Maharashtra

Additional DCF, Nagpur

RBT/CC/13/548

डॉ. राजकुमार मोहनलाल राठी - Complainant(s)

Versus

मेसर्स लालगुलाब प्रामोटर्स व डेव्‍हलपर्स प्रा. लि. व्‍दारा संचालक कासव - Opp.Party(s)

संजय कस्‍तुरे

06 Mar 2018

ORDER

ADDITIONAL DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
NAGPUR
New Administrative Building No.-1
3rd Floor, Civil Lines, Nagpur-440001
Ph.0712-2546884
 
Complaint Case No. RBT/CC/13/548
 
1. डॉ. राजकुमार मोहनलाल राठी
वय 57 वर्षे रा. रामदास पेठ, नागपूर .
...........Complainant(s)
Versus
1. मेसर्स लालगुलाब प्रामोटर्स व डेव्‍हलपर्स प्रा. लि. व्‍दारा संचालक कासव
कार्यालय सत्‍यम अपार्टमेन्‍ट धंतोली वर्धा रोड, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
2. गुजराती समाज नागपूर व्‍दारा अध्‍यक्ष
कार्यालय सत्‍यम अपार्टमेन्‍ट धंतोली वर्धा रोड, नागपूर.
नागपूर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Shekhar P.Muley PRESIDENT
 HON'BLE MRS. Chandrika K. Bais MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 06 Mar 2018
Final Order / Judgement

                   -निकालपत्र

                              (पारित व्‍दारा- श्री शेखर प्रभाकर मुळे, मा.अध्‍यक्ष.)

                         ( पारित दिनांक-06 मार्च, 2018)

 

01.   तक्रारकर्त्‍याने ही तक्रार ग्राहक संरक्षण कायदा-1986 चे कलम-12 खाली  दोन्‍ही विरुध्‍दपक्षां विरुध्‍द सेवेतील कमतरते संबधी दाखल केली आहे.

 

02.    तक्रारकर्त्‍याची  थोडक्‍यात तक्रार खालील प्रमाणे-    

             तक्रारकर्त्‍याने, विरुध्‍दपक्षां विरुध्‍द ग्राहक तक्रार क्रं-601/2008 जिल्‍हा ग्राहक मंच, नागपूर येथे दाखल केली होती, ज्‍यामध्‍ये तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांच्‍या धंतोली, नागपूर स्थित सत्‍यम अपार्टमेंट मधील एक गाळा विकत घेण्‍याचा करार केला होता व करारा प्रमाणे विक्रीपत्र नोंदवून मिळावे अशी तक्रारी मध्‍ये मागणी केली होती, त्‍या तक्रारी मध्‍ये जिल्‍हा ग्राहक मंचाने दिनांक-21/07/2009 रोजी आदेश पारीत करुन विरुध्‍दपक्षांना तक्रारकर्त्‍याचे गाळयाचे विक्रीपत्र नोंदवून देण्‍याचे आदेशित केले होते, जिल्‍हा ग्राहक मंचाचे आदेशा नुसार तक्रारकर्त्‍याचे नावे करारातील गाळयाचे विक्रीपत्र दिनांक-29/03/2011 रोजी नोंदवून दिले होते परंतु विक्रीपत्रात गाळयाचा सुपर बिल्‍टअप एरिया-40.7796 चौरसमीटर नमुद केला नव्‍हता,त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्षांकडे वारंवार विक्रीपत्रात सुपर बिल्‍टअप एरिया नमुद करुन ते विक्रीपत्र दुरुस्‍त करुन देण्‍याची विनंती केली परंतु त्‍यावर विरुध्‍दपक्षांनी कोणतीही कारवाई केली नाही. तक्रारकर्त्‍याला जर तो गाळा अन्‍य कोणाला विक्री करावयास असल्‍यास विक्रीपत्रात गाळयाचा सुपर बिल्‍टअप एरिया नमुद असणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारे विरुध्‍दपक्षानीं आपल्‍या सेवेत कमतरता ठेवली म्‍हणून या तक्रारीव्‍दारे त्‍याने अशी विनंती केली की, विरुध्‍दपक्षांना आदेशित करण्‍यात यावे की, तक्रारकर्त्‍याच्‍या गाळयाच्‍या विक्रीपत्रा मध्‍ये सुपर बिल्‍टअप एरिया-40.7796 चौरसमीटर नमुद करुन तशी विक्रीपत्रात दुरुस्‍ती करुन द्दावी. विरुध्‍दपक्षांचे सेवेतील त्रृटी मुळे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये-10,000/- विरुध्‍दपक्षानीं तक्रारकर्त्‍याला देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

03. विरुध्‍दपक्ष क्रं-1) याला मंचाचे मार्फतीने नोटीस तामील होऊनही त्‍याचे तर्फे कोणीही उपस्थित न झाल्‍याने  विरुध्‍दपक्ष क्रं-1) विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍यात आली.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने लेखी जबाब दाखल करुन तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली पूर्वीची ग्राहक तक्रार मान्‍य केली आणि त्‍यातील आदेश सुध्‍दा मान्‍य केला. परंतु पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष क्रं-2) हा केवळ त्‍या भूखंडाचा लिजधारक आहे आणि त्‍या भूखंडा वरील ईमारत ही विरुध्‍दपक्ष क्रं-1) याने बांधलेली आहे, जो बिल्‍डर व विकासक आहे. तक्रारकर्त्‍याने गाळा विकत घेण्‍याचा करार विरुध्‍दपक्ष क्रं-1) याचे सोबत केला होता. तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे मध्‍ये कुठल्‍याही प्रकारचा “Privity of  Contract”  नाही तसेच  विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने तक्रारकर्त्‍याला कुठलीही सेवा पुरविलेली नाही. विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने हे नाकबुल केले की, तक्रारकर्त्‍याने त्‍याचे कडे गाळयाचे विक्रीपत्रा मध्‍ये सुपर बिल्‍टअप एरिया नमुद करुन ते विक्रीपत्र दुरुस्‍त करुन देण्‍याची मागणी केली होती. विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे विरुध्‍द तक्रार दाखल करण्‍यास कुठलेही कारण घडलेले नाही म्‍हणून या सर्व कारणास्‍तव तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने केली.

 

05.   तक्रारकर्त्‍याची प्रतिज्ञालेखावरील तक्रार, तसेच दाखल दस्‍तऐवजाच्‍या प्रती, विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे लेखी उत्‍तर तसेच तक्रारकर्ता आणि विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे वकील यांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन अतिरिक्‍त ग्राहक मंचाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे देण्‍यात येतो-

 

::निष्‍कर्ष ::

06.    विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने ही बाब नाकबुल केलेली नाही की, तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या गाळयाचा सुपर बिल्‍टअप एरिया हा-40.7796 चौरसमीटर आहे आणि त्‍याचा उल्‍लेख विक्रीपत्रात केलेला नाही. तक्रारकर्त्‍याने डिड ऑफ डिक्‍लरेशनची प्रत दाखल केलेली आहे, त्‍यामध्‍ये त्‍या ईमारती मधील पहिल्‍या आणि तळमजल्‍या वरील गाळयांचे बिल्‍टअप एरिया नमुद केलेले आहेत. तक्रारकर्त्‍याचा गाळा हा पहिल्‍या मजल्‍यावर असून त्‍यावरील प्रत्‍येक गाळयाचा बिल्‍टअप एरिया-25.4773 चौरसमीटर असून सुपर बिल्‍टअप एरिया-40.7796 चौरसमीटर नमुद केलेला आहे, हा डिड ऑफ डिक्‍लरेशनचा दस्‍तऐवज विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने नाकबुल केलेला नाही किंवा या दस्‍तऐवजावर कुठलाही वाद नाही, तक्रारकर्त्‍याचे गाळयाचे विक्रीपत्र सुध्‍दा अभिलेखावर दाखल आहे, त्‍यामध्‍ये गाळयाचा बिल्‍टअप एरिया-25.4773 चौरसमीटर इतका नमुद केलेला आहे परंतु सुपर बिल्‍टअप एरिया मात्र नमुद केलेला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या विक्रीपत्रात गाळयाचा सुपर बिल्‍टअप एरिया लिहावयाचा राहून गेला होता ही बाब सिध्‍द होते.

07.   विरुध्‍दपक्ष क्रं-2) याने या संबधी स्‍वतःची जबाबदारी झटकण्‍याचा प्रयत्‍न केला. विरुध्‍दपक्ष क्रं-2) तर्फे असा युक्‍तीवाद करण्‍यात आल की, विरुध्‍दपक्ष क्रं-2 हा केवळ लिज होल्‍डर असून त्‍या भूखंडावर विरुध्‍दपक्ष क्रं-1) याने ईमारत बांधलेली आहे आणि त्‍यामुळे विक्रीपत्र दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी ही केवळ विरुध्‍दपक्ष क्रं-1) याची आहे, विरुध्‍दपक्ष क्रं-2) याचे या म्‍हणण्‍याशी आम्‍ही सहमत नाही. तक्रारकर्त्‍याचे विक्रीपत्र हे दोन्‍ही विरुध्‍दपक्षानीं नोंदवून दिलेले आहे, ज्‍यामध्‍ये विरुध्‍दपक्ष क्रं-2) याला “Vendor” म्‍हणजे विक्रेता असे संबोधिलेले आहे आणि विरुध्‍दपक्ष क्रं-1) याला “Confirming Party” असे संबोधिलेले आहे.

          तक्रारकर्त्‍याचे विक्रीपत्रातील एक क्‍लॉज खालील प्रमाणे

       आहे-

              “AND WHEREAS in terms of the agreement dated-14/09/1981 as agreed the VENDOR shall execute the transfer deed of proportionate undivided share in land being portion of plot no.-8 admeasuring about 1141.02 Sq.Metere (12282.88 Sq.Ft.) of area with all heritable and transferable lease hold rights in the said appropriate proportion of land in favour of buyers of each premises nominated by THE CONFIRMING PARTY.”

 

08.   तक्रारकर्त्‍याचे विक्रीपत्रात हे सुध्‍दा नमुद केलेले आहे की, पूर्वीच्‍या ग्राहक तक्रारी मधील जिल्‍हा ग्राहक मंचाचे आदेशा नुसार दोन्‍ही विरुध्‍दपक्षानीं गाळयाचे विक्रीपत्र तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून देण्‍याचे मान्‍य केलेले आहे, यावरुन असे स्‍पष्‍ट दिसून येते की, दोन्‍ही विरुध्‍दपक्ष हे “EXECUTANT”  आहेत आणि म्‍हणून विरुध्‍दपक्ष क्रं-2) याला तक्रारकर्त्‍याचे  नोंदविलेल्‍या विक्रीपत्रात सुपर बिल्‍टअप एरिया नमुद करुन तशी दुरुस्‍ती करण्‍या विषयीची आपली जबाबदारी नाकारता येणार नाही. विक्रीपत्रा मध्‍ये जर काही चुक झाली असेल किंवा करारा प्रमाणे काही आवश्‍यक मजकूर अनावधानाने नमुद करण्‍याचे राहून गेले असेल तर ते दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी दोन्‍ही विरुध्‍दपक्षांची संयुक्तिक जबाबदारी आहे.

09.   अशाप्रकारे तक्रारकर्त्‍याच्‍या नावे नोंदवून दिलेल्‍या विक्रीपत्रात गाळयाचे सुपर बिल्‍टअप एरिया क्षेत्रफळ नमुद न केल्‍यामुळे झालेली चुक दुरुस्‍त करुन देण्‍याची जबाबदारी विरुध्‍दपक्षानीं नाकरल्‍याने ही त्‍यांच्‍या सेवेतील कमतरता ठरते, त्‍यामुळे ही तक्रार दोन्‍ही विरुध्‍दपक्षां विरुध्‍द अंशतः मंजूर करुन तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येतो-

 

::आदेश:

(01)  तक्रारकर्ता डॉ.श्री राजकुमार मोहनलाल राठी यांची तक्रार, विरुध्‍दपक्ष  क्रं-(1) मेसर्स लालगुलाब प्रामोटर्स व डेव्‍हलपर्स प्रा.लि. व्‍दारा संचालक श्री माणिक कासव आणि विरुध्‍दपक्ष क्रं-(2) गुजराती समाज नागपूर व्‍दारा अध्‍यक्ष यांचे विरुध्‍द वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) अंशतः मंजूर करण्‍यात येते.

(02)  उपरोक्‍त नमुद दोन्‍ही विरुध्‍दपक्षानां आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी   तक्रारकर्त्‍याचे नावे जे दिनांक-29 मार्च, 2011 रोजी गाळयाचे विक्रीपत्र नोंदवून दिलेले आहे, त्‍या विक्रीपत्रा मध्‍ये तक्रारकर्त्‍याने विकत घेतलेल्‍या धंतोली, वर्धा रोड नागपूर स्थित सत्‍यम अपार्टमेंट मधील पहिल्‍या मजल्‍या वरील गाळा क्रं-6 (106) चे सुपर बिल्‍ट अप एरिया-40.7796 चौरसमीटर क्षेत्र नमुद केलेले नसल्‍याने, त्‍या विक्रीपत्रामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे गाळयाचे सुपर बिल्‍ट अप एरिया-40.7796 चौरसमीटर क्षेत्र नमुद करुन त्‍यानुसार विक्रीपत्र चुक दुरुस्‍तीचा लेख दोन्‍ही विरुध्‍दपक्षानीं तक्रारकर्त्‍याचे नावे नोंदवून द्दावा. चुक दुरुस्‍ती लेखाचा नमुना तक्रारकर्त्‍याला प्रथम दाखविण्‍यात यावा आणि तक्रारकर्त्‍याची त्‍यास मान्‍यता मिळाल्‍यावर चुक दुरुस्‍तीचा लेख नोंदवून द्दावा. चुक दुरुस्‍तीचा लेख नोंदवून देण्‍यासाठी येणारा  संपूर्ण खर्च दोन्‍ही विरुध्‍दपक्षांनी स्‍वतः सहन करावा.

(03)  तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल  रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्‍त) आणि तक्रारखर्च म्‍हणून रुपये-3000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्‍त) उपरोक्‍त नमुद विरुध्‍दपक्ष क्रं -(1) व क्रं-(2) यांनी वैयक्तिक आणि संयुक्तिक स्‍वरुपात (Jointly & Severally) तक्रारकर्त्‍याला द्दावेत.

(04)   सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं-(1) व क्रं-(2)  यांनी वैयक्तिक  आणि  संयुक्तिक  स्‍वरुपात (Jointly & Severally)   निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍या पासून 30 दिवसांचे आत करावे.     

(05)  प्रस्‍तुत निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना निःशुल्‍क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.      

 

 
 
[HON'BLE MR. Shekhar P.Muley]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Chandrika K. Bais]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.