Maharashtra

Thane

CC/42/2013

श्री दिपक अशोक कपूर - Complainant(s)

Versus

यशवंत डेव्‍हलपर्स, - Opp.Party(s)

जे पी दुबे

09 Dec 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/42/2013
 
1. श्री दिपक अशोक कपूर
202,शारूख अपार्टमेंट, रूई श्री ग्रीन वूड, मजिद जवळ, हतकेश, मिरा भांईदर रोड, मिरा रोड,(ईस्‍ट)ठाणे, 401 107 मो नं 08082136996
ठाणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. यशवंत डेव्‍हलपर्स,
शरद रूई, 101/3, केडिया चेंबर, एस व्हि रोड, मलाड(वेस्‍ट) मुंबई 400064
मुंबई
महाराष्‍ट्र
2. द मुन्‍सीपल कमिशनर,
मिरा भांईदर मुन्सिपल कार्पोन,छत्रपती शिवाजी मार्ग, भांईदर (वेस्‍ट) ठाणे
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated the 09 Dec 2015

(द्वारा मा. सदस्‍या सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे)

तक्रारदार गैरहजर. सामनेवाले क्र. 1 चे प्रतिनिधी वकील श्रमिका साठे हजर. सामनेवाले क्र. 2 चे वकील धोंडे हजर.

सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 12/11/2014 रोजी लेखी कैफियत दाखल केली आहे. तक्रारदारांचे पुरावा  शपथपत्रासाठी प्रकरण ब-याच कालावधीपासून प्रलंबित आहे. तक्रारदारांचे वकीलांनी दि. 12/11/2014 रोजी सामनेवाले यांच्‍या लेखी कैफियतीची प्रत स्विकारली आहे. तक्रारदारांना दि. 11/02/2015 रोजी पुरावा  शपथपत्र दाखल करणेसाठी अंतिम संधी देणेत आली होती. तसेच दि. 08/07/2015 रोजी रु. 300/- कॉस्‍टसहीत पुरावा शपथपत्र दाखल करणेची मुदत देणेत आली होती. मागील दोन तारखेसही तक्रारदार गैरहजर होते व आजही गैरहजर आहेत. सामनेवाले क्र. 1 व 2  यांचे वकीलांनी निवेदन केले की तक्रारदार सातत्‍याने गैरहजर आहेत.

संचिकेची पाहणी केली असता असे दिसून येते की, तक्रारदार हा मंचापुढे नियमितपणे हजर राहत नाही. त्‍यांच्‍या गैरहजेरीमुळे प्रकरणात आवश्‍यक व योग्‍य ती प्रगती होऊ शकली नाही. तक्रारदार याला या प्रकरणांत तक्रार पुढे चालविण्‍यात स्‍वारस्‍य दिसून येत नाही व ते त्‍याबाबत जागृत/सजग व गंभीर आहे असे मंचास वाटत नाही.  ज्‍याअर्थी तक्रारदार यांना स्‍वारस्‍य नाही त्‍याअर्थी अंतिम आदेश पारीत केल्‍यास तो कागदोपत्री सोपस्‍कार ठरेल. सबब, ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्‍यात येते.

खर्चाबाबत आदेश नाही.

हाच अंतीम आदेश समजण्‍यात यावा.

या आदेशाच्‍या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्‍क टपालाने पाठविण्‍यात याव्‍यात.

 
 
 
 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.