जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
किरकोळ अर्ज क्रमांक : 4/2022. अर्ज दाखल दिनांक : 20/05/2022. अर्ज निर्णय दिनांक : 27/12/2022.
कालावधी : 00 वर्षे 07 महिने 07 दिवस
श्री. महादेव मधुकर खोसे :- अर्जदार
विरुध्द
(1) व्यवस्थापक, श्री ॲग्रीकल्चर रिसर्च, पुणे. :- उत्तरवादी
(2) श्री नेटाफीम, मुंबई.
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
अर्जदार यांचेकरिता विधिज्ञ :- एस.एम. इंगळे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रार क्र. 191/2021 मध्ये दि.28/2/2022 रोजी नि. क्र.1 वर करण्यात आलेला एकतर्फी चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या पुन:विलोकन अर्जाकरिता 52 दिवसांचा विलंब झाल्यामुळे तो क्षमापीत होण्याकरिता अर्जदार (ग्राहक तक्रार क्र. 191/2021 मध्ये विरुध्द पक्ष क्र.1) यांनी प्रस्तुत किरकोळ अर्ज दाखल केलेला आहे.
(2) अर्जदार यांचे कथन असे की, ग्राहक तक्रार क्र.191/2021 मध्ये त्यांच्याविरुध्द दि.28/2/2022 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आल्यासंबंधी दि.5/5/2022 रोजी समजले.
(3) अर्जदार व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित आहेत. ग्राहक संरक्षण (ग्राहक आयोग कार्यपध्दती) अधिनियम, 2020 चे कलम 14 अनुसार आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत पुन:विलोकन अर्ज दाखल केला पाहिजे. अर्जदार हे दि.28/2/2022 रोजीच्या आदेशाकरिता पुन:विलोकन अर्ज करु इच्छित असल्यामुळे त्यांनी दि.30/3/2022 पर्यंत पुन:विलोकन अर्ज दाखल करणे आवश्यक होते. असे दिसते की, अर्जदार यांनी दि.20/5/2022 रोजी अर्ज सादर केला आणि त्यांना 51 दिवसाचा विलंब झालेला आहे. विलंब क्षमापीत होण्याकरिता अर्जामध्ये समाधानकारक व संयुक्तिक कारण दिसून येत नाही. त्या अनुषंगाने अर्जदार यांचा अर्ज रद्द करणे क्रमप्राप्त आहे. अंतिमत: खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
(1) अर्जदार यांचा किरकोळ अर्ज रद्द करण्यात येतो.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-