Maharashtra

Pune

CC/12/227

श्री चंद्रशेखर ढेकणे - Complainant(s)

Versus

मॅक्‍स लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि,मुख्‍य व्‍यवस्‍थापक - Opp.Party(s)

01 Nov 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/12/227
 
1. श्री चंद्रशेखर ढेकणे
692/2अ/112/23,कल्‍याणीसोसा.प्‍लॅट नं.बी/2,पुणे-सातारारोड,पुणे37
पुणे
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मॅक्‍स लाईफ इन्‍शुरन्‍स कं.लि,मुख्‍य व्‍यवस्‍थापक
सिटीमॉलबिल्‍डींग4थामजला गणेशखिंडरोड,शिवाजीनगर, पुणे
पुणे
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. V. P. UTPAT PRESIDENT
 HON'ABLE MR. S.K. Pacharne MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे अ‍ॅड. घोणे हजर. 
जाबदेणार गैरहजर (एकतर्फा)
 
 
द्वारा मा. श्री. व्ही. पी. उत्पात, अध्यक्ष
 
** निकालपत्र **
 (01/11/2013)
      प्रस्तुतची तक्रार ही तक्रारदारांनी जाबदेणार इन्शुरन्स कंपनीविरुद्ध सेवेतील त्रुटीबाबत ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे. यातील कथने खालीलप्रमाणे आहेत.
 
1]    जाबदेणार यांची इन्शुरन्स कंपनी असून तक्रारदार यांनी जाबदेणार यांचेकडून दोन विमा पॉलिसी दि. 05/02/2008 रोजी घेतल्या होत्या. त्या पॉलिसींचे नंबर  457626000 व 457626059 असे होते व त्यांचा वार्षिक हप्ता रक्कम रु. 30,000/- होता. तक्रारदार यांनी विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की, भरलेल्या हप्त्यामधून 30% अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस कापलेले आहेत. त्यावेळी तक्रारदार यांनी याविषयी तक्रार केली व पॉलिसी रद्द करण्याचे ठरविले. परंतु, जाबदेणार यांनी असे सांगितले की, त्यांनी जर पॉलिसी रद्द केली तर सर्व रक्कम बुडीत होईल व नियमानुसार तीन वार्षिक हप्ते भरणे आवश्यक आहे. अशाप्रकारे, तक्रारदार यांनी दोन्ही पॉलिसीच्या पोटी रक्कम रु. 10,500/- व रु. 90,000/- भरले. तीन वर्षांनंतर सर्व रक्कम परत मिळणार असे आश्वासन देऊनही तक्रारदार यांनी भरलेल्या रकमेतून रक्कम रु. 31,500/- व रक्कम रु. 27,000/- अ‍ॅडमिनिस्ट्रेटीव्ह चार्जेस म्हणून वजा केले. त्याचप्रमाणे तीन वर्षात पॉलिसी परत केल्यामुळे रक्कम रु. 18,000/- कॅन्सलेशन चार्जेस म्हणून वजा केले. जाबदेणार यांनी दि. 16/12/2011 ऐवजी दि. 19/12/2011 रोजी पॉलिसी रद्द केली, त्यामुळे तक्रारदार यांचे नुकसान झाले. तक्रारदार यांनी भरलेल्या रक्कम रु.1,05,000/- पैकी रक्कम रु. 69,848/- तर रक्कम रु. 90,000/- पैकी रक्कम रु.57,023/- देण्यात आले. अशा प्रकारे एकुण रक्कम रु. 1,95,000/- पैकी रक्कम रु.81,500/- चुकीच्या पद्धतीने जाबदेणार यांनी वजा केले. सदरची रक्कम न देऊन जाबदेणार यांनी सेवेमध्ये त्रुटी निर्माण केलेली असून सदरची रक्कम बिनव्याजी वापरली आहे, म्हणून तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. त्यामध्ये जाबदेणार यांनी बेकायदेशिररित्या वजा केलेली रक्कम रु. 81,500/-, एकुण रकमेवर 18% व्याज, मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून 25,000/- व कोर्ट खर्च रु.15,000/- ची मागणी केलेली आहे.
 
 
2]    प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये जाबदेणार नोटीस बजवूनदेखील गैरहजर राहीले, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध हे प्रकरण गुणवत्तेवर एकतर्फा चालविण्यात येत आहे.
 
3]    तक्रारदार यांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र , त्यांनी भरलेल्या हप्त्यांच्या पावत्या, जाबदेणार यांनी कमी दिलेल्या रकमेचा तपशील इ. कागदपत्रे दाखल केली. तक्रारदार यांनी दाखल केलेला पुरावा निरुत्तर करण्यासाठी जाबदेणार यांनी कोणताही लेखी पुरावा किंवा पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केलेल्या नाहीत. तक्रारदार यांनी दाखल केलेल्या पुराव्यावरुन हे स्पष्ट होते की, जाबदेणार यांनी तक्रारदाराच्या पॉलिसीतील रकमेतून बेकायदेशररित्या वजावटी केलेल्या आहेत व अशाप्रकारे सेवा देण्यामध्ये कसुर केलेली आहे म्हणून जाबदेणार हे तक्रारदारास बेकादेशिररित्या वजा केलेली रक्कम व नुकसान भरपाई देण्यास पात्र आहेत. वर उल्लेख केलेले कथनांचा विचार करता, खालील आदेश पारीत करण्यात येतो.
** आदेश **
1.                  तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
 
2.    जाबदेणार यांनी तक्रारदारांच्या विमापॉलिसीतून
बेकायदेशिररित्या रक्कम वजा करुन सेवेमध्ये
कसूर केलेली आहे, असे जाहीर करण्यात येते.
 
3.    जाबदेणार यांनी तक्रारदार यांना विमापॉलिसीतून
बेकायदेशिररित्या वजा केलेली रक्कम म्हणजे
रक्कम रु. 81,500/- (रु. एक्याऐंशी हजार पाचशे
फक्त), त्याचप्रमाणे नुकसान भरपाईपोटी रक्कम
रु. 5,000/- (रु. पाच हजार फक्त) व तक्रारीचा
खर्च म्हणून रक्कम रु. 2,000/- (रु. दोन हजार
फक्त) या आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍यापासून
सहा आठवडयांच्‍या आत द्यावेत.
 
 
4.    आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्‍क
पाठविण्‍यात यावी.
 
5.    पक्षकारांना असे आदेश देण्यात येतात की
त्यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक
महिन्याच्या आंत सदस्यांकरीता दिलेले तक्रारीचे
संच घेऊन जावेत, अन्यथा सदरचे संच नष्ट
करण्यात येतील.
 
 स्थळ : पुणे
दिनांक : 01/नोव्हे./2013
 
 
[HON'ABLE MR. V. P. UTPAT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.K. Pacharne]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.