Maharashtra

Ahmednagar

CC/21/25

१. श्री.ओम संभाजी बांगर - Complainant(s)

Versus

मा.शाखा प्रबंधक,जिल्‍हा शिक्षक सहकारी बॅंक,राहूरी शाखा - Opp.Party(s)

गजानन एस फुंदे

27 Jan 2021

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/21/25
( Date of Filing : 13 Jan 2021 )
 
1. १. श्री.ओम संभाजी बांगर
वृदावन,मल्‍हार वाडी रोड,भागीरथी वसाहत,राहूरी बुद्रुक,ता.राहूरी
अहमदनगर
ूमहाराष्‍ट्र
2. 2. सौ.मिरा संभाजी बांगर
वृदावन,मल्‍हार वाडी रोड,भागीरथी वसाहत,राहूरी बुद्रुक,ता.राहूरी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मा.शाखा प्रबंधक,जिल्‍हा शिक्षक सहकारी बॅंक,राहूरी शाखा
विरोबा नगर,राहूरी बुद्रुक,ता.राहूरी
अहमदनगर
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. C. V.Dongare PRESIDING MEMBER
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
PRESENT:गजानन एस फुंदे, Advocate for the Complainant 1
 
Dated : 27 Jan 2021
Final Order / Judgement

निशाणी क्रमांक १ वरील आदेश

आदेश दिनांक – २७/०१/२०२१

 (द्वारा मा.सदस्‍या :  श्रीमती.चारु विनोद डोंगरे)

________________________________________________________

१.     तक्रारदार स्‍वतः हजर. तक्रारदाराचे वकील हजर. तक्रारदारतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकण्‍यात आला. तक्रारदाराने बॅंकेविरूध्‍द सदरची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने मयताचा बॅंक खाते क्रमांक १३४७१ या खातेचा अधिकार व लॉकरची परवानगी मिळणेत यावी, अशी मागणी केली. तक्रारदाराने मृतक मच्छिंद्र बाजीराव म्‍हसे यांनी दिलेले मृत्‍युपत्र तक्रारीत दाखल केलेले आहे. त्‍या  दस्‍तऐवजावरून तक्रारदार ग्राहक होऊ शकत नाही. तसेच तक्रारदाराने सदरचे लॉकरची व बचत खातेचा वापर करणेसाठी सामनेवालेंना नोटीस दिलेली होती. सामनेवाले यांनी सदरचे नोटीसीला उत्‍तर दिले व त्‍यात वारस प्रमाणपत्र देण्‍याची विनंती केली. सदरचे बचत खाते हे मृतक मच्छिंद्र बाजीराव म्‍हसे यांचे नावे असल्‍याचे दाखल कागदपत्रांवरून स्‍पष्‍ट होते. सदरचे तक्रारीमध्‍ये तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे आहे. ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ नुसार ग्राहकाची व्‍याख्‍या खालीलप्रमाणे.

(a) the consumer,—

(i) to whom such goods are sold or delivered or agreed to be sold or

delivered or such service is provided or agreed to be provided; or

(ii) who alleges unfair trade practice in respect of such goods or service;

(b) any recognised consumer association, whether the consumer to whom such

goods are sold or delivered or agreed to be sold or delivered or such service is provided

or agreed to be provided, or who alleges unfair trade practice in respect of such goods

or service, is a member of such association or not;

(c) one or more consumers, where there are numerous consumers having the

same interest, with the permission of the District Commission, on behalf of, or for the

benefit of, all consumers so interested; or

(d) the Central Government, the Central Authority or the State Government, as the case may be:

      यावरून तक्रारदार यांचा सामनेवाले बॅंकेशी कोणताही ग्राहक असा नाते संबंध येत नाही. यामुळे तक्रारदार हे सदरचे बॅंकेचे ग्राहक आहेत हे सिध्‍द होत नाही. तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा २०१९ चे कलम ३५ प्रमणे ‘ ग्राहक ’ या संज्ञेत बसत   नसल्‍याने सदरची तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे. सबब खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्‍यात येत आहे. 

 

आ दे श

१. तक्रारदाराची तक्रार अस्विकृत करण्‍यात येत आहे.

२. तक्रारदाराने तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.

३. तक्रारदाराला योग्‍य न्‍यायालयात तक्रार दाखल करणेची परवानगी देण्‍यात येत आहे.

४. या आदेशाची प्रथम प्रत तक्रारदार यांना नि:शुल्‍क देण्‍यात यावी.

५. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत करावी.

 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
PRESIDING MEMBER
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.