Maharashtra

Nagpur

MA/13/52

मेथॉडीस्‍ट एपीस्‍कॉपल चर्च नागपूर - Complainant(s)

Versus

मुख्‍य व्‍यवस्‍थापक, अलाहाबाद बँक - Opp.Party(s)

ऐ. ऐ. कठाणे

01 Aug 2013

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, NAGPUR
New Administrative Building
5 th Floor, Civil Lines.
Nagpur-440 001
0712-2548522
 
Miscellaneous Application No. MA/13/52
 
1. मेथॉडीस्‍ट एपीस्‍कॉपल चर्च नागपूर
तर्फे सचिव, काया्रलय पत्‍ता सिव्‍हील लाईन नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Appellant(s)
Versus
1. मुख्‍य व्‍यवस्‍थापक, अलाहाबाद बँक
शाखा सिव्‍हील लाईन्‍स, नागपूर
नागपूर
महाराष्‍ट्र
...........Respondent(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. AMOGH KALOTI PRESIDENT
 HON'ABLE MR. PRADEEP PATIL MEMBER
 HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE MEMBER
 
PRESENT:ऐ. ऐ. कठाणे , Advocate for the Appellant 1
 
अॅड. अहमद
......for the Respondent
ORDER

1.          तक्रारकर्ता ही संस्‍था मुंबई सार्वजनिक अधिनियमाचे तरतूदीनुसार नोंदणीकृत असुन निवडून आलेले प्रतिनिधी संस्‍थेचा कारभार चालवितात. तक्रारकर्ता संस्‍थेचे खाते विरुध्‍द पक्षाकडे असुन तक्रारकर्त्‍याने प्राधिकृत केलेले प्रतिनिधी बँकेचे खाते हाताळीत असतात. तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे श्री. जबेश सुफल किस्‍कु हे कोषाध्‍यक्ष म्‍हणून काम करतात आणि विश्‍वस्‍त मंडळाने दि.13.11.2009 रोजी झालेल्‍या कार्यकारी मंडळाच्‍या बैठकीत ठराव पारित करुन त्‍यांचा अधिकार काढून घेतला व त्‍यांचे जागी श्री.अजय मनोहरराव वाघचौरे यांना कोषाध्‍यक्ष केले. सदरील बदलाचा अहवाल धर्मदाय आयुक्‍त यांचेकडे प्रलंबीत आहे. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍याप्रमाणे श्री. जबेश सुफल किस्‍कु यांना पदावरुन काढल्‍यानंतर सुध्‍दा  ते नवे कोषाध्‍यक्ष यांना कारभार हस्‍तांतरीत करीत नव्‍हते, म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द पोलिसात तक्रार केली. त्‍यानंतर श्री. जबेश सुफल किस्‍कु यांनी श्री. अजय मनोहरराव वाघचौरे यांना संपूर्ण कारभार हस्‍तांतरीत केला व तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे श्री. अजय मनोहरराव वाघचौरे कोषाध्‍यक्ष म्‍हणून काम पाहतात.

 

2.          तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍यांनी दि.14.09.2009 रोजी कोषाध्‍यक्षाच्‍या बदलीबाबत विरुध्‍द पक्षास कळविले होते. व तेव्‍हापासुन श्री. अजय वाघचौरे कोषाध्‍यक्ष या नात्‍याने विरुध्‍द पक्ष बँकेकडे असलेल्‍या बचत खाते क्र.5000408904 चा संस्‍थेच्‍या कामाकरीता वापर करीत असत.
3.          तक्रारकर्ता संस्‍थेच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे काही लोकांनी संस्‍थेच्‍या विरुध्‍द विरुध्‍द पक्षाकडे तक्रारी केलेल्‍या आहेत, त्‍यामुळे विरुध्‍द पक्षांनी दि.20.03.2013 पासुन संस्‍थेच्‍यावरील खात्‍याचे व मुदत ठेवींचे सर्व व्‍यवहार थांबविण्‍यांत आलेले आहे व संस्‍थेस श्‍येडयुल 1 ची प्रत जमा करावयास सांगितले आहे. संस्‍थेच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षांचा हा निर्णय अन्‍यायकारक असल्‍यामुळे दि.26.03.2013 रोजी विरुध्‍द पक्ष बँकेस पत्र पाठवुन व्‍यवहार सुरू करण्‍याची विनंती केली होती. परंतु, विरुध्‍द पक्ष बँकेने व्‍यवहार सुरु केला नाही, त्‍यामुळे तक्रारकर्ता संस्‍थेला सदरहू तक्रार दाखल करावी लागली व सोबत अंतरिम आदेशासाठी अर्ज सादर करावा लागला. तसेच अंतरिम अर्जामधे त्‍यांनी विरुध्‍द पक्षाकडे असलेले संस्‍थेचे खाते व मुदत ठेवी संस्‍थेच्‍या प्राधिकृत केलेल्‍या व्‍यक्तिंना हाताळण्‍याचे आदेश करण्‍याची विनंती केली आहे.
4.          विरुध्‍द पक्षांना नोटीस जारी झाल्‍यानंतर त्‍यांनी सदर अर्जाला उत्‍तर सादर केले व प्राथमिक आक्षेपाव्‍दारे सदरहू तक्रार ही ग्राहक तक्रार नसल्‍यामुळे मंचासमक्ष चालू शकत नाही, तसेच विरुध्‍द पक्षांचे सेवेमधे त्रुटी नसल्‍यामुळे सदर तक्रार मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही असा आक्षेप घेतला आहे. विरुध्‍द पक्षाने पुढे असेही नमुद केले आहे की, अंतरिम अर्जातील मागितलेल्‍या आदेशाचे मुद्दे व तक्रारीतील मुद्दे सारखेच असल्‍यामुळे अंतरिम आदेशाचा अर्ज निकाली काढणे म्‍हणजे मुळ तक्रारीवर आदेश पारित करण्‍यासारखे होईल. तसेच तक्रारकर्ता सेस्‍थेचे एक सदस्‍य श्री. नोएल ऑयसैक यांनी विरुध्‍द पक्षाला दि.08.03.2013 रोजी कायदेशिर नोटीस पाठवुन संस्‍थेच्‍या कारभाराविषयी अनेक आरोप केलेले आहेत व संशयास्‍पद व्‍यवहार असल्‍यामुळे व दि.13.09.2009 रोजीची कार्यकारी मंडळाची झालेली बैठक ही अवैध आहे. त्‍यामुळे धर्मदाय आयुक्‍तांनी सुध्‍दा बदल अर्जावर निर्णय दिलेला नाही. संस्‍था व त्‍यांच्‍या सदस्‍यांमध्‍ये असलेल्‍या मतभेदामुळे संस्‍थेचे व संस्‍थेशी संबंधीत लोकांचे नुकसान होण्‍याची शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत संस्‍थेच्‍या हितासाठी व सार्वजनिक हिताच्‍या दृष्‍टीने संस्‍थेचे खाते व व्‍यवहारावर बंदी घालणे आवश्‍यक व योग्‍य होते व वित्‍त बँकेने आपल्‍या कायदेशिर अधिकाराचा वापर करुन संस्‍थेच्‍या मुदत ठेवी व खात्‍यातील व्‍यवहारांना योग्‍य कागदपत्रांच्‍या अभावी बंदी घातलेली आहे व ते योग्‍य आहे. या शिवाय विरुध्‍द पक्षाने आपल्‍या उत्‍तरात असे म्‍हटले आहे की, त्‍यांचेकडे संस्‍थेविरुध्‍द तक्रार प्राप्‍त झाल्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांचेकडे असलेल्‍या कायदेतज्ञांचा त्‍यावर सल्‍ला मागितला होता व त्‍यांचे सल्‍ल्‍यानुसार संस्‍थेला श्‍येडयुल 1 ची प्रत व बदली अर्जावर झालेला आदेश दाखविण्‍यांस सांगितले होते. परंतु सदरहू संस्‍थेने कुठलेच कागदपत्र सादर केलेले नाही, तसेच त्‍यांचेजवळ असलेला पैसा हा सार्वजनिक हिताचे दृष्‍टीने योग्‍य व्‍यक्तिव्‍दारे योग्‍य कामाकरता वापरण्‍यांत आला पाहिजे. त्‍यामुळे अंतरिम आदेशाचा अर्ज खारिज करण्‍यात यावा, अशी मंचास विनंती केलेली आहे.
5.         मंचाने दोन्‍ही पक्षांचे म्‍हणणे ऐकल्‍यानंतर व दाखल कागदपत्रांचे अवलोकन केल्‍यानंतर असे निदर्शनास येते की, अर्जदार संस्‍थेने विरुध्‍द पक्षांनी मागितलेली कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही व धर्मदाय आयुक्‍तांकडून बदल अर्जावरील आदेश प्राप्‍त केलेला नसल्‍यामुळे बँकेचे व्‍यवहार हाताळण्‍याचे अधिकार संस्‍थेने प्राधिकृत केलेल्‍या व्‍यक्तिंस करु देणे हे सार्वजनिक हीताचे दृष्टिने योग्‍य होणार नाही, त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने केलेला अंतरिम अर्ज ना-मंजूर करण्‍यांत येत आहे.
 
 
[HON'ABLE MR. AMOGH KALOTI]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. PRADEEP PATIL]
MEMBER
 
[HON'ABLE MRS. MANJUSHREE KHANKE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.