जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 76/2023. आदेश दिनांक : 17/04/2023.
दत्ता संतराम ढगे, वय 55 वर्षे,
व्यवसाय : नोकरी, रा. जुनी कापड लाईन, लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, शाखा क्र. 20037,
चंद्रनगर, शाहू कॉलेजच्या बाजूस, लातूर.
(2) व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक, 18 19 देवदास कामल्लीग ब्लॉक,
सेनरजी बिल्डींग, 'जी' ब्लॉक, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, नॅशनल
स्टॉक एक्सचेंजच्या पाठीमागे, बांद्रा पूर्व, मुंबई - 400 051. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- श्री. अनिल के. जवळकर
आदेश
श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) ग्राहक तक्रारीमध्ये नमूद कथने व कागदपत्रांचे अवलोकन केले. तक्रारकर्ता यांच्या विधिज्ञांचा युक्तिवाद ऐकला.
(2) सकृतदर्शनी, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून वित्तीय सेवा घेतल्याचे दिसून येत नाही. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांच्याकडून सेवा घेत नसल्यामुळे 'ग्राहक' संज्ञेत येत नाहीत. ग्राहक संरक्षण अधिनियम, 2019 चे कलम 2 (5) अन्वये 'तक्रारकर्ता' संज्ञेत येत नसल्यामुळे व 'ग्राहक' नसल्यामुळे कलम 35 अन्वये ग्राहक तक्रार दाखल करण्यास तक्रारकर्ता पात्र नाहीत. तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने उपस्थानाधिकार नसल्यामुळे उक्त कारणास्तव दाखलपूर्व टप्प्यावर ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-