Maharashtra

Thane

MA/43/2012

एव्‍हरशाईन पिने - Complainant(s)

Versus

रवी डेव्‍हलपर्स - Opp.Party(s)

29 Sep 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Miscellaneous Application No. MA/43/2012
In
Complaint Case No. CC/248/2012
 
1. एव्‍हरशाईन पिने
Bldg No.1,2,3,4 CHSL, Through its Authorised Representatives Mr.Salim Khan & Other 3.everly Park, Opp.Gaurav City, Mira Rd(E), Thane-401107.
...........Appellant(s)
Versus
1. रवी डेव्‍हलपर्स
Laxmi Palace, 76, Mathuradas Road, Kandivli(w), Mumbai-400067.
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 
For the Appellant:
For the Respondent:
ORDER

Dated the 29 Sep 2015

      अंतरीम अर्जावर आदेश

           (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1. तक्रारदार ही गृहनिर्माण संस्‍था असून दि. 15/10/2009 रोजीपंजीकृत केली आहे. तक्रारदार सोसायटीच्‍या सदस्‍यांनी सामनेवाले यांचेकडून सदनिका विकत घेतल्‍या आहेत. तक्रारदार संस्‍था, सर्व सदस्‍यांनी मिळून प्रस्‍थापित केल्‍यानंतर करारामध्ये नमूद केल्‍याप्रमाणे सामनेवाले बिल्‍डर यांना भोगवटा प्रमाणपत्र व हस्‍तांतरणपत्र करुन देण्‍याची विनंती केली. सामनेवाले यांनी कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार तक्रारदार संस्‍थेने सामनेवाले यांचेविरुध्‍द मंचात दाखल केली आहे.

  2. सामनेवाले यांचे म्‍हणण्‍यानुसार भोगवटा प्रमाणपत्र मिळण्‍यासाठी कार्यवाही सुरु आहे. तसेच इमारतीचे बांधकामाचे काम व इतर आवश्‍यक प्रमाणपत्र मिळवल्‍यानंतरच हस्‍तांतरणपत्र मिळण्‍यासाठीची कार्यवाही करणे शक्‍य आहे.

  3. तक्रारदारांनी सदर तक्रारीचा अंतिमतः निकाल होईपर्यंत तक्रारदार संस्‍थेची इमारत क्र. 1,2,3 व 4 मिळकत हस्‍तांतरीत करुन इतर व्‍यक्‍तीचे हितसंबंध निर्माण करु नये, हस्‍तांतरीत करु नये यासाठी तक्रारदारांनी प्रस्‍तुतचा अर्ज दाखल केला आहे.

  4. तक्रारीतील कागदपत्रे व स्‍वरुप पाहता तक्रारदारांचा अर्ज मंजूर करणे न्‍यायोचित आहे असे न्‍यायमंचाचे मत आहे.

 

     सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

                          आ दे श

 

  1. सामनेवाले यांनी तक्रारदार संस्‍थेच्‍या इमारत क्र. 1,2,3 व 4 हस्‍तांतरीत करुन मिळकतीत इतर त्रयस्‍थ व्‍यक्‍तीचे हितसंबंध प्रस्‍तुत तक्रार पूर्णतः निकाली होईपर्यंत निर्माण करु नयेत.

  2. खर्चाबाबत आदेश नाही

  3. अंतरीम अर्ज निकाली करण्‍यात आल्‍यामुळे तो वादसुचीतुन काढून टाकण्‍यात यावा.

  4. या आदेशाच्‍या प्रती तक्रारदार व सामनेवाले यांना निःशुल्‍क देण्‍यात याव्‍यात/पाठविण्‍यात याव्‍यात.

 

 

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.