Maharashtra

Latur

CC/87/2021

इंदुबाई कुमार सगरे - Complainant(s)

Versus

विभागीय व्यवस्थापक, दि. ओरिएंंटल इंशुरंस कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. पि. एल. शिंदे

26 Jul 2022

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/87/2021
( Date of Filing : 10 Mar 2021 )
 
1. इंदुबाई कुमार सगरे
h
...........Complainant(s)
Versus
1. विभागीय व्यवस्थापक, दि. ओरिएंंटल इंशुरंस कं. लि.
j
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. REKHA R. JADHAV PRESIDENT
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 26 Jul 2022
Final Order / Judgement

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 87/2021.                        तक्रार दाखल दिनांक : 10/03/2021.                                                                           तक्रार निर्णय दिनांक :  26/07/2022.

                                                                                 कालावधी :  01 वर्षे 04 महिने 16 दिवस

 

इंदुबाई कुमार सगरे, वय 51 वर्षे,

व्यवसाय : घरकाम, रा. सावरी, ता. निलंगा, जि. लातूर.                              तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

 

विभागीय व्यवस्थापक, दी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि.,

विभागीय कार्यालय : लोखंडे कॉम्प्लेक्स, पहिला मजला,

टॉकीजसमोर, सुभाष चौक, लातूर,ता. जि. लातूर.                                     विरुध्द पक्ष

 

 

गणपूर्ती :          मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार)

                        मा. श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :- प्रमोद एल. शिंदे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :- एस.जी. डोईजोडे

 

आदेश 

 

मा. श्रीमती रेखा जाधव, अध्‍यक्ष (अतिरिक्त कार्यभार) यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षीप्त स्वरुपात अशी की, त्यांचे पती कुमार गोपाळ सगरे हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सावरी यांचे सभासद होते. सहकारी संस्थेने विरुध्द पक्ष यांच्याकडे जनता अपघात विमा योजनेंतर्गत त्यांचा विमा उतरविलेला होता.  दि.18/9/2017 रोजी कुमार गोपाळ सगरे चक्कर आल्यामुळे खाली पडले आणि डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडे कागदपत्रांसह दावा प्रस्ताव सादर केला. परंतु विरुध्द पक्ष यांनी चूक व काल्पनिक कारणाद्वारे विमा दावा नामंजूर केला. त्यामुळे तक्रारकर्ती यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करुन रु.2,00,000/- विमा रक्कम व्याजासह देण्याचा; मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- देण्याचा व तक्रार खर्चाकरिता रु.25,000/- देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.

 

(2)       विरुध्द पक्ष यांनी लेखी निवेदनपत्र दाखल केले आहे. त्यांनी ग्राहक तक्रारीतील बहुतांश मजकूर अमान्य केला आहे. त्यांचे कथन असे की, कुमार गोपाळ सगरे हे मृत्यूपूर्वी 4 ते 5 दिवस सातत्याने मद्य प्राशन करीत होते आणि मद्याच्या अंमलाखाली पडल्यामुळे डोक्यास मार लागून त्यांचा मृत्यू झाला. शवचिकित्सा अहवालामध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण Intracranial bleeding नमूद आहे. त्यांनी अन्वेषकामार्फत चौकशी केली असता विमापत्राच्या अटी व शर्तीचा भंग झाला असल्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला आहे.  त्यांच्या सेवेमध्ये त्रुटी नाही आणि तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी, अशी विनंती केलेली आहे.

 

(3)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, विरुध्द पक्ष यांचे लेखी निवेदनपत्र, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता; तसेच उभय पक्षांतर्फे विद्वान विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्‍यानंतर वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

                       

मुद्दे                                                                                          उत्तर

 

(1) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना द्यावयाच्‍या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                            होय.

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय  ?                  होय.

     असल्‍यास किती ?                                                                          अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                               अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(4)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- प्रामुख्याने, कुमार गोपाळ सगरे हे मृत्यूपूर्वी 4 ते 5 दिवस सातत्याने मद्य प्राशन करीत होते आणि मद्याच्या अंमलाखाली पडून डोक्यास मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला असून विमापत्राच्या अटी व शर्तीचा भंग झाल्यामुळे तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केला, असे विरुध्द पक्ष यांचे कथन आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा नामंजूर केल्यासंबंधी दि.21/9/2018 रोजीचे पत्र अभिलेखावर आहे. वास्तविक पाहता, विरुध्द पक्ष यांनी प्रतिवादापृष्ठयर्थ त्यांनी नियुक्त केलेल्या अन्वेषकांचा अहवाल किंवा अन्य समर्पक कागदपत्रे दाखल केलेले नाहीत. विरुध्द पक्ष यांनी जे अटी व शर्तीचे पत्रक दाखल केले आहे, ते जनता व्यक्तिगत अपघात विमापत्रासंबंधी आहे. त्यामध्ये विमापत्राचा क्रमांक, कालावधी, विमाधारकांचे नांव व इतर आवश्यक बाबींचा उल्लेख नाही. त्यातील उपबंध क्र.4 नुसार मादक द्रवाच्या प्रभावाखाली मृत्यू झाल्यास विमा कंपनीचे जबाबदारी दिसून येत नाही. या ठिकाणी ही बाब नमूद करणे आवश्यक वाटते की, उभय पक्षांपैकी कोणीही महत्वपूर्ण असणारे विमापत्र दाखल केलेले नाही. 

 

(5)       मयत कुमार गोपाळ सगरे यांचे बंधू मोहन यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या अर्जामध्ये कुमार हे 4 ते 5 दिवसापासून दारु पीत असल्यामुळे उपचाराकरिता नेत असताना मृत्यू झाल्याचे नमूद केलेले आहे. तसेच पोलीस कागदपत्रांमध्ये कुमार गोपाळ सगरे हे 4 ते 5 दिवसांपासून मद्य प्राशन करीत होते, असे नमूद दिसते. केवळ पोलीस कागदपत्रांमध्ये नमूद कथनांच्या आधारे कुमार गोपाळ सगरे मद्याच्या अंमलाखाली असताना पडले आणि त्यांचा मृत्यू झाला, हे ग्राह्य धरता येणार नाही. मयत कुमार गोपाळ सगरे यांचा शवचिकित्सा अहवाल अभिलेखावर दाखल आहे आणि त्यानुसार पोटामध्ये मद्य आढळून आल्याचे दिसून येत नाही. शवचिकित्सा अहवालामध्ये त्यांच्या मृत्यूचे कारण Intracranial bleeding नमूद आहे. यावरुन त्यांच्या डोक्यामध्ये रक्तस्त्राव झाला, हे स्पष्ट होते. कुमार गोपाळ सगरे हे मद्याच्या अंमलाखाली असताना पडले आणि त्यांनी मद्य प्राशन केले होते, असा स्वतंत्र पुरावा नाही.

 

(6)       उक्त विवेचनाअंती विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांचा विमा दावा आयोग्य व अनुचित कारणास्तव नामंजूर करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे सिध्द होते आणि तक्रारकर्ती विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. असे दिसते की, तक्रारकर्ता यांनी रु.2,00,000/- विमा रकमेची मागणी केली आहे. विमापत्रासंबंधी आवश्यक कागदपत्रे अभिलेखावर नाहीत. परंतु विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या अटी व शर्तीच्या पत्रकामध्ये रु.1,00,000/- विमा जोखीमेचा उल्लेख आहे. अशा स्थितीत तक्रारकर्ता हे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास पात्र ठरतात. प्रकरणाची वस्तुस्थिती विचारात घेऊन विमा दावा नामंजूर केल्याच्या तारखेपासून म्हणजेच दि.21/9/2018 पासून द.सा.द.शे. 6 टक्के दराने व्याज देण्याकरिता विरुध्द पक्ष यांना आदेश करणे न्यायोचित होईल.

 

(7)       मानसिक व शारीरिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रार खर्च मागणीचा विचार करता  योग्‍य विचाराअंती मानसिक व शारीरिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता एकत्रिरित्या रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र ठरतात. उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

आदेश

 

(1) तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.   

 

ग्राहक तक्रार क्र.  87/2021.

 

(2) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना रु.1,00,000/- विमा रक्कम द्यावी.

तसेच, विरुध्‍द पक्ष यांनी उक्त रु.1,00,000/- रकमेवर दि.21/9/2018 पासून संपूर्ण रक्‍कम अदा करेपर्यत द.सा.द.शे. 6 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.          

(3) विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(4) विरुध्‍द पक्ष यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)                                                        (श्रीमती रेखा  जाधव)                

             सदस्‍य                                                                           अध्यक्ष (अतिरिक्त कार्यभार)             

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MRS. REKHA R. JADHAV]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.