तक्रारदारांना त्यांचे बिल्डर लोढा डेव्हलपर्स यांनी रु. 10,73,023/- एवढया रकमेचा हप्ता दि. 09/10/2012 तारखेपर्यंत भरणा करण्याबाबत डिमांड लेटर दिले होते. सदर डिमांड लेटरनुसार तक्रारदार व बिल्डर यांचेमध्ये झालेल्या करारानुसार Due date पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रकमेवर 18% व्याजदराची आकारणी केल्याबाबतची अट नमूद केल्याचे दिसून येते.
ड. तक्रारदारांनी दि. 20/11/2012 रोजी चेकद्वारे लोढा डेव्हलपर्स
यांचेकडे रु. 22,164/- एवढया रकमेचा भरणा केल्याचे त्यांचे
पावतीवरुन दिसून येते.
इ. तक्रारदारांना फेब्रुवारी, 2012 ते 30 ऑक्टोबर, 2012 या कालावधीत तक्रारदारांचे गृहकर्ज मंजूर करुनही वितरीत केली नाही. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे मागणी्प्रमाणे एकूण रु. 16,751/- एवढी रक्कम चेकद्वारे त्यांचेकडे भरणा केली आहे. ही बाब तक्रारीत दाखल कागदपत्रांवरुन स्पष्ट होते.
ई. सामनेवाले यांनी सदर प्रकरणात लेखी कैफियत दाखल केली नाही. तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेल्या मजकूरास कोणताही आक्षेप दाखल नाही. तक्रारदारांचा पुरावा अबाधित आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेला मजकूर ग्राहय धरणे योग्य आहे असे मंचाला वाटते.
मा. राष्ट्रीय आयोगाचे रिव्हीजन पिटीशन 753/2006 जगमोहन लाल मोहन वि. आय.सी.आय.सी.आय. होम फायनान्स कंपनी लि. आणि इतर या न्यायनिवाडयामध्ये नमूद केल्याप्रमाणे फायनान्स कंपनीने ग्राहकाचे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रांची तपासणी करणे तसेच पूर्तता करुन घेणे आवश्यक आहे.
कर्ज मंजूर केल्यानंतर वितरित करणे फायनान्स कंपनीच्या अखत्यारीत असले तरी ग्राहकांचे नुकसान होऊ न देण्याची जबाबदारी त्यांचेवर आहे. फायनान्स कंपनीने कर्ज मंजूर केल्यानंतर विहीत मुदतीत ग्राहकाच्या आवश्यकतेनुसार वितरीत करणे आवश्यक आहे. कर्ज मंजूर केल्यानंतर वितरण करण्यास नकार देणे ही फायनान्स कंपनीची सेवेतील त्रुटी आहे.
ऊ. त्याचप्रमाणे उत्तराखंड (डेहराडून) राज्य आयोगाच्या पहिले अपिल नं. 101/2008 दि. 11/5/2012 रोजीच्या न्यानिवाडयामध्ये राज्य आयोगाने वरील राष्ट्रीय आयोगाच्या न्यायनिर्णयाचा आधार घेऊन कर्ज मंजूर केल्यानंतर वितरण न करणे ही फायनान्स कंपनीची सेवेतील त्रुटी आहे असे नमूद केले आहे.
फ. मा. राष्ट्रीय आयोग व मा. राज्य आयोगाचे वर नमूद केलेले न्यायनिवाडे प्रस्तुत प्रकरणात लागू होतात असे या मंचाचे मत आहे.
तक्रारदारांना सामनेवाले यांनी कर्जाची रक्कम मंजूर करुनही वितरीत केली नाही त्यामुळे लोढा डेव्हलपर्स यांचेकडे भरणा करावयाच्या रकमेवर रु. 22,164/- एवढी व्याजाची रक्कम भरणा करावी लागली. तसेच इतर फायनान्स कंपनीकडून धावपळ करुन सदनिकेचे पुढे हप्ते भरण्यासाठी फायनान्स घ्यावे लागले. यामुळे तक्रारदारांना निश्चितच मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे.
सबब खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतोः
आ दे श