 मे ते 30 मे 2013 संदर्भातील विवरणपत्र रक्‍कम रु.5000/- तक्रारदारास पाठवून दिले. त्‍यानंतर सुध्‍दा सामनेवाला यांनी दि.23.09.2013 रोजी रक्‍कम रु.5000/- ओ.डी.ची भरावी अन्‍यथा सदरील रक्‍कम आपल्‍या खात्‍यातून वजा करण्‍यात येईल असे सुचनापत्र तक्रारदारास पाठविले. पुढे असा युक्‍तीवाद केला की, सामनेवाला यांची बँक राष्‍ट्रीयकृत बँक असून चांगली सेवा देण्‍याची जबाबदारी, अपेक्षा आहे. परंतू सामनेवाला यांनी तसे न करता द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी करुन तक्रारदारास अत्‍यंत आर्थिक, मानसिक आणि शारिरिक त्रासास सामोरे जावे लागले. कारण तक्रारदार हा एक निष्‍पाप, प्रतिष्ठित, शासकीय नोकर असून त्‍याची काहीही चुक नसताना सामनेवाला यांनी तक्रारदारास योग्‍य सेवा पुरविली नाही. तक्रारदाराने या तक्रारीसोबत निशाणी 3 नुसार सर्व कागदपत्रे दाखल केलेले आहे. तक्रारदाराने अशी विनंती केली आहे की, सामनेवाला यांनी द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे म्‍हणून तक्रारदाराकडे कोणतीही ओ.डी.ची बाकी नसताना रक्‍कम रु.5000/- वजा करु नये. आणि मागील चार, पाच वर्षापासून होणा-या  आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रु.75,000/- व खर्चापोटी रु.25,000/- 10 टक्‍के व्‍याज दराने सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावे.

 

            सामनेवाला यांना या मंचाची नोटीस मिळूनही या मंचासमोर हजर झाले नाही. म्‍हणून या मंचाने त्‍यांचे विरुध्‍द एकतर्फा प्रकरण चालविण्‍याचा निर्णय घेतला.

            वरील सर्व बाबींचा, कागदपत्रांचा व युक्‍तीवादाचा या मंचाने विचार केला असता असे दिसून येते की, तक्रारदार हा सामनेवाला यांचा ग्राहक आहे. तसेच तक्रारदाराचे सामनेवाला यांच्‍या बँकेत दोन प्रकारचे खाते असून पगार खाते ज्‍याचा खाता क्रमांक 10969583893 व कर्ज खाते ज्‍याचा अकाऊंट नं.00000031235208821 असा दिसून येतो. त्‍यापैकी तक्रारदार यांनी पगार खाते क्र. 10969583893 या खात्‍यातून दि.07.12.2008 रोजी स्‍टेट बँक ऑफ हैद्राबाद यांच्‍या शाखेच्‍या ए.टी.एम.मधून रु.5000/- काढण्‍यास गेले असता ती रक्‍कम न मिळता त्‍यांचे खात्‍यातून वजा होऊन “Sorry to unable process”   असा शेरा आला. परंतू तक्रारदाराने पाठपुरावा करुन आणि सामनेवाला यांना त्‍यांची चुक लक्षात आल्‍यामुळे सदरील न मिळालेली रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यात दि.19.01.2009 रोजी जमा करुन तशी माहिती दि.24.01.2009 रोजी तक्रारदारास दिली, ते पत्र या मंचासमोर दाखल केले. यावरुन असे दिसून येते की, सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली नाही.

 

            तक्रारदाराने दाखल केलेल्‍या ओ. डी. विवरणपत्राचे या मंचाने बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की, सदरील विवरणपत्रावर असणारा अकाऊंट नं हा 00000031235208821 असा असून ते खाते तक्रारदार यांच्‍या नावावर असल्‍याचे दिसून येते. यावरुन या मंचास असे निदर्शनास  येते की, तक्रारदाराचे सामनेवाला यांच्‍याकडे कर्ज खाते आहे. कारण सदरील ओ.डी.ची रक्‍कम ही सदरील अकाऊंटवर दाखविलेली आहे. म्‍हणजेच त्‍या खात्‍यावर तक्रारदाराने कर्जाचा व्‍यवहार केला आहे असे निदर्शनास येते. परंतू सदरील खात्‍यावर कर्ज किंवा ओ.डी.ची रक्‍कम नसल्‍याबाबतचा कसल्‍याही प्रकारचा सबळ पुरावा तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला नाही. म्‍हणून सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत कसूर केला आहे ही बाब तक्रारदाराने शाबीत केली नाही. म्‍हणून तक्रारदाराची तक्रार नामंजूर होणेस पात्र आहे. म्‍हणून  मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर नकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

                        आदेश

            1) तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.

            2) खर्चाबददल आदेश नाही.

            3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

               कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

               परत करावेत.

 

 

 

                      श्री.रविंद्र राठोडकर,   श्रीमती मंजूषा चितलांगे,   

                           सदस्‍य            प्रभारी अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

  

 
 
[HON'BLE MRS. Manjusha Chitalange]
PRESIDING MEMBER
 
[HON'BLE MR. R.S.Rathodkar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.