जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 168/2021. आदेश दिनांक : 09/12/2022.
श्री. चेतन सुनिलराव देशमुख, वय 24 वर्षे,
व्यवसाय : शिक्षण व शेती, रा. कातपूर, ता. जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
व्यवस्थापक, भारतीय कृषि विमा कंपनी,
बी.एस.ई. टॉवर, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- एस.डी. जांबळे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत ग्राहक तक्रार दाखल करुन पीक विमा रक्कम व्याजासह देण्याचा व अन्य नुकसान भरपाई देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल करुन घेण्यात आली आणि विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्याचा आदेश करण्यात आला. मात्र, विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र पाठविणे / बजावणी करण्यासंबंधी तक्रारकर्ता यांनी आवश्यक पूर्तता केली नाही. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ अनुपस्थित आहेत. उचित संधी प्राप्त होऊनही तक्रारकर्ता यांनी आवश्यक पूर्तता केलेली नाही आणि त्यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने ग्राहक तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-