Maharashtra

Additional DCF, Thane

CC/12/237

श्री. ज्ञानदेव आत्‍मारांमजी खराड - Complainant(s)

Versus

मे. सुरज ऐंटरप्रायजेस - Opp.Party(s)

Poonam Makhijani

21 Dec 2013

ORDER

ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच,
कोंकण भवन, नवी मुंबई.
 
Complaint Case No. CC/12/237
 
1. श्री. ज्ञानदेव आत्‍मारांमजी खराड
R/at.E-4/4G.P.P.S MSEB Colony Bokad Veera, Uran Dist. Raigad, Navi Mumbai 400706
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. मे. सुरज ऐंटरप्रायजेस
A Proprietory concern, Through its Proprietor Mr. Shrishkumar Rangrao Chavhan, having office at C-324, Vashi Plaza, Sector 17, Vashi, Navi Mumbai 400 705.
Thane
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S.Patil MEMBER
 
PRESENT:
तक्रारदाराचे वकील हजर.
......for the Complainant
 
वि.प गैरहजर.
......for the Opp. Party
ORDER

ठाणे जिल्‍हा अतिरिक्‍त ग्राहक तक्रार निवारण मंच,

कोंकण भवन, नवी मुंबई. 

 

                                 ग्राहक तक्रार क्रमांकः-  237/2012

                          आदेश दिनांक :-   21/12/2013

  

श्री.ज्ञानदेव आत्‍मारामजी खराड

E-4/4 जी.पी.पी.एस, एम,ई.सी.बी कॉलनी,

बोकाड वीरा, उरण, जिल्‍हा रायगड.                             .... तक्रारदार

 

             विरुध्‍द

           

1. मे. सूरज एंटरप्रायझेस, प्रोप्रायटरी कन्‍सर्न

(तर्फे श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण,

प्रोप्रायटर,मे. सूरज एंटरप्रायझेस,           

ऑफिस – सी / 324, वाशी प्‍लाझा,

सेक्‍टर 17, वाशी, नवी मुंबई – ४००७०५.)                        ....  सामनेवाले

   

            समक्ष :-  मा. अध्‍यक्षा, स्‍नेहा एस. म्‍हात्रे 

     मा. सदस्‍य, एस.एस. पाटील  

            

उपस्थिती :- तक्रारदार स्‍वतः व त्‍यांचे वकील अॅड. पूनम माखिजानी हजर

            विरुध्‍दपक्ष क्र. 1 एकतर्फा चौकशी

 

                       आदेश

     (दि. 21/12/2013)

                द्वारा मा. सौ. स्‍नेहा एस. म्‍हात्रे, अध्‍यक्षा

 

 1.          तक्रादारांनी सामनेवाले यांचेविरुध्‍द तक्रार क्र. CC/237/12 ही मंचात दाखल केली आहे. सदर तक्रारीच्‍या सुनावणीप्रित्‍यर्थ्‍य जबाब दाखल करण्‍यासाठी मंचाने दि.16/11/2012 रोजीच्‍या सुनावणीस सामनेवाले यांनी हजर रहाण्‍याबाबत नोटीस पाठविली होती.  ती नोटिस  “Left”  या शे-याने मंचात परत आली.  त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या वकीलांनी दि.08/01/2012 रोजी विरुध्‍दपक्षाला नोटीसीची बजावणी योग्‍य प्रकारे होणेसाठी वृत्‍तपत्रामध्‍ये नोटीस प्रसिध्‍द करण्‍यास परवानगी मिळण्‍याबाबत मंचामध्‍ये अर्ज दिला.  व सदर अर्ज मंजूर करण्‍यात आला.  त्‍या अर्जान्‍वये दि.19/05/2013 रोजी ‘कोकण सकाळ’ व ‘बहुजन रत्‍न लोकनायक’ या दोन वृत्‍तपत्रांमध्‍ये दि.20/06/2013 रोजीच्‍या सुनावणीस विरुध्‍दपक्षाने हजर र‍हाण्‍याबाबत नोटीस प्रसिध्‍द केली व त्‍याचा अहवाल दि.20/06/2013 रोजीच्‍या सुनावणी दरम्‍यान मंचात दाखल केला. सुनावणीची नोटिस प्रसिध्‍द करुनही दि.20/06/2013 रोजीच्‍या सुनावणीस विरुध्‍दपक्ष गैरहजर होते तसेच त्‍यांनी त्‍यांचा जबाबही दाखल केला नाही, म्‍हणून तक्रारदाराच्‍या वकीलांनी विरुध्‍द पक्षा विरुध्‍द एकतर्फा आदेश पारित करण्‍याचा अर्ज दिला व दि.20/06/2013 रोजी सामनेवाले यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश पारीत करुन प्रकरण एकतर्फा सुनावणीसाठी ठेवण्‍यात आले. त्‍यानंतर दि.10/10/2013 रोजी तक्रारदारांनी पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद दाखल केला. तक्रारदारांचा तोंडी युक्‍तीवाद ऐकून सदर तक्रार अंतिम आदेशासाठी  दि.21/12/2013  रोजी ठेवून त्‍यात अंतिम आदेश पारीत करण्‍यात आला.

             

2.          सदर प्रकरणात    तक्रारदारांची  तक्रार  खालीलप्रमाणे  आहे

           तक्रारदार हे उरण, जिल्‍हा - रायगड येथील रहिवासी असून, सामनेवाले मे.सूरज एंटरप्रायझेस ही एक प्रोप्रायटरी कन्‍सर्न असून श्री. शिरिषकुमार रंगराव चव्‍हाण हे सदर संस्‍थेचे प्रोप्रायटर (मालक) आहेत व त्‍यांचा बांधकामाचा व्‍यवसाय असून तो ते सूरज एंटरप्रायझेस या नांवाने चालवतात.

 

3.         तक्रारदार हे मध्‍यमवर्गीय कुटुंबातील असून ते वाजवी दरात उपलब्‍ध होणा-या गृहसंकुलाबाबतच्‍या चांगल्‍या Project च्‍या शोधात होते.  सामनेवाले यांनी प्‍लॉट नं. 26, सेक्‍टर 05, कामोठे, नवी मुंबई येथे सूरज कुंज ही इमारत बांधण्‍याचे ठरविले व सामनेवाले यांनी सदर इमारतीचे काम जानेवारी 2011 पूर्वी किंवा जानेवारी 2011 पर्यंत पूर्ण करुन तक्रारदारांना त्‍यांच्‍या सदनिकेचा ताबा देण्‍याचे कबूल केले होते.  सामनेवाले यांच्‍या बोलण्‍यावर विश्‍वास ठेवून तक्रारदारांनी खालीलप्रमाणे सदनिका बुक केली.

अ.क्र.

तक्रार क्रमांक

तक्रारदारांचे नांव

सदनिका क्रमांक व इमारतीचे नांव

रक्‍कम रु. (Total Consideration)

तक्रारदारांनी दिलेली रक्‍कम रु.

एरिया चौ.फूट

1.

237/12

श्री. ज्ञानदेव आत्‍माराम खराड

304 सूरज कुंज - 1.

(अलॉमेंट लेटरप्रमाणे)

व पर्यायी सदनिका 603 सुरज हेरीटेज तेवढयाच मोबदल्‍याचे किमतीस देण्‍याचे ठरले. 

11,40,000/-

6,61,000/- (paid to opposite party)

 

307.05 चौ.फु.

                                                               

4.          तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे धनादेशाने / रोख रकमेद्वारे वर नमूद केल्‍याप्रमाणे सदनिका क्र. 304 सुरज कुंजच्‍या खरेदीसाठी रक्‍कम जमा केली. त्‍याप्रमाणे सदर तक्रारीत सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिलेल्‍या पावत्‍यांची नि. "C” Colly वर अभिलेखात उपलब्‍ध आहे. 

 

5.        तक्रारदार पुढे म्‍हणतात की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर रक्‍कम भरल्‍यानंतर सामनेवाले यांनी दि.18/05/2010 रोजी सदर सदनिकेबाबत अलॉटमेंट लेटरही तक्रारदारांना दिले परंतु आजतागायत सदर सदनिकेच्‍या विक्रीचा करारनामा करुन तो रितसर स्‍वक्षरीत करुन नोंदणीकृत करण्‍याबाबत तक्रारदारांना कोणतेही सहकार्य केले नाही.  तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर सदनिकेच्‍या खरेदीपोटी एकूण रक्‍कम रु. 6,61,000/- देऊनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.304 सुरज कुंज -1 हिचा करारनामा रितसर नोंदणीकृत करुन दिला नाही. व त्‍यावर मुद्रांक शुल्‍क भरण्‍यासाठी तक्रारदारांकडुन सामनेवाला यांनी रु. 1,60,000/- एवढया मोठया प्रमाणात रक्‍कम‍ही घेतली व सदर सदनिकेचा ताबा तक्रारदारांना देण्‍याऐवजी ती सदनिका श्री.नितीन विनायक पवार यांना परस्‍पर विकल्‍याचे तक्रारदारांना बाहेरुन चौकशी केली असता समजले व याबाबत सामनेवाले याचेकडे तक्रारदारांनी विचारणा केली असता,  सदर सदनिकेला पर्याय म्‍हणुन तेवढयाच क्षेत्रफळाची सुरज हेरीटेज या इमारतीमधील सदनिका क्र.603, 6 वा माळा, सुरज हेरीटेज प्‍लॉट नं. 59, सेक्‍टर 20, कामोठे, नवी मुंबई. ही सदनिका पुर्वीच्‍या सदनिकेच्‍या एकुण मोबदल्‍याचे किंमतीत तक्रारदारांना देण्‍याचे सामनेवाले यांनी कबुल केले व सदनिका क्र. 304 साठी भरलेली एकुण रक्कम आपण सदनिका 603, सुरज हेरीटेज या सदनिकेच्‍या व्‍यावहारामध्‍ये वळती करु असे तक्रारदारांना सांगितले. व सामनवाला यांनी दि. 19/04/2012 रोजी सदर पर्यायी सदनिका क्र.603, सुरज हेरीटेज यावर तक्रारदारांच्‍या नावे रु.1,27,860/- मुद्रांक शुल्‍क व दि.30/04/2012 रोजी रु.25,230/- इत‍के नोंदणी शुल्‍क भरले सदर मुद्रांक शुल्‍क व नोंदणी शुल्‍काची पावती नि. सी-4 वर अभिलेखात उपलब्‍ध आहे. एवढी मोठी रक्‍कम मुद्रांक शुल्‍क व नोंदणी शुल्‍‍कापोटी भरुनही सामनेवाले यांनी सदर पर्यायी सदनिका 603 सुरज हेरीटेज हीचा रितसर करारनामा स्‍वाक्षरीत केला नाही. तसेच अद्याप सदर इमारतीचे बांधकाम पुर्ण केलेले नाही व तक्रारदारांकडुन एवढया मोठया प्रमाणात रक्‍कम घेऊनही व जानेवारी 2011 पर्यंत सदर सदनिकेचा ताबा देतो असे आश्‍वासन देऊनही सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा अद्याप दिलेला नाही. अशा प्रकारे सामनेवाले हे तक्रारदारांचा सद‍र सदनिकेवरील (सदनिका क्र. 603  सुरज हेरीटेज) कायदेशिर हक्‍क मान्‍य करण्‍यास व व्‍यवहार पुर्ण करुन त्‍याचा ताबा देण्‍यास हेतुपुरसर टाळाटाळ करीत आहेत ही त्‍यांनी तक्रारदारांना दिलेली दोषपुर्ण सेवा असुन ते अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करीत आहेत असे दिसुन येते. त्‍यामुळे तक्रारदारांना खुप मोठे आर्थिक नुकसान, मानसिक त्रास इत्‍यादी सहन करावा लागत आहे.

 

6.         सामनेवाले यांचे कार्यालय वाशी येथे असून या मंचाच्‍या भौगोलिक व आर्थिक कार्यक्षेत्रात असल्‍याने या मंचाला सदर तक्रारीचे निराकरण करण्‍याचा पूर्ण अधिकार आहे.

 

7.         अद्यापही सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर पर्यायी सदनिका क्र. 603 सुरज हेरीटेजचा ताबा दिलेला नसल्‍यामुळे तक्रार दाखल करण्‍याचे कारण (Cause of action is continuous) हे अद्यापही अस्तित्‍वात / कायम आहे व त्‍यामुळे सदर तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 24 – ए नुसार नमूद केलेल्‍या कालावधीतच दाखल झालेली आहे.  त्‍यामुळे सदर तक्रार ही कालबाह्य नाही.  सदर प्रकरणात तक्रारदारांच्‍या लाभात दि. 05/10/2012 रोजी अंतरिम आदेश पारीत करण्‍यात आला असून या अंतरिम आदेशान्‍वये सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या सदर सदनिका क्र. 603, सुरज हेरीटेज वर इतर त्रयस्‍थ व्‍यक्‍तीचा हक्‍क, कायदेशीर अधिकार इत्‍यादी प्रस्‍थापित करु नयेत असे सामनेवाले यांना निर्देश देण्‍यात आलेले आहेत.

 

8.           तक्रारदारांनी त्‍यांच्‍या  तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे सदर सदनिका 603, सुरज हेरीटेज हिचा ताबा मिळावा, करारनामा करुन मिळावा तसेच सदर इमारतीतील  सदनिकाधारकांची गृहनिर्माण संस्‍था स्‍थापन करुन त्‍याचा अभिलेख सदर संस्‍थेच्‍या लाभात सामनेवाला यांनी नोंदवुन द्यावा इ. मागण्‍या केल्‍या होत्‍या, परंतु सदर प्रकरणाच्‍या तोंडी युक्तिीवादा दरम्यान तक्रारदाराच्‍या वकीलांनी सदर वादग्रस्‍त सदनिका ज्‍या इमारतीत आहे ती इमारत अद्याप बांधुन तयार झालेली नाही त्‍यामुळे त्‍यांनी तक्रारीत प्रार्थना कलम 19 (a to h) यांना पर्यांय म्‍हणुन तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे सदर सदनिकेच्‍या खरेदीसाठी भरलेली एकुण रक्‍कम रु. 6,61,000/- सामनेवाले यांनी तक्रारदारांना 21 % व्‍याजाने परत करावी अशी पुर्सिस मंचात दाखल केली. तसेच तक्रारदाराने तक्रारीत मानसिक त्रासापोटी रु. 2,00,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.50,000/- ची मा‍गणी सामनेवाले यांचेकडे  केलेली आहे.

 

9.    तक्रारदारांनी तक्रारीसोबत जोडलेल्‍या नि.सी colly वरील विरुध्‍दपक्षाकडे पैसे भरल्‍याच्‍या पावत्‍या, सामनेवाले यांनी दि.18/05/2010 रोजी तक्रारदारांनी सदनिका क्र. 304 सुरज कुंज याबाबत दिलेले अलॉटमेंट लेटर तसेच दि.19/04/2012 रोजी सदनिका क्र. 603 सुरज हेरिटेज प्‍लॉट नं. 59 सेक्‍टर 20 कामोठे नवी मुंबई यावर भरलेल्‍या मुद्रांक शुल्‍काची पावती व दि.30/04/2012 रोजीची नोंदणी शुल्‍काची पावती तसेच 18/06/2012 रोजी तक्रारदारांनी कळबोली पोलीस स्‍टेशनमध्‍ये दाखल केलेल्‍या एफ.आय.आरची प्रत व सदनिका क्र.603 सुरज हेरीटेज वरील मंचाने पारीत केलेल्‍या अंतरिम आदेशाची प्रत व इतर आवश्‍यक कागदपत्रे व तक्रारदाराचे पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्विाद इत्‍यादींचे अवलोकन करुन मंचाने तक्रारीच्‍या निराकरणार्थ खालील प्रमुख मुद्दे विचारात घेतले.

मुद्दा क्रमांक 1 -         सामनेवाले हे तक्रारदार यांना दिलेल्‍या दोषपूर्ण सेवेसाठी

जबाबदार  आहेत काय ?

उत्‍तर        -        होय.

 

मुद्दा क्रमांक 2 -         तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून त्‍यांनी सामनेवाले यांना

सदनिका खरदीबाबत भरलेली एकुण रक्‍कम व्‍याजासह परत मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

उत्‍तर        -        होय.

मुद्दा क्रमांक 3 -         तक्रारदार सामनेवालेकडून मानसिक त्रासापोटी नुकसान

             भरपाई व न्‍यायिक खर्च मिळण्‍यास पात्र आहेत काय ?

उत्‍तर        -        होय.

 

विवेचन मुद्दा क्रमांक     1 -   तक्रार क्र. 237/12 मध्‍ये सामनेवाले यांनी तक्रारदारास सदनिका क्रमांक 304, सूरज कुंज, प्‍लॉट नं. 26, सेक्‍टर 5 कामोठे नवी मुबई,  (क्षेत्राफळ 307.5 चौ.फु) इमारतीमध्‍ये एकूण रु.11,40,000/- इतका मोबदला घेऊन देण्‍याचे कबूल केले आहे. त्‍यापैकी तक्रारदाराकडुन एकूण रु. 6,61,000/- सामनेवाले यांना मिळाले असल्‍याचे नमूद केलेले आहे व त्‍याबाबतच्‍या पावत्‍या सामनेवाले यांनी तक्रारदारांना दिल्‍या आहेत सदर पावत्‍या अभिलेखात नि. ‘C’ Colly वर उपलब्‍ध आहेत.  परंतु अनेकवेळा विनवण्‍या करुन विरुध्‍दपक्ष सदर सदनिकेचा करारनामा करण्‍यास तयार नाहीत. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर सदनिका क्र. 304, सुरज कुंज हिचा करारनामा करुन देण्‍यासाठी व त्‍याचा ताबा तक्रारदारांना देण्‍यासाठी तक्रारदारांकडून फार मोठया प्रमाणात म्‍हणजे एकूण मोबदल्‍याच्‍या 58% रक्‍कम वसूल करुनसुध्‍दा तक्रारदारांना कोणतेही सहकार्य केले नाही तसेच सदर सदनिकेचा ताबाही अद्याप तक्रारदारांना दिला ना‍ही व तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिकेच्‍या ताब्यासाठी वारंवार विनंवणी केल्‍यावर सद‍र सदनिकेचा पर्यांय म्‍हणुन प्‍लॉट नं. 59, सेक्‍टर 20, वरील सुरज हेरीटेज या इमारतील सदनिका क्र. 603 (क्षेत्राफळ 307.5 चौ.फु) तक्रारदारांना पुर्वीच्‍या सदनिकेच्‍या खरेदीच्‍या किमतीस देण्‍याचे मान्‍य केले व त्‍याबाबत सामनेवाला यांनी तक्रारदारांकडुन वर नमुद केल्‍याप्रमाणे मुद्रांक शुल्‍क व नोंदणीशुल्‍क यासाठी आगाऊ घेतलेली रक्‍कम रु. 1,60,000/- यातुन सदर पर्यायी सदनिका 603, सुरज हेरीटेज हिच्‍या खरेदीपोटी तक्रारदारांच्‍या नावे रु.1,27,860/- व नोंदणीशुल्‍कापोटी रु.25,230/- इतके दुय्यम निबंधक पनवेल यांचे कडे अनुक्रमे दि.19/04/2012 व  दि.30/04/2012 रोजी भरले. सदर पावत्‍या निशाणी 23 व 24 वर अभिलेखात उपलब्‍ध आहे. एवढी मोठी रक्‍कम मुद्रांक शुल्‍क व नोंदणी शुल्‍कापोटी भरुनही सामनेवाला हे सदर करारनामा स्‍वाक्षरीत करण्‍यास व नोंदणीकृत करण्‍यास उपस्थित राहिले नाहीत व अद्यापही त्‍यांनी पर्यांयी सदनिका क्र. 603 सुरज हेरीटेज प्‍लॉट नं. 59, सेक्‍टर 20, हीचा करारनामा तक्रारदारांशी स्‍वाक्षरीत केला नाही यांबाबत तक्रारदारांनी  सामनेवाले यांचे विरुध्‍द दि. 18/06/2012 रोजी कळंबोली पोलीस ठाण्‍यात पोलीस कंप्‍लेंटही दाखल केली तरीही तक्रारदारांना सामनेवाला यांनी कोणत्‍याही प्रकारे सहकार्य केले नाही व अशा प्रकारे मोफा कायद्याचे कलम 4 सामनेवाले यांचेवर बंधनकारक असूनही त्‍याचे विरुध्‍दपक्ष यांनी उल्‍लंघन केले आहे असे असल्‍यामुळे सामनेवाले हे अनुचित व्‍यापारी प्रथेस जबाबदार असून त्‍यांनी तक्रारदारांस दोषपूर्ण सेवा दिली आहे हे सिद्ध होते.

 

विवेचन मुद्दा क्रमांक     2 -   तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या पुराव्‍याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्‍तीवाद व इतर आवश्‍यक कागदपत्रे, तसेच अभिलेखात उपलब्‍ध असलेल्‍या सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिलेल्‍या पावत्‍यांचे अवलेाकन केले असता, सदर सदनिकेच्‍या खरेदीसाठी तक्रारदारांनी सामनेवाले यांस एकूण खालील कोष्‍टकाप्रमाणे रुपये दिलेले आहेत.

अ.क्र.

दिनांक

पावती क्रमांक

रक्‍कम रु.

1.

19-10-09

142

11,000/-

2.

10-11-09

153

3,00,000/-

3.

10-03-10

720

90,000/-

4.

10-03-10

721

1,00,000/-

5.

17-03-10

 

1,60,000/-

                             Total Rs.

6,61,000/-

एवढी मोठी रक्‍कम सामनेवाले यांस तक्रारदारांनी भरुन देखील आजतागायत सामनेवाले यांनी तक्रारदार यांस सदर सदनिकेचा करारनामा करुन न देणे किंवा ताबा न देणे इत्‍यादी त्रुटीपूर्ण सेवेसाठी सामनेवाले जबाबदार आहेत. तक्रार दाखल करण्‍याचे कारण सामनेवाले यांनी अद्याप तक्रारदारांना वादग्रस्‍त सदनिकेचा ताबा न दिल्‍यामुळे कायम आहे. (Cause of action is continuous). याबाबत खालील न्‍यायनिवाड्याचा मंचाने विचार केला.

2012 (4) ALL MR (JOURNAL) 39

CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, MAHARASHTRA STATE, MUMBAI

Mr. P.N.Kashalkar, Hon. Presiding Member

& Mr. Dhanraj Khamatkar, Hon. Member

 

M/s. Seth Developers Ltd.,

Vs.

Mrs. Sunita Bharat Salunkhe

First Appeal Nos. 373 to 375 of 2011.

30th April, 2012

Mr. S.B. Prabhawalkar, Adv. for the Appellant

Mr. U.B. Wavikar, Adv. for the Respondents.

 

(B)   Consumer Protection Act (1986), S.15 Limitation

 Complainants deposited amount with opponent developer for flat booking -Developer neither executed agreement nor gave possession - Complaint filed after 2 years of initial booking done  Booking is for possession of flat-  Till possession is given there is continuous cause of action  Complaint not barred by limitation.

तक्रारदाराच्‍या वकीलांनी त्यांच्‍या युक्तिीवादा दरम्‍यान अद्याप सदर इमारतीचे बांधकाम पुर्ण झालेले नसून, अनेक वर्षापासून सदर इमारतीचे केवळ Slab टाकून ठेवण्‍यात आले आहेत व विरुध्‍द पक्ष ह्याच्यावर तक्रारदारासारख्‍या अनेक सदनिकाधारकांना फसविल्‍याबाबत अनेक फौजदारी खटले विविध न्‍यायालयात चालू आहेत असे नमुद केले. व सदर वादग्रस्‍त सदनिकेच्‍या खरेदीबाबत तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे भरलेली एकुण रक्‍कम रु.6,61,000/- 21% व्‍याजाने सामनेवाले यांनी तक्रारदारांना परत करावी अशी पुरसीस तक्रारीतील प्रार्थना कलम 19 (a to h) यांना पर्याय म्‍हणुन तक्रारदाराच्‍या वकीलांनी दि. 05/12/2013 रोजी मंचात दाखल केली. सदर वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदाराने विरुध्‍द पक्षाकडे सदनिका खरेदीबाबत भरलेली एकुण रक्‍कम विरुध्‍दपक्ष यांनी तक्रारदारांना 18% व्याजासह परत करावी असे आदेश मंच विरुध्‍द पक्ष यांना देत आहे. म्‍हणजेच विरुध्‍द पक्ष यांनी सदर तक्रार क्र. 237/2012 मधील तक्रारदारांनी विरुध्‍द पक्ष यांचेकडे भरलेली एकुण रक्‍कम रु. 6,61,000/- यावर दि. 18/05/2010 (अलॉटमेंट लेटर दिल्‍यापासुनची तारीख) या ताखेपासुन ते प्रत्‍येक्ष रक्‍कम अदा करण्‍याच्या दिवसापर्यंत द.सा.द.शे 18% व्‍याजासह मिळुण होणारी एकुण रक्‍कम  तक्रारदारांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्‍यात परत करावी.

 

विवेचन मुद्दा क्रमांक     3 - तक्रारदारांनी सामनेवाले यांचेवर विश्‍वास ठेवून त्‍यांच्‍याकडे सदनिका बुक केली.  तसेच सदनिकेच्‍या ठरलेल्‍या रकमेच्‍या 58 टक्‍क्‍याहून जास्‍त रक्‍कम अदा केली. एवढया मोठया प्रमाणात रक्‍कम भरुन सुध्‍दा सामनेवाले यांनी तक्रारदारांस कुठल्‍याही प्रकारे सहकार्य केलेले नाही किंवा तक्रारदारांना अलॉट केलेल्‍या सदनिकेचा करारनामा स्‍वाक्षरीत केलेला नाही किंवा ताबाही दिलेला नाही. त्‍यामुळे नाइलाजाने तक्रारदारांस मंचापुढे सामनेवाले विरुध्‍द न्‍याय मिळविण्‍यासाठी तक्रार क्र. CC/237/12 दाखल करावी लागली. त्‍यामुळे तक्रारदारांस वेळ, पैसा, शक्‍ती (Time / money, energy) नाहक खर्ची घालावे लागले, यासाठी तक्रारदारांना मानसिक त्रासही झाला व त्‍यामुळे तक्रारदार नुकसान भरपाईपोटी रु.40,000/- व न्‍यायिक खर्चापोटी रु.20,000/- सामनेवाले यांचेकडून मिळण्‍यास पात्र आहेत.

10.         सबब, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो –

अंतिम आदेश

1.     तक्रार क्र. CC/237/12 अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.    विरुध्‍दपक्षाने तक्रारदाराकडुन मिळालेल्‍या एकुण रक्‍कम रु. 6,61,000/- यावर दि.18/05/2010 (अलॉटमेंट लेटरच्‍या तारखेपासुन) ते सदर रक्‍कम प्रत्‍यक्ष अदा करणेच्‍या दिवसापर्यंत द.सा.द.शे 18% दराने व्‍याज द्यावे व अशी व्‍याजासह मिळुन होणारी एकुण रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारदारांना आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्‍यात परत करावी.

3.    तक्रारदारांना सामनेवाले यांनी नुकसानभरपाई पोटी रक्‍कम रु. 40,000/- (अक्षरी  रु. चाळीस हजार मात्र)  व न्‍यायिक  खर्चापोटी रु. 20,000/-  (अक्षरी रुपये वीस हजार मात्र ) द्यावेत.

4.    उपरोक्‍त आदेशाचे पालन विरुध्‍द पक्ष यांनी आदेश पारित तारखेच्‍या दोन महिन्‍याचे आत करावे.

5.    सदर आदेशाच्‍या सत्‍यप्रती उभय  पक्षकारांना पाठविण्‍यात याव्‍यात.

ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.

दिनांक –21/12/2013

 

 

                          (एस.एस.पाटील )     (स्‍नेहा एस.म्‍हात्रे )  

                          सदस्‍य              अध्‍यक्षा

               अति.ठाणे जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.

 

 

 
 
[HON'ABLE MRS. Sneha S.Mhatre]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S.Patil]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.