Maharashtra

Ahmednagar

CC/20/288

श्रीमती.अलका वालीराम दातिर - Complainant(s)

Versus

मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड.नितीन काळे

23 Oct 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/20/288
( Date of Filing : 14 Oct 2020 )
 
1. श्रीमती.अलका वालीराम दातिर
रा. पिंपळी लौकी,ता. संगमनेर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि.
पुणे रिजनल ऑफिस, ४था मजला, पी.एम.टी बिल्डिंग, डेक्कन, पुणे ४११००४ मॅनेजर, नॅशनल इंशुरन्स कं.लि. अबंर प्लाझा बिल्डिंग, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:अ‍ॅड.नितीन काळे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Oct 2020
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २३/१०/२०२०

 (द्वारा अध्‍यक्ष : श्री.विजय चंद्रलाल प्रेमचंदानी)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने सदर तक्रार विलंब माफीचे अर्जासोबत शेतकरी अपघात विमा मिळण्‍याकरीता दाखल केलेली आहे. सदर तक्रारीची पडताळणी करतांना असे दिसुन आले की, तक्रारदाराने पुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार क्रमांक १९/५३ दाखल केली असुन सदर तक्रार प्रलंबीत आहे. सदर बाबीचा उल्‍लेख तक्रारदाराने तक्रारीत केलेला नाही व खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारदारातर्फे वकील आज हजर झाले व सदर तक्रार पुढे चालु इच्‍छीत नाही म्‍हणुन पुरसीस सादर केली. तक्रारदाराने पुर्वी या आयोगासमोर (पुर्वीचे मंच) ग्राहक तक्रार क्रमांक १९/५३ दाखल केली होती.  ही बाब तक्रार व विलंब माफीचे अर्जात लपवीलेली आहे. सबब खालील प्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

अंतिम आ दे श

१)  तक्रारदार सदर तक्रार पुढे चालविण्‍यास इच्‍छुक नाही म्‍हणुन सदर तक्रार नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

२) तक्रारदाराने यापुर्वी ग्राहक तक्रार क्रमांक १९/५३ दाखल केली आहे, ही बाब लपवुन सदर तक्रार दाखल केली म्‍हणुन तक्रारदाराला रक्‍कम रूपये २,०००/- (अक्षरी दोन हजार) दंड बसविण्‍यात येत आहे.

३) तक्रारदाराने दंडाची रक्‍कम ग्राहक निधी खात्‍यामध्‍ये जमा करावी, असे निर्देश देण्‍यात येत आहे.

४) वरील नमुद आदेशाची पुर्तता तक्रारदाराने आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत करावी.

५) तक्रारदाराने वरील नमुद दंडाची रक्‍कम आदेशाची प्रत मिळाल्‍यापासुन ३० दिवसांचे आत भरली नाही तर प्रबंधकांना निर्देश देण्‍यात येत आहे की, सदर रक्‍कम वसुलीकरीता ग्राहक संरक्षण     कायदा २०१९ चे कलम ७१ खाली मंचासमक्ष अर्ज सादर करावा.  

६)  तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

७)  या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

८) वर नमुद आदेशाचे अनुषंगाने किरकोळ अर्ज क्रमांक २०/१२५ नस्‍तीबध्‍द करण्‍यात येत आहे.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.