Maharashtra

Ahmednagar

MA/20/65

श्रीमती. पारुबाई विठ्ठल जावळे - Complainant(s)

Versus

मॅनेजर, लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इंशुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

काळे एन.जी.

06 Apr 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Miscellaneous Application No. MA/20/65
( Date of Filing : 20 Mar 2020 )
In
Complaint Case No. CC/20/153
 
1. श्रीमती. पारुबाई विठ्ठल जावळे
रा.कोठा,ता.नेवासा,
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मॅनेजर, लिबर्टी व्हिडिओकॉन जनरल इंशुरन्स कं.लि.
सीटी टॉवर, ऑफिस नंबर/६०१/६०२, ६वा मजला, बोट क्‍लब रोड, बंडगार्डन,
पुणे
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:काळे एन.जी., Advocate for the Appellant 1
 
Dated : 06 Apr 2021
Final Order / Judgement

किरकोळ अर्जावर आदेश

आदेश दिनांक – ०६/०४/२०२१

 (द्वारा मा. अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

__________________________________________________________

१.  तक्रारदाराने नोडल ऑफीसरद्वारे सामनेवाले कंपनीकडुन शेतकरी अपघात विमा करीता विमा दावा दाखल केला होता. सदर विमा मंजुरीबाबत कोणतीही माहिती सामनेवालेकडुन मिळाली नसल्‍याने तक्रारदाराला सदर तक्रार दाखल करणेकरीता विलंब झालेला आहे व सदर विलंब माफ करून तक्रारदाराची तक्रार  दाखल करून घेण्‍यात यावी, असा विनंती अर्ज सादर केलेला आहे.

२.  सदर अर्जावर सामनेवाले यांना नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस प्राप्‍त  झाल्‍यावर सामनेवाले हजर होऊन असे नमुद केले आहे की, विलंब माफ करणेची प्रत्‍येक दिवसाचे कारण नमुद केलेले नाही व विलंबाबाबत कोणतेही कागदपत्र जोडलेले नाही. तक्रारदाराचा विलंब माफीचा अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा. 

३.   उभयपक्षांचा सदर अर्जावर युक्तिवाद ऐकण्‍यात आला. सामनेवाले कंपनीने जबाबात असे नमुद केले आहे की, तक्रारदाराचा विमा दावा नाकारलेबाबत त्‍याची माहिती तक्रारदाराला दिनांक २५-०७-२०१६ रोजी पत्राद्वारे देण्‍यात आली होती. परंतु सदर पत्र पाठविलेबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा किंवा पोस्‍ट पावतीचा पोहच अहवाल सादर केलेला नाही. म्‍हणुन सामनेवाले विमा कंपनीने विमा क्‍लेम नाकारलेबाबत पत्र तक्रारदाराला दिले होते, ही बाब प्रथमदर्शनी सिध्‍द करू शकले नाही व माहितीचे अभावामुळे तक्रारदाराला सदर तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत घडत राहीले आहे, असे आयोगाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

आ दे श

१. तक्रार दाखल करण्‍याचे कारण सतत घडत असल्‍याने सदर अर्ज नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.  

२. उभयपक्षकार यांनी सदर अर्जाचा खर्च स्‍वतः सहन करावा.  

३. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.