Maharashtra

Bhandara

CC/21/87

हेमंत बकाराम मूरकूटे - Complainant(s)

Versus

मूख्‍य कार्यकारी अधिकारी अभियंता - Opp.Party(s)

श्री. व्‍ही.डी.सातदेवे

08 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/21/87
( Date of Filing : 24 Aug 2021 )
 
1. हेमंत बकाराम मूरकूटे
रा.पालोरा तह.मोहाडी जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मूख्‍य कार्यकारी अधिकारी अभियंता
मा.राज्‍य विद्यूत वितरण कार्यालय विद्युत उपकेंद्र करडी
भंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MR. NITIN M. GHARDE MEMBER
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Jul 2022
Final Order / Judgement

(पारित दिनांक-08 जुलै, 2022)

(पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी. योगी, मा.अध्‍यक्ष )

 

01.  तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित करडी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा  यांचे विरुध्‍द  ग्राहक संरक्षण अधिनियम-2019 चे कलम-35 अन्‍वये प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्‍दपक्षाचे दोषपूर्ण सेवे बाबत  दाखल केलेली आहे.

 

02.     तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

    तक्रारकर्ता हे त्‍यांचे कुटूंबासह वारसाहक्‍काने मागील 60 वर्षा पासून राहत असून तेथेच त्‍यांचे दुकान सुध्‍दा आहे. त्‍यांचे घरी त्‍यांचे वडीलांचे नावे असलेले विद्दुत मीटर हे काहीही कारण नसताना विरुध्‍दपक्ष यांनी दिनांक-07.07.2021 रोजी कायमस्‍वरुपी काढून नेले. तत्‍पूर्वी नोव्‍हेंबर 2020 मध्‍ये त्‍यांची सर्व्‍हीस केबल खंडीत करण्‍यात आली होती. या संदर्भात विरुध्‍दपक्ष यांचे कडे वारंवार विचारणा केल्‍या नंतर त्‍यांनी सांगितले की, खूप जुने मीटर असल्‍याने तो काढलेला असून त्‍याऐवजी नवीन डिजीटल विद्दुत मीटर बसवून देण्‍यात येईल परंतु आज पावेतो नविन विद्दुत मीटर बसवून दिले नाही. वस्‍तुतः तक्रारकर्ता हे 60 वषा्र पासून विरुध्‍दपक्ष विज विरण कंपनीचे ग्राहक असून त्‍यांची विजेची सेवा खंडीत झालेली आहे. त्‍यांचे  घर व दुकान असल्‍यामुळे विजेची अत्‍यंत आवश्‍यकता असलयाने तयांनी शेजारुन तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात विद्दुत संदर्भात मदत घेतली आहे परंतु विरुध्‍दपक्ष हे त्‍यातही अडथळा निर्माण करीत आहे त्‍यामुळे त्‍यांनी  शेवटी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन त्‍याव्‍दारे विरुध्‍दपक्षा विरुध्‍द खालील प्रकारच्‍या मागण्‍या केल्‍यात-

 

  1. तक्रारकर्ता यांचे कडे विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी यांनी पूर्ववत नविन विद्दुत मीटर लावून विज पुरवठा पूर्ववत सुरु करुन देण्‍याचे आदेशित व्‍हावे.  

 

  1. विद्दुत मीटरचे अभावी तक्रारकर्ता यांची झालेली नुकसानी बद्दल भरपाई म्‍हणून रुपये-2,00,000/- विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद तक्रारकर्ता याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.          जिल्‍हा ग्राहक आयोग, भंडारा यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे लेखी उत्‍तर दाखल करण्‍यात आले. त्‍यांनी लेखी उत्‍तरात प्राथमिक आक्षेप घेतला की, करडी, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा येथे कनिष्‍ठ अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित  तर कार्यकारी अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी विद्दुत भवन भंडारा असे पद अस्तित्‍वात आहे परंतु तक्रारकर्ता यांनी तक्रारी मध्‍ये चुकीचे प्रतिपक्ष केल्‍याने मा.जिल्‍हा ग्राहक आयोगाने तक्रारी मध्‍ये योग्‍य ते प्रतिपक्ष करण्‍याचे तक्रारकर्ता यांना आदेशित करावे.

          विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे विशेष लेखी  उत्‍तरात नमुद केले की, तक्रारकर्ता हे स्‍वच्‍छ हाताने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष आलेले नाहीत. तक्रारकर्तायांनी मा. दिवाणी  न्‍यायाधीश कनिष्‍टस्‍तर मोहाडी येथे रे.दि.दा.क्रं-23/2020 हेमंत विरुध्‍द सुखदेव व ईतर दाखल केलेला आहे आणि सदर दाव्‍यामध्‍ये वादी श्री हेमंत मुरकूटे यांनी कायमस्‍वरुपी मनाई हुकूम व हक्‍काच्‍या  जाहिरनाम्‍या करीता दाखल केलेला आहे तसेच सदर दाव्‍या मध्‍ये तात्‍पुरता मनाई हुकूम मिळण्‍यासाठी अर्ज केलेला आहे, त्‍यामध्‍ये विद्दुत पुरवठा करण्‍या करीता प्रार्थना केलेली आहे. सदर तात्‍पुरत्‍या मनाई हुकूमाच्‍या अर्जावर दिनांक-15.12.2020 रोजी दिवाणी न्‍यायालयाचे  आदेश पारीत केलेला
आहे.  न्‍यायालयाचे सदर आदेशामध्‍ये असे नमुद करण्‍यात आले की, “The plaintiff mutating his name in Gram Panchayat at record get new connection of electricity by following proper procedure.   The defendant No . 1 has not objection for mutation of 300 Sq.Ft. area in the name of plaintiff as per mutual partition, as contended.  तक्रारकर्ता आणि सुखदेव बकाराम मुरकूटे यांचे मध्‍ये जागेचा विवाद होता आणि दिवाणी न्‍यायालयाने तक्रारकर्त्‍याचे 300 चौरस फुटावरील बांधकामाचे नियमा नुसार रितसर मालकी हक्‍क सिध्‍द करुन फेरफार घेऊन शासकीय अभिलेखावर नाव चढवून नविन विद्दुत मीटर घ्‍यावा असे नमुद केले होते. तक्रारकर्त्‍याचे मृत वडीलांचे नावाने असलेल्‍या जुन्‍याच मीटरवर विद्दुत पुरवठा करुन जुनेच मीटर लावून देण्‍याची मागणी करणे  सेवाशर्तीच्‍या नियमांचे उल्‍लंघन करणारे असून सदर तक्रारकर्त्‍याची मागणी ही नियमबाहय असल्‍याने खारीज करण्‍यात यावी. तक्रारकर्त्‍याने दिवाणी न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाची पुर्तता केली नाही व नविन विद्दुत कनेक्‍शन घेतले नाही. सदरचे प्रकरण दिवाणी न्‍यायालयात प्रलंबित असून निवाडया करीता बराच अवधी लागणार आहे परंतु सदर दिवाणी न्‍यायालयाचे प्रकरणाचा तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोगा समोरील तक्रारीत उल्‍लेख केला नाही व ही बाब जिल्‍हा ग्राहक आयोगा पासून लपवून ठेवली करीता तक्रार रुपये-2,00,000/- खर्च तक्रारकर्त्‍यावर बसवून खारीज करावी असे विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी तर्फे लेखी उत्‍तरात नमुद केले. 

 

04. प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये त.क. तर्फे वकील श्री सुखदेवे तर विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे वकील श्री एस.आर.मेश्राम यांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला.

  

 

05.  तक्रारकर्ता यांची  तक्रार, विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे लेखी उत्‍तर तसेच प्रकरणात उभय पक्षां तर्फे दाखल साक्षी पुरावे आणि उपलब्‍ध दस्‍तऐवज इत्‍यादीचे अवलोकन करण्‍यात आले. तसेच उभय पक्षांचे विदवान वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगाचा निष्‍कर्ष खालील प्रमाणे-

 

                                                                                               ::निष्‍कर्ष::

 

  06.  तक्रारकर्ता यांचे  तक्रारी प्रमाणे ते त्‍यांचे कुटूंबासह वारसाहक्‍काने मागील 60 वर्षा पासून राहत असून तेथेच त्‍यांचे दुकान सुध्‍दा आहे. त्‍यांचे घरी त्‍यांचे वडीलांचे नावे असलेले विद्दुत मीटर हे काहीही कारण नसताना विरुध्‍दपक्ष यांनी दिनांक-07.07.2021 रोजी कायमस्‍वरुपी काढून नेले. तत्‍पूर्वी नोव्‍हेंबर 2020 मध्‍ये त्‍यांची सर्व्‍हीस केबल खंडीत करण्‍यात आली होती. या संदर्भात विरुध्‍दपक्ष यांचे कडे वारंवार विचारणा केल्‍या नंतर त्‍यांनी सांगितले की, खूप जुने मीटर असल्‍याने तो काढलेला असून त्‍याऐवजी नवीन डिजीटल विद्दुत मीटर बसवून देण्‍यात येईल परंतु आज पावेतो नविन विद्दुत मीटर बसवून दिले नाही.

 

07.  या उलट विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीचे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्ता हे स्‍वच्‍छ हाताने जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष आलेले नाहीत आणि त्‍यांनी  दिवाणी न्‍यायालय, मोहाडी यांचे समोर दिवाणी दावा क्रं 23/2020 हेमंत विरुध्‍द सुखदेव आणि ईतर दाखल केला होता आणि सदर दाव्‍यामध्‍ये विद्दुत मीटरचा मुद्दा सुध्‍दा उपस्थित केला होता. सदर दिवाणी दाव्‍यामध्‍ये न्‍यायालयाने दिनांक-15.12.2020 रोजी आदेश पारीत करुन अर्जदार (तक्रारकर्ता) यांनी निशाणी क्रं 6 व 7 प्रमाणे केलेला अर्ज खारीज केला होता. विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने आपले म्‍हणण्‍याचे पुष्‍टयर्थ सदर दिवाणी दाव्‍याची प्रत अभिलेखावर दाखल केली. जिल्‍हा ग्राहक आयोगा व्‍दारे सदर दिवाणी न्‍यायालयाचे आदेशाचे अवलोकन करण्‍यात आले. सदर आदेशा वरुन असे दिसून येते की, अर्जदार (तक्रारकर्ता) आणि उत्‍तरवादी क्रं 1 सुखदेव यांचे मध्‍ये घरगुती घराचे जागे मध्‍ये आपसी वाद आहे. अर्जदार (तक्रारकर्ता)  यांनी 382 चौरसफूट जागेवर हक्‍क सांगितलेला आहे परंतु अभिलेखा प्रमाणे 300 चौरसफूट जागा अर्जदार (तक्रारकर्ता) यांचे नावावर आहे. सदर आदेशा मध्‍ये न्‍यायालयाने असेही नमुद केले की,  अर्जदार (तक्रारकर्ता) यांचे घर आणि दुकानाचे जागे मध्‍ये जे वडील बकाराम यांचे नावे विज मीटर होते आणि त्‍यांचा मृत्‍यू दिनांक-30.12.1992 रोजी झालेला असून त्‍यांचे हयातीत जागेच्‍या वाटण्‍या झालेल्‍या आहेत. सदर आदेशात न्‍यायालयाने पुढे असेही नमुद केले की, अर्जदार (तक्रारकर्ता) यांचे वडीलांचे नावे असलेल्‍या विज मीटर ऑक्‍टोंबर-2020 पर्यंत उपयोगात होते. परंतु अर्जदार (तक्रारकर्ता)  यांनी वडीलोपार्जीत मीटरचे देयकाची अर्धी रक्‍कम देण्‍यास नकार दिला त्‍यामुळे सदर वडीलोपार्जीत मीटरवरील विजेचा पुरवठा देयक प्रलंबित असल्‍याचे कारणा वरुन विज वितरण कंपनी तर्फे खंडीत करण्‍यात आला होता आणि उत्‍तरवादी क्रं 1 यांनी विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी कडे अर्ज करुन नविन  मीटर स्‍थापीत करुन घेतलेले आहे. सदर अर्जामध्‍ये अर्जदार (तक्रारकर्ता)  यांनी उत्‍तरवादी क्रं 1 यांनी खंडीत विजेचा पुरवठा सुरु करुन दयावा अशी मागणी  केली होती सदरची मागणी न्‍यायालयाने नामंजूर केली आणि नमुद केले की, उत्‍तरवादी क्रं 1 यांनी विज पुरवठा खंडीत केलेला नाही.

 

 

08. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी तर्फे कनिष्‍ठ अभिंयता विज वितरण केंद्र करडी यांचे कार्यालयाने जावक क्रं 143 दिनांक-22.11.2021 रोजी तक्रारकर्ता यांचे नावे दिलेल्‍या पत्राची प्रत अभिलेखावर दाखल केली, सदरचे पत्रा मध्‍ये तक्रारकर्ता यांना असे कळविण्‍यात आले की, त्‍यांनी नविन विद्दुत जोडणी करीता दिनांक-25.10.2021 रोजी सांकेतीक स्‍थळावरुन विज वितरण केंद्र करडी यांचेकडे अर्ज सादर केलेला असून सदर अर्ज क्रं-35539952 असा आहे, अर्जाचे अनुषंगाने दस्‍तऐवजाची पडताळणी केली असता तक्रारकर्ता यांनी चालू वर्षाचे मालकी हक्‍काचे कुठलेही दस्‍तऐवज सादर केलेले नाही करीता पत्र मिळताच चालू वर्षाचे मालकी हक्‍काचे दस्‍तऐवज विज वितरण केंद्र करडी येथे सादर करावे, अन्‍यथा 15 दिवसा नंतर तक्रारकर्ता यांनी नविन विज जोडणी करीता केलेला अर्ज रद्द करण्‍यात येईल व परत नविन विद्दुत जोडणी करीता सांकेतीक स्‍थळावरुन अर्ज करावा लागेल याची कृपया नोंद घ्‍यावी असे नमुद केलेले आहे.

 

 

09.  उपरोक्‍त नमुद वस्‍तुस्थिती आणि पुरावे पाहता तक्रारकर्ता यांचे जागे मधील वडीलोपार्जीत मीटर हे तक्रारकर्ता यांनी अर्धी देयकाची रक्‍कम देण्‍यास नकार दिल्‍याने देयकाची रक्‍कम न भरल्‍याने खंडीत झालेले आहे. दुसरी बाब अशी आहे की, जेंव्‍हा तक्रारकर्ता यांनी  दिनांक-25.10.2021 रोजी सांकेतीक स्‍थळावरुन विज वितरण केंद्र करडी यांचेकडे नविन विज मीटर करीता अर्ज सादर केला त्‍याचे सोबत चालू वर्षाचे मालकी हक्‍काचे दस्‍तऐवज विज वितरण केंद्र करडी यांचे कडे सादर केलेले नाही वा तसे दस्‍तऐवज सादर केले होते असे तक्रारकर्ता यांचे म्‍हणणे सुध्‍दा नाही. तक्रारकर्ता यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष दाखल केलेल्‍या तक्रारी मध्‍ये दिवाणी न्‍यायालयात दाखल केलेल्‍या दिवाणी दाव्‍याचा कोणताही उल्‍लेख केलेला नाही. तक्रारकर्ता यांनी आपले तक्रारी मध्‍ये तसेच आपल्‍या शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये  त्‍यांचे घरी त्‍यांचे वडीलांचे नावे असलेले विद्दुत मीटर हे काहीही कारण नसताना विरुध्‍दपक्ष यांनी दिनांक-07.07.2021 रोजी कायमस्‍वरुपी काढून नेले एवढाच उल्‍लेख केलेला आहे. तक्रारकर्ता यांनी आपले शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये पुढे असे नमुद केले की, विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने नविन मीटर बसवून दिले नाही तसेच असे सांगितले  की, तुमचे वडील हे मृत झालेले असल्‍याने मृत व्‍यक्‍तीचे नावाने मीटर चालविता येत नाही व त्‍यामुळे नविन मीटर घ्‍यावे असे सांगितले परंतु तक्रारकर्ता यांचे मोठे भाऊ यांनी स्‍वतःच्‍या नावाने ग्राम पंचायत कर करुन घेतल्‍याने तक्रारकर्ता यांचे नावाची ग्राम पंचायत कर पावती नसलयाने विरुध्‍दपक्ष विज कंपनीने विद्दुत कनेक्‍शन दिलेले नाही. तक्रारकर्ता यांचे कुटूंबात जागे संबधी दिवाणी न्‍यायालयात वाद सुरु आहे आणि तक्रारकर्ता यांचे नावे ग्राम पंचायत कराची पावती नाही यासाठी विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीला जबाबदार धरता येणार नाही.

 

10.  विरुध्‍दपक्ष यांनी या बाबीवर जोर दिला की, तक्रारकर्ता यांचे वडीलांचे नावाने असलेल्‍या जुन्‍याच मीटरवर खंडीत असलेला  विद्दुत पुरवठा करुन जुनेच मीटर लावून देण्‍याची मागणी करणे सेवाशर्तीचे नियमांचे उल्‍लंघन करणारे असून सदर मागणी न्‍यायोचित नाही.  

 

11.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे असे मत आहे की, तक्रारकर्ता यांचे वडील श्री बकाराम यांचे नावाने असलेले विज मीटर हे ऑक्‍टोंबर-2020 पर्यंत उपयोगात होते. बकाराम यांचा  मृत्‍यू दिनांक-30.12.1992 रोजी झालेला आहे. दरम्‍यानचे काळात तक्रारकर्ता आणि त्‍यांचे कुटूंबात जागेच्‍या मालकी हक्‍का संबधात दिवाणी न्‍यायालयात दावा प्रलंबित आहे. वडीलोपार्जीत मीटर वरील देयकाची अर्धी रक्‍कम तक्रारकर्ता यांनी देण्‍यास नकार दिल्‍याने सदर मीटर विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने काढून नेले. ज्‍यांचे नावाने ते मीटर होते ते बकाराम यांचा मृत्‍यू झालेला असल्‍याने ते मीटर तक्रारकर्ता यांना आपल्‍या नावाने करावयाचे असल्‍यास त्‍या संबधी काही कायदेशीर प्रक्रिया आहेत जयामध्‍ये वारसान प्रमाणपत्र दाखल करणे तसेच कुटूंबातील अन्‍य सदस्‍यांचे ना-हरकत-प्रमाणपत्र दाखल करणे आवश्‍यक आहे परंतु तक्रारकर्ता यांनी वडीलांचे नावे असलेले विज मीटर आपले नावाने करुन घेण्‍यासाठी कोणत्‍याही कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब केलेला नाही. तक्रारकर्ता यांनी नविन विज मीटर घेण्‍यासाठी सुध्‍दा विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात अर्ज दाखल केला परंतु चालू वर्षाचे जागेचे मालकीचे दस्‍तऐवज वर नमुद केल्‍या प्रमाणे विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने लेखी मागणी करुनही तक्रारकर्ता यांनी दाखल केलेले नाहीत, ही बाब सिध्‍द होते. तक्रारकर्ता यांनी त्‍यांचे मालकीची आणि कब्‍ज्‍यातील जागेचे ग्राम पंचायत मध्‍ये फेरफार घेऊन त्‍या संबधीचे मालकी हक्‍काचे दसतऐवज नवीन मीटरसाठी विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात दाखल करणे आवश्‍यक आहे परंतु जागे संबधी दिवाणी न्‍यायालयात वाद असल्‍यामुळे राहते जागेचे निर्विवाद मालकी हक्‍क तक्रारकर्ता यांना मिळालेले नाही.

 

12.  तक्रारकर्ता यांचे वकील श्री सतदेवे यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समोरील आपले मौखीक युक्‍तीवादात विद्दुत कायदा-2003 चे कलम 43 वर आपली भिस्‍त ठेवली. सदर कलम 43 चे आम्‍ही सुक्ष्‍म वाचन केले, त्‍यामध्‍ये पुढील प्रमाणे नमुद आहे-  

         Section 43 of the Electricity Act, 2003- The occupier of the premises is entitled for electric supply in his name, if the owner refused to take connection in his name.  Section 43 of the Electricity Act, 2003, is very clear that it is the duty of every licensee to give supply of electricity to the owner or occupier of any premises within its area.  The occupier of the premises is entitled as of her own right under Section 43 to supply of electricity and respondent should have ensured that such supply was restored to the petitioner after complying with all necessary formalities as provided under the Act and the Rules and Regulations made there under.  The Occupier of the premises is entitled for electricity supply in his name if the owner is refused to take connection in his name.

 

          सदर तरतुदीचे वाचन  केले असता असे दिसून येते की, जागेचे ताबेदार यांना खंडीत विज पुरवठा  पाहिजे असल्‍यास विद्दुत कायदयातील तरतुदी व नियमा प्रमाणे ताबेदार यांनी सर्व आवश्‍क प्रक्रिया पार पाडणे आवश्‍यक आहे. तसेच असेही नमुद आहे की, जर जागेचा मालक हा जागेचा ताबेदार यांना विजेच्‍या वापरा पासून प्रतीबंधीत करीत असेल तरी  जागेचा ताबेदार हा विज पुरवठा मिळण्‍यास पात्र आहे परंतु आमचे समोरील हातातील प्रकरणात जुने मीटर हे तक्रारकर्ता यांचे वडील श्री बकाराम यांचे नावे होते आणि त्‍यांचा  मृत्‍यू दिनांक-30.12.1992 रोजी झालेला आहे, अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांचे मृतक वडीलांचे नावे असलेले मीटर जर तक्रारकर्ता यांना आपले नावाने करुन घ्‍यावयाचे होते तर त्‍यांनी वडीलांचे मृत्‍यू प्रमाणपत्र, कायदेशीर वारसदार प्रमाणपत्र, कुटूंबातील अन्‍य सदस्‍यांचे ना-हरकत-प्रमाणपत्र विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात दाखल करावयास हवे होते परंतु त्‍यांनी तसे  केलेले नाही वा तशी प्रक्रिया केल्‍याचे त्‍यांचे म्‍हणणे सुध्‍दा नाही . तसेच तक्रारकर्ता यांनी विरुध्‍दपक्ष यांचे मागणी प्रमाणे नविन मीटर बाबत चालू वर्षातील मालकी हक्‍काचे कागदपत्र विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात दाखल केलेले नाही.  तक्रारकर्ता राहत असलेल्‍या जागे बाबत दिवाणी न्‍यायालयात दिवाणी दावा प्रलंबित आहे त्‍यामुळे तक्रारकर्ता यांचे नावे जागा झालेली नाही त्‍यामुळे ते विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात मालकी हक्‍काचे दस्‍तऐवज दाखल करण्‍यास असमर्थ आहेत. अशा परिस्थिती मध्‍ये विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होत नाही. परंतु असे जरी असले तरी कोणत्‍याही व्‍यक्‍तीला व त्‍याचे कुटूंबातील अन्‍य सदस्‍यांना विजेच्‍या अभावामुळे  आंधारात ठेवणे योग्‍य होणार नाही. तक्रारकर्ता राहत असलेल्‍या जागेवर त्‍यांचा अनेक वर्षा पासून कब्‍जा आहे ही बाब दिवाणी दाव्‍याचे अर्जाचे प्रतीवरुन सिध्‍द होते थोडक्‍यात तक्रारकर्ता हे सदर जागेचे कब्‍जेदार आहेत आणि म्‍हणून भारतीय विद्दुत कायदा-2003 चे कलम 43 तरतुदी नुसार त्‍यांना विजेचे कनेक्‍शन मिळणे बंधनकारक आहे. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांचे कडून त्‍यांचे मालकीचे जागेचा वाद दिवाणी न्‍यायालयात चालू असल्‍यामुळे जेंवहा दिवाणी न्‍यायालयाचा निकाल लागेल आणि तक्रारकर्ता यांचे नावे जेंवहा मालकीचे जागे बाबत फेरफार होईल त्‍यावेळी ते मालकी हक्‍काचे दसतऐवज विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी मध्‍ये दाखल करतील अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र तक्रारकर्ता यांचे कडून घेऊन त्‍यांना नविन विज कनेक्‍शन दयावे, त्‍यासाठी तक्रारकर्ता यांनी अर्ज, आवश्‍यक शुलक ईत्‍यादीची प्रक्रिया पूर्ण करावी व त्‍यानंतर त्‍वरीत विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने त्‍यांना नविन विज कनेक्‍शन दयावे असे आदेशित करणे योग्‍य व न्‍यायोचीत होईल, असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

     13.   वर नमुद केल्‍या प्रमाणे तक्रारकर्ता यांचे मालकीचे जागे बाबत दिवाणी न्‍यायालयात दावा प्रलंबित असल्‍यामुळे विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीला तक्रारकर्ता यांचे मालमत्‍तेचे दसतऐवज मिळाले नाही म्‍हणून त्‍यांनी नविन विज कनेक्‍शन दिले नाही तसेच तक्रारकर्ता यांचे वडीलांचे निधना नंतर जुने मीटर हे कुटूंबातील मालमत्‍ते संदर्भात अंतर्गत वादामुळे विज देयकाची रक्‍कम न भरल्‍यामुळे काढून नेलेले होते, ते पूर्ववत सुरु करण्‍यासाठी तक्रारकर्ता यांनी कायदेशीर वारसदारांचे प्रमाणपत्र  त्‍यावेळी दाखल केलेले नव्‍हते या बाबी पाहता विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना दोषपूर्ण सेवा दिली असे म्‍हणता येणार नाही. तसेच तक्रारकर्ता यांनी दिवाणी न्‍यायालयात दावा चालू असल्‍याची बाब जिल्‍हा ग्राहक आयोगा पासून लपवून ठेवली अशापरिस्थितीत तक्रारकर्ता यांना शारिरीक व मानसिक त्रास आणि तक्रारीचा खर्च मंजूर करता येणार नाही.    

 

14.       उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोग  प्रस्‍तुत तक्रारीमध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

 

                                                                            :: अंतिम आदेश ::

 

  1. तक्रारकर्ता श्री हेमंत बकाराम मुरकूटे यांची विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित तर्फे कनिष्‍ट अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित, विद्दुत उपकेंद्र करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांचे विरुध्‍दची अंशतः मंजूर  करण्‍यात येते.

 

 

  1. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित तर्फे कनिष्‍ट अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित, विद्दुत उपकेंद्र करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, तक्रारकर्ता यांना जर नविन विज कनेक्‍शन पाहिजे असल्‍यास अशा परिस्थितीत तक्रारकर्ता यांचे मालकीचे जागेचा वाद दिवाणी न्‍यायालयात चालू असल्‍यामुळे जेंवहा दिवाणी न्‍यायालयाचा निकाल लागेल आणि तक्रारकर्ता यांचे नावे जेंवहा मालकीचे जागे बाबत फेरफार होईल त्‍यावेळी ते मालकी हक्‍काचे दसतऐवज विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनी मध्‍ये दाखल करतील अशा आशयाचे प्रतिज्ञापत्र तक्रारकर्ता यांचे कडून घेऊन विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने तक्रारकर्ता यांना नविन विज कनेक्‍शन दयावे, त्‍यासाठी तक्रारकर्ता यांनी  नविन विज कनेक्‍शन मिळण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज, आवश्‍यक शुल्‍क  ईत्‍यादीची प्रक्रिया पूर्ण करावी व त्‍यानंतर त्‍वरीत विहित मुदतीत विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीने त्‍यांना नविन विज कनेक्‍शन दयावे.

 

  1. तक्रारकर्ता यांच्‍या अन्‍य मागण्‍या या नामंजूर करण्‍यात येतात.

 

  1. उभय पक्षांना आदेशाच्‍या प्रथम प्रमाणित प्रती निःशुल्क उपलब्‍ध करुन देण्‍यात याव्‍यात.

 

  1. विरुध्‍दपक्ष महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित तर्फे कनिष्‍ट अभियंता, महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी मर्यादित, विद्दुत उपकेंद्र करडी, तहसिल मोहाडी, जिल्‍हा भंडारा यांनी सदर आदेशाचे अनुपालन सदर आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्‍याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे. तक्रारकर्त्‍यास आदेशित करण्‍यात येते की, त्‍याने सदर अंतीम आदेशातील मुद्दा क्रं 2 मध्‍ये नमुद केल्‍या प्रमाणे नविन विद्दुत कनेक्‍शन मिळण्‍यासाठी विहित नमुन्‍यातील अर्ज, आवश्‍यक शुल्‍क आणि स्‍वतःचा प्रतिज्ञालेख विरुध्‍दपक्ष विज वितरण कंपनीचे कार्यालयात  शक्‍यतो लवकरात लवकर दाखल करावा.

 

  1. उभय पक्षकार व त्‍यांचे अधिवक्‍ता यांना निर्देशित करण्‍यात येते की, त्‍यांनी जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष प्रकरणात दाखल केलेले अतिरिक्‍त संच जिल्‍हा ग्राहक आयोगाचे कार्यालयातून परत घेऊन जावेत.  

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MR. NITIN M. GHARDE]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.