Maharashtra

Thane

CC/11/17

नाजमुनीसा हमीद पटेल, पी/ए होल्‍डर -गुलनाझ एस. शेख - Complainant(s)

Versus

मे.अली बिल्‍डर् तर्फे प्रोप्रा..श्री.ईस्‍माईल चांद सैय्यद - Opp.Party(s)

Adv.D.S.Dwivedi

09 Oct 2015

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/11/17
 
1. नाजमुनीसा हमीद पटेल, पी/ए होल्‍डर -गुलनाझ एस. शेख
सी-201,ओम शक्‍ती अपार्टमेंट,जरीमारी टेम्‍पलजवळ, सुखापुर, नवे पनवेल,
रायगड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मे.अली बिल्‍डर् तर्फे प्रोप्रा..श्री.ईस्‍माईल चांद सैय्यद
मुनी मानसिअन, 4था मजला,रुम नं.401,कादरी बिल्‍डींग मागे, चांद नगर, काऊसा, मुंब्रा.
ठाणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

 

               न्‍यायनिर्णय   

               (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1. तक्रारदारांनी दि. 17/04/2008 रोजीच्‍या करारानुसार सामनेवाले यांचेकडून सदनिका क्र. 406, 4 थ्‍या मजल्‍यावरील क्षेत्रफळ 364 चौ.फू. (Built up Area) ‘न्‍यु मनोज निवास’ या इमारतीतील मौ. मुंब्रा, ता.जि. ठाणे येथील रु. 3,50,000/- एवढया रकमेची विकत घेण्‍याचे ठरले.

  2. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदर सदनिका खरेदीपोटी रु. 1,50,000/- रक्‍कम दि. 15/04/2008 रोजी दिली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर रकमेची पोच पावती दिली आहे. सामनेवाले यांनी करारानंतर 12 महिन्‍यांत सदनिकेचा ताबा देण्‍याचे तोंडी आश्‍वासन दिले.

  3. सामनेवाले यांनी सदनिका खरेदी करारापोटी रु. 1,50,000/- दि. 15/04/2008 रोजी स्विकारली, परंतु त्‍यानंतर सदनिकेचा ताबा करारानुसार तक्रारदारांना दिला नाही अथवा सदनिकेची रक्‍कमही परत केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.

  4. सामनेवाले यांना मंचाची नोटीस प्राप्‍त होऊनही गैरहजर असल्‍यामुळे त्‍यांचेविरुध्‍द सदर तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश मंचाने पारीत केला.

  5. तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे वकीलांनी त्‍यांच्‍या तक्रारीतील नमूद मजकूर हाच लेखी युक्‍तीवाद व तोंडी युक्‍तीवाद समजण्‍यात यावा अशी पुरसिस मंचात दाखल केली.

  6. तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 13(2)(b)(ii) प्रमाणे निकाली करण्‍यात येत

  7. तक्रारीतील दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे निष्‍कर्ष काढण्‍यात येतोः

     

  8. तक्रारदारांनी सामनेवाले बिल्‍डर्स यांना सदनिका खरेदीपोटी रक्‍कम रु. 1,50,000/- दि. 15/04/2008 रोजी दिली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना रक्‍कम प्राप्‍त झाल्‍याबाबत दिलेली पोचपावती मंचात दाखल आहे.

ब.  तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये दि. 17/04/2008 रोजी झालेल्‍या   

   करारानुसार सदनिकेची एकूण किंमत रु. 3,50,000/- असल्‍याचे   

   दिसून  येते.

क.   सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी काही रक्‍कम स्विकारुन सदनिकेचा ताबा देण्‍याची कोणतीही कार्यवाही केली नाही अथवा  सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कमही स्विकारली नाही. सामनेवाले

       यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे.

 

ड.     तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या तक्रारीतील मजकूरास कोणताही आक्षेप दाखल केला नाही. अशा परिस्थितीत तक्रारीतील नमूद मजकूर ग्राहय धरणे न्‍यायोचित होईल असे मंचाचे मत आहे.

 

           सबब खालीलप्रमाणे आदेश करण्‍यात येतोः

 

            आ दे श

  1. तक्रार क्र. 17/2011 अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

  2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि. 17/04/2008 रोजीच्‍या करारानुसार सदनिकेचा ताबा न देऊन मोफा कायदयातील तरतुदींचा भंग केला आहे.सामनेवाले यांची सदरची कृती सेवेमध्‍ये त्रुटी असल्‍याचे जाहिर करण्‍यात येते.

  3. सामनेवाले क्र. 1 यांना आदेश देण्‍यात येतो की त्‍यांनी तक्रारदारांना ‘न्‍यु मनोज निवास’ इमारतीतील चौथ्‍या मजल्‍यावरील सदनिका क्र. 406, 364 चौ.फू. क्षेत्रफळ असलेली मौजे मुंब्रा, ता.जि. ठाणे या मिळकतीचा कायदेशीर ताबा करारामध्‍ये नमूद असलेल्‍या सोयी सुविधांस‍ह दि. 17/11/2015 पर्यंत दयावा. तसे न केल्‍यास दि. 18/11/2015 पासून प्रत्‍येक महिन्‍याकरीता रु. 5,000/- (अक्षरी रुपये पाच हजार) रक्‍कम तक्रारदारांना दयावी.

  4. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून सदनिका ताबा देण्‍याबाबतचे पत्र प्राप्‍त झाल्‍यानंतर 15 दिवसांचे आंत सदनिका खरेदीपोटीची उर्वरीत रक्‍कम रु. 2,00,000/- (अक्षरी रुपये दोन लाख) सामनेवाले यांना अदा करावी.

  5. सामनेवाले सदर सदनिकेचा ताबा देण्‍यास असमर्थ असल्‍यास सामनेवाले यांनी सदनिका खरेदीपोटी स्विकारलेली रक्‍कम रु. 1,50,000/- दि. 15/04/2008 पासून दि. 17/11/2015 पर्यंत तक्रारदारांना द.सा.द.शे. 18% व्‍याजदरासह अदा करावी. विहीत मुदतीत रक्‍कम अदा न केल्‍यास दि. 18/11/2015 पासून 21% व्‍याजदरासहीत दयावी.

  6. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाईची रक्‍कम रु. 3,00,000/- (अक्षरी रुपये तीन लाख)दि. 17/11/2015 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत रक्‍कम अदा न केल्‍यास दि. 18/11/2015 पासून 9% दरासहीत दयावी.

  7. सामनेवाले यांनी तक्रारदारांना तक्रारीच्‍या खर्चाची रक्‍कम रु. 10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार) दि. 17/11//2015पर्यंत दयावी. विहीतमुदतीत अदा न केल्‍यास दि. 18/11/2015 पासून द.सा.द.शे. 9% व्‍याजदराने दयावी.

  8. संचिकेच्‍या अतिरिक्‍त प्रती तक्रारदारांना परत करण्‍यात याव्‍यात.

  9. आदेशाच्‍या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्‍य पोष्‍टाने    पाठविण्‍यात   याव्‍यात.

  10. उभय पक्षांनी आदेशाची पूर्तता झाली/न झालेबाबतचे शपथपत्र    दि. 17/11/2015 रोजी मंचात दाखल करावे.

 
 
[HON'BLE MR. MANOHAR Y. MANKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.