जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
ग्राहक तक्रार क्रमांक : 83/2020. आदेश दिनांक : 25/07/2022.
उत्तमराव सिताराम शिंदे, वय 71 वर्षे, व्यवसाय : शेती,
रा. (गांजूरवाडी) आष्टामोड, ता. चाकूर, जि. लातूर. तक्रारकर्ता
विरुध्द
(1) विभागीय व्यवस्थापक, फेनोमिनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि.,
वडगावे प्लाझा, विश्व सुपर मार्केटजवळ, बार्शी रोड, लातूर.
हा. म.न.पा. कॉम्प्लेक्स, मिनी मार्केट, ता. जि. लातूर.
(2) व्यवस्थापकीय संचालक, फेनोमिनल हेल्थ केअर सर्व्हीसेस लि.,
सि. टी. एस. नं. 733, फेनोमिनल हाऊस, ए.के. रोड,
मरोळ, अंधेरी (पु.), मुंबई - 400 059. विरुध्द पक्ष
गणपूर्ती : मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य
तक्रारकर्ता यांचेकरिता विधिज्ञ :- व्ही. आर. शिंदे
आदेश
मा. श्रीमती रेखा जाधव, अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-
(1) विरुध्द पक्ष यांनी फेनोगोल्ड मेंबरशीप - सिंगल इकोनॉमी पॉलिसीची रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्यामुळे अनुतोष मिळण्यासाठी तक्रारकर्ता यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे.
(2) ग्राहक तक्रार दाखल झाल्यानंतर ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र काढण्यात आले. परंतु सूचनापत्राच्या बजावणीसंबंधी तक्रारकर्ता यांनी पूर्तता केलेली नाही. उचित संधी प्राप्त होऊनही विरुध्द पक्ष यांच्यावर सूचनापत्र बजावणी होण्याकरिता तक्रारकर्ता यांनी कार्यवाही केलेली नाही. अनेक तारखांपासून तक्रारकर्ता व त्यांचे विधिज्ञ सातत्याने अनुपस्थित आहेत. नैसर्गिक न्याय-तत्वानुसार विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणे आवश्यक आहे. उचित संधी देऊनही विरुध्द पक्ष यांना सूचनापत्र बजावणी करण्यासाठी आवश्यक पूर्तता न केल्यामुळे तक्रारकर्ता यांना ग्राहक तक्रारीच्या अनुषंगाने स्वारस्य दिसून येत नाही. ग्राहक तक्रारींचे कालबध्द मुदतीमध्ये निर्णयीत करण्याचे बंधन पाहता तक्रार रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. उक्त अनुषंगाने तक्रार रद्द करण्यात येते.
(श्री. रविंद्र शे. राठोडकर) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)
-०-
(संविक/स्व/25722)