Maharashtra

Ahmednagar

CC/18/243

श्री. बाबुराव कोंडीबा वाघमोडे - Complainant(s)

Versus

मे.न्‍यु निलेश मोटर्स तर्फे अधिकृत व्‍यक्‍ती श्री. निलेश पिपाडा - Opp.Party(s)

जे.जी.खटके

02 Jan 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/243
( Date of Filing : 02 Aug 2018 )
 
1. श्री. बाबुराव कोंडीबा वाघमोडे
मु.पो.पानसरेवाडी, पो.सुपा, ता.बारामती
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मे.न्‍यु निलेश मोटर्स तर्फे अधिकृत व्‍यक्‍ती श्री. निलेश पिपाडा
ऑफिस पत्‍ता- नगर-मनमाड रोड, साकोरी, ता.राहाता
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:जे.जी.खटके , Advocate
For the Opp. Party:
Dated : 02 Jan 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – ०२/०१/२०२०

(द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराने तक्रारीत असे कथन केले आहे की, तक्रारदार यांचा शेतीचा व्‍यवसाय असुन स्‍वतःच्‍या व कुटुंबाच्‍या उदरनिर्वाहासाठी जोड धंदा म्‍हणुन मळणी यंत्र खरेदी करण्‍याचा विचार करून सदरचे मळणी यंत्र खरेदी करणेसाठी  सामनेवाले यांचेकडे संपर्क केला. तक्रारदार यांनी दिनांक ३०-११-२०१७ रोजी मळणी यंत्र घेतले. सदर यंत्राचे संदर्भात सामनेवालेकडे पक्‍के बिलाची मागणी केली असतांना त्‍यांनी ते देण्‍यास वारंवार टाळाटाळ केली. तसेच दिलेले मशीन खराब झाले व सदर मशीन योग्‍य रितीने काम करत नसल्‍याने तक्रारदाराचे मशीनची रक्‍कम रूपये १,११,०००/- चे नुकसान झालेले आहे व तसेच तक्रारदाराला शेतीच्‍या व्‍यवसायामध्‍ये रक्‍कम रूपये २,००,०००/- पर्यंतचे नुकसान झालेले असल्‍याने तक्रारदाराने सामनेवालेकडे सदरहु मशीन दुरूस्‍त करण्‍याकरीता नोटीस पाठविली. सदर नोटीस सामनेवालेंना प्राप्‍त होऊनसुध्‍दा त्‍यावर कोणतीही दखल घेतली नसल्‍याने तक्रारदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, सामनेवालेने तक्रारदाराला घेतलेल्‍या मशीनचे पक्‍के बील देण्‍याचे आदेश पारीत व्‍हावा. तसेच तक्रारदाराला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासापोटी भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा आदेश व्‍हावा. 

४.   तक्रारदाराची तक्रार स्विकृत करून सामनेवाले यांना नोटीस काढण्‍यात आली. सदर नोटीस सामनेवालेंना प्राप्‍त झाल्‍यावर ते प्रकरणात हजर झाले नाही म्‍हणुन दिनांक २७-०६-२०१९ रोजी सामनेवाल विरूध्‍द प्रकरण ‘एकतर्फा’ चालविण्‍याचा आदेश पारीत करण्‍यात आला.

५.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, दस्‍तऐवज व तोंडी युक्तिवाद ऐकला असता खालील कारणमिमंसेवरून अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

कारणमिमांसा

६.   तक्रारदाराने सामनेवाले यांचेकडुन शेतीसाठी सॅको कंपनीचे मशीन दिनांक ३०-११-२०१७ रोजी घेतली होती व त्‍याकरीता तक्रारदाराने रूपये १,११,०००/- रोख रक्‍कम दिली होती, ही बाब तक्रारदाराने निशाणी ४ दस्‍त क्रमांक १ वरील देयकावरून सिध्‍द होते. सदर मशील त्‍यानंतर खराब झाले व तक्रारदाराने सामनेवालेकडे सदर मशीनची दुरूस्‍ती करता संपर्क साधला असतांना त्‍यांनी त्‍यावर कोणतीही दखल घेतली नाही किंवा कार्यवाही केली नाही, ही बाब तक्रारदाराने दिनांक १२-०३-२०१८ रोजी पाठविलेल्‍या नोटीसवरून सिध्‍द होत आहे. सदर नोटीस सामनेवालेंना प्राप्‍त होऊन‍सुध्‍दा कोणतीही दखल घेतली नसल्‍याने तसेच सामनेवाले प्रकरणात नोटीस प्राप्‍त होऊनसुध्‍दा गैरहजर राहिले व त्‍यांची बाजु मांडली नाही. म्‍हणुन तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेविरूध्‍द  लावलेले आरोप सिध्‍द होत आहे. तक्रारदाराला पक्‍के बील दिले नाही, तसेच विकलेली मशीन खराब झाले व बंद पडले त्‍याचा उपयोग तक्रारदार करू शकत नाही. याबाबत सामनेवालेकडुन कोणतीही दखल घेतली नसल्‍याने सामनेवालेने तक्रारदाराप्रती अनुचीत व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला आहे, हे सिध्‍द होते. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आदेश

       १.  तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. तक्रारदाराकडे बंद असलेले मशीन सामनेवालेकडे परत करावे व सामनेवालेने तक्रारदाराकडुन घेतलेली रक्‍कम रूपये १,११,०००/- (अक्षरी एक लाख अकरा हजार मात्र) दिनांक ३०-११-२०१७ पासुन द.सा.द.शे. ८ टक्‍के व्‍याजाने तक्रारदाराला परत करावी.

 

३. सामनेवाले यांनी तक्रारदाराला शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल रूपये २०,०००/- (अक्षरी वीस हजार) व  सदर तक्रार अर्जाचा खर्च रूपये ५,०००/- (अक्षरी पाच हजार) द्यावा.

 

४ वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

 

५. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

६. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.