Maharashtra

Ahmednagar

RBT/CC/18/232

दिगंबर हरीभाऊ कोते - Complainant(s)

Versus

मॅनेजर, कांकरीया अॅटो मोबाईल्‍स प्रा.लि. - Opp.Party(s)

एम.एन.सोले

02 Mar 2019

ORDER

District Consumer Disputes Redressal Forum,Ahmednagar.
judgement
Office Phone No.(0241)2347917
 
Complaint Case No. RBT/CC/18/232
 
1. दिगंबर हरीभाऊ कोते
रा.साई पालखी रोड, शिर्डी, ता.राहाता
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅनेजर, कांकरीया अॅटो मोबाईल्‍स प्रा.लि.
नगर मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
2. वर्कशॉप मॅनेजर, कांकरीया अॅटो मोबाईल्‍स प्रा.लि.
एम.आय.डी.सी. अहमदनगर
अहमदनगर
महाराष्‍ट्र
3. के.सेन.गुप्‍ता, सर्व्हिस इनचॉर्ज/अॅथोराईज्‍ड सिग्‍नेचरी
कांकरीया अॅटो मोबाईल्‍स प्रा.लि. शाखा- राहाता, राहाता
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:एम.एन.सोले, Advocate
For the Opp. Party: रव्रिद्र सुधाकर बेद्रे, Advocate
Dated : 02 Mar 2019
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा-श्री.महेश एन.ढाके - मा.सदस्‍य )

1.   तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये दाखल केली आहे. 

2.   तक्रारदाराची तक्रार थोडक्‍यात येणे खालील प्रमाणे ः-

     सामनेवाला नं.1 मारुती सुझुकी कंपनीच्‍या कारचे अहमदनगर जिल्‍हयाचे डिलर आहेत. तक्रारदाराने सामनेवालाकडे मारुती कंपनीची मारुती इर्टीका गाडी बुकींग करुन दिनांक 11.04.2013 रोजी ताब्‍यात घेतली. सदर गाडीचा रजि.नं.एम.एच.17/एजे-7874 असा आहे. सदर गाडीमध्‍ये अव्‍हरेज कमी, फ्रंट व रिअर सस्‍पेन्‍शनमध्‍ये आवाज इ.तांत्रीक दोष असल्‍याचे आढळुन आल्‍यामुळे तक्रारदाराने सामनेवाला नं.3 चे निदर्शनास आणुन दिले. सामनेवाला नं.3 यांचे पत्रानुसार तक्रारदाराने सदर गाडी सामनेवाला नं.2 यांचे वर्क शॉपला दिनांक 17.10.2014 रोजी दुरुस्‍तीसाठी दिली. त्‍यावेळी गाडीचे रनिंग 37000 कि.मी. एवढे होते. तथापी तक्रारदार गाडी घेणेसाठी गेले असता सामनेवाला नं.2 यांनी गाडी पुर्णपणे दुरुस्‍त करुन दिली नाही व गाडीचे रनिंग 46674 असल्‍याचे व गाडीचा बेकायदा वापर केल्‍याचे निदर्शनास आले. गाडीची दुरुस्‍ती वॉरंटी कालावधीमध्‍ये असतांना देखील दिनांक 22.10.2014 रोजी सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराकडून रुपये 20,000/- बेकायदा वसुल केले. सदर रक्‍कम व नुसान भरपाईची मागणी सामनेवाला यांचेकडे केली असता तक्रारदारास दिली नाही. सबब तक्रारदाराने अर्ज दाखल करुन परिच्‍छेद क्र.15 मधील मागणीप्रमाणे अर्ज मंजूर करावा अशी विनंती केली आहे.

3.   सामनेवाला नं.2 यांनी लेखी कैफियत निशाणी 12 वर दाखल करुन तक्रारदाराने सामनेवालाकडून वाहन खरेदी केले ही बाब मान्‍य केली. सामनेवाला यांचे असे कथन की, दिनांक 17.10.2014 रोजी तक्रारदाराने गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 46674 कि.मी.इतके होते व ते 37000 होते हे तक्रारदाराचे म्‍हणणे चुकीचे आहे. त्‍यामुळे मारुती वॉरंटी पॉलीसीनुसार तक्रारदाराला मोफत सेवेची सवलत उपलब्‍ध न झाल्‍यामुळे सामनेवाले यांनी रिपेअरिंगचे रुपये 20,000/- कायदेशिर घेतले. तक्रारदाराने रक्‍कम रुपये 1,42,815/- ची केलेली मागणी बेकायदेशिर असुन सदर नुकसान भरपाई देणेचा प्रश्‍नच उदभवत नाही. सबब अर्ज खर्चासह खारीज करण्‍यात यावा अशी विनंती सामनेवाला नं.2 यांनी केली आहे.

4.   प्रस्‍तूत तक्रार क्रमांक 462/2014 मध्‍ये दिनांक 31.03.2016 रोजी मे.मंचाने आदेश पारीत केले. सदर निकालाचे विरुध्‍द सामनेवाला यांनी मा.राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई यांचे परीक्रमा खंडपीठ औरंगाबाद यांचेकडे फस्‍ट अपील क्र.228/2016 दिनांक 04.05.2016 रोजी दाखल केले. सदर अपीलामध्‍ये मा.औरंगाबाद खंडपीठ आयोगाने आदेश पारीत केले. ग्राहक संरक्षण कायदयाच्‍या अनुषंगाने अध्‍यक्ष व दोन सदस्‍य यांच्‍या स्‍वाक्षरीने मे.मंचाचा निकाल पारीत होत असतो. व त्‍यामध्‍ये स्‍वाक्षरी करणे आवश्‍यक असते. परंतु ग्राहक तक्रार क्र.462/2014 मघ्‍ये जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अहमदनगर यांनी सदर प्रकरणामध्‍ये अंतिम आदेश पारीत केला व त्‍यात एका सदस्‍यांची स्‍वाक्षरी नसल्‍याने सदर प्रकरण पुन्‍हा सुनावणीकरीता आदेशीत करण्‍यात आले. सदर प्रकरणामध्‍ये दिनांक 21.07.2017 आदेश पारीत झाला. त्‍या अनुषंगाने ग्राहक तक्रार क्रमांक 462/2014 मध्‍ये पुन्‍हा प्रस्‍तुत केस नोंदणीकृत करण्‍यात आली व सदर केसला RBT-CC-18-232 असा क्रमांक देण्‍यात आला.त्‍या अनुषंगाने उभय पक्षकारांना सुनावणीकरीता आदेश देण्‍यात आले त्‍यानुसार दिनांक 05.10.2017 रोजी मे.मंचाने सामनेवाला यांना नोटीस समन्‍स काढण्‍याचा आदेश केला. सदर प्रकरणी सामनेवाला नं.1  हे दिनांक 18.11.2017 रोजी हजर झाले. त्‍यानुसार त्‍यांनी दिनांक 22.10.2014 रोजी निशाणी 27 सोबत असल्‍लल प्रत, वादग्रस्‍त वाहनाचे जॉब कार्ड तसेच वादग्रस्‍त वाहनाचे व्हिकलची हिस्ट्रीची प्रत दाखल करण्‍यात आली. दिनांक 30.10.2014, 22.10.2014, 17.06.2014,20.10.2013 व 25.07.2013 यांच्‍या अस्‍सल प्रती जोडल्‍या आहेत.

5.   निशाणी 28 ला तक्रारदारानी वकीलांना नेमले. निशाणी 29 वर तक्रारदाराने लेखी युक्‍तीवाद दाखल केले. निशाणी 30 ला सामनेवाला क्र.1 यांनी युक्‍तीवाद दाखल केला.

6.   तक्रारदार व सामनेवाला यांचे वकीलांनी दाखल केलेला युक्‍तीवाद तसेच उभय पक्षकरांनी दाखल केलेली कागदपत्रे, दाखल केलेले पुराव्‍यावरुन न्‍याय मंचासमोर  न्‍याय निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

    

             मुद्दे  

      उत्‍तर

1.

मागणी प्रमाणे निशाणी 1 मंजुर होण्‍यास लायक आहे काय.?                    

 

... होय.

2.

आदेश काय ?

...अंतीम आदेशानुसार.

 

का र ण मि मां सा

7.   मुद्दा क्र.1  – तक्रारदाराने आपल्‍या अर्जाचे पुष्‍टयर्थ गाडी खरेदीचे बिल, सामनेवाला नं.1 यांनी सामेनवाला नं.2 यांना दिनांक 17.10.2014 रोजी दिलेले पत्र ज्‍यामध्‍ये गाडीचे रनिंग 37000 कि.मी. झाल्‍याचे नमुद आहे. वॉरंटी पॉलीसी, सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराकडुन घेतलेली रक्‍कम रुपये 20,000/- चा कॅश मेमो दिनांक 22.10.2014 व रुपये 716/- चा कॅश मेमो दिनांक 27.10.2014, सामनेवाला नं.2 यांना दिनांक 30.10.2014 रोजी पाठविलेली नोटीस व त्‍याची पोहोच पावती इ.कागदपत्रे निशाणी 6 सोबत दाखल केलेली आहेत.

8.   तक्रारदाराने सामनेवालाकडून वाहन खरेदी केले ही बाब वादातील नाही. तथापी सामनेवाला नं.2 चे विद्वान वकीलांनी असा युक्‍तीवाद केला की, दिनांक 17.10.2014 रोजी तक्रारदाराने गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली. त्‍यावेळी गाडीचे रनिंग 46674 कि.मी.इतके होते व त्‍यामुळे मारुती वॉरंटी पॉलीसीनुसार गाडीचे रनिंग 40000 कि.मी.पेक्षा जास्‍त झाल्‍यामुळे तक्रारदाराला मोफत सेवेची सवलत उपलब्‍ध झाली नाही. व त्‍यामुळे सामनेवाले यांनी रिपेअरिंगचे रुपये 20,000/- कायदेशिर घेतले. सदरचा युक्‍तीवाद योग्‍य आहे किंवा नाही हे दाखल कागदपत्रावरुन पाहाणे गरजेचे आहे.

9.   तक्रारदाराचे विदवान वकीलांनी या मंचाचे लक्ष दाखल केलेला दस्‍त निशाणी 6/2 वर वेधले व असा युक्‍तीवाद केला की, दिनांक 17.10.2014 रोजी तक्रारदाराने गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 37000 कि.मी.इतके होते. सदर दस्‍ताचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, सामनेवाला नं.3 यांनी सामनेवाला नं.2 यांना दिनांक 17.10.2014 चे पत्रान्‍वये गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली त्‍यावेळी तक्रारदाराचे गाडीचे रनिंग 37000 कि.मी. होते असे कळविले. तसेच दस्‍त निशाणी 6/4 जॉब कार्ड वरुन दिनांक 22.10.2014 रोजी गाडी तक्रारदाराचे ताब्‍यात दिली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 46674 कि.मी.असल्‍याचे दिसुन येते. दस्‍त निशाणी 6/2 वर सामनेवाले यांनी काहीही भाष्‍य केले नाही. यावरुन दिनांक 17.10.2014 ते 22.10.2014 या कालावधीमध्‍ये सामनेवाला नं.2 यांनी बेकायदेशिररित्‍या गाडीचा गैरवापर केला हे स्‍पष्‍ट होते. व त्‍यामुळे तक्रारदार त्‍यापोटी नुकसान भरपाई मिळणेस पात्र असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

10.  सामनेवाला यांनी निशाणी 27 सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्राचे अवलोकन केले. त्‍यावरील मेकॅनिक प्रदीप थोरात, किशोर राऊत व इतरांची अॅफिडेव्‍हीट या प्रकरणामध्‍ये दाखल केलेली नाहीत.

11.  तक्रारदाराने प्रति किलोमीटर रुपये 15/- प्रमाणे एकुण रक्‍कम रुपये 1,42,815/- एवढी नुकसान भरपाईपोटी मागणी केली आहे. हे दर्शविण्‍यासाठी तक्रारदाराने साई राजे टुर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स, शिर्डी यांचे बिल निशाणी 22 वर दाखल केले आहे. सदर बिलाचे अवलोकन केले असता दिनांक 08.11.2014 रोजी मारुती इर्टीका गाडीचे प्रति किलोमीटर रुपये 15/- प्रमाणे भाडे होते. तथापी बिल निशाणी 22 चे पुष्‍टयर्थ तक्रारदाराने साई राजे टुर्स अॅन्‍ड ट्रॅव्‍हल्‍स, शिर्डी येथील संबंधीत व्‍यक्‍तीचे शपथपत्र अथवा इतर सबळ व ठोस पुरावा दाखल केला नाही अथवा न करण्‍याचे कारणही दिले नाही. तसेच दस्‍त निशाणी 22 मध्‍ये नमुद गाडी पेट्रोलवर अथवा डिझेलवर चालणारी होती हे दर्शविणारा कोणताही दस्‍त या मंचासमोर दाखल नाही. सबब दिनांक 08.11.2014 रोजी मारुती इर्टीका गाडीचे प्रति किलोमीटर रुपये 15/- प्रमाणे भाडे होते हा दर्शविणारा दस्‍त निशाणी 22 विचारात घेणे योग्‍य होणार नाही. अशा परिस्थितीत सन 2014 मध्‍ये मारुती इर्टीका गाडीचे प्रति किलोमीटर रुपये 12/- प्रमाणे भाडे विचारात घेणे न्‍यायोचित होईल.

12.  तक्रारदाराचे अर्जातील कथनानुसार दिनांक 17.10.2014 ते 22.10.2014 या कालावधीमध्‍ये सामनेवाला नं.2 यांनी बेकायदेशिररित्‍या 9521 कि.मी. गाडीचा गैरवापर केला. तथापी दस्‍त निशाणी 6/2 दिनांक 17.10.2014 चे पत्रान्‍वये गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली त्‍यावेळी तक्रारदाराचे गाडीचे रनिंग 37000 कि.मी. होते व दस्‍त निशाणी 6/4 जॉब कार्डवरुन दिनांक 22.10.2014 रोजी गाडी तक्रारदाराचे ताब्‍यात दिली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 46674 कि.मी. होते. यावरुन सामनेवाला नं.2 यांनी बेकायदेशिररित्‍या 9521 कि.मी.गाडीचा गैरवापर केल्‍याचे तक्रारदाराचे कथन आहे. सबब तक्रारदार प्रति किलोमीटर रुपये 12/- प्रमाणे 9521 कि.मी. ची होणारी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये 1,14,252/- मिळणेस पात्र असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

13. तक्रारदाराचे अर्जातील कथन की, गाडीची दुरुस्‍ती वॉरंटी कालावधीमध्‍ये असतांना देखील दिनांक 22.10.2014 रोजी सामनेवाला नं.2 यांनी तक्रारदाराकडून रुपये 20,000/- बेकायदा वसुल केले. या कथनाचे पुष्‍यर्थ तक्रारदाराचे विदवान वकीलांनी निशाणी 6/3 वर दाखल वॉरंटी पॉलीसीच्‍या अटीकडे वेधले. सदर अट नं.2 खाली उधृत करणे गरजेचे आहे.

(2) The term of the warranty shall be twenty four months or 40,000 kilimeters (whichever ccurs first) from the date of delivery to the first owner.

उपरोक्‍त अटीचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की, मुळे मालकाने गाडी ताब्‍यात घेतल्‍यापासून 24 महिने किंवा 40000 कि.मी.यापैकी जी घटना अगोदर घडले तो कालावधी हा वॉरंटी कालावधील समजला जाईल. प्रस्‍तुतचे प्रकरणात प्रथम मालक तक्रारदार असुन त्‍यांनी गाडीचा ताबा दिनांक 11.04.2013 रोजी घेतला व गाडीत दोष आढळुन आल्‍याने दिनांक 17.10.2014 रोजी सामनेवाला नं.2 यांचे ताब्‍यात दिली व त्‍यावेळी गाडीचे रनिंग 37000 कि.मी. झाल्‍याचे पत्र निशाणी 6/2 वरुन स्‍पष्‍ट होते. यावरुन वॉरंटी कालावधीमध्‍येच गाडी दुरुस्‍तीसाठी सामनेवाला नं.2 यांचे ताब्‍यात दिली. सबब दिनांक 17.10.2014 रोजी तक्रारदाराने गाडी रिपेअरसाठी वर्कशॉपमध्‍ये दिली त्‍यावेळी गाडीचे रनिंग 46674 कि.मी. इतके होते व त्‍यामुळे मारुती वॉरंटी पॉलीसीनुसार तक्रारदाराला मोफत सेवेची सवलत उपलब्‍ध होत नसल्‍यामुळे सामनेवाले यांनी रिपेअरींगचे रुपये 20,000/- कायदेशिर घेतले हा सामनेवाला यांचा बचाव हा केवळ बचाव असुन तो संयुक्तिक वाटत नाही. सबब सामनेवाला नं.2 यांनी रिपेअरींगपोटी घेतलेली रक्‍कम रुपये 20,000/- परत मिळणेस तक्रारदार पात्र असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.

14. उपरोक्‍त विवेचनावरुन सामनेवाला नं.2 यांनी गाडी दुरुस्‍तीपोटी घेतलेली रक्‍कम रुपये 20,000/- व नुकसान भरपाई रक्‍कम रुपये 1,14,252/- अशी एकुण रक्‍कम रुपये 1,34,252/- तक्रारदार मिळणेस पात्र आहेत.

15.  गाडी दुरुस्‍तीपोटी सामनेवाला नं.2 यांनी घेतलेली रक्‍कम व नुकसान भरपाईची मागणी तक्रारदाराने नोटीसीव्‍दारे करुनही ती न मिळाल्‍यामुळे तक्रारदारास निश्चितच मानसिक त्रास सहन करावा लागला. सबब त्‍यापोटी तसेच या अर्जाचे खर्चापोटी तक्रारदाराला काही रक्‍कम मंजुर करणे न्‍याय संगत होईल. सामनेवाला नं.3 हे सामनेवाला कंपनीत नोकरीस आहेत. तसेच अर्ज निशाणी 1 मधील कथनाचे बारकाईने अवलोकन केले असता असे दिसून येते की, तक्रारदाराने उपरोक्‍त रकमेची मागणी सामनेवाला नं.3 यांचेकडून केलेली नाही. सबब सामनेवाला नं.3 विरुध्‍द उपरोक्‍त रक्‍कम देणेचा हुकूम करणे न्‍यायोचित होणार नाही. सबब मुद्दा क्र.1 चे उत्‍तर अंशतः होकारार्थी देण्‍यात येते.

16.  मुद्दा क्र.2 - मुद्दा क्र.1  चे विवेचनावरुन खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

- अं ति म आ दे श

1.   तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

2.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदाराची मारुती इर्टीका गाडी रजि.नं.एम.एच-17/एजे-7874 च्‍या दुरुस्‍तीपोटी घेतलेली रक्‍कम रुपये 20,000/- (रक्‍कम रुपये वीस हजार फक्‍त) व नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये 1,14,252/- (रक्‍कम रुपये एक लाख चौदा हजार दोनशे बावन्‍न फक्‍त.)  अशी एकुण रक्‍कम रुपये 1,34,252/- (रक्‍कम रु.एक लाख चवतीस हजार दोनशे बावन्‍न फक्‍त)  या निकालाचे तारखेपासून 30 दिवसांचे आत तक्रारदारास अदा करावी. सामनेवाले यांनी दिलेल्‍या मुदतीत रक्‍कम न दिल्‍यास त्‍यावर द.सा.द.शे.6 टक्‍के प्रमाणे तक्रार दाखल तारखेपासून म्‍हणजेच दिनांक 17.11.2014 पासुन रक्‍कम देईपावेतो होणारे व्‍याज तक्रारदारास द्यावे.

3.   सामनेवाला नं.1 व 2 यांनी तक्रारदार यांना झालेल्‍या शारीरीक व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- (रक्‍कम रु.दोन हजार फक्‍त) व तक्रारीचा खर्च 3,000/- (रक्‍कम रु.तीन हजार फक्‍त ) तक्रारदारास द्यावे. वप त्‍यांनी या तक्रार अर्जाचा खर्च स्‍वतः सोसावा.

4.   तक्रारदाराचा अर्ज निशाणी 1 सामनेवाला नं.3 यांचेविरुध्‍द खारीज करण्‍यात येते.

5. वरील नमुद आदेशाची पुर्तता सामनेवाला नं.1 व 2 यांनी एकत्रित व संयुक्‍तीकरित्‍या या आदेशाची प्रत मिळण्‍यापासून 30 दिवसाचे आत करावी.

6. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

7. तक्रारदार यांना या प्रकरणाची “ब” व “क” फाईल परत करावी.

 

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.