Dated the 21 Aug 2017
न्यायनिर्णय
द्वारा- सौ.स्नेहा एस.म्हात्रे...................मा.अध्यक्षा.
1. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदार वर नमुद पत्यावर रहात असुन, सामनेवाले हे इमारत बांधकाम व्यावसायिक असुन विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन या नांवाने इमारत बांधकामाचा व्यवसाय करतात. श्री.संदिप पावसे व श्री.शेखर पावशे हे सदर भागिदारी संस्थेचे भागीदार असल्यापचे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. तक्रारदार नं.1 व 2 यांनी सामनेवाले यांच्या सर्व्हे नं.44, हिस्सा नं.18, हरीभाऊपाडा, काटेमानवली, कल्याण (पुर्व) जिल्हा-ठाणे येथे बांधण्यात येत असलेल्या गिरीजाआई कॉम्प्लेक्स या प्रकल्पामध्ये सदनिका क्रमांक-202, सी-विंग, रु.11,59,200/- या मोबदल्याच्या किंमतीस खरेदी करण्याचे ठरवले, त्यानुसार उभयपक्षांत विक्री करारनामा स्वाक्षरीत करुन नोंदविण्यात आला. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना एकूण मोबदल्याच्या किंमतीपैंकी रु.11,38,996/- ही रक्कम दिली असल्याचे नमुद केले आहे. परंतु सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर सदनिकेचा ताबा ऑक्टोंबर-2012 मध्ये देण्याचे कबुल करुनही अदयाप न दिल्याने तक्रारदार यांनी सामनेवाले विरुध्द तक्रार दाखल करुन तक्रारीच्या प्रार्थना कलमांत नमुद केल्यानुसार सामनेवाले यांचेकडून मागण्या केल्या आहेत.
2. सामनेवाले यांनी त्यांच्या कैफीयतीमध्ये तक्रारदार यांचे तक्रारीमधील सर्व आरोप फेटाळले असुन सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदर सदनिकेचा ताबा ऑक्टोंबर-2012 पर्यंत देण्याबाबत कोणतेही आश्वासन दिले नव्हते, सामनेवाले यांनी बांधकाम खर्चाच्या वाढीव रकमेबाबत तक्रारदार यांना ता.20.10.2013 रोजी पत्र पाठवले, परंतु तक्रारदार यांनी ती सामनेवाले यांना देण्यास टाळाटाळ केली, सामनेवाले पुढे कैफीयतीत म्हणतात, तक्रारदार यांनी सामनेवाले यांस ठरल्याप्रमाणे मोबदल्याची रक्कम दिल्यास सामनेवाले आजही सदनिकेचा ताबा तक्रारदारास देण्यास तयार आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिली नसुन तक्रारदार यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक केली नाही असे सामनेवाले यांचे म्हणणे आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांचे इतर आरोप फेटाळले असुन प्रस्तुत तक्रार बिनबुडाची व खोटी असल्याचे नमुद करुन फेटाळण्याची मागणी केली आहे.
सामनेवाले यांनी पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल न केल्याने त्यांच्या पुरावा शपथपत्र व लेखी युक्तीवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्यात आले.
3. उभयपक्षांनी दाखल केलेल्या आवश्यक कागदपत्रांचे अवलोकनप करुन तक्रारीच्या निराकरणार्थ मंचाने खालील मुदयांचा विचार केला.
मुद्दे निष्कर्ष
अ.तक्रारदार यांचेशी सामनेवाले यांनी ता.28.12.2010 रोजी
सदनिका क्रमांक-सी-202 बाबत नोंदणीकृत करारनामा
करुनही तक्रारदार यांना सदर सदनिकेचा ताबा न दिल्याने
तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिली आहे का ?...........................................होय.
ब.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून भाडयापोटी रक्कम मिळण्यास
पात्र आहेत का ?....................................................नाही.(No Leave & Lic. Agreement
is Produced)
क.तक्रारदार सामनेवाले यांचेकडून मानसिक त्रास व न्यायिक
खर्चाची रक्कम अंतिम आदेशात नमुद केल्यानुसार
मिळण्यास पात्र आहे ?.............................................................................होय.
ड.तक्रारीत काय आदेश ?..........................................तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
4.कारण मिमांसा-
मुद्दा- क्र.1. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचे गिरीजा आई कॉम्प्लेक्स या काटेमानवली येथील प्रकल्पामध्ये सदनिका क्रमांक-सी-202 खरेदी करण्याबाबत सामनेवाले यांना सदर सदनिकेचा करारनामा स्वाक्षरीत करण्यापुर्वी रक्कम रु.2,31,840/- अदा केले, त्यानंतर सामनेवाले यांनी सदर सदनिकेबाबत ता.28.12.2010 रोजी तक्रारदार नं.1 व 2 यांच्याशी करारनामा स्वाक्षरीत केला, तो KLN/1/10679/2010 या क्रमांकान्वये सहा.दुय्यम निबंधक कल्याण-1 येथे नोंदविण्यात आला. त्यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांना उर्वरीत मोबदल्याची रक्कम रु.51,000/- धनादेशाव्दारे ता.13.12.2009 रोजी दिली, तसेच सामनेवाले यांना तक्रारदार यांनी ता.23.12.2010 रोजी व ता.28.01.2011 रोजी अनुक्रमे रु.1,80,840/- व रु.2,360/- दिल्याचे तक्रारीत सादर केलेल्या पावत्यांवरुन दिसुन येतात, त्याखाली सामनेवाले यांची स्वाक्षरी आहे, तसेच तक्रारदार यांनी त्यानंतर रु.9,04,796/-, GIC Housing Finance Ltd., व्दारे कर्ज घेऊन सामनेवाले यांना Installment क्रमांक-1 ते 5 बाबत अदा केले. (पान क्रमांक-64 ते 68) अशा प्रकारे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना एकूण मेबदला रु.11,59,200/- हया रकमेपैंकी एकूण रक्कम रु.11,38,996/- अदा केल्याचे दिसुन येतात. तक्रारदार सामनेवाले यांना उर्वरीत रक्कम रु.20,204/- अदा करण्यास तयार आहेत असे नमुद केले आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराकडून एवढया मोठया प्रमाणात रक्कम घेऊनही अदयाप सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मुलभूत सोयी सुविधांसह त्यांच्या वर नमुद सदनिकेचा ताबा दिला नाही, व अशाप्रकारे तक्रारदार यांना सदोषपुर्ण सेवा दिली, तसेच करारनाम्यामधील ताबा देण्याच्या अटीमधील ताबा देण्याच्या कालावधीची अट कोणतीही तारीख न लिहिता कोरी ठेवली. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराप्रती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याचे दिसुन येते, सामनेवाले यांनी कैफीयतीमध्ये तक्रारदार यांनी वर नमुद संपुर्ण रक्कम तक्रारदार यांनी दिल्यास सामनेवाले तक्रारदार यांना सदनिकेचा ताबा देण्यास तयार असल्याचे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वर नमुद केल्याप्रमाणे एकूण मोबदल्यापैंकी उर्वरीत रक्कम रु.20,204/- (अक्षरी रुपये वीस हजार दोनशे चार) आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांत अदा करावी व सामनेवाले यांना सदर रक्कम रु.20,204/- तक्रारदाराकडून प्राप्त झाल्यावर सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-सी-202, गिरीजा आई कॉम्प्लेक्स,644 चौरस फूट बिल्टप हिचा ताबा पाणी जोडणी, इलेक्ट्रीसिटी कनेक्शन, लिफ्ट इत्यादि मुलभूत सोयी सुविधांसह आदेश पारित तारखेपासुन तीन महिन्यांत दयावा, असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
मुद्दा-क्र.2. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडून तक्रारदार यांना सदनिका न मिळाल्याने तक्रारदार यांना भाडयाने जागा घेऊन रहावे लागले असे नमुद केले आहे, व सामनेवाले यांचेकडून भाडयापोटीची नुकसानभरपाई म्हणून प्रतिमहिना रक्कम रु.5,000/- दयावेत. अशी तक्रारदार यांनी मागणी केली आहे. परंतु तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रारीमध्ये त्यांनी भाडयाने जागा घेतल्याबाबत लिव लायसन्स अँग्रिमेंट किंवा भाडे पावती इत्यादी दाखल केलेली नसल्याने भाडे भरल्याबाबतच्या कागदोपत्री पुराव्या अभावी तक्रारदार यांची भाडयापोटीची नुकसानभरपाई मिळण्याबाबतची मागणी फेटाळण्यात येते.
मुद्दा-क्र.3.तक्रारदार यांनी सामनेवाले यांना वर नमुद सदनिकेबाबत एकूण मोबदल्यापैंकी 98 टक्के रक्कम दिली तरी देखील सामनेवाले यांनी अदयापपर्यंत तक्रारदार यांना सदर सदनिकेचा ताबा न दिल्याने इतकी वर्षे तक्रारदाराचे पैसे सामनेवाले यांचेकडे अडकून राहिले, व सदनिकेचा ताबाही तक्रारदार यांना मिळाला नाही, तसेच बँकेच्या कर्जाचे हप्ते अदयापपर्यंत तक्रारदार यांना भरावे लागतात असे तक्रारदार यांनी नमुद केले आहे. यामुळे तक्रारदार यांना जो मानसिक त्रास झाला त्या मानसिक त्रासाची नुकसारभरपाईपोटी सामनेवाले यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) व वकीलाकरवी प्रस्तुत तक्रार दाखल करावी लागल्याने झालेल्या न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 व 2 यांना एकत्रितपणे आदेश पारित तारखेपासुन तीन महिन्यांत दयावे असे आदेश सामनेवाले यांना देण्यात येतात.
प्रस्तुत प्रकरणात तक्रारदार यांनी MA-06-2014 दाखल केला होता, मुळ प्रकरणात अंतिम आदेश पारित झाल्याने उपरोक्त एम.ए.क्रमांक-06/2014 हा नस्ती करण्यात येतो.
उपरोक्त चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन खालील प्रमाणे आदेश पारित करण्यात येतो.
“ या मंचातील कार्यभार पाहता व इतर प्रशासकीय कारणांमुळे यापुर्वी ही तक्रार निकाली काढता येऊ शकली नाही ”.
- अंतिम आदेश -
1. तक्रार क्रमांक-48/2014 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना तक्रारीत नमुद सदनिका क्रमांक-सी-202, गिरीजा आई
कॉम्प्लेक्सचा ताबा अदयाप न दिल्याने, तक्रारदाराप्रती सदोषपुर्ण सेवा दिल्याचे व पझेशन
देण्याबाबतचा करारनाम्यातील क्लॉज हेतुपुरस्सर कोरा ठेवल्याने अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केल्याचे जाहिर करण्यात येते.
3. तक्रारदार यांनी सामनेवाले यांना आदेश पारित तारखेपासुन एक महिन्यांत सदनिका
क्रमांक-202, सी-विंगच्या मोबदल्यापैंकी उर्वरीत रक्कम रु.20,204/- (अक्षरी रुपये वीस
हजार दोनशे चार) दयावी, व सामनेवाले यांनी तक्रारदार यांना सदनिका क्रमांक-सी-202,
गिरीजा आई कॉम्प्लेक्स, हरीभाऊपाडा, काटेमानवली, कल्याण-पुर्व (644 चौरस फूट
बिल्टप) हिचा ताबा पाणी जोडणी, इलेक्ट्रीसि कनेक्शन, लिफ्ट इत्यादि मुलभूत सोयी
सुविधांसह आदेश पारित तारखेपासुन तीन महिन्यांत दयावा असे आदेश सामनेवाले यांना
देण्यात येतात.
4. सामनेवाले यांनी तक्रारदार नं.1 व 2 यांना एकत्रितपणे मानसिक त्रासापोटी रक्कम
रु.25,000/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) व न्यायिक खर्चापोटी रक्कम रु.10,000/-
(अक्षरी रुपये दहा हजार) आदेश पारित तारखेपासुन तीन महिन्यांत दयावेत.
5. तक्रारदार यांची भाडयाच्या रकमेची मागणी कागदोपत्री पुराव्याअभावी फेटाळण्यात येते.
6. आदेशाच्या प्रती उभयपक्षकारांना विनामुल्य व विनाविलंब पोस्टाने पाठविण्यात याव्यात.
7. तक्रारीचे अतिरिक्त संच असल्यास तक्रारदार यांना परत करण्यात यावे.
ता.21.08.2017
जरवा/