Maharashtra

Latur

CC/272/2022

सविता रमेश विळेगावे - Complainant(s)

Versus

मुख्य अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि. - Opp.Party(s)

अ‍ॅड. एस. एम. तांदळे

01 Feb 2024

ORDER

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर.
जिल्‍हा परिषदेचे गेट क्र.2 शेजारी, लातूर - 413512
 
Complaint Case No. CC/272/2022
( Date of Filing : 03 Oct 2022 )
 
1. सविता रमेश विळेगावे
लातूर
...........Complainant(s)
Versus
1. मुख्य अभियंता, म. रा. वि. वि. कं. लि.
लातूर
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Amol B. Giram PRESIDENT
 HON'BLE MRS. Rekha R. Jadhav MEMBER
 HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 01 Feb 2024
Final Order / Judgement

जिल्हा   ग्राहक   तक्रार   निवारण  आयोग,  लातूर.

 

ग्राहक तक्रार क्रमांक : 272/2022.                           तक्रार दाखल दिनांक : 03/10/2022.                                                                           तक्रार निर्णय दिनांक : 01/02/2024.

                                                                                       कालावधी : 01 वर्षे 03 महिने 29 दिवस

 

सौ. सविता रमेश विळेगावे, वय 45 वर्षे, व्यवसाय : घरकाम,

रा. स्वराज नगर, पाखरसांगवी, ता. जि. लातूर.                              :-          तक्रारकर्ती

 

                        विरुध्द

 

मुख्य अभियंता, महावितरण कार्यालय,

ग्रामीण विभाग, गंजगोलाई, ता. जि. लातूर.                                   :-          विरुध्द पक्ष

 

गणपूर्ती :          श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष

                        श्रीमती रेखा जाधव, सदस्य

                        श्री. रविंद्र शे. राठोडकर, सदस्य

                                   

तक्रारकर्ती यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. सुदर्शन एम. तांदळे

विरुध्द पक्ष यांचेकरिता विधिज्ञ :-  श्री. आर. बी. पांडे

 

आदेश 

 

श्री. अमोल बालासाहेब गिराम, अध्‍यक्ष यांचे द्वारा :-

 

(1)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार संक्षिप्त स्वरुपात अशी की, त्यांनी त्यांच्या राहत्या घरासाठी विरुध्द पक्ष (यापुढे "महावितरण") यांच्याकडून ग्राहक क्र. 610080861314 अन्वये विद्युत पुरवठा घेतला आहे. मर्यादीत विद्युत वापर असल्यामुळे त्यांना प्रतिमहा सरासरी 100 युनीटच्या आत विद्युत देयके आलेले असून त्या देयकांचा वेळोवेळी मुदतीमध्ये भरणा केलेला आहे.

 

(2)       तक्रारकर्ती यांचे पुढे कथन असे की, दि.15/6/2022 रोजी त्यांना 890 युनीट नमूद करुन रु.11,600/- रकमेचे चुकीचे देयक देण्यात आले. ते देयक दुरुस्त करुन देण्याची विनंती केली असता महावितरण यांनी त्यांच्या मीटरची तपासणी करुन अहवाल तयार केला; मात्र देयकाच्या दुरुस्तीसंबंधी कार्यवाही केली नाही. त्यानंतर दि.15/7/2022 रोजी 890 युनीटचे रु.13,330/- व थकबाकी रु.11,748/- दर्शवून रु.25,080/- चे देयक दिले आहे. देयक दुरुस्ती व मीटर दुरुस्तीची विनंती केली असता दखल घेतलेली नाही. त्यानंतर पुन्हा दि.15/8/2022 रोजी 6214 युनीट दर्शवून रु.56,962/- व थकबाकी रु.25,244/- असे एकूण रु.82,290/- चे देयक देण्यात आले. तक्रारकर्ती यांनी केलेल्या तक्रारीची दखल न घेता उलट विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. तक्रारकर्ती यांनी दुरुस्त देयक देण्याबद्दल व खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याबद्दल विनंती केली असता विरुध्‍द पक्ष यांनी दखल घेतली नाही. त्यानंतर तक्रारकर्ती यांना दि.15/9/2022 रोजी 621 युनीटचे रु.8,584/- रकमेचे थकबाकी रु.82,919/- सह रु.91,610/- चे चुक व वाढीव देयक देण्यात आलेले आहे. उक्त विवेचनाअंती दि.15/9/2022 रोजीचे चुक देयक दुरुस्त करुन सरासरी वीज देयक देण्याचा; विद्युत मीटर बदलून खंडीत विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचा; मानसिक व आर्थिक त्रासाकरिता रु.30,000/- व ग्राहक तक्रार खर्च रु.15,000/- देण्याचा महावितरण यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती तक्रारकर्ती यांनी केलेली आहे.

 

(3)       महावितरण यांनी अभिलेखावर लेखी निवेदनपत्र दाखल केले. ग्राहक तक्रारीमध्ये नमूद बहुतांश कथने त्यांनी अमान्य केले आहेत. महावितरण यांचे कथन असे की, तक्रारकर्ती यांचा विद्युत वापर 2.5 K.W. असून मंजूर भारापेक्षा जास्त वापर करीत आहेत. तक्रारकर्ती यांच्या विद्युत मीटरवर चालू रिडींग 7726 KWH असून वापराप्रमाणे दिलेले देयक योग्य आहे. मीटर रिडींग नोंद घेण्यासाठी कर्मचारी गेले असता तक्रारकर्ता यांच्या घराच्या फाटकास कुलूप असल्यामुळे रिडींग घेता आलेली नाही आणि सरासरी देयक देण्यात आले. तक्रारकर्ती यांना ऑगस्ट 2022 मध्ये 6214 युनीटचे देयक योग्य भाराप्रमाणे देण्यात आले आणि त्या देयकाची 10 महिन्यामध्ये विभागणी करुन प्रतिमहा 621 नुसार वीज आकार करण्यात आला. त्याचप्रमाणे मागील सरासरी युनीटची एकूण रु.27,596.85 दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्यांनी तक्रारकर्ती यांना चुक किंवा अवास्तव देयक दिलेले नाही. जोपर्यंत तक्रारकर्ता देयक भरणा करीत नाहीत, तोपर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत करता येणार नाही. अंतिमत: सेवेमध्ये त्रुटी नसल्याचे नमूद करुन महावितरण यांनी ग्राहक तक्रार रद्द करण्याची विनंती केली आहे.

 

(4)       तक्रारकर्ती यांची ग्राहक तक्रार, महावितरण यांचे लेखी निवेदनपत्र, अभिलेखावर दाखल कागदपत्रे इ. चे अवलोकन केले असता वादविषयाचे निवारणार्थ खालीलप्रमाणे वाद-मुद्दे निश्चित करण्‍यात येतात आणि त्‍या मुद्दयांची कारणमीमांसा त्‍यांच्‍यापुढे दिलेल्‍या उत्‍तराकरिता खालीलप्रमाणे देण्‍यात येते.

 

                        मुद्दे                                                                                                 उत्तर

 

(1) महावितरण यांनी तक्रारकर्ता यांना द्यावयाच्या सेवेमध्‍ये त्रुटी

      केल्‍याचे सिध्‍द होते काय ?                                                                                   होय

(2) मुद्दा क्र.1 च्‍या अनुषंगाने तक्रारकर्ती अनुतोषास पात्र आहेत काय  ?                        होय

     असल्‍यास किती ?                                                                                  अंतिम आदेशाप्रमाणे

(3) काय आदेश  ?                                                                                     अंतिम आदेशाप्रमाणे

 

कारणमीमांसा

 

(5)       मुद्दा क्र. 1 ते 3 :- मुद्दा क्र. 1 ते 3 हे एकमेकांशी पुरक असल्यामुळे एकत्र विवेचन करण्यात येते. प्रामुख्याने, तक्रारकर्ती यांनी महावितरण यांच्याकडून निवासी वापराकरिता विद्युत पुरवठा घेतला, याबद्दल उभयतांमध्ये मान्यस्थिती आहे. तक्रारकर्ती यांचा विद्युत ग्राहक क्र. 610080861314 आहे, याबद्दल विवादीत नाही. तसेच महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना सरासरी आकारणीचे विद्युत देयक दिले, ही मान्यस्थिती आहे. 

 

(6)       महावितरण यांनी वादकथित देयकांच्या समर्थनार्थ मांडलेल्या मुद्यांनुसार तक्रारकर्ती यांचा विद्युत वापर त्यांच्या मंजूर भारापेक्षा जास्त होता; तक्रारकर्ती यांच्या घराच्या फाटकास कुलूप असल्यामुळे रिडींग घेता आले नाही आणि सरासरी देयक द्यावे लागले, असे नमूद केले. तसेच तक्रारकर्ती यांना विद्युत वापरानुसार देयक दिल्याचे महावितरण यांचे कथन आहे.

 

(7)       उभय पक्षांचा वाद-प्रतिवाद व अभिलेखावर दाखल कागदपत्रे पाहता माहे तक्रारकर्ती यांना ऑक्टोंबर 2021 पर्यंत मीटर रिडींगनुसार नोंदलेल्या युनीटप्रमाणे देयक दिल्याचे दिसते. तक्रारकर्ती यांच्या विद्युत वापराचा ग्राहक वैयक्तिक उतारा (Consumer Personal Ledger) अभिलेखावर दाखल केलेला आहे. त्यानुसार तक्रारकर्ती यांचा ऑक्टोंबर 2021 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत विद्युत वापर खालीलप्रमाणे आढळतो.

महिना व वर्ष

मीटर क्रमांक

मीटर स्थिती

चालू नोंद

मागील नोंद

युनीट वापर

देयक रक्कम

ऑक्टोंबर 2021

05385206555

Normal

1532

1497

35

रु.312.24

नोव्हेंबर 2021

05385206555

Locked

1532

1523

39

रु.652.55

डिसेंबर 2021

05385206555

R.N.T.

1532

1523

33

रु.305.38

जानेवारी 2022

05385206555

Inaccessible

1532

1523

38

रु.325.52

फेब्रुवारी 2022

05385206555

R.N.T.

1532

1523

41

रु.342.37

मार्च 2022

05385206555

R.N.T.

1532

1523

39

रु.338.00

एप्रिल 2022

05385206555

Inaccessible

1532

1523

50

रु.404.86

मे 2022

05385206555

R.N.T.

1532

1532

86

रु.605.64

जुन 2022

05385206555

R.N.T.

1532

1532

890

रु.11602.92

जुलै 2022

05385206555

R.N.T.

1532

1532

890

रु.25078.05

ऑगस्ट 2022

05385206555

Normal

7746

1523

6214

रु.82207.57

सप्टेंबर 2022

05385206555

Inaccessible

7746

7746

621

रु.11602.92

ऑक्टोंबर 2022

05385206555

Inaccessible

7746

7746

621

रु.100357.28

नोव्हेंबर 2022

05385206555

Locked

7746

7746

0

रु.101402.79

 

 

(8)       प्रामुख्याने, नोव्हेंबर 2021 ते जुलै 2022 या कालावधीमध्ये Locked, R.N.T., Inaccissible अशा कारणास्तव सरासरी युनीटचे विद्युत देयक दिलेले दिसून येते. तसेच ऑगस्ट 2022 च्या देयकासाठी 'मागील युनीट 1532' व 'चालू युनीट 7746' नोंद दर्शवून 6214 युनीटचे विद्युत देयक आकारलेले दिसते. त्यापुढे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 मध्ये प्रतिमहा 621 सरासरी युनीट वापर नमूद आहे. उक्त स्थिती पाहता, केवळ नोव्हेंबर 2021 मध्ये Locked नोंद नमूद असून अन्य महिन्यांमध्ये R.N.T. व Inaccissible नोंद आढळते. यावरुन तक्रारकर्ती यांचे निवासस्थान नोव्हेंबर 2021 मध्ये बंद असल्यामुळे केवळ त्या महिन्यामध्ये सरासरी युनीटचे देयक आकारणी होणे अपेक्षीत होते. मात्र अनेक महिन्यांमध्ये महावितरण यांनी रिडींग घेतलेले नाही, अशी नोंद आढळते. महत्वाचे असे की, जुन व जुलै 2022 मध्ये रिडींग घेतलेले नसताना (R.N.T.) त्या महिन्यांमध्ये सरासरी 890 युनीटची नोंद केलेली आहे. तसेच ऑगस्ट 2022 मध्ये अचानक 6214 युनीट वापराची नोंद आढळते. त्यानंतर सुध्दा सप्टेंबर व ऑक्टोंबर 2022 मध्ये सरासरी 621 युनीटची नोंद आढळते. महावितरण यांनी दि.10/8/2022 रोजी मीटरची नोंद दर्शविणारे छायाचित्र दाखल केले. महावितरण यांचे म्हणणे की, तक्रारकर्ता यांना त्यांच्या वापराप्रमाणे देयक दिले, हे काही क्षणाकरिता ग्राह्य धरले तरी जुन 2022 ते ऑक्टोंबर 2022 या कालावधीतील विद्युत वापर निश्चितच अवास्तव व अवाजवी आढळतो.   

 

(9)       तक्रारकर्ती यांच्या विद्युत वापरासंबंधी केलेल्या स्थळ पाहणी अहवालाच्या वैधतेसंबंधी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी तक्रारकर्ती यांचा विद्युत वापर CFL 5, Fan 1, Freeze 1, Motor 1, Cooler 1, TV 1, Other 2 आहे आणि मोटार व कुलर हे सातत्यपूर्ण उपकरणे नाहीत. एका अर्थाने, तक्रारकर्ती यांचा विद्युत वापर मर्यादीत स्वरुपाचा आढळून येतो.  महावितरण यांनी विद्युत मीटरवर नोंदलेल्या युनीटप्रमाणे देयक आकारणी केल्याचे नमूद केले असले तरी तक्रारकर्ती यांचा मर्यादीत विद्युत वापर पाहता निश्चितच मीटरवर नोंदलेले युनीट अवास्तव व अवाजवी दर्शवितात. महावितरण यांनी अशाप्रकारची नोंद झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केलेला नाही किंवा त्यामागील कारणांचा शोध घेतल्याचे दिसून येत नाही.

 

(10)     तक्रारकर्ती यांना ऑक्टोंबर 2021 पूर्वी मीटरवर नोंदलेल्या युनीटप्रमाणे देयकाची आकारणी झालेली आहे. तो विद्युत वापर 100 युनीटपेक्षा कमी आढळतो. तसेच नोव्हेंबर 2021 ते मे 2022 पर्यंत दिलेल्या सरासरी देयकांमध्ये 100 युनीटच्या आत विद्युत वापर नमूद आहे. मात्र जुन 2022 पासून निश्चितच अवाजवी युनीट वापर दर्शविलेला आहे. वाद-तथ्‍ये व पुरावे पाहता अवाजवी व अवास्तव युनीट नोंदीसंबंधी महावितरण यांनी गांर्भियाने पाहिलेले नाही. अनेकवेळा विद्युत देयकामध्ये आढळणा-या त्रुटीकरिता मीटर वाचकाची चूक, मीटरमध्ये निर्माण झालेला दोष किंवा अन्य तांत्रिक बाबी कारणीभूत असू शकतात. तसेच तक्रारकर्ती यांनी मीटरमध्ये दोष असल्याचे लेखी निवेदन दिलेले असताना मीटर तपासणी करण्याचा महावितरण यांनी प्रयत्न केलेला नाही.   तक्रारकर्ती यांचे विद्युत उपकरणे व त्यांचा मागील महिन्यांचा विद्युत वापर पाहता मीटरमध्ये दोष असावा, हेच अनुमान निघते.

(11)     उक्त स्थिती पाहता, महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना जुन 2022 पासून अवाजवी व चूक विद्युत देयक दिल्याचे सिध्द होते. तक्रारकर्ती यांनी दि.15/9/2022 चे देयक दुरुस्त करण्याची विनंती केलेली असली तरी त्यांचा वाद जुन 2022 पासून दिलेल्या देयकासंबंधी आहे. त्यामुळे न्यायाच्या दृष्टीने जुन 2022 पासून दिलेले देयके रद्द करणे क्रमप्राप्त ठरते. तक्रारकर्ती यांचा विद्युत पुरवठा दि.15/8/2022 रोजी खंडीत केल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. तक्रारकर्ती यांचा जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2021 मधील सरासरी 59 युनीट विद्युत वापर आढळतो. त्यामुळे तक्रारकर्ती यांना जुन 2022 ते ऑगस्ट 2022 कालावधीकरिता प्रतिमहा 59 युनीट विद्युत वापराचे देयक आकारणी करणे न्यायोचित ठरेल. तसेच सप्टेंबर 2022 पासून पुढे विद्युत पुरवठा सुरु करेपर्यंतच्या कालावधीकरिता कोणत्याही प्रकारची आकारणी करता येणार नाही.

 

(12)     न्यायाच्या दृष्टीने तक्रारकर्ती यांचे विद्युत मीटर बदलून देण्याचा आदेश करणे न्यायोचित ठरते.

 

(13)     तक्रारकर्ती यांनी मानसिक व आर्थिक त्रासासह ग्राहक तक्रार खर्चाकरिता एकूण रु.45,000/- रकमेची मागणी केलेली आहे. नुकसान भरपाईची रक्‍कम निश्चित करताना त्या–त्‍या परिस्थितीनुसार गृहीतक निश्चित केले जातात. असे दिसते की, तक्रारकर्ती ह्या महिला व गृहिणी आहेत. वादकथित देयकांच्या अनुषंगाने त्यांना महावितरण यांच्याकडे पाठपुरावा करावा लागलेला आहे. तसेच त्यांना जिल्‍हा आयोगापुढे तक्रार दाखल करणे भाग पडले. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मानसिक त्रास होणे स्‍वाभाविक आहे.  शिवाय, कायदेशीर कार्यवाहीकरिता विधिज्ञांचा सल्‍ला व सहायता, प्रकरण शुल्‍क इ. खर्चाच्‍या बाबी आहेत. ग्राहक तक्रार न्‍यायप्रविष्‍ठ असताना आर्थिक खर्च व वेळेचा अपव्‍यय होतो. त्या अनुषंगाने योग्‍य विचाराअंती मानसिक त्रासाकरिता रु.5,000/- व तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- मिळण्‍यास तक्रारकर्ती पात्र ठरतात.

 

(14)     उक्त विवेचनाअंती मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देऊन मुद्दा क्र.3 करिता खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

 

ग्राहक तक्रार क्र. 272/2022.

 

आदेश

 

(1) ग्राहक तक्रार अशंत: मंजूर करण्‍यात येते.     

(2) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना जुन 2022 पासून दिलेले विद्युत देयके रद्द करण्यात येतात.

(3) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना जुन 2022 ते ऑगस्ट 2022 कालावधीकरिता प्रतिमहा 59 युनीट विद्युत वापराचे देयक आकारणी करावे.

(4) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी तक्रारकर्ती यांच्या निवासस्थानामध्ये नवीन विद्युत मीटर स्थापित करावे आणि त्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करावा.

(5) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना सप्टेंबर 2022 पासून नवीन मीटर स्थापित करेपर्यंत विद्युत देयकाची आकारणी करु नये.

(6) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी तक्रारकर्ती यांना मानसिक त्रासापोटी रु.5,000/- नुकसान भरपाई व ग्राहक तक्रार खर्चाकरिता रु.3,000/- द्यावेत.

(7) विरुध्‍द पक्ष महावितरण यांनी प्रस्तुत आदेशाची अंमलबजावणी आदेश प्राप्तीपासून 45 दिवसाच्या आत करावी.

 

 

(श्री. रविंद्र शे. राठोडकर)             (श्रीमती रेखा  जाधव)                 (श्री. अमोल बा. गिराम)

             सदस्‍य                                         सदस्‍य                                            अध्यक्ष

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, लातूर (महाराष्ट्र)

-०-

 
 
[HON'BLE MR. Amol B. Giram]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Rekha R. Jadhav]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. Ravindra S. Rathodkar]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.