Maharashtra

Beed

CC/13/100

अमोल दादाराव तांबे - Complainant(s)

Versus

विक्रेता प्रो.आनंद सेल्‍स अन्‍ड सर्व्हिसेस - Opp.Party(s)

डाके

07 Jul 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/100
 
1. अमोल दादाराव तांबे
रा.केत ता.केज
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. विक्रेता प्रो.आनंद सेल्‍स अन्‍ड सर्व्हिसेस
जुना नगर नाका नगर रोड, बीड
बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 07.07.2014

               (द्वारा- श्रीमती मंजुषा चितलांगे, सदस्‍य)

            तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाला यांनी कर्तव्‍यात कसूर केल्‍यामुळे नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

 

            तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणेप्रमाणे, तक्रारदार हे मुळचे केज ता.केज जि.बीड येथील रहिवाशी आहेत. सामनेवाला क्र.1 हे गोदरेज अॅण्‍ड बायस एम.एफ.जी.कंपनी लि., अप्‍लायन्‍स  डिव्‍हीजन या उत्‍पादीत कंपनीमार्फत वस्‍तूंची विक्री करणारी एजन्‍सी आहे. सामनेवाला क्र.2 हे गोदरेज अॅण्‍ड बायस एम.एफ.जी.कंपनीचे  वस्‍तू उत्‍पादीत करणारी कंपनी आहे. सामनेवाला क्र.3 हे सामनेवाला क्र.2 यांनी उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तूमध्‍ये बिघाड झाल्‍यास ती दुरुस्‍त करुन देणारी एजन्‍सी आहे.

 

            तक्रारदार हे स्‍वतःच्‍या घरगुती वापराकरीता दि.22.02.2011 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 यांनी उत्‍पादीत केलेला गोदरेज कंपनीचा  मॉडेल नं.GFE 30 DY युनिट नं.0809210219 हा रक्‍कम रु.22,000/- मध्‍ये फ्रिज खरेदी केला आहे. फ्रिज उत्‍पादीत कोड BTR 134 A व कॅबीनेट सिरियल नं.GCB 1 BT 05 10-11-002568 असा आहे. फ्रिजची  वॉरंटी ही 5 वर्ष असल्‍याचे वॉरंटी कार्ड तक्रारदारांना दिलेले आहे. तक्रारदार यांनी सदर फ्रिज खरेदी केल्‍यानंतर  दोन तीन महिने फ्रिज व्‍यवस्थित चालला व त्‍यानंतर फ्रिजमध्‍ये ठेवलेले पदाथ व जीवनावश्‍यक वस्‍तू  थंड होत नसल्‍याने व खराब होत असल्‍याचे तक्रारदार यांच्‍या लक्षात आल्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 यांना कळविले असता सामनेवाला क्र.1 यांनी सदर फ्रिज गोदरेज कंपनीच्‍या शोरुममध्‍ये दाखविण्‍यास सांगितले. म्‍हणून  तक्रारदार  यांनी फ्रिज हे राहत असलेल्‍या पुणे येथील गोदरेज स्‍मार्ट केअर शोरुम मधील अथोराईजड  सर्व्हिस प्रोव्‍हायडर जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग यांचेकडे दुरुस्‍तीकरीता दाखवले असता त्‍यांनी  सदर फ्रिजची पाहणी करुन फ्रिज मधील कॉम्‍प्रेसर निकामी झाल्‍याचे सांगितले. त्‍यानंतर सुध्‍दा तक्रारदार यांनी 4, 5 वेळा सदर फ्रिज दुरुस्‍तीकरता दाखवले परंतू ते दुरुस्‍त झाले नाही. सदर फ्रिज हे कधीच दुरुस्‍त होणार नाही असा सल्‍ला दिला. त्‍याकरता तक्रारदार यांना जवळपास सात ते आठ हजार रुपये खर्च आला.

            तक्रारदार यांनी फ्रिजमधील कॉम्‍प्रेसर  निकामी झाल्‍याची माहिती वेळोवेळी सामनेवाला यांना देऊनही सामनेवाला यांनी तक्रारदारास फ्रिज बदलून देण्‍याची तयारी दर्शविली नाही. सबब सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष करुन कर्तव्‍यात कसूर केला व फ्रिज बदलून देण्‍यास टाळाटाळ केली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे व तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी दि.12.06.2013 रोजी गोदरेज केअर शोरुममध्‍ये फ्रिज पुन्‍हा दुरुस्‍तीसाठी दाखवला असता सदर फ्रिज दुरुस्‍त होणार नाही असा सल्‍ला दिला. तदनंतर तक्रारदार यांनी दि.18.06.2013 रोजी सामनेवाला यांना नोटीस पाठवून फ्रिज बदलून देण्‍याची विनंती केली. सामनेवाला यांनी पाठवलेल्‍या नोटीसचे उत्‍तर व फोटो तक्रारदार यांना मान्‍य नाही. तक्रारदारास नादुरुस्‍त फ्रिजमुळे जीवनावश्‍यक वस्‍तूंचा उपभोग घेता आला नाही. तसेच सामनेवाला यांचेकडून सतत अपमानकारक व मानहानीकारक बोलणे ऐकून घ्‍यावे लागले. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब तक्रारदाराची विनंती की, फ्रिजची किंमत रु.22,000/- तसेच जीवनावश्‍यक वस्‍तू नाश पावल्‍यामुळे  तक्रारदारास झालेल्‍या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.30,000/-, फ्रिज दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु.10,000/-, दाव्‍याचा खर्च म्‍हणून रु.3,000/- असे एकूण रक्‍कम रु.65,000/- सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी देण्‍याची विनंती केली आहे.

 

            सामनेवाला क्र.1 ते 3 मंचासमोर हजर झाले. त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे निशाणी क्र.14 वर दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदार याने रक्‍कम रु.22,000/- मध्‍ये फ्रिज खरेदी केला असून सदर फ्रिजच्‍या कॉम्‍प्रेसरची वॉंरंटी 5 वर्षांची व फ्रिज मधील पार्टसची वॉरंटी 1 वर्षाची आहे. तक्रारीतील उर्वरीत मजकूर सामनेवाला यांनी स्‍पष्‍टपणे नाकारलेला आहे. सामनेवाला क्र.1 हे गोदरेज कंपनीचे विक्रेता आहे. सामनेवाला क्र.2 ही गोदरेज कंपनी असून उत्‍पादीत आहे. सामनेवाला क्र.3 हे कंपनीचे अधिकृत सर्व्हिस मॅनेजर आहे. तक्रारदार यांनी खरेदी केलेल्‍या फ्रिजची वॉरंटी व बिल सामनेवाला यांनी तक्रारदारास दिलेले आहे. फ्रिजच्‍या कॉम्‍प्रेसरची वॉरंटी 5 वर्षाची, बाकीच्‍या पार्टसची वॉरंटी 1 वर्षाची देण्‍यात आलेली आहे. वॉरंटीमध्‍ये काच बल्‍ब, प्‍लॉस्टिक या वस्‍तूंचा समावेश नाही. सामनेवाला यांचे कथन की, कंपनीची वॉरंटी/गॅरंटी नियमाप्रमाणे तक्रारदाराने वस्‍तू खरेदी केल्‍यानंतर त्‍यामध्‍ये दोष आढळून आल्‍यास सदर वस्‍तू ही कंपनीने नियुक्‍त केलेल्‍या सर्व्हिस सेंटरला दाखवायला पाहिजे, तक्रारदार यांनी दि.05.06.2012, 08.06.2012, 12.06.2012 असे तीन वेळेस सामनेवाला क्र.2 यांचे कायदेशिर (Authorized Center) जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग यांच्‍याकडे खाजगीत दाखवले, सदर सेंटर हे सामनेवाला क्र.2 यांचे कायदेशिर सेंटर नाही. तक्रारदाराने सदर फ्रिज हे खाजगी सेंटरला दाखविल्‍याने सदर बाब ही कंपनीच्‍या वॉरंटीच्‍या नियमात बसत नाही.

            तक्रारदार यांनी सामनेवाला यांना दि.18.06.2013 रोजी नोटीस पाठविल्‍यानंतर तक्रारदार यांच्‍या फ्रिजमध्‍ये बिघाड असल्‍याबाबत सामनेवाला  यांना माहिती झाली. तदनंतर सामनेवाला क्र.2 यांनी नियुक्‍त पुणे येथील सर्व्हिस सेंटरच्‍या वतीने तक्रारदाराच्‍या  घरी जाऊन फ्रिजची पाहणी केली तेव्‍हा सदरील फ्रिजमध्‍ये फ्रिजच्‍या कॉम्‍प्रेसरचे सील फोडलेले दिसून आले. तक्रारदाराकडे चौकशी केली असता सर्व्हिस प्रोव्‍हायडर जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग यांच्‍याकडे दाखविले व त्‍यांनी सदरील सील तोडले असे सांगितले. त्‍याबाबतची माहिती दि.20.06.2013 रोजी कंपनीला कळविलेले आहे, त्‍यावेळेस फ्रिजचे फोटो काढून घेतले होते. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 च्‍या वॉरंटी कार्डच्‍या अटीनुसार खाजगी व्‍यक्‍तीकडून फ्रिज दुरुस्‍त करुन घेतल्‍याने वॉरंटीच्‍या अटीचा भंग केल्‍याने सामनेवाला हे फ्रिजच्‍या वॉरंटीस जबाबदार राहीलेले नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी.

 

            तक्रारदार यांचे वकील श्री.कोल्‍हे यांचा युक्‍तीवाद ऐकला. सामनेवाला यांचे वकील श्री.सानप यांचा युक्‍तीवाद ऐकला. तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र यांचे अवलोकन केले. न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

           मुददे                                       उत्‍तर

 

1) सामनेवाला यांनी तक्रारदार यांना सेवा देण्‍यात

   त्रुटी ठेवली आहे, ही बाब तक्रारदार यांनी सिध्‍द

   केली काय ?                                         होय.                                                 2) तक्रारदार हे तक्रारीतील मागणी मिळण्‍यास

   पात्र आहे काय ?                                  अंशतः होय.

3) आदेश काय ?                                  अंतिम आदेशाप्रमाणे.

 

 

 

                        कारणमिंमासा

मुददा क्र.1 ते 3 ः-

            तक्रारदार यांनी दाखल केलेले कागदपत्र व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी नमुद केलेले वादातील फ्रीज हे सामनेवाला यांचेकडून विकत घेतला ही बाब मान्‍य आहे. तक्रारदार यांच्‍या वकीलांनी युक्‍तीवाद केला की, त्‍यांनी सामनेवाला यांच्‍याकडून खरेदी केलेला गोदरेज कंपनीचा फ्रीज हा खरेदी केल्‍यानंतर दोन तीन महिने व्‍यवस्थित सुरु होता पण नंतर त्‍यामध्‍ये ठेवलेल्‍या वस्‍तू हया खराब होतात असे कळल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला यांना कळविले असे सामनेवाला यांनी तुमच्‍याकडे वॉरंटी कार्ड आहे त्‍यानुसार तुम्‍ही सदर फ्रीज गोदरेज कंपनीच्‍या शोरुमला दाखवा तुम्‍हाला अडचण येणार नाही असे सांगितले. तक्रारदार यांनी फ्रीजपूणे येथील जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग यांच्‍याकडे दाखविला असता सदर फ्रीजचे कॉम्‍प्रेसर निकामी झाल्‍याचे कळविले. तक्रारदार यांनी दि.05.06.2012, 08.06.2012 व 12.06.2012 ला जयदिप शुभनंदा इंजिनिअरींगकडे दाखविला त्‍या बाबतच्‍या पावत्‍या मंचासमोर दाखल केल्‍या आहे. तक्रारदार यांनी फ्रीज दुरुस्‍तीकामी सामनेवाला यांच्‍याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला सामनेवाला यांनी सदर फ्रीज हे दुरुस्‍त करुन दिले नाही किंवा बदलून दिले नाही. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना नोटीस पाठविली, नोटीसचे उत्‍तर तक्रारदारास मान्‍य नाही.  सामनेवाला यांनी तक्रारदारास द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांना शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारदार यांनी नुकसान भरपाई रक्‍कम रु.65,000/- मिळावी अशी विनंती केली आहे.

 

            सामनेवाला यांच्‍या वकीलांनी युक्‍तीवाद केला की, सामनेवाला क्र.1 हे सामनेवाला क्र.2 यांनी उत्‍पादित केलेल्‍या वस्‍तूची विक्री करणारी एजन्‍सी आहे. तक्रारदार यांनी पाठविलेल्‍या नोटीस नंतर सामनेवाला यांना सदर फ्रीज खराब झाल्‍याबाबत कळाले तेव्‍हा सामनेवाला यांनी ताबडतोब तक्रारदार यांच्‍या फ्रीजची दुरुस्‍तीकामी  लोकल टेक्निशियनला पाठवले. त्‍याबाबतचे कागदपत्र मंचासमोर दाखल केले. सामनेवाला यांचे वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सदर फ्रीज हे लोकल टेक्निशियनला दाखविल्‍याप्रमाणे दुरुस्‍त केले. म्‍हणून आमची जबाबदारी नाही. सदर फ्रीज हे आमच्‍या कंपनीच्‍या  टेक्निशियनने पाहिले असता तेव्‍हा त्‍याला त्‍यामधील चुका कळाल्‍या व लोकल टेक्निशियनने त्‍यामधील कॉम्‍प्रेसरचे सील फोडून दुसरे बसविले आहे. तक्रारदार यांनी सदर फ्रीज हे अधिकृत सेवा केंद्राकडे न दाखविता त्‍यांनी लोकल टेक्निशियनला दाखविले असा बचाव सामनेवाला यांनी घेतला. सदर सेवा केंद्र हे सामनेवाला यांचे कायदेशिर सेंटर नाही. तसेच तक्रारदार यांनी खाजगी सेंटरमध्‍ये दाखविल्‍याप्रमाणे कंपनीच्‍या वॉरंटीमध्‍ये बसत नाही. सामनेवाला क्र.1 ते 3 हे जबाबदार नाही. तसेच सदरील जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग सेंटर यांच्‍या कंपनीचे नियुक्‍त सेंटर नाही. तक्रारदार यांनी खाजगी सेंटरकडून फ्रीज दुरुस्‍त करुन घेतल्‍याने वॉरंटीच्‍या अटीचा भंग केला आहे. सामनेवाला त्‍यास जबाबदार नाही. सबब तक्रारदार यांची तक्रार खर्चासह रदद करण्‍यात यावी.

 

            वर नमुद केलेला युक्‍तीवाद याचे अवलोकन केले. तसेच तक्रारदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले कागदपत्र याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदार यांचा फ्रीज हा खराब झाला ही बाब सिध्‍द होते. तक्रारदार यांनी दुरुस्‍तीकामी पाठविलेला फ्रीज हा ज्‍या सेंटरकडे दुरुस्‍त केला ते सेंटर सामनेवाला सामनेवाला यांचे अधिकृत सेवा केंद्र आहे किंवा नाही हे ठरविणे महत्‍वाचे आहे. तक्रारदार यांनी दाखल केलेल्‍या पावत्‍या दि. 05.06.2012, 08.06.2012 व 12.06.2012 चे अवलोकन केले तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेली पावती दि.18.06.2012 चे अवलोकन केले असता असे निदर्शनास आले की, सदर सेंटर हे गोदरेज स्‍मार्ट केअरचे आहे. तसेच पावतीवर गोदरेज कंपनीचे लोबो आहे. त्‍यामधील कॉल सेंटर नंबर, वेबसाईट इ-मेल आयडी, एसएमएस नंबर ही सर्व माहिती ही तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या व तसेच सामनेवाला यांनी दाखल पावती हयामधील सारखी आहे. त्‍यावरुन तक्रारदार यांनी दुरुस्‍तीकामी पाठविलेले जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग हे सामनेवाला यांचे अधिकृत सेवा केंद्र आहे ही बाब सिध्‍द होते. सामनेवाला यांनी घेतलेला बचाव हा स्विकार्य नाही. तसेच सामनेवाला यांनी जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग हे अधिकृत सेवा केंद्र नाही असे असतांना सामनेवाला यांनी सदर केंद्रावर कोणतीही कारवाई केली नाही की जेणेकरुन ही बाब सिध्‍द होऊ शकली असती. यावरुन मंचाचे असे मत आहे की, तक्रारदार यांनी सामनेवालाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन सुध्‍दा सदर फ्रीज हे दुरुसत करुन दिले नाही. तक्रारदार यांनी जयदिप शुभनंदा इंजिनिअरींग सेंटर येथे सदर फ्रीज दुरुस्‍तीकामी पाठविला होता ते सेंटर हे सामनेवाला यांचे अधिकृत सेंटर आहे. सबब तक्रारदार यांनी अधिकृत सेंटरकडे दाखविले असता तेव्‍हा तक्रारदारास एकूण रु.1850/- खर्च करावे लागले. सामनेवाला यांनी तक्रारदाराच्‍या फ्रीजमधील निकामी झालेला कॉम्‍प्रेसर बदलन दिला नाही. त्‍याकरीता तक्रारदार हयास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. सामनेवाला यांनी सदर फ्रीज हे वॉरंटीमध्‍ये  असल्‍यानंतर ही सदर फ्रीज दुरुस्‍त करुन दिले नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदारास सेवा देण्‍यात कसूर केला आहे. त्‍यामुळे तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागला. यावरुन मंचाचे असे मत आहे की, सामनेवाला यांनी तक्रारदारास वादातील फ्रीजचे गोदरेज कंपनीचे कॉम्‍प्रेसर  बदलून देणे व सुरु करुन देणे. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर होण्‍यास पात्र आहे. म्‍हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

 

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

            1)  तक्रारदाराची  तक्रार मंजूर  करण्‍यात येत आहे.          

            2)  सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी निकाल

                कळाल्‍यापासून 30 दिवसाच्‍या आत तक्रारदार यांना गोदरेज

                कंपनीच्‍या फ्रीज सोबत असलेल्‍या कंपनीचे नवीन कॉम्‍प्रेसर

                बसवून देणे व फ्रीज सुरु करुन देणे.

            3)  सामनेवाला यांना आदेश देण्‍यात येतो की, त्‍यांनी तक्रारदार

                यांना मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्‍कम रुपये 2,000/-

                (अक्षरी रु.दोन हजार ) व तक्रारीचा खर्च म्‍हणून रक्‍कम

                रु.1,000/- (अक्षरी रु.एक हजार) दयावे.

            4)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील

                कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला

                परत करावेत.     

 

 

 

                       श्रीमती मंजूषा चितलांगे,    श्री.विनायक लोंढे,

                              सदस्‍य               अध्‍यक्ष

                        जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड

 

 

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.