Maharashtra

Beed

CC/13/169

वैजीनाथ येताळा सानप - Complainant(s)

Versus

मा.शाखा व्‍यवस्‍थापक,बीड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि. - Opp.Party(s)

स्‍वतः

09 Apr 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, BEED.
House No.1-4-1600,Uttamnanda Building,1st Floor,
Ambika Chowk,Pangri Road,Shahu Nagar,
Dist.Beed.431 122.
 
Complaint Case No. CC/13/169
 
1. वैजीनाथ येताळा सानप
मु.पो.रायमोहा ता.शिरुर कासार जि.बीड
बीड
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.शाखा व्‍यवस्‍थापक,बीड जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक लि.
शाखा रायमोहा ता.शिरुर कासार
जि.बीड
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe PRESIDENT
 HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

निकाल

                       दिनांक- 09.04.2014

                  (द्वारा- श्री.विनायक रावजी लोंढे, अध्‍यक्ष)

            तक्रारदार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्‍वये सामनेवाले  यांनी सेवेत त्रूटी ठेवली आहे  म्‍हणून नुकसान भरपाई मिळणेसाठी दाखल केली आहे.

             तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात खालील प्रमाणे, तक्रारदार वैजिनाथ येताळा सानप यांनी सामनेवाले बँकेमध्‍ये दि.25.10.2013 रोजी रु.2,40,996/- त्‍यांचे बचत खात्‍यावर जमा होते. सदर बचत खात्‍यावरील रक्‍कम देण्‍याची विनंती तक्रारदार यांनी सामनेवाले यांना केली. परंतु त्‍यांनी रक्‍कम दिली नाही. तक्रारदार हे सेवानिवृत्‍त शिक्षक आहेत. त्‍यांची मुलीचे लग्‍न असल्‍यामुळे त्‍यांना रक्‍कमेची आवश्‍यकता आहे. तक्रारदार यांची रक्‍कम न देऊन सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे. . सबब, तक्रारदार यांना बचत खात्‍यावरील रककम रु.2,40,996/- व त्‍यावर द.सा.द.शे. 10 टक्‍के व्‍याज देण्‍याचा हूकूम व्‍हावा. तसेच तक्रारदार यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्‍याचा हूकूम व्‍हावा अशी विनंती केली आहे.

 

            सामनेवाले क्र.1 व 2 यांना या मंचाची नोटीस मिळाली. सामनेवाले क्र.1 व 2 हे अँड.एल.वाय.कुलकर्णी  मार्फत मंचासमोर हजर झाले. सामनेवाले यांनी मुदतीत लेखी म्‍हणणे सादर केले नाही. म्‍हणून त्‍यांचे विरुध्‍द लेखी कैफियत नाही असा आदेश करण्‍यात आला व तक्रार पूढे चालविण्‍यात आली. सामनेवाले यांनी दि.2.4.2014 रोजी लेखी म्‍हणणे दाखल केले. सदरील तक्रारीमध्‍ये सामनेवाले यांनी मुदतीत लेखी कैफियत दाखल न केल्‍यामुळे सामनेवाले यांनी दाखल केलेले लेखी कैफियत विचारात घेतली नाही.

 

            तक्रारदार यांनी त्‍यांचे स्‍वतःचे शपथपत्र दाखल केले. तसेच तक्रारदार यांनी सामनेवाले बॅकेमध्‍ये खाते पुस्‍तकाची झेरॉक्‍स प्रति हजर केल्‍या तसेच बँकेकडे अर्ज केले त्‍यांची झेरॉक्‍स प्रती हजर केल्‍या आहेत. तक्रारदार यांनी स्‍वतः यूक्‍तीवाद केला. सामनेवाले यांचे वकील श्री.एल.वाय.कूलकर्णी यांचा यूक्‍तीवाद ऐकला.  न्‍यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.

 

            मुददे                                              उत्‍तर

1.    तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेत बचत खात्‍यातील रक्‍कम

      मागणी करुनही सामनेवाले यांनी न देऊन सेवेत त्रूटी ठेवली आहे

      ही बाब तक्रारदार शाबीत करतात काय ?                        होय.

2.    तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्‍यास पात्र आहेत

      काय ?                                                    होय.

3.    काय आदेश ?                                   अंतिम आदेशाप्रमाणे.

 

                              कारणमिंमासा

मुददा क्र.1 व 2ः-

 

            तक्रारदार व सामनेवाले यांनी केलेला यूक्‍तीवाद व कागदपत्राचे अवलोकन केले  असता खालील नमुद केलेल्‍या बाबीविषयी तक्रारदार व सामनेवाले यांचेमध्‍ये वाद नाही. तक्रारदार यांनी त्‍यांचे तक्रारीत नमूद केलेले बचत खात्‍यात रक्‍कम रु.2,40,996/- जमा आहेत.  सामनेवाले बँकेत ठेवलेल्‍या आहेत ही बाब उभय पक्षकार यांना मान्‍य आहे. सामनेवाले यांनी मागणी केल्‍यानंतर तक्रारदार यांना बचत खात्‍यातील रक्‍कम दिली नाही याविषयी वाद नाही. तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे वेळोवेळी अर्ज देऊन त्‍यांनी सामनेवाले बँकेत बचत खात्‍यात असलेली रक्‍कम मिळावी म्‍हणून अर्ज दिला होता ही बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे.

            तक्रारदार यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार वैजिनाथ येताळा सानप हे सेवानिवृत्‍त शिक्षक आहेत. सेवानिवृत्‍तीनंतर त्‍यांना मिळालेली रक्‍कम त्‍यांनी त्‍यांचे  नांवे सामनेवाले बॅकेमध्‍ये बचत खात्‍या मध्‍ये ठेवले होते.  तक्रारदार यांनी सामनेवाले बॅकेत वेळोवेळी बचत खात्‍यावरील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज  मिळावे म्‍हणून पाठपूरावा केला. परंतु सामनेवाले यांनी सदरील  रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज तक्रारदार यांना दिले नाही.  तक्रारदार यांना  त्‍यांचे घरी मुलीचे लग्‍न करण्‍यासाठी रक्‍कमेची  आवश्‍यकता असतानाही सामनेवाले यांनी त्‍यांची दखल घेतली नाही व सदरील रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ करुन सेवेत त्रुटी ठेवली आहे. तक्रारदार यांनी मागणी केली आहे की, तक्रारदार यांनी ठेवलेल्‍या ठेवीवर द.सा.द.शे. 12 टक्‍के व्‍याज देण्‍याचा आदेश व्‍हावा व झालेल्‍या मानसिक व शारीरिक त्रासापोटी  नुकसान भरपाई मिळावी व तक्रारीचा खर्च मिळावा.

 

            सामनेवाले यांचे वकील श्री.कूलकर्णी यांनी असा युक्‍तीवाद केला की, तक्रारदार यांनी सामनेवाले बँकेमध्‍ये तक्रारीत नमुद केलेली रक्‍कम बचत खात्‍यांत सामनेवाले बँकेत ठेवली आहे. सामनेवाले बँक ही आर्थिक अडचणीत असल्‍यामुळे तक्रारदार यांची रक्‍कम देता आली नाही. सामनेवाले यांनी कर्जदाराकडून रक्‍कम वसूल केल्‍यानंतर सामनेवाले हे तक्रारदार यांची  रक्‍कम देण्‍यास तयार आहेत. बॅकेच्‍या वसूलीचे पैसे समाधानकारक झाल्‍यानंतर तक्रारदार याची  रक्‍कम व्‍याजासह देण्‍यास सामनेवाले तयार आहेत. सामनेवाले यांचे वकिलांनी त्‍यांचे यूक्‍तीवादाचे समर्थनार्थ  महाराष्‍ट्र शासनाचे काही पत्र जोडले आहेत. सदरील पत्रामध्‍ये अवेळी पाऊस  व गारपीटमुळे ज्‍या शेतक-याचे पिकाचे नुकसान झाले आहे. कर्जाची रक्‍कम वसूल करण्‍या बाबत मार्गदर्शक तत्‍वे दिली आहेत. 

 

            तक्रारदार यांचे शपथपत्र व कागदपत्र यांचे काळजीपुर्वक अवलोकन केले. सामनेवाले यांनी दाखल केलेले शासकीय पत्र व यूक्‍तीवाद लक्षात घेतला.  तकारदार यांनी सामनेवाले बँकेत तक्रारीत नमूद केलेले बचत खात्‍यात रक्‍कम शिल्‍लक आहे. सदरील रक्‍कमेची तक्रारदार यांना आवश्‍यकता असतानाही सामनेवाले यांनी तक्रारदार यांना बचत खात्‍याची रककम व त्‍यावरील व्‍याज दिले नाही. ती देण्‍याची टाळाटाळ केली आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्‍त शिक्षक आहेत. त्‍यांनी त्‍यांचे आयूष्‍याची कमाई त्‍यांचे बचत खात्‍यावर  सामनेवाले बँकेत ठेवली आहे. सदरील रक्‍कम तक्रारदार यांना अडीअडचणीचे वेळेस मिळणे गरजेचे आहे.  सदरील रक्‍कम तक्रारदार यांना सामनेवाले यांनी दिली नाही. केवळ सामनेवाले बँक आर्थिक अडचणीत आहे या सबबीवर सामनेवाले बँक टाळाटाळ करु शकत नाही. सामनेवाले बँकेचे आर्थिक नुकसानीस तक्रारदार हे जबाबदार नाहीत. तक्रारदार यांनी ठेवलेली बचत खात्‍यातील रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज तक्रारदार यांनी मागणी करताच देण्‍याची जबाबदारी सामनेवाले बँकेवर आहे. ती जबाबदारी सामनेवाले बँक यांनी टाळलेली आहे.  सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाचे सेवेत त्रुटी ठेवलेली आहे. तक्रारदार हे त्‍यांनी बचत खात्‍यात ठेवलेली रक्‍कम व त्‍यावरील व्‍याज मिळण्‍यास पात्र आहेत. तसेच बचत खात्‍यातील रक्‍कम न दिल्‍यामुळे तक्रारदार यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला  आहे व त्‍यांना मंचात तक्रार दाखल करावी लागली आहे. त्‍याबददल मानसिक व शारीरिक त्रासाबददल तक्रारदारास रु.3,000/- व तक्रारीच्‍या खर्चाबददल तक्रारदारास रु.1,000/- दयावेत.

 

            मुददा क्र.1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येते.

            सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

                         आदेश

            1)  तक्रारदारांची  तक्रार मंजूर  करण्‍यात येत आहे.          

2)  सामनेवाले क्र.1 व 2यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार यांना

    बचत खात्‍यातील  रक्‍कम  रु.2,40,996/-निकाल  कळाल्‍यापासून  

    30 दिवसांचे आंत व्‍याजासह दयावेत, न दिल्‍यास  तक्रार दाखल 

    दि.18.03.2014 पासून पुर्ण रक्‍कम वसुल होईलपर्यत द.सा.द.शे

    10 टक्‍के व्‍याज दराने संपूर्ण रक्‍कम दयावी.

3)  सामनेवाले क्र.1 व 2 यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदार   

    यांना शारिरीक  व मानसिक त्रासापोटी रक्‍कम  रु.3,000/- व 

    तक्रारीच्‍या खर्चापोटी  रककम रु.1,000/- दयावेत.

4)  ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम

                20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदाराला परत

                करावेत.

 

 

                       श्रीमती मंजूषा चितलांगे,         श्री.विनायक लोंढे,

                             सदस्‍य                    अध्‍यक्ष

                            जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड  

 

 

 

 

जयंत पारवेकर

लघुलेखक

 
 
[HON'BLE MR. Vinayak Raoji Londhe]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MANJUSHA CHITALANGE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.