Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/412

श्री. अशोक वामनराव सहारे - Complainant(s)

Versus

मे. स्‍पॅनको नागपूर डिस्‍कॅम लि. मार्फत उपाध्‍यक्ष - Opp.Party(s)

सचिन एस. जोशी

27 Jun 2016

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/412
 
1. श्री. अशोक वामनराव सहारे
वय 53 वर्षे व्‍यवसाय नोकरी रा. महाकाली नगर, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट़
...........Complainant(s)
Versus
1. मे. स्‍पॅनको नागपूर डिस्‍कॅम लि. मार्फत उपाध्‍यक्ष
5 वा माळा, नारंग टावर पाल्‍म रोड, सिव्‍हील लार्अन, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
2. ग्राहक तक्रार निवारण कक्ष मे. स्‍पॅनको नागपूर उिस्‍कॅम लि.
5 वा माळा नारंग टावर, पाल्‍म रोड, सिव्‍हील लाईन, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट़
3. सहायक व्‍यवस्‍थापक (दक्षता पथक ) मे. स्‍पॅनको नागपूर डिस्‍कॅाम मर्या.
एम. एस. ए. डी. सी. अमारत स्‍पॅनको ऑफीस जुनी शुक्रवारी नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
4. कार्यकारी अभियंता कहहाराष्‍ट्र राज्‍य विदयूत वितरण कंपनी मर्या.
विदयुत भवण काटोल रोड, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
5. अशिक्षक अभियंता (नोडल) नागपूर शहर महाराष्‍ट्र राज्‍य विदयूत वितरण कं. मर्या.
गउउी गोदाम कार्यालय प्रकाश भवन नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                             -निकालपत्र

           (पारित व्‍दारा- श्री नितीन माणिकराव घरडे,मा.सदस्‍य)

                  ( पारित दिनांक-27 जुन, 2016)

 

01.     तक्रारकर्त्‍याने विज बिला संबधाने विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते क्रं-5) विरुध्‍द ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली प्रस्‍तुत तक्रार  दाखल केली आहे.

02.    तक्रारीचे स्‍वरुप थोडक्‍यात खालील प्रमाणे-      

       तक्रारकर्ता हा मागील 11 वर्षा पासून विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचा ग्राहक असून त्‍याचा ग्राहक क्रं-410015646458 असा असून,  मीटर                    क्रं-9000084027 असा आहे. दिनांक-26/02/22013 रोजी अंदाजे 12.15 वाजताचे सुमारास पाच पुरुष व एक स्‍त्री यांनी आपण स्‍पॅनकोचे कर्मचारी असल्‍याचे सांगून मीटर तपासणी करावयाची असल्‍याचे सांगितले. त्‍यावर तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीने त्‍यांना उभे राहण्‍यास स्‍टुल आणून दिला. एक कर्मचारी स्‍टुलावर उभे राहून मीटरला यंत्र जोडून त्‍यामधील नोंदी घेत होता तर महिला कर्मचारी त्‍या नोंदी त्‍यांचे जवळील दस्‍तऐवजामध्‍ये लिहून घेत होती. त्‍यानंतर त्‍या कर्मचा-यांनी मीटर वेगळे काढून तपासून पाहिले व काही दोष नाही, मीटर सुस्थितीत आहे, सिल बरोबर आहे असे तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीस सांगून मीटर त्‍याच ठिकाणी पुन्‍हा स्‍थापित केले. मीटर तपासल्‍या नंतर बाहेरील एक अधिकारी आत मध्‍ये आले व त्‍यांनी घरातील सर्व विद्दुत उपकरणे सुरु करावयास लावली व मीटरची तपासणी केली व त्‍यानंतर पुन्‍हा सर्व विद्दुत उपकरणे तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीस बंद करावयास लावली. सर्व विद्दुत उपकरणे बंद केल्‍याने मीटर विजेचा वापर कमी दर्शवू लागला तेंव्‍हा त्‍या अधिका-याने तुमचे मीटर हे 39 टक्‍के हळू फीरत आहे असे सांगितले व दुस-या अधिका-यास फोन केला. त्‍या अधिका-याने आल्‍या नंतर कर्मचा-यांना तुम्‍ही मीटर तपासणीपूर्वी छायाचित्र का घेतले नाही असे विचारले असता, तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीस मीटर मध्‍ये छेडछाड केली असावी असा संशय आल्‍याने तिने कारवाई पोलीस व पंचासमक्ष करावी अशी विनंती केली असता त्‍या अधिका-याने आम्‍हीच पोलीस व पंच आहोत असे सांगत सुरुवातीला असलेले शाबुत सिल तुटलेले दाखविले व तुम्‍हीच ते तोडले असा आरोप केला. सुरुवातीस दोन वेळा मीटर काढले त्‍यावेळी सिल शाबुत होते परंतु चालू असलेली उपकरणे बंद करते वेळी मीटर काढून सिल तुटले आहे असे सांगून सिलचे फोटो घेण्‍यात आले. यावरुन मीटर काढते वेळी कर्मचा-याचेच हाताने सिल तुटले होते ही बाब स्‍पष्‍ट आहे. त्‍यानंतर ते कर्मचारी तेच सिल तुटलेले मीटर लावून निघुन गेले. त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याचे पत्‍नीने कारवाईचा अहवाल मागितला असता पावती तुमच्‍या मीटरला लावली आहे असे सांगून ते निघुन गेले.  त्‍याच दिवशी अंदाजे 4.30 वाजताचे सुमारास तक्रारकर्त्‍याच्‍या घरी 14 ते 15 लोकांनी घेराव टाकला व काहीही बोलू न देता तुम्‍ही मीटर सोबत छेडछाड केली असून विज चोरीचा गुन्‍हा दाखल करुन जेल मध्‍ये टाकू अशी धमकी देत को-या स्‍पॉट इन्‍स्‍पेक्‍शन फॉर्मवर जबरदस्‍तीने सही घेतली व 5.30 ते 6.00 वाजे पर्यंत जुनी शुक्रवारी कार्यालयात येण्‍यास सांगून, मीटर घेऊन निघुन गेले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ता विरुध्‍दपक्षाचे कार्यालयात गेला असता त्‍यास रात्री 10.00 वाजे पर्यंत तेथेच बसविण्‍यात आले व विज चोरीचे रुपये-1,43,350/- आणि कम्‍पाऊंडींग चॉर्जेसचे रुपये-20,000/- अशी बिले दिलीत व आधी बिले भरा न भरल्‍यास विज चोरीचे आरोपा खाली अटक करण्‍याची धमकी दिली. विज मीटर काढून नेल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास व त्‍याचे कुटूंबियास अंधारात रात्रभर राहावे लगले व दुसरे दिवशी नातेवाईक आणि मित्रां कडून पैसे जमा करुन बिलापोटीची सर्व रक्‍कम भरली. त्‍यानंतर विरुध्‍दपक्षाने जी-1031337 क्रमांकाचे दुसरे मीटर लावून विजेचा पुर्ववत पुरवठा सुरु करुन दिला. तक्रारकर्त्‍याने सदरील बाबीची तक्रार दिनांक-02/03/2013 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं-5) यांचेकडे केली व तक्रारीची प्रत विरुध्‍दपक्ष क्रं-2 व क्रं-4 तसेच पोलीस आयुक्‍त नागपूर यांना सुध्‍दा पाठविली. सदरचे तक्रारी वरुन विरुध्‍दपक्ष क्रं-5) यांनी, विरुध्‍दपक्ष क्रं-1) यांना नियमा प्रमाणे कारवाई करुन अहवाल पाठविण्‍यास कळविले परंतु आज पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही.

    पोलीस स्‍टेशन, म.रा.विज वितरण कंपनी मर्यादित नागपूर यांचे कडून              दिनांक-07/03/2013 रोजीची नोटीस तक्रारकर्त्‍यास प्राप्‍त झाली. सदर नोटीस मध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं-3) ने विज कायदा कलम-135 व 138 खाली तक्रार दाखल केली असून त्‍यानुसार पोलीसांनी तक्रारकर्त्‍या विरुध्‍द अपराध क्रं-3262/13 दाखल केल्‍याचे नमुद केले. वस्‍तुतः विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍या कडून कंपाऊडींग चॉर्जेस वसुल केल्‍याचे पोलीसांना कळविले नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं-3) कडे ज्‍या दस्‍तऐवजांचे आधारे त्‍याचेवर विज चोरीचा गुन्‍हा दाखल करण्‍यात आला त्‍या कागदपत्रांची मागणी दिनांक-09/03/2013 रोजीचे पत्राव्‍दारे केली परंतु त्‍याची पुर्तता देखील अद्दाप पर्यंत करण्‍यात आलेली नाही. जुने मीटर वरील वाचन आणि नविन मीटर वरील वाचन मध्‍ये फारसा फरक नाही. विरुध्‍दपक्षाचेच कर्मचा-यांनी निष्‍काळजीपणे मीटर हाताळून मीटरचे सिल तोडले व खोटा विज चोरीचा आरोप तक्रारकर्त्‍यावर लावून बेकायदेशीररित्‍या मोठी रक्‍कम वसुल केली.  तक्रारकर्त्‍याने दिनांक-26/04/2013 ला विरुध्‍दपक्षांना कायदेशीर नोटीस पाठविली असता विरुध्‍दपक्ष क्रं4 ची नोटीस दिलेल्‍या पत्‍त्‍यावर नाही या पोस्‍टाचे शे-यासह परत आली.

    म्‍हणून शेवटी तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन तीव्‍दारे विरुध्‍दपक्ष व त्‍यांचे कर्मचा-यांनी दिनांक-26/02/2013 रोजी केलेली कारवाई व दिनांक-27/02/2013 रोजी केलेली वसुली मनमान, एकतर्फी व बेकायदेशीर असल्‍याचे घोषीत करावे. तक्रारकर्त्‍या कडून बेकायदेशीर वसुल केलेली विज चोरी संबधाने बिलाची रक्‍कम रुपये-1,43,350/- तसेच कम्‍पाऊंडींग चॉर्जेसची रक्‍कम रुपये-20,000/- असे मिळून एकूण रुपये-1,63,350/- तसेच आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासा बद्दल रुपये-25,000/- व तक्रारखर्च/नोटीस फी म्‍हणून रुपये-10,000/- अशा रकमा वार्षिक 24 टक्‍के व्‍याजासह विरुध्‍दपक्षाने देण्‍याचे आदेशित व्‍हावे अशी मागणी केली.

 

 

           

03.    विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (5) यांना  मंचाची नोटीस पाठविण्‍यात आली. पैकी विरुध्‍दपक्ष क्रं-(1) ते (3) स्‍पॅन्‍को तर्फे एकत्रित लेखी उत्‍तर  नि.क्रं-8 प्रमाणे सादर केले. त्‍यांनी प्राथमिक आक्षेप घेतला की, दिनांक-26/02/2013 रोजी तक्रारकर्त्‍या कडील मीटर तपासणी संबधाने मीटर तपासणी अहवाल आणि घटनास्‍थळ पंचनामा तयार करण्‍यात आला. मीटर तपासणीचे वेळी “Accu-check Meter” ने तपासणी केली असता ते मीटर 72.02% हळू फीरत असल्‍याचे आढळून आले तसेच मीटरचे बॉडी सिलामध्‍ये छेडछाड केली असल्‍याचे आढळून आले. त्‍यामुळे मीटर हे तक्रारकर्त्‍याचे कुटूंबासमक्ष उघडण्‍यात आले असता एडीशनल पी.व्‍ही.सी. फ्लेक्‍सीबल काळया रंगाची तांब्‍याची तार ही मीटरचे आत मधील टर्मीनल फेज आणि मुख्‍य प्रवाहाचे मध्‍ये लावलेली दिसून आली. (Said Meter opened and it was found that the Additional PVC flexible black colour  copper wire was found connected inside the meter on terminal phase and through that by passing actual current) आणि त्‍यामुळे सदरील मीटर हे हळू चालत होते व ते फक्‍त 27.98% एवढाच वापर नोंद करीत होते. थोडक्‍याते ते मीटर हे 72.02% हळू चालत होते. यावरुन मीटर मध्‍ये छेडछाड झाली असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. छेडछाड मीटरची छायाचित्रे सुध्‍दा घेण्‍यात आली तसेच व्‍हीडीओ शुटींगपण घेण्‍यात आले.  तक्रारकर्त्‍या कडे विजेचा भार हा 5.093 के.डब्‍लु. आढळून आला. त्‍यावरुन तक्रारकर्त्‍यावर विद्दुत कायदा-2003 चे कलम-135 व 138 प्रमाणे बिला पोटी एकूण रुपये-1,42,649.50 पैसे आणि मीटरची किंमत रुपये-700/- असे मिळून एकूण रुपये-1,43,350/- रकमेची आकारणी करण्‍यात आली आणि कम्‍पाऊंडींग चॉर्जेस म्‍हणून रुपये-20,000/- आकारण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने सदर विज चोरीचा गुन्‍हा कबुल करुन रक्‍कम भरण्‍याची तयारी दर्शविली. ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे तरतुदी खाली विज चोरीची प्रकरणे ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नाहीत. तक्रारकर्त्‍याची तक्रार ही खोटी असून तक्रारकर्त्‍याने बिलापोटी भरलेल्‍या रकमेची मागणी करणे बेकायदेशीर असल्‍याचे नमुद करुन तक्रारकर्त्‍याची तक्रार खारीज व्‍हावी, अशी विनंती केली.

 

 

04.  विरुध्‍दपक्ष क्रं-4) ते क्रं-5) यांनी नि.क्रं 7 प्रमाणे पुरसिस सादर करुन विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांचेशी ते संलग्‍न असून त्‍यांनी दाखल केलेले उत्‍तर हेच त्‍यांचे उत्‍तर समजण्‍यात यावे व तेच उत्‍तर त्‍यांना मान्‍य असल्‍याचे नमुद केले.

 

 

05.   तक्रारकर्त्‍याने नि.क्रं 3 वरील यादी प्रमाणे अक्रं-1) ते 19) प्रमाणे दस्‍तऐवजाच्‍या प्रती सादर केल्‍यात.

 

 

06.     विरुध्‍दपक्ष क्रं-1) ते 3) यांनी नि.क्रं 9 प्रमाणे अ.क्रं-1) ते 7) दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात, ज्‍यामध्‍ये घटनास्‍थळ पंचनामा, घटनास्‍थळ अहवाल व इतर दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.

 

 

 

 

 

 

 

 

07.   उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. तसेच त्‍यांनी दाखल केलेल्‍या दस्‍तऐवजांचे अवलोकन करण्‍यात आले. त्‍यावरुन मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष   ::   

 

08.   सदर प्रकरणात तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून घरगुती विजेचे घेतलेले कनेक्‍शन, ग्राहक क्रमांक, मीटर क्रमांक या बाबीं बद्दल उभय पक्षांमध्‍ये विवाद नाही.

 

 

09.   दिनांक-26/02/2013 रोजी तक्रारकर्त्‍या कडील मीटर तपासणी संबधाने मीटर तपासणी अहवाल आणि घटनास्‍थळ पंचनामा विरुध्‍दपक्षाने अभिलेखावर दाखल केलेला आहे, त्‍यामध्‍ये मीटर तपासणीचे वेळी “Accu-check Meter” ने तपासणी केली असता ते मीटर 72.02% हळू फीरत असल्‍याचे नमुद असून तसेच मीटरचे बॉडी सिलामध्‍ये छेडछाड केली असल्‍याचे दिसून आल्‍याने ते मीटर हे तक्रारकर्त्‍याचे कुटूंबासमक्ष उघडण्‍यात आले असता एडीशनल पी.व्‍ही.सी. फ्लेक्‍सीबल काळया रंगाची तांब्‍याची तार ही मीटरचे आत मधील टर्मीनल फेज आणि मुख्‍य प्रवाहाचे मध्‍ये लावलेली दिसून आली. (Said Meter opened and it was found that the Additional PVC flexible black colour copper wire was found connected inside the meter on terminal phase and through that by passing actual current) आणि त्‍यामुळे सदर मीटर हे 72.02% हळू चालत होते असे नमुद आहे. सदर तपासणी अहवालावर तसेच घटनास्‍थळ पंचनाम्‍यावर तक्रारकर्त्‍या तर्फे त्‍याचे घरच्‍यांची  सही करण्‍यात आल्‍याचे दिसून येते. मीटर जप्‍तीचा पंचनामा सुध्‍दा अभिलेखावर दाखल आहे. त्‍यावरुन विरुध्‍दपक्षाने विज चोरी संबधाने एकूण रुपये-1,43,350/- चे बिलाची आकारणी केली, जी तक्रारकतर्याने दिनांक-27/02/2013 रोजी भरल्‍याचे दिसून येते.

 

 

10.     तक्रारकर्त्‍याचे असे म्‍हणणे आहे की, मीटर तपासणीचे वेळी ते दोन-तीनदा काढण्‍यात आल्‍याने विरुध्‍दपक्षाचेच कर्मचा-यांनी मीटरचे सिल तोडले परंतु घटनास्‍थळ पंचनाम्‍यात मीटरचे आतमध्‍ये फ्लेक्‍सीबल काळया रंगाची तांब्‍याची तार बसविण्‍यात आल्‍याचे नमुद आहे.

 

 

11.     विज चोरीचे प्रकरणात व्‍यापक प्रमाणावर साक्षी पुराव्‍यांची आवश्‍यकता असते. विरुध्‍दपक्ष क्रं-4) व क्रं-5) तर्फे लेखी युक्‍तीवादात, मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने  “U.P. Power Corporation Ltd.-V/s- Anis Ahmed & others”  दिलेल्‍या प्रकरणावर आपली भिस्‍त ठेवली. या प्रकरणात मा. सर्वोच्‍च न्‍यायालयाने  विज चोरीची प्रकरणे ही ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्‍याचा निर्वाळा दिलेला आहे. मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने सदर निकालात दिलेले मत पाहता प्रस्‍तुत विज चोरीचे प्रकरण हे  ग्राहक मंचा समक्ष चालू शकत नसल्‍याचे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. त्‍यामुळे आम्‍ही, उभय पक्षांनी एकमेकांवर केलेल्‍या आरोप-प्रत्‍यारोपां मध्‍ये न जाता तसेच प्रकरणातील कोणत्‍याही विवादीत मुद्दांना स्‍पर्श न करता प्रस्‍तुत तक्रार ग्राहक मंचा समक्ष चालविण्‍यास योग्‍य नाही या निर्णयाप्रत आलेलो आहोत आणि त्‍यामुळे तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.

 

                            ::आदेश  ::

 

(1)    तक्रारकर्त्‍याची  विरुध्‍दपक्षा विरुध्‍दची तक्रार, विज चोरीचे प्रकरणात ग्राहक मंचास अधिकार क्षेत्र येत नसल्‍याचे कारणावरुन खारीज करण्‍यात येते. तक्रारकर्त्‍यास वाटल्‍यास तो योग्‍य त्‍या सक्षम न्‍यायालयात जाऊन तेथे दाद मागू शकतो.

(2)     खर्चा बद्दल कोणतेही आदेश नाहीत.

(3)    प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन

       देण्‍यात याव्‍यात.      

                                  

 

 

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. Nitin Manikrao Gharde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.