आदेश
1) तक्रारदार क्र.1 यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2) तक्रारदार क्र.2 यांची तक्रार मंजूर करण्यात येत आहे.
3) सामनेवाला क्र.1 व 4 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी
तक्रारदार क्र.2 यांना दैनिक संकल्प ठेव म्हणून बचत खाते
क्र.एम-6010 मधील रक्कम रु.14,200/- (अक्षरी रु.चौदा
हजार दोनशे) व त्यावर द.सा.द.शे.7 टक्के व्याज तक्रार दाखल
तारखेपासून 30 दिवसात द्यावे. सदर रक्कम विहीत मुदतीत न
दिल्यास तक्रार दाखल तारखेपासून संपूर्ण रक्कम वसूल
होईपर्यंत द.सा.द.शे.10 टक्के व्याज द्यावे.
4) सामनेवाला क्र.1 व 4 यांनी तक्रारदार क्र.2 यांना झालेल्या
मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.2500/-(अक्षरी रु.दोन
हजार, पाचशे) द्यावेत.
5) सामनेवाला क्र.1 व 4 यांनी तक्रारदार क्र.2 यांना तकारीच्या
खर्चापोटी रु.2,000/-(अक्षरी रु.दोन हजार) द्यावे.
6) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील
कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला
परत करावेत.
श्री.रविंद्र राठोडकर, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड