ठाणे जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचकोंकण भवन, नवी मुंबई.
ग्राहक तक्रार क्रमांक :- 162, 163, 164,
165, 179, 180, 181, 182, 183, 184,
185, 186, 187, 188, 240/13
तक्रार दाखल दिनांक – 20/07/2013.
आदेश दिनांक : - 20/02/2014
1. श्री. मारुती धोंडीबा प्रधान,
रा. ए / 204, सेक्टर 20,
ओम सिध्दी को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.,
ऐरेाली, नवी मुंबई. (तक्रार क्र. 162/13)
2. श्री. अरविंद लक्ष्मण शेलार,
रुम नं. 22, जुनी पोलिस लाईन,
भायखळा, मुंबई – 400027. (तक्रार क्र. 163/13)
3. श्री. संतोष रामचंद्र बर्गे,
रा. ए -1, रुम नं. 98,
वरळी पोलिस कॅंप, सर पोचखानवाला मार्ग,
मुंबई – 400030. (तक्रार क्र. 164/13)
4. श्री. दिपक गणपती अडसळ,
रा. बी.डी.डी. चाळ नं. 17, रुम नं. 32,
एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल,
मुंबई – 400013. (तक्रार क्र. 165/13)
5. श्री. अशोक सदाशिव पाटील,
रा.बी बिल्डींग, रुम नं. 19,
पहिला मजला, शिवडी पोस्ट लाईन,
दारुखाना रे रोड, मुंबई. (तक्रार क्र. 179/13)
6. श्री.सूर्यकांत तुकाराम जाधव,
रा. बी.आय.टी. चाळ नं. 10,
रुम नं. 64, सेंट मेरी रोड,
ताडवाडी, माझगांव, मुंबई -10. (तक्रार क्र. 180/13)
7. श्री. सुरेश सीताराम कुंभार,
रा. धनेश वैती चाळ, रुम नं. 3,
बोराला, गोवंडी, मुंबई. (तक्रार क्र. 181/13)
8. श्री. बाबू जनाबा सकपाळ,
रा. रुम नं. 139, कोहिनूर चाळ नं. 3,
एस.एस. वाघ मार्ग, नायगांव,
दादर, मुंबई- 14. (तक्रार क्र. 182/13)
9. श्री. गोरखनाथ व्ही. आवळे,
रा. बानरेवाला चाळ, पोस्ट देवनार,
मानखुर्द, मुंबई – 88. (तक्रार क्र. 183/13)
10. श्री. उत्तम लक्ष्मण शिंदे,
रा. बिल्डींग नं. सी/2/2, रुम नं. 19,
चौथा मजला, वरळी पोलिस कॅंप,
सर पोचखानवाला मार्ग, मुंबई – 400030. (तक्रार क्र. 184/13)
11. श्री. अर्जुन साताप्पा सरोलकर,
रा. आमची सावली, रुम नं. 110,
हुकमिल लेन, एन.एम.जोशी मार्ग,
चिंचपोकळी, (पश्चिम), मुंबई. (तक्रार क्र. 185/13)
12. श्री. निलेश दत्ताराम पारकर,
रा. 22/709, पारिजातक को.ऑप.हौसिंग सोसा. लि.,
टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) मुंबई- 400083. (तक्रार क्र. 186/13)
13. श्री. अनिल रानबा रोकडे,
रा. 203/सी, चिरायु सी.एच.एस.,
बिग बझार, सेनापती बापट मार्ग,
लोअर परेल, मुंबई – 13. (तक्रार क्र. 187/13)
14. श्री. राजेंद्र गणपत कु-हाडे,
रा. सी /46, शिवडी पोलिस लाईन,
दारुखाना रे रोड, मुंबई – 10. (तक्रार क्र. 188/13)
15. श्री. सुरेश तुकाराम पाटील,
रा. 24/65, 3 बी.डी.डी.चाळ, ना.म. जोशी मार्ग,
मुंबई – 400013. (तक्रार क्र. 240/13)
...... तक्रारदार
विरुध्द
1. मे. सूरज एंटरप्रायझेस, तर्फे प्रोप्रायटर,
श्री. शिरिषकुमार रंगराव चव्हाण,
ऑफिस – ए / 324, वाशी प्लाझा,
सेक्टर 17, वाशी, नवी मुंबई – 400705.
घरचा पत्ता - उषा कबिर, सेक्टर 10,
दुसरा मजला, रुम नं. 201, प्लॉट नं. 42,
नवीन पनवेल, खांदा कॉलनी
2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे,
रा. शिलोत्तर रायचूर, ता. पनवेल, जि. रायगड.
3. श्री. तुकाराम कमळू म्हात्रे,
रा. शिलोत्तर रायचूर, ता. पनवेल, जि. रायगड. .... सामनेवाले क्र. 1 ते 3
समक्ष :- मा. अध्यक्षा, स्नेहा एस. म्हात्रे
मा. सदस्य, एस.एस. पाटील
उपस्थिती :- तक्रारदारातर्फे त्यांचे वकील अॅड. संतोष पाटील हजर
विरुध्दपक्ष क्र. 1 एकतर्फा चौकशी
विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 तर्फे अॅड.वाय. एस. भोपी हजर.
आदेश
(दि. 20/02/2014)
द्वारा मा. सौ. स्नेहा एस. म्हात्रे, अध्यक्षा
1. वर नमूद केलेल्या 15 तक्रारींमध्ये विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 हे सारखेच आहेत तसेच उभयपक्षांतील वादविषय सुध्दा समान आहेत त्यामुळे कामकाजाच्या सोयीचे दृष्टीने या सर्व 15 तक्रारी एकाच दिवशी निकालासाठी ठेवलेल्या आहेत. तसेच एकत्रित आदेशाद्वारे ही सर्व तक्रार प्रकरणे निकाली काढण्यात येत आहेत ही बाब सर्वप्रथम स्पष्ट करण्यात येते.
2. तक्रारदारांनी सदर प्रकरणांत तक्रारीसोबत पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद व इतर काही आवश्यक कागदपत्रे दाखल केली. वर नमूद केलेल्या सर्व तक्रार प्रकरणांत विरुध्दपक्ष क्र. 1 यांना पाठविण्यात आलेली नोटीस “ Left ” या शे-यासह मंचात परत आलेली आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी वर नमूद सर्व तक्रार प्रकरणांत सुनावणीसाठी हजर राहणेबाबत त्यांचेवर स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस प्रसिध्द करण्याबाबत परवानगी मिळावी असा अर्ज तक्रारदारांचे वकीलांनी दि. 04/10/13 रोजी दिला. सदर अर्ज मंजूर करण्यात आला. सदर अर्जानुसार तक्रारदारांचे वकीलांनी दि. 27/11/2013 रोजीच्या “कोकण सकाळ” या वृत्तपत्रात दि. 07/12/2013 रोजीच्या सुनावणीस सकाळी 10.30 वाजाता हजर रहावे अशी जाहीर नोटीस प्रसिध्द करुन त्याचा अहवाल दि. 07/12/13 रोजी मंचात दाखल केला. तसेच सदर जाहीर नोटीसीचा ड्राफ्ट तक्रार क्र. 179/13 मधील तक्रारदार श्री. अशोक पाटील व तक्रार क्र. 184/13 मधील तक्रारदार श्री. उत्तम शिंदे यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांना स्वतः भेटून दिला असून विरुध्दपक्ष क्र. 1 ने सदर नोटीसीचा ड्राफ्ट आपल्याला मिळाला असल्याची पोच दिल्याबाबतचा अहवाल / सर्व्हिस अॅफिडेव्हीट दाखल करुन तक्रारदारांचे वकीलांनी वर नमूद प्रत्येक तक्रार प्रकरणात मा. मंचाने दि. 20/07/13 रोजी पारीत केलेल्या अंतरिम आदेशाची प्रतही विरुध्दपक्ष क्र. 1 ने दि. 25/11/13 रोजी स्विकारल्याबाबत नमूद केले. अशाप्रकारे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना जबाब दाखल करण्यासाठी संधी मिळूनही ते मंचासमक्ष गैरहजर राहिल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात यावा असा तक्रारदारांचे वकीलांनी युक्तीवाद केला. त्यांचा युक्तीवाद ऐकून विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेविरुध्द दि.07/12/13 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ने त्यांचा लेखी जबाब, त्यांचे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. त्यामुळे उभयपक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकून प्रकरण अंतिम आदेशासाठी ठेवण्यात आले.
3. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
वरील सर्व तक्रार प्रकरणांतील तक्रारदार हे शासन सेवेतील पोलीस खात्यातील कर्मचारी/अधिकारी असून वर नमूद केलेल्या पत्त्यावर रहातात. विरुध्दपक्ष क्र. 1 हे सूरज एंटरप्रायझेस ही प्रोप्रायटरी कन्सर्न असून श्री.शिरिषकुमार रंगराव चव्हाण हे सदर सूरज एंटरप्रायझेसचे प्रोप्रायटर / बिल्डर आहेत व त्यामार्फत ते बांधकामाचा व्यवसाय करतात. विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 हे विरुध्दपक्ष क्र 1 यांनी विकसनासाठी घेतलेल्या मिळकतीचे मूळ जागामालक आहेत. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ने विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचे मालकीच्या मौजे शिलोत्तर रायचूर, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट नं. 07, एकूण क्षेत्र 0.41.7 हे.आर. गांव शिलोत्तर रायचूर, ता. पनवेल, जि. रायगड ही मिळकत दुय्यम निबंधक, पनवेल – 1, यांचेकडील रजिस्टर दस्त क्र. 6650 / 2012 नुसार योग्य मोबदला देऊन खरेदी केली आहे. त्यानंतर विरुध्दपक्ष क्र. 1 हे या मिळकतीवर सूरज एंटरप्रायझेस या नांवाने मिळकती विकसित करीत होते.
4. सर्व तक्रारदारांचे पुढे म्हणणे की, त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडे खालील कोष्टकात नमूद केलेला फ्लॅट बुक केला व त्यासाठी मोबदला म्हणून खाली नमूद केल्याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्कम विरुध्दपक्ष क्र. 1 यांना दिली. व विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला सदर बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा लवकारात लवकर देण्याचे कबूल करुनसुध्दा तसेच तक्रारदाराने विरुध्दपक्षाला वारंवार विनवण्या करुनही अद्याप पर्यंत दिलेला नाही. तसेच सर्व तक्रारदारांकडून विरुध्दपक्ष क्र. 1 ने बुकींगसाठी मोठया प्रमाणात रक्कम स्विकारुन व करारनामा करण्याचे आश्वासन देऊनही अद्यापपर्यंत कोणत्याही सदनिकेचा करारनामा नोंदवून दिलेला नाही. सदर सदनिकांच्या व्यवहाराचा तपशिल खालील प्रमाणे .
अ क्र | त. क्र. | त.दार नांव | वि.प. नांव | एकूण मोबदला रक्कम रु. | त.ने वि.प.ला दिलेली रक्कम | सदनिका क्र., इमारत नांव, व एरिया (कारपेट) | अलॉटमेंट लेटर दि. | त.दाराने मागणी केलेली रक्कम रु. |
1 | 162/13 | मारुती प्रधान | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | युनिट फ्लॅट नं. ए - 202, दुसरा मजला, बिल्डींग नं. 5, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर, पनवेल, नवी मुंबई. 590 चौ. फूट | 19-12-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
2 | 163/13 | अरविंद शेलार | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | | 3,20,000/- | फ्लॅट नं. बी – 101, पहिला मजला, सूरज कॉम्प्लेक्स, गट नं. 07, सुखापूर, पनवेल, नवी मुंबई. 560 चौ. फूट | 02-05-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
3 | 164/13 | संतोष बर्गे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | फ्लॅट नं. ए – 203, दुसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स II , गट नं. 07, सुखापूर, पनवेल, नवी मुंबई. 590 चौ. फूट | 20-03-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
4 | 165/13 | दिपक आडसळ | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 8,17,000/- | 2,00,000/- | युनिट फ्लॅट नं. 205, बिल्डींग नं. 6, सूरज कॉम्प्लेक्स II , गट नं. 07, सुखापूर, पनवेल, नवी मुंबई. 380 चौ. फूट | 28-02-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
5 | 179/13 | अशोक पाटील | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | 204, दुसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 20-03-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
6 | 180/13 | सूर्यकांत जाधव | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | बी विंग, दुसरा मजला, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 25-01-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
7 | 181/13 | सुरेश कुंभार | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,38,500/- | 3,00,000/- | ए – 302, तिसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 12-12-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
8 | 182/13 | बाबू सकपाळ | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 8,17,000/- | 2,00,000/- | फ्लॅट नं. 305, बिल्डींग नं. 6, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 380.00 चौ.फूट. | 28-02-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
9 | 183/13 | गोरखनथ आवळे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | ए विंग, तिसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 15-01-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
10 | 184/13 | उत्तम शिंदे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | फ्लॅट नं. बी 302, तिसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 12-12-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
11 | 185/13 | अर्जुन सरोलकर | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 8,17,000/- | 2,00,000/- | 301, बिल्डींग नं. 6, सूरज कॉम्प्लेक्स, II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 380 चौ.फूट | 28-02-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
12 | 186/13 | निलेश पारकर | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,68,500/- | 3,00,000/- | फ्लॅट नं. सी – 203, दुसरा मजला, बिल्डींग नं. 4, सूरज कॉम्प्लेक्स, II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 12-12-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
13 | 187/13 | अनिल रोकडे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 9,10,000/- | 3,18,500/- | बी – 102, पहिला मजला, सूरज कॉम्प्लेक्स, II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 560 चौ.फूट | 02-05-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
14 | 188/13 | राजेंद्र कु-हाडे | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 9,18,125/- | 3,18,500/- | 104, बिल्डींग नं. 2, सूरज कॉम्प्लेक्स, I, गट नं. 08, शिलोत्तर रायचूर, ता. पनवेल, जि. रायगड. 565 चौ.फूट | 27-03-12 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
15 | 240/13 | सुरेश पाटील | 1.सूरज एंटरप्रायझेस तर्फे प्रोप्रा. श्री.शिरिषकुमार चव्हाण 2. श्री. नामदेव कमळू म्हात्रे, 3.श्री. तुकाराम कमळू म्हात्रे | 12,04,000/- | 3,00,000/- | सूरज कॉम्प्लेक्स II, गट नं. 07, सुखापूर,पनवेल,नवी मुंबई. 590 चौ.फूट | 18-11-11 | मान. व शारिरिक त्रासापोटी - 50,000/- न्यायिक खर्च- 10,000/- |
यासाठी तक्रारदारांनी विरुध्दपक्षक्र. 1 कडून खालील मागण्या केल्या आहेत.-
1. विरुध्दपक्ष क्र. 1 नी तक्रारदारांना त्यांनी बुकींग केलेल्या फ्लॅटचा करारनामा (ॲग्रीमेंटटूसेल)करुन दयावा सदर मिळकत विकसनाकरीता कायदेशीर अडचण असल्यास तक्रारअर्जातील चालू बाजार भावाप्रमाणे व मागणी रकमेच्या तपशीलाप्रमाणे रक्क्म व त्या रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. तक्रारीतील वर नमूद केलेल्या मागण्यांना पर्याय म्हणून- (2) तक्रारदारांनी दि. 11/02/14 रोजी दाखल केलेल्या लेखी युक्तीवादामध्ये विरुध्दपक्षक्र. 1 कडे सदनिका खरेदीसाठी जमा केलेल्या रकमेवर ती रक्कम जमा केल्या दिवसापासून ते आजपावेतो 18 टक्के व्याज अशी होणारी एकूण रक्क्म विरुध्दपक्षक्र. 1 कडून प्रत्येक तक्रारदारास परत देण्याचे आदेश व्हावेत व तक्रारअर्जाचा खर्च प्रत्येकी रु. 5,000/- द्यावा अशी मागणी केली आहे.
विरुध्दपक्ष क्र.2 व 3 यांनी सदर सर्व तक्रारींत त्यांचा जबाब दाखल केला आहे. त्यात तक्रारदारांनी विरुध्दपक्षक्र. 2 व 3 यांना सेवा देण्यासाठी कोणताही आर्थिक मोबदला दिलेला नाही. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 चे ग्राहक नसून विरुध्दपक्षक्र. 2 व 3 हे सदर तक्रारीत आवश्यक पक्षकार नाहीत,याउलट विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांची विरुध्दपक्ष क्र. 1 ने घोरफसवणूक केली आहे व दि. 29/05/12 रोजीचे विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांच्यातील खरेदी खत रद्दबातल झालेले आहे. व सदर खरेदीखत रद्द करणेसाठी विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ने विरुध्दपक्ष क्र. 1 चे विरुध्द पनवेल येथील दिवाणी कोर्टात स्पे. मु. नं. 319/2012 हा दावा दाखल केलेला आहे, व दि. 26/07/12 रोजी विरुध्दपक्षक्र. 2 व 3 यांनी विरुध्दपक्षक्र. 1 चे विरुध्द सदर दाव्याचे कामी पनवेल कोर्टाने तूर्तातूर्त मनाई हुकूमाचे आदेश जारी केले आहेत असे नमूद केले आहे. तसेच विरुध्दपक्षक्र. 2 व 3 ने तक्रारदारांना कोणतीही सेवा पुरविलेली नाही. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1) (डी) नुसार तक्रारदार हे विरुध्दपक्षक्र. 2 व 3 चे ग्राहक नसल्याने त्यांचेविरुÁ केलेली तक्रार ताबडतोब फेटाळण्यात यावी असेम्हटलेआहे.
5. तक्रारीचे कारण हे रोज घडत असल्याने तक्रारदाराने सदर तक्रार विहित मुदतीत दाखल केली आहे. तसेच तक्रारीचे कारणही या मंचाच्या कार्यक्षेत्रात येते व याबाबत इतर कुठल्याही न्यायालयात तक्रारदाराने दावा दाखल केलेला नाही. त्यामुळे मंचाला सदर तक्रारीत न्यायनिवाडा करण्याचा अधिकार आहे.
6. तक्रारदाराची तक्रार, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तीवाद व इतर कागदपत्रे, व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचा लेखी जबाब, पुराव्याचे प्रतिज्ञापत्र यांचे अवलेाकन केल्यावर तक्ररीचे निराकरणार्थ मंचाने खालील मुद्दयांचा विचार केला.
मुद्दा क्रमांक – 1 वर नमूद केलेल्या सर्व तक्रारीमधील तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र.
1 चे ग्रा.सं.का. चे कलम 2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक – 2 तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 चे ग्रा.सं.का. चे कलम
2 (1) (d) नुसार ग्राहक आहेत काय ?
उत्तर - नाही.
मुद्दा क्रमांक – 3 तक्रारदाराला विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 यांनी दोषपूर्ण
सेवा दिली आहे काय ?
उत्तर - A) क्र. 1 ने दोषपूर्ण सेवा दिली आहे.
B) विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 ने दोषपूर्ण सेवा दिल्याचा तक्रारीत
उल्लेख नाही.
मुद्दा क्रमांक – 4 तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 1, 2 व 3 कडून त्यांनी केलेल्या मागणीनुसार रक्कम मिळण्यास व
नुकसानभरपाई/न्यायिक खर्च पात्र आहेत काय ?
उत्तर - विरुध्दपक्ष क्र. 1 कडून खाली नमूद केलेल्या विवेचन क्र. 4
नुसार रक्कम मिळण्यास पात्र आहेत. परंतु विरुध्दपक्ष
क्र. 2 व 3 कडून नुकसानभरपाई व त्यांनी मागितलेली रक्कम
मिळण्यास पात्र नाहीत.
विवेचन मुद्दा क्रमांक – 1 तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 1 चे ग्राहक आहेत. कारण तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 यांच्याकडे वरील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे वादग्रस्त सदनिका बुक केली व त्यासाठी प्रत्येक तक्रार प्रकरणातील तक्रारदारांनी खाली दिलेल्या कोष्टकाप्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 1 यांना मोठया प्रमाणात एकूण मोबदल्याच्या रकमेपैकी धनादेशाद्वारे / डीमांड ड्राफ्टद्वारे/रोख रक्कमेव्दारे खाली नमुद केल्याप्रमाणे रक्क्म दिली आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे .
अ.क्र. | तक्रार क्रमांक क्र. | तक्रारदाराचे नांव | बुकींग रिसीट नंबर | दिनांक | बॅंकेचे नांव चेक / डी.डी. | तक्रारदारांनी वि.प.ला दिलेली रक्कम रु. |
1 | 162/13 | मारुती प्रधान | 2230 | 27/12/10 | बॅंक ऑफ महाराष्ट्र – 184629 | 2,00,000/- |
2231 | 14/01/11 | बॅंक ऑफ इंडिया – 000003 | 1,00,000/- |
| | | | | | |
2 | 163/13 | अरविंद शेलार | 835 | 24/02/10 | अॅक्सीस बॅंक – 640123 | 2,00,000/- |
1848 | 13/12/10 | अॅक्सीस बॅंक – 640125 | 1,20,000/- |
| | | | | | |
3 | 164/13 | संतोष बर्गे | 2098 | 16/12/10 | सिंडीकेट बॅंक – 739555 | 1,50,000/- |
2099 | 07/01/11 | सारस्वत बॅंक | 1,50,000/- |
| | | | | | |
4 | 165/13 | दिपक अडसळ | 1770 | 30/12/10 | अॅक्सीस बॅंक – 240282 | 1,00,000/- |
2803 | 01/02/11 | अॅक्सीस बॅंक – 240284 | 50,000/- |
2245 | 15/01/11 | अॅक्सीस बॅंक – 240283 | 50,000/- |
| | | | | | |
5 | 179/13 | अशोक पाटील | 2090 | 16/12/10 | अॅक्सीस बॅंक – 120256 | 50,000/- |
2091 | 16/12/10 | अॅक्सीस बॅंक – 120258 | 50,000/- |
2092 | 16/12/10 | अॅक्सीस बॅंक – 120259 | 50,000/- |
2093 | 05/01/11 | अॅक्सीस बॅंक – 893081 | 50,000/- |
2094 | 05/01/11 | अॅक्सीस बॅंक – 893082 | 50,000/- |
2095 | 05/01/11 | अॅक्सीस बॅंक – 893083 | 50,000/- |
| | | | | | |
6 | 180/13 | सूर्यकांत जाधव | 1982 | 14/12/10 | बॅंक ऑफ महाराष्ट्र - 827547 | 1,50,000/- |
2082 | 14/12/10 | बॅंक ऑफ महाराष्ट्र - 827547 | 1,50,000/- |
2084 | 07/01/11 | बॅंक ऑफ महाराष्ट्र - 827549 | 1,50,000/- |
| | | | | | |
7 | 181/13 | सुरेश कुंभार | 1766 | 13/12/10 | देना बॅंक | 1,00,000/- |
1767 | 21/12/10 | देना बॅंक – 891622 | 50,000/- |
2219 | 01/01/11 | देना बॅंक – 891623 | 50,000/- |
2220 | 07/01/11 | देना बॅंक – 8916241 | 50,000/- |
| | | | | | |
8 | 182/13 | बाबू सकपाळ | 2244 | 15/01/11 | बॅंक ऑफ महाराष्ट्र - 585287 | 50,000/- |
2800 | 28/01/11 | बॅंक ऑफ महाराष्ट्र - 585290 | 1,00,000/- |
2801 | 05/02/11 | बॅंक ऑफ महाराष्ट्र – 585289 | 50,000/- |
9 | 183/13 | गोरखनाथ आवळे | 2270 | 13/12/10 | सांगली सहकारी बॅंक – 310991 | 1,00,000/- |
2271 | 20/12/10 | सांगली सहकारी बॅंक – 310992 | 50,000/- |
2272 | 29/12/10 | सांगली सहकारी बॅंक – 310994 | 1,50,000/- |
| | | | | | |
10 | 184/13 | उत्तम शिंदे | 2273 | 10/12/10 | सांगली सहकारी बॅंक – | 50,000/- |
2274 | 20/12/10 | सांगली सहकारी बॅंक – 168726 | 50,000/- |
2275 | 05/01/11 | सांगली सहकारी बॅंक – 171557 | 50,000/- |
2276 | 11/01/11 | सांगली सहकारी बॅंक –171588 | 50,000/- |
2277 | 17/01/11 | सांगली सहकारी बॅंक – 171559 | 50,000/- |
| | | | | | |
11 | 185/13 | अर्जुन सरोलकर | 2242 | 27/12/10 | बॅंक ऑफ बडोदा – 044828 | 1,00,000/- |
2243 | 15/01/11 | अर्बन बॅंक – 757151 | 50,000/- |
2802 | 07/02/11 | बॅंक ऑफ महाराष्ट्र – 585288 | 50,000/- |
| | | | | | |
12 | 186/13 | निलेश पारकर | 1765 | 16/12/10 | पी.एम.सी. बॅंक – 106633 | 1,50,000/- |
2087 | 01/01/11 | पी.एम.सी. बॅंक – 106634 | 1,50,000/- |
| | | | | | |
13 | 187/13 | अनिल रोकडे | 651 | 25/02/10 | अॅक्सीस बॅंक – 881061 | 1,00,000/- |
902 | 05/03/10 | अॅक्सीस बॅंक – 881062 | 1,00,000/- |
2504 | 17/03/11 | अॅक्सीस बॅंक – 881065 | 1,18,500/- |
| | | | | | |
14 | 188/13 | राजेंद्र कु-हाडे | 1729 | 02/03/10 | अभ्युदय को.ऑप.बॅंक – 219431 | 25,000/- |
1730 | 02/03/10 | अभ्युदय को.ऑप.बॅंक – 219432 | 50,000/- |
| | | 1731 | 02/03/10 | अभ्युदय को.ऑप.बॅंक – 219434 | 75,000/- |
1732 | 06/03/10 | अभ्युदय को.ऑप.बॅंक – 19433 | 50,000/- |
| | | | | | |
15 | 240/13 | सुरेश पाटील | 1970 | 13/12/10 | आजरा अर्बन बॅंक – 691660 | 1,20,000/- |
1971 | 13/12/10 | बॅंक ऑफ महाराष्ट्र – 540783 | 80,000/- |
2080 | 27/12/10 | आजरा अर्बन बॅंक – 753731 | 75,000/- |
2081 | 01/01/11 | अर्बन को.ऑप. बॅंक – 753732 | 25,000/- |
सदर रक्कम तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 ला दिल्याबाबतच्या रीतसर पावत्या विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदारांना दिलेल्या आहेत. व त्या पावत्या अभिलेखात उपलब्ध आहेत. सदर पावत्या ह्या सूरज एंटरप्रायझेस या नांवाने विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना दिल्या असून त्याखाली विरुध्दपक्ष क्र. 1 ने सूरज एंटरप्रायझेसचे मालक / प्रोप्रायटर या शिर्षकाखाली स्वाक्षरी केलेली आहे.
तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदाराला वरील कोष्टकात नमूद केल्याप्रमाणे सदर वादग्रस्त सदनिकेच्या बुकींगबाबत अलॉटमेंट लेटरही दिले आहे. सदर अलॉटमेंट लेटरची प्रत अभिलेखात उपलब्ध आहे. सदर अलॉटमेंट लेटरवरही विरुध्दपक्ष क्र. 1 तर्फे प्रोप्रायटर म्हणून श्री. शिरिषकुमार रंगराव चव्हाण यांनी स्वाक्षरी केलेली आहे. यावरुन तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 1 यांचे ग्राहक आहेत हे सिध्द होते.
विवेचन मुद्दा क्रमांक - 2 विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी खरेदीखत करुन विकसित करावयास घेतलेल्या भूखंडाचे मूळ जमिन मालक आहेत. परंतु सदर वादग्रस्त सदनिकांच्या खरेदी व्यवहारात तक्रारदारांनी विरुध्दपक्षक्र. 2 व 3 यांचेशी कोणताही आर्थीक मोबदला देऊन व्यवहार केल्याचा उल्लेख किंवा कागदपत्रे तक्रारीत दाखल केलेली नाहीत. त्यामुळे विरुध्दपक्षक्र. 2 व 3 चे तक्रारदार ग्राहक कसे याचा खुलासा तक्रारीत दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदार हे विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 चे ग्राहक नाहीत.
विवेचन मुद्दा क्रमांक – 3 (A) विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराकडून वादग्रस्त सदनिका विक्रीबाबत वर नमूद केल्याप्रमाणे मोठया प्रमाणात रक्कम स्विकारूनही व तक्रारदाराला अलॉटमेंट लेटरमध्ये/विरुध्दपक्ष क्र.1 नी दिलेल्या पावतीवर नमूद केलेल्या सदनिकेचा ताबा देण्याचे कबूल करुनही विरुध्दपक्ष क्र. 1 ने अद्यापपर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा दिलेला नाही तसेच करारनामाही नोंदवून दिलेला नाही. याउलट, तक्रारदाराकडून वारंवार विचारणा होऊनही त्यांनी तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा देण्यास टाळाटाळ केली. परंतु अद्याप पर्यंत तक्रारदाराला सदर वादग्रस्त सदनिकेचा ताबा दिला नाही किंवा सदनिका खरेदीबाबत तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे भरलेली रक्कमही विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना परत केली नाही. यावरुन विरुध्दपक्ष क्र. 1 ने तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली आहे हे स्पष्ट होते.
3 B तक्रारदार व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्यात सदर सदनिकेच्या खरेदीपोटी कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. किंवा त्यांच्यात (Privity of Contract) नाही. तसेच तक्रारदारांनी तक्रारीत विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्यात व तक्रारदारांत सेवा पुरविणारे व ग्राहक असे नाते असल्याचा किंवा विरुध्दपक्षक्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्याबाबतचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे विरुध्दपक्षक्र. 2 व 3 यांनी तक्रारदारांना सदर सदनिका खरेदी करताना कोणत्याही प्रकारे दोषपूर्ण सेवा दिली आहे असे म्हणता येणार नाही.
विवेचन मुद्दा क्रमांक – 4 विरुध्दपक्ष क्र. 1 ने विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 कडून गट क्र०७ सुखापुर, पनवेल, नवी मुंबई,हा खरेदीखत करुन विकत घेतला व सदर मिळकतीवर विरुध्दपक्षाने इमारत बांधण्याचे काम चालू केले. तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र. 1 कडे सदर इमारतीत वर नमूद कोष्टकाप्रमाणे सदनिका बुक करुन मोठया प्रमाणात रक्क्मही भरली. परंतु विरुध्दपक्षक्र. 1 ने तक्रारदारांना सदर सदनिकांच्या विक्रीबाबाबत रीतसर करारनामे करुन दिले नाहीत किंवा व्यवहार पूर्ण करुन सदनिकांचा ताबा दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी केलेल्या मागणीनुसार प्रत्येक तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 कडे वर नमुद केलेल्या कोष्टकाप्रमाणे सदनिका खरेदीसाठी भरलेली एकुण रक्क्म ती (कोष्टकातील तारखेनुसार एकुण रक्क्म ) जमा झालेल्या दिवसापासून ते 11.02.2014 पर्यत द.सा.शे.15 टक्के व्याजासह होणारी एकुण रक्कम आदेश पारीत तारखेपासून प्रत्येक तक्रारदारास दोन महिन्यात परत करावी, तसेच तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई प्रत्येकी रुपये 20,000/- व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रुपये 10,000/- तक्रार क्र. 162/13, 163/13, 164/13, 165/13, 179/13, 180/13, 181/13, 182/13, 183/13, 184/13, 185/13, 186/13, 187/13, 188/13, 240/13 मधील सर्व तक्रारदारांना विरुध्दपक्ष क्र.1 यांनी आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यामध्ये दयावेत.
विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचेविरुध्द वरील सर्व तक्रारदारांची तक्रार प्रकरणे 162/13, 163/13, 164/13, 165/13, 179/13, 180/13, 181/13, 182/13, 183/13, 184/13, 185/13, 186/13, 187/13, 188/13, 240/13 खारीज करण्यात येतात. तसेच विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांच्याकडून तक्रारदार कोणतीही नुकसानभरपाई किंवा न्यायिक खर्च मिळण्यास पात्र नाहीत.
सबब, अंतिम आदेश पारीत करण्यात येतो,
अंतिम आदेश
1. तक्रारदारांच्या तक्रार क्र. 162/13, 163/13, 164/13, 165/13, 179/13, 180/13, 181/13, 182/13, 183/13, 184/13, 185/13, 186/13, 187/13, 188/13, 240/13 विरुध्दपक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येतात. व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांचे विरुध्द वर नमूद केलेली सर्व तक्रार प्रकरणे खारीज करण्यात येतात.
2 ,तक्रारदारांनी तक्रारीत केलेल्या मागणीनुसार प्रत्येक तक्रारदारांनी विरुध्दपक्ष क्र.1 कडे वर नमुद केलेल्या कोष्टकाप्रमाणे सदनिका खरेदीसाठी भरलेली एकुण रक्क्म, ती (कोष्टकातील तारखेनुसार एकुण रक्क्म) जमा झाल्या दिवसापासून ते दि.11.02.2014 पर्यत द.सा.शे 15 टक्के व्याजासह होणारी एकुण रक्क्म विरुध्दपक्षक्र.1 यांनी आदेश पारित तारखेपासुन दोन महिन्यात प्रत्येक तक्रारदारास परत करावी.
3. विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी तक्रार क्र. 162/13, 163/13, 164/13, 165/13, 179/13, 180/13, 181/13, 182/13, 183/13, 184/13, 185/13, 186/13, 187/13, 188/13, 240/13 मधील सर्व तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई प्रत्येकी रु.20,000/- (अक्षरी रु.वीस हजार मात्र) व न्यायिक खर्चापोटी प्रत्येकी रु.10,000 /- (अक्षरी रु. दहा हजार मात्र) आदेश पारीत तारखेपासून दोन महिन्यात द्यावेत.
विहित मुदतीत वर नमूद केलेल्या आदेशातील कलम 3 मध्ये नमूद केलेल्या आदेशाचे पालन विरुध्दपक्ष क्र. 1 यांनी न केल्यास तक्रार क्र. 162/13, 163/13, 164/13, 165/13, 179/13, 180/13, 181/13, 182/13, 183/13, 184/13, 185/13, 186/13, 187/13, 188/13, 240/13 मधील सर्व तक्रारदार नुकसानभरपाई व न्यायिक खर्चाच्या रकमेवर आदेश पारीत तारखेपासून ते प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 3% दराने दंडात्मक व्याज मिळण्यास पात्र रहातील.
5. आदेशप्रत मिळण्याबाबत होणा-या खर्चाचे वहन उभयपक्षांनी स्वतःचे स्वतः करावे.
6. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- कोकण भवन, नवी मुंबई.
दिनांक – 20/02/2014.
(एस.एस.पाटील ) (स्नेहा एस.म्हात्रे )
सदस्य अध्यक्षा
अति.ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नवी मुंबई.