निकालपत्र
(दि.07.08.2015)
(घोषीत द्वारा- मा.सौ. स्मिता बी.कुलकर्णी,अध्यक्ष)
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेविरुध्द सेवेत त्रुटीच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदार यांचे तक्रारीतील कथन थोडक्यात खालील प्रमाणेः-
2. अर्जदार ही गैरअर्जदार कंपनीची ग्राहक आहे. अर्जदाराचे मयत पती नामे पांडूरंग देवराव पाटील यांनी गैरअर्जदार यांचेकडून घरगुती वापराकरीता विद्युत पुरवठा घेतलेला आहे. अर्जदार यांचेकडे गैरअर्जदार यांची कोणतीही थकबाकी नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 08.07.2014 रोजी रक्कम रु.1,51,660/- घरगुती विद्युत बील पाठविले असता अर्जदार यांनी त्यास लेखी व तोंडी आक्षेप घेऊन बिल रद्य करण्याची विनंती केली असता गैरअर्जदार यांनी दिनांक 15.09.2014 रोजी अर्जदाराचे मिटरचे स्थळ परिक्षण करुन खालील प्रमाणे अहवाल दिलाः-
‘’मिटर रिप्लेस करण्यात आले. जुने मिटरवरील jumping reading टाकण्यात आली आहे. Meter replaced on 12.07.2014 due to jumped meter. Meter reader has taken jumped meter reading & billed abnormally. The present meter reading is 0288 hence review bill as per meter reading.”
दिनांक 15.09.2014 रोजी गैरअर्जदार यांनी अहवाल तयार केला. परंतु सदरील अहवालावर कोणतीही कारवाई केली नाही. अहवालापुर्वी दिनांक 10.09.2014 रोजी रक्कम रु.66,240/- चे विद्युत बील पाठविले व बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येईल असे धमकावल्यावर अर्जदारास नाईलाजाने दिनांक 20.09.2014 रोजी रक्कम रु.20,000/- भरणे भाग पडले. अर्जदाराचे घरातील वापर जास्त नाही. गैरअर्जदार यांनी दिनांक 08.07.2014 रोजी रक्कम रु.1,51,660/- तसेच दिनांक 10.09.2014 रोजी रक्कम रु.66,240/-चे बील पाठवून सेवेत कसूर केलेला आहे. सदरील बीले ही बेकायदेशीर असल्याने रद्यबातल करण्यात यावी यासाठी अर्जदार यांनी सदरील तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये गैरअर्जदार यांनी दिनांक 10.09.2014 रोजी घरगुती वापराबद्दल दिलेले विद्युत बील रक्कम रु.66,240/- चुकीचे व
बेकायदेशीर घोषीत करुन रद्द करण्यात यावे. तसेच अर्जदाराकडून दिनांक 20.09.2014 रोजी बिलापोटी भरुन घेतलेली रक्कम रु.20,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास परत करावे. तसेच मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रु. 25,000/- व दावा खर्च रु.5,000/- इत्यादी रक्कमेची मागणी गैरअर्जदार यांचेकडून तक्रारीव्दारे केलेली आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मंचाची नोटीस तामील झाल्यानंतर गैरअर्जदार हे दिनांक 15.11.2014 रोजी वकीलामार्फत हजर झाले. परंतु गैरअर्जदार यांनी आपला लेखी जबाब दाखल केलेला नाही. त्यामुळे गैरअर्जदार यांचेविरुध्द दिनांक 14.01.2015 रोजी ‘’नोसेचा’’ आदेश पारीत करण्यात आला. दिनांक 13.03.2015 रोजी गैरअर्जदार यांनी नोसेचा आदेश रद्य करण्यात यावा असा अर्ज देऊन शपथपत्र दाखल केले त्यासोबत आपला लेखी युक्तीवाद दाखल केला नाही. परंतु पारीत केलेला आदेश रद्य करण्याचा मंचास अधिकार नसल्यामुळे गैरअर्जदार यांचा नोसेचा आदेश रद्य करण्याचा अर्ज मंचाने नामंजूर केला. अर्जदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र व कागदपत्रे दाखल केलेली आहेत. अर्जदार यांचा युक्तीवाद ऐकला. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता खालील गोष्टी स्पष्ट होतात.
4. अर्जदार यांनी दाखल केलेल्या मिटर स्थळ परिक्षण अहवालाचे अवलोकन केले असता सदरील अहवालामध्ये ‘’मिटर रिप्लेस करण्यात आले. जुने मिटरवरील jumping reading टाकण्यात आली आहे. Meter replaced on 12.07.2014 due to jumped meter. Meter reader has taken jumped meter reading & billed abnormally. The present meter reading is 0288 hence review bill as per meter reading.” असे नमुद केलेले आहे. सदरील अहवालामध्ये दिलेल्या निष्कर्षावरुन अर्जदाराचे मिटर रिडींग हे jumped meter reading घेत असल्याचे दिसून येते. सदरील अहवालामध्ये दिनांक 15.09.2014 रोजी अर्जदाराचे मीटर रिडींग 288 असल्याचे दिसते. अर्जदाराचे मिटर दिनांक 12.07.2014 रोजी बदलण्यात आले आहे. यावरुन अर्जदारास दिनांक 12.07.2014 ते दिनांक 15.09.2014 म्हणजेच दोन महिन्याचा विद्युत वापर हा 288 युनीट असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 08.07.2014 रोजी रक्कम रु.1,51,660/- व दिनांक 10.09.2014 रोजी रक्कम रु.66,240/- चे दिलेले विद्युत बीले चुकीचे असल्याचे सिध्द होते. सदरील चुकीचे बिलापोटी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे दिनांक 20.09.2014 रोजी रक्कम रु.20,000/- भरलेले आहेत. गैरअर्जदार यांनी अर्जदारास चुकीची विद्युत बीले दिलेली होती. ही बाब मीटर स्थळ परिक्षण अहवालावरुन दिसते. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार केल्यानंतर अर्जदाराच्या मिटरचा स्थळ परिक्षण अहवालानंतरही गैरअर्जदार यांनी अर्जदाराची विद्युत बीले दुरुस्त करुन दिलेली नाहीत. तसेच मंचासमोर आपले म्हणणे दाखल केलेले नाही. यावरुन गैरअर्जदार यांना अर्जदाराचे तक्रारीतील कथन मान्य असल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिनांक 10.09.2014 रोजी रक्कम रु.66,240/- चे दिलेले देयक बेकायदेशीर व चुकीचे आहे असे मंचाचे मत आहे. वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आ दे श
1. अर्जदार यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास दिलेले दिनांक 10.09.2014 रोजीचे रक्कम रु.66,240/- चे देयक रद्द करण्यात येते.
3. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास अर्जदाराचे युनीट वापराप्रमाणे देयक द्यावे व अर्जदाराने भरलेली रक्कम रु.20,000/- त्यामध्ये समायोजित करण्यात यावी.
4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 2500/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1000/- आदेश तारखेपासून तीस दिवसाच्या आत द्यावे.
4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.
e-height:150%'>4. आदेशाची पूर्तता झाल्याबद्दलचा अहवाल दोन्ही पक्षांनी 45 दिवसानंतर मंचात दाखल करावा. प्रकरण 45 दिवसानंतर पुन्हा आदेशाच्या पूर्ततेच्या अहवालासाठी ठेवले जाईल.
5. दोन्ही पक्षकारास निकालाच्या प्रती मोफत पुरविण्यात याव्यात.