Maharashtra

Bhandara

CC/20/52

नरेन्‍द्र सुकाजी मंंदुरकर - Complainant(s)

Versus

मायक्रो ऑफीस इनचार्ज, युनाईटेड इंडीया इंशुरन्‍स कं.लि. - Opp.Party(s)

श्री. वी.अ.भोयर

13 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION,BHANDARA
Near Akhil Sabhagruha, Ganeshpur Road,Bhandara
PINCODE-441904
 
Complaint Case No. CC/20/52
( Date of Filing : 13 Jul 2020 )
 
1. नरेन्‍द्र सुकाजी मंंदुरकर
रा.बेटाळा. ता.मोहाडी.जि.भंडारा
भंडारा
महाराष्‍ट्र
...........Complainant(s)
Versus
1. मायक्रो ऑफीस इनचार्ज, युनाईटेड इंडीया इंशुरन्‍स कं.लि.
शॉप नं.२१. तुरसकर कॉम्‍प्‍लेक्‍स. पोष्‍ट ऑफीस चौक. भंडारा. ४४१९०४
भंडारा
महाराष्‍ट्र
2. दिनानाथ के. खेडकर. सर्वेअर
.क्रिष्‍णा. २४८. लक्ष्‍मीनगर. नागपूर . ता.जि.नागपूूूर
नागपूर
महाराष्‍ट्र्र
3. शाखा व्‍यवस्‍थापक. बॅंक ऑफ महाराष्‍ट्र
बॅंक ऑफ महाराष्‍ट्र. पोलीस स्‍टेशन समाेेर. गांधी चौक. भंडारा. ता.जि.भंडारा
भंंडारा
महाराष्‍ट्र
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. BHASKAR B. YOGI PRESIDENT
 HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 13 Aug 2021
Final Order / Judgement

                    (पारीत व्‍दारा श्री भास्‍कर बी.योगी, मा.अध्‍यक्ष)

                                                                              (पारीत दिनांक13 ऑगस्‍ट, 2021)

 

01.  तक्रारकर्त्‍याने  प्रस्‍तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 खाली त्‍याचे मौजा बेटाळा, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा येथील यामी अगरबत्‍ती भंडार युनिटला आग लागल्‍याने झालेल्‍या नुकसानी संबधात विमा दाव्‍याची रक्‍कम  विरुध्‍दपक्षा कडून मिळावी व ईतर अनुषंगिक मागण्‍यांसाठी  दाखल केलेली आहे. सदर तक्रारी मध्‍ये मौखीक युक्‍तीवाद मा.अध्‍यक्ष व मा.दोन सदस्‍यांचे उपस्थितीत ऐकण्‍यात आला होता. परंतु एक मा.सदस्‍य  श्री घरडे हे आजारी असल्‍याने रजेवर आहेत. तक्रारकर्त्‍याचे वकील श्री भोयर यांनी पुरसिस दाखल करुन मा.अध्‍यक्ष व मा.सदस्‍या श्रीमती जागीरदार यांनी मौखीक युक्‍तीवाद ऐकल्‍याने निकालासाठी विलंब होऊ नये म्‍हणून निकाल देण्‍याची पुरसिस दाखल केली, त्‍यानुसार मा.अध्‍यक्ष व मा.सदस्‍या श्रीमती जागीरदार यांचे पिठाव्‍दारे सदर प्रकरणात निकाल पारीत करण्‍यात येत आहे.

 

02.    तक्रारीचा थोडक्‍यात आशय खालील प्रमाणे-

      तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे या प्रकरणा मध्‍ये  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी असून विरुध्‍दपक्ष क्रं 2  हे विमा कंपनीचे सर्व्‍हेअर आहेत आणि विरुध्‍दपक्ष क्रं-3 महाराष्‍ट्र बॅंक आहे. त्‍याने “Prime minister Employment Generation Programme”या योजने अंतर्गत खादी ग्रामोद्दोग जिल्‍हा कार्यालय भंडारा येथून सबसिडी योजनेतून विरुध्‍दपक्ष क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंके मधून रुपये-10,00,000/- कर्ज घेऊन त्‍याचे राहते गावी मौजा बेटाळा, तालुका मोहाडी, जिल्‍हा भंडारा येथे  जून-2018 मध्‍ये यामी अगरबत्‍ती भंडार नावाने अगरबत्‍ती उत्‍पादन करण्‍याचे युनिट सुरु केले. विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंकेचे मार्फतीने सदर अगरबत्‍ती भंडार युनिटचा विमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीकडे दिनांक-03.09.2018 ते 02.09.2019 कालावधी करीता काढला होता आणि पुढे दिनांक-13.09.2019 ते 12.09.2020 पर्यंत विम्‍याचे नुतनीकरण केले. सदर नुतनीकरण केलेल्‍या विमा पॉलिसीचा क्रमांक-2309821119P107610625 असा आहे.  अशाप्रकारे तक्रारकर्ता हा विरुध्‍दपक्षांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने सप्‍टेंबर-2018 पासून ते फेब्रुवारी-2020 पर्यंत कर्ज परतफेडीचे हप्‍ते नियमित पणे विरुदपक्ष क्रं 3 बॅंके मध्‍ये जमा केलेत.

    तक्रारकर्त्‍याने पुढे नमुद केले की, दिनांक-01 फेब्रुवारी, 2020 चे मध्‍यरात्री अंदाजे-12.00 वाजता त्‍याचे अगरबत्‍ती युनिटला ईलेक्ट्रिक शार्टसर्कीटमुळे लागलेल्‍या आगी मध्‍ये मशीन, कच्‍चा व तयार माल तसेच युनिट मधील इतर वस्‍तू जळून नष्‍ट झाल्‍यात व त्‍यामुळे अंदाजे रुपये-8,50,000/-एवढे नुकसान झाले. सदर नुकसानी संबधात यादी नुसार दस्‍त. क्र-5 ते 10 दाखल केलेले आहेत. आग पूर्ण विझल्‍या नंतर त्‍याने पाहणी केली असता सर्व ईलेक्ट्रिक साहित्‍य, दोन मशीन, एक पॅकींग मशीन, मिक्‍सर मशीन, युनिटच्‍या चारही भिंती स्‍लाईडर खिडक्‍या, कच्‍चामाल, पक्‍का माल व ईतर साहित्‍य नष्‍ट झाल्‍यामुळे त्‍याचे वास्‍तविक नुकसान रुपये-9,50,000/- ते 10,00,000/- एवढे झाल्‍याचे निर्दशनास आले. सदर घटनेची माहिती दुसरेच दिवशी दिनांक-02 फेब्रुवारी, 2020 रोजी विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंकेच्‍या शाखा व्‍यवस्‍थापकांना दिली. त्‍याच बरोबर ग्राम पंचायत कार्यालय, बेटाळा यांना व दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी पोलीस स्‍टेशन मोहाडी यांना दिली. दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी गावातील पंचा समक्ष पंचनामा केला व ग्राम पंचायती तर्फे युनिटची पाहणी करुन प्रमाणपत्र देण्‍यात आले. सदर घटनेची माहिती वर्तमानपत्रातून सुध्‍दा प्रसिध्‍द झाली. (दस्‍तऐज क्रं 12 ते 20 वर दाखल आहे) विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंकेनी, विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला लेखी स्‍वरुपात सुचना दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी दिली व क्‍लेम फॉर्म भरुन देण्‍यात आला. त्‍या अनुसार विरुदपक्ष क्रं 1 विमा कंपनीने, विरुध्‍दपक्ष क्रं 2 सर्व्‍हेअर यांची नियुक्‍ती केली. दिनांक-04.02.2020 रोजी वि.प.क्रं 2 विमा सर्व्‍हेअर आणि वि.प.क्रं 3 बॅंकेचे विभागीय मॅनेजर श्री धनविज यांनी त्‍याचे अगरबत्‍ती युनिटची पाहणी केली. पाहणीचे वेळी विमा दाव्‍या करीता लागणारे दस्‍तऐवजाची मागणी ई मेल व्‍दारे कळवितो असे विरुध्‍दपक्ष क्रं 2 सर्व्‍हेअर यांनी सांगितले,  त्‍या प्रमाणे दिनांक-05.02.2020 रोजी ई मेल पाठविला. सदर ई मेल अनुसार तक्रारकर्त्‍याने दिनांक-10 फेब्रुवारी, 2020 रोजी वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांना दस्‍तऐवज पाठविले. त्‍यानंतर सुध्‍दा दिनांक-03 मार्च, 2020 रोजी आणि 12 मार्च, 2020 रोजी  मागणी केल्‍या नुसार दस्‍तऐवज ई मेल व्‍दारे  वि.प.क्रं 2 यांचे कडे पाठविले. विरुध्‍दपक्ष क्रं 2 सर्व्‍हेअर यांनी पुन्‍हा दिनांक-23 फेब्रुवारी, 2020 रोजी ई मेल व्‍दारे दस्‍तऐवजाची मागणी केली त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने दुरध्‍वनी वरुन कळविले की, त्‍याचे कडे जी बिले उपलबध आहेत ती पाठविलीत. दिनांक-07 फेब्रुवारी, 2020 रोजी पोलीस स्‍टेशन मोहाडी तर्फे मोक्‍यावर पंचनामा करण्‍यात आला, सदर पंचनाम्‍या मध्‍ये युनिटच्‍या चारही भिंती व स्‍लॅब आगीमुळे काळपट पडलेल्‍या आहेत, पूर्वे कडील्‍ पहिल्‍या बोर्डामध्‍ये अगरबत्‍ती मशीनचा वायर लागलेला असून सदर वायर अर्धवट जळलेला आहे. उर्वरीत दोन इलेक्ट्रिक बोर्ड काळे पडलेले आहेत. युनिट मधील तिन्‍ही मशीन काळया पडलेल्‍या आहेत. दक्षीणे कडील भिंती वरील सज्‍ज्‍या मधील सामान व कागदपत्र जळाल्‍याचे दिसून येत असून सज्‍जा काळा पडल्‍याचे नमुद केलेले  आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा सर्व्‍हेअर यांनी दिनांक-03 मार्च, 2020 रोजी पाठविलेल्‍या ई मेल मध्‍येसर्व्‍हीस इंजिनियर याचे कडून मशीनरी दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक काढून ते पाठविण्‍याचे सुचित केले होते परंतु तक्रारकर्त्‍याने ते शक्‍य नसल्‍याचे लेखी कळविले. वस्‍तुतः  विरुध्‍दपक्ष क्रं 2 सर्व्‍हेअर यांचे सांगण्‍या वरुन श्री विनोद आर. तांडेकर यांनी तयार केलेले अंदाजपत्रक दिनांक-10 फेब्रुवारी, 2020 रोजी पाठविले होते. असे असताना विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा सर्व्‍हेअर यांनी दिनांक-07 मार्च, 2020 रोजी ई मेल व्‍दारे कळविले की, Please note that in our opinion, the machinery has suffered minor damages, and the 3rd machine loss you are claiming was in open condition for the repairs at the time of loss. सदर ई मेल वरुन नुकसान झाले नसल्‍याचे मत सर्व्‍हेअर यांनी नोंदविल्‍याचे दिसून येते.

    तक्राकर्त्‍याने  वकील श्री विनय भोयर यांचे मार्फतीने विरुध्‍दपक्ष क्रं 1  ते 3 यांना दिनांक-16 जून, 2020 रोजी नोटीस पाठवून विमा दावा रकमेची मागणी केली, सदर नोटीस वि.प.क्रं 1 ते 3 यांना प्राप्‍त झाली. वि.प.क्रं 2 व क्रं 3 यांनी उत्‍तर दिले नाही. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने नोटीसचे उत्‍तरात विमा दावा नाकारल्‍या बाबत कुठलेही कारण दिले नाही. अशाप्रकारे वि.प.क्रं 1 विमा कंपनी आणि वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांनी दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला त्‍यामुळे त्‍यास शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे म्‍हणून शेवटी त्‍याने प्रस्‍तुत तक्रार जिल्‍हा ग्राहक आयोगा समक्ष विरुध्‍दपक्षां विरुध्‍द दाखल केली असून त्‍याव्‍दारे खालील प्रकारे मागण्‍या केल्‍यात-

 

  1.  तक्रारकर्त्‍याची तक्रार खर्चासह मंजूर करण्‍यात यावी.

 

  1. वि.प.क्रं 1 व क्रं 3 यांनी त्रृटी पूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी पध्‍दतीचा अवलंब केला असे जाहिर करावे.

 

  1.  वि.प.क्रं 2 यांनी त्‍यास विनाकारण त्रास दिल्‍यामुळे दंडात्‍मक कार्यवाही करावी.

 

  1. वि.प.क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचे झालेल्‍या नुकसानी बाबत रुपये-8,50,000/- आणि सदर रकमेवर दिनांक-01 फेब्रुवारी, 2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो वार्षिक-18 टक्‍के दराने  व्‍याज आदेशाच्‍या दिनांका पासून 30 दिवसाचे आत तक्रारकर्त्‍यास दयावे.

 

  1. तक्रारकर्त्‍याचे अगरबत्‍ती युनीट माहे फेब्रुवारी, 2020 पासून बंद पडल्‍यामुळे प्रतीमाह अंदाजे रुपये-20,000/- नुकसान या प्रमाणे एकूण-80,000/- नुकसान भरपाई व्‍याजासह वि.प.क्रं 1 ते 3 यांनी व्‍याजासह देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारिरीक मानसिक  व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये-25,000/- विरुध्‍दपक्ष क्रं 1 व क्रं 2 यांचे कडून देण्‍याचे आदेशित व्‍हावे.

 

  1. या शिवाय योग्‍य ती दाद त्‍याचे बाजूने मंजूर करण्‍यात यावी.

 

 

03.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर दाखल केले. विमा कपंनीने तक्रारीचे परिच्‍छेदां मधील बहुतांश मजकूर नामंजूर केला. तक्रारकर्त्‍याने वि.प.क्रं 3 बॅंके कडून घेतलेल्‍या कर्जाची नियमित परतफेड केल्‍या बाबत बॅंकेचे स्‍टेटमेंट सर्व्‍हेअर यांना पाहणीचे वेळी पुरविले नाही. तक्रारकर्त्‍याचे अगरबत्‍ती युनिटला दिनांक-01 फेब्रुवारी, 2020 च्‍या मध्‍यरात्री शॉर्ट सर्कीट मुळे लागलेल्‍या आगीचे घटनेत मशीन, कच्‍चा माल, तयार माल व ईतरवस्‍तु जळून अंदाजे रुपये-8,50,000/- नुकसान झाले  ही बाब खोटी असल्‍याचे नमुद केले तसेच दस्‍तऐवज यादी क्रं 5 ते 10 वर दाखल केलेले कागदपत्र बनावट असल्‍याचे नमुद केले. वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री खेडकर यांनी वारंवार पत्र, ई मेल व्‍दारे कागदपत्रांच्‍या मूळ प्रती, स्‍टॉक रजिस्‍टर मागणी करुनही तक्रारकर्त्‍याने पुरविले नाही. तक्रारकर्त्‍याचे म्‍हणण्‍या  प्रमाणे त्‍याचे रुपये-9,50,000/- ते 10,00,000/- नुकसान झाल्‍याची बाब खोटी आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंकेनी दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी सुचना दिल्‍याने त्‍यांनी वि.प.क्रं 2 ची सर्व्‍हेअर म्‍हणून नियुक्‍ती केली. वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर आणि वि.प.क्रं 3 बॅंकेचे विभागीय मॅनेजर श्री धनविज यांनी दिनांक-04 फेब्रुवारी, 2020 रोजी मोक्‍यावर पाहणी केली आणि तक्रारकर्त्‍या कडे मूळ कागदपत्राची व तपासणीसाठी स्‍टॉक रजिस्‍टरची  मागणी केली व ई मेल पण पाठविले. दस्‍तऐवज अभावी नुकसानीचे निर्धारण करणे शक्‍य नव्‍हते. त्‍यावेळी मोक्‍यावर फोटो काढण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने मागणी प्रमाणे मूळ दस्‍तऐवज पुरविले नाहीत तसेच तपासणीसाठी मूळ स्‍टॉक रजिस्‍टर दिले नाही.

    वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांचा अहवाल वि.प.क्रं 1 विमा कंपनीला दिनांक-04 ऑगस्‍ट, 2020 रोजी प्राप्‍त झाला. सदर अहवाला मध्‍ये मशीन क्रं 3 ही मशीन क्रं 1 व 2 च्‍या खूप दुर  प्रवेशव्‍दारा जवळ आहे. मशीन क्रं 3 दुरुस्‍ती करीता उघडून ठेवलेली  होती व तिचे कुठल्‍याही प्रकारचे नुकसान झाले नव्‍हते तसेच मशीन क्रं 1 व क्रं 2 यांचे फक्‍त वायर जळाल्‍याचे आढळून आले परंतु मशीनच्‍या ईतर भागाचे कुठलेही नुकसान झाल्‍याचे दिसून आले नाही. जळालेला कच्‍चा माल, तयार अगरबत्‍ती या आकाराने लहान असून त्‍यास लागलेली आग तारीख 01 ते 04 पर्यंत सुलगत होती व त्‍यातून धुर निघत होता हे संशयास्‍पद होते. तक्रारकर्त्‍याने तयार केलेली कागदपत्रे बनावट असल्‍याने मूळ कागदपत्रांची तपासणी होणे जरुरी होते म्‍हणून वारंवार मूळ कागदपत्रांची मागणी करुनही ती पुरविलेली नाही. पोलीस स्‍टेशन मोहाडी यांनी दिनांक-07 फेब्रुवारी, 2020 रोजी तयार केलेला पंचनामा हा तक्रारकर्त्‍याचे  सांगण्‍या वरुन तयार केलेला आहे. मशीन क्रं 3 चे कुठलेच नुकसान झालेले नसून ती दुरुस्‍ती करीता उघडलेली होती व तिचे फोटो सुध्‍दा घेतलेले आहेत. तक्रारकर्त्‍याचा विमा दावा निकाली न निघण्‍या मागे  तोच स्‍वतः जबाबदार आहे कारण त्‍याने मागणी प्रमाणे मूळ कागदपत्र दिलेली नाही. तक्रारकर्त्‍या कडून प्राप्‍त झालेल्‍या दस्‍तऐवजावर खोडतोड होती. सर्व्‍हेअर यांनी नुकसानीचे निर्धारण केले परंतु तक्रारकर्ता यांनी मूळ दस्‍तऐवज सादर केले तरच नुकसान भरपाई दयावी असे अहवालात नमुद केले . तक्रारकर्ता हा भंडारा येथे राहतो आणि बेटाळा येथील युनिटवर त्‍याचे नियंत्रण नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 2 चे ग्राहक तक्रारकर्ता होत नाही व त्‍यांना विनाकारण या प्रकरणात प्रतिपक्ष केलेले आहे. सबब तक्रारकर्त्‍याच्‍या मागण्‍या या फेटाळून लावण्‍यात येऊन तक्रार खारीज करण्‍याची विनंती विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने केली.

 

04.   विरुध्‍दपक्ष क्रं 2 विमा कंपनीचे सर्व्‍हेअर श्री खेडकर यांना जिल्‍हा ग्राहक आयोगाची रजिस्‍टर पोस्‍टाने पाठविलेली नोटीस मिळाल्‍या बाबत पोस्‍टाची पोच उपलब्‍ध आहे परंतु नोटीस मिळूनही ते उपस्थित न झाल्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द तक्रार एकतर्फी चालविण्‍याचा आदेश जिल्‍हा आयोगाने प्रकरणात दिनांक-21.01.2021 रोजी पारीत केला.

 

05.   विरुध्‍दपक्ष क्रं 3 महाराष्‍ट्र  बॅंके तर्फे लेखी उत्‍तर जिल्‍हा आयोगा समक्ष दाखल करण्‍यात आले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे युनिट करीता वि.प.क्रं 3 बॅंके कडून एकूण रुपये-10,00,000/- कर्ज घेतल्‍याची बाब मान्‍य आहे.  तक्रारकर्त्‍याने माहे सप्‍टेंबर-2018 पासून ते फेब्रुवारी,2020 पर्यंत मासिक किस्‍तीचा भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याचे अगरबत्‍ती युनिटला दिनांक-01 फेब्रुवारी, 2020 चे मध्‍यरात्री 12.00 वाजता शॉर्ट सर्कीट मुळे  आग लागल्‍याचे त्‍यांना 02 फेब्रुवारी, 2020 रोजी सकाळी 7.00 वाजता तक्रारकर्त्‍याने माहिती दिली त्‍याअनुसार वि.प.क्रं 3 यांनी त्‍याच  दिवशी अंदाजे 10.30 वाजता मोक्‍यावर पाहणी केली असता आग सुरुच होती व पूर्ण्‍ युनिट काळपट झालेले होते, त्‍याठिकाणच्‍या तीन मशीन जळलेल्‍या दिसून आल्‍यात. जळालेल्‍या मालाचा मोठा ढिग दिसून आला व ईतर सामान जळून खाक झाले होते. तक्रारकर्त्‍याने दिनांक-02 फेब्रुवारी रोजी तोंडी कळविले होते व दिनांक-03 मार्च, 2020 रोजी त्‍यांना लेखी कळविले होते.तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंके विरुध्‍द केलेली मागणी अयोग्‍य आहे करीता त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती वि.प.क्रं 3 बॅंके तर्फे करण्‍यात आली.

 

06.  तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या दसतऐवज यादी नुसार घटनास्‍थळ पंचनामा, प्रसिध्‍दीपत्रक, क्‍लेम फार्म, सर्व्‍हेअरला पाठविलेले  ई मेल, सर्व्‍हेअरने पाठविलेला ई मेल, तक्रारकर्त्‍याने पाठविलेले ईस्‍टीमेट, क्‍लेम सोबत पाठविलेले दस्‍तऐवज, नंतर पाठविलेले दस्‍तऐवज, बॅलन्‍स शिट, तक्रारकर्त्‍याने वकीलांचे मार्फतीने पाठविलेली नोटीस, रजि.पोच व वि.प.क्रं 1 विमा कंपनीचे उत्‍तर अशा दस्‍तऐवजाच्‍या प्रती दाखल केल्‍यात.  तक्रारकर्त्‍याने स्‍वतःचा शपथे वरील पुरावा व लेखी युक्‍तीवाद , तक्रारकर्त्‍याचा साक्षीदार विनोद आर.तांडेकर याचा प्रतिज्ञालेख, अगरबत्‍ती युनिट जळाल्‍या बाबतची छायाचित्रे  दाखल केलीत.

 

07.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनी व तिचे सर्व्‍हेअर यांनी तक्रारकर्त्‍याला पाठविलेल्‍या ई मेलच्‍या प्रती, वि.प. क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्‍हेअर यांचा अंतिम सर्व्‍हे अहवाल व अहवाला सोबत वि.प.क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंकेच्‍या स्‍टॉक रजिस्‍टरच्‍या प्रती दाखल केल्‍यात.  वि.प.क्रं 1 विमा कंपनीने शपथे वरील पुरावा  व लेखी दाखल केला.

 

08.   वि.प.क्रं 3 बॅंके तर्फे शाखा प्रबंधक यांनी त्‍यांचा शपथे वरील पुरावा दाखल केला.

 

09.   उभय पक्षां तर्फे दाखल केलेले दस्‍तऐवज, साक्षी पुरावे आणि उभय पक्षांचे वकीलांचा मौखीक युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला, त्त्‍यावरुन जिल्‍हा ग्राहक आयोगा समोर न्‍यायनिवारणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-

 

अक्रं

                       मुददा

       उत्‍तर

1

तक्रारकर्त्‍याचे अगरबत्‍ती युनिटचे शॉर्ट सर्कीट आगीमुळे नुकसान झाल्‍याची बाब पुराव्‍यानिशी सिध्‍द होते काय?

       -होय-

 

 

 

2

विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने तक्रारकर्त्‍याचा विमा दावा प्रलंबित ठेऊन दोषपूर्ण सेवा दिल्‍याची बाब सिध्‍द होते काय?

    -होय-

3

काय आदेश?

अंतिम आदेशा नुसार

                                                                                           ::निष्‍कर्ष::

मुद्दा क्रं 1 ते 3 बाबत

 

10.   तक्रारकर्त्‍याचे तक्रारी प्रमाणे दिनांक-01 फेब्रुवारी, 2020 चे मध्‍यरात्री अंदाजे-12.00 वाजता त्‍याचे अगरबत्‍ती युनिटला ईलेक्ट्रिक शार्टसर्कीट मुळे लागलेल्‍या आगी मध्‍ये मशीन्‍स, कच्‍चा व तयार माल  तसेच युनिट मधील इतर वस्‍तू जळून नष्‍ट झाल्‍यात आग पूर्ण विझल्‍या नंतर त्‍याने पाहणी केली असता सर्व ईलेक्ट्रिक साहित्‍य, मशीन्‍स, एक पॅकींग मशीन, मिक्‍सर मशीन, युनिटच्‍या चारही भिंती, स्‍लाईडर खिडक्‍या, कच्‍चामाल, पक्‍कामाल व ईतर साहित्‍य नष्‍ट झाल्‍यामुळे त्‍याचे वास्‍तविक नुकसान रुपये-9,50,000/- ते 10,00,000/- एवढे झाल्‍याचे निर्दशनास आले. तक्रारकर्त्‍याने त्‍याचे म्‍हणण्‍याचे समर्थनार्थ दस्‍तऐवज यादी प्रमाणे दिनांक-14.11.2019, 19.12.2019, 08.01.2020 रोजीचे साहित्‍याची बिले, माहे नोव्‍हेंबर-2019 ते डिसेंबर-2020 स्‍टॉक रजिस्‍टरच्‍या नोंदी, दिनांक-02 फेब्रुवारी, 2020 रोजी वि.प.क्रं 3 बॅंकेला  तसेच ग्राम पंचायतीला आग लागल्‍या बाबत दिलेले पत्र्, पोलीस स्‍टेशन मोहाडी यांना दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी दिलेले पत्र, दिनांक-03 फेब्रुवारी, 2020 रोजी गावातील पंचा मार्फत केलेला पंचनामा,  ग्राम पंचायतीने रुपये-8,50,000/- नुकसानी बाबत दिलेले प्रमाणपत्र, ग्राम पंचायती जवळ अग्‍नीशाम यंत्रणा नसलया बाबत दिलेले पत्र, पोलीस स्‍टेशन मोहाडी यांचा दिनांक-07 फेब्रुवारी, 2020 रोजीचा एफ.आय.आर, वृत्‍तपत्रा मध्‍ये घटनेचा मजकूर, वि.प.क्रं 3 बॅंके मार्फत भरलेला क्‍लेम फार्म, पोलीस रिपोर्ट,  स्‍टॉक रजिस्‍टर , बॅलन्‍सशिट असे दस्‍तऐवज पाठविल्‍याचे दिसून येते.

 

11.    या प्रकरणा मध्‍ये तक्रारकर्त्‍याचे अगरबत्‍ती युनिटला आग लागल्‍याची घटना उभय पक्षांमध्‍ये  विवादास्‍पद नाही. विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंकेचे शाखा प्रबंधक विजय एन.कुंभारे यांनी शपथपत्रात नमुद केले की, दिनांक-02 फेब्रुवारी 2020 रोजी मोक्‍यावर भेट दिली असता आगीमुळे 03 मशीन जळालेल्‍या दिसून आल्‍यात, जळालेल्‍या मालाचा मोठा ढीग व इतर साहित्‍य जळून खाक झाल्‍याचे दिसून आले. युनिट मधील खिडक्‍या जळालेल्‍या दिसून आल्‍यात यामध्‍ये तक्रारकर्त्‍याचे मोठे नुकसान झाल्‍याचे नमुद केले. मार्च-2020 पासूनचा मासिक हप्‍ता थकीत असल्‍याचे नमुद केले. तक्रारकर्त्‍याने श्री विनोद आर.तांडेकर याचा शपथे वर पुरावा दाखल केला. त्‍यात त्‍याने असे नमुद केले की, तो मागील पाच ते सहा वर्षा पासून अगरबत्‍ती मशीन दुरुस्‍तीचे काम करतो. तक्रारकर्त्‍याने त्‍याला मशीन दुरुस्‍तीसाठी येण्‍यास दुरध्‍वनी वरुन सांगितल्‍याने त्‍याने दिनांक-07 फेब्रुवारी, 2020 रोजी प्रत्‍यक्ष मोक्‍यावर पाहणी केली असता त्‍याला तिन्‍ही मशीन आगीत पूर्णपणे जळालेल्‍या दिसून आल्‍यात. मशीनच्‍या भागाची पाहणी केली त्‍यानुसार दुरुस्‍तीच्‍या खर्चाचे अंदाजपत्रक तक्रारकर्त्‍यास दिले त्‍यामध्‍ये जळालेल्‍या तिन्‍ही मशीनचा एकूण रुपये-4,38,250/- एवढा खर्च येणार असल्‍याचे शपथे  वरील पुराव्‍यात नमुद केले.

 

12.   तक्रारकर्त्‍याने पुराव्‍या दाखल जळालेल्‍या युनिटची छायाचित्रे दाखल केलीत , त्‍यावरुन युनिटला फार मोठया प्रमाणावर आग लागून हानी झाल्‍याचे दिसून येते.

 

13.  विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कपंनीचा बचाव हा अत्‍यंत तोकडया स्‍वरुपाचा आहे की, त्‍यांचे सर्व्‍हेअर यांनी तक्रारकर्त्‍या कडे मागणी करुन मूळ दस्‍तऐवज पुरविले नाहीत तसेच तपासणीसाठी मूळ स्‍टॉक रजिस्‍टर दिले नाही.स्‍टॉक रजिस्‍टरच्‍याउता-याच्‍या प्रती विरुध्‍दपक्ष क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंके तर्फे उपलब्‍ध करुन दिल्‍याचे  दिसून येते. विरुध्‍दपक्ष क्रं 3 राष्‍ट्रीयकृत बॅंक असून तिचेवर अविश्‍वास ठेवण्‍याचे कोणतेही प्रयोजन जिल्‍हा आयोगास दिसून येत नाही. तक्रारकर्त्‍याने ई मेल व्‍दारे वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांचे मागणी प्रमाणे  दस्‍तऐवज पुरविल्‍याचे दिसून येते. दुसरी महत्‍वाची बाब अशी आहे की, विमा सर्व्‍हेअर यांचे सांगण्‍यानुसारच  तक्रारकर्त्‍याने  श्री विनोद तांडेकर, अगरबत्‍ती मशीन दुरुस्‍ती करणारा याचे कडून मशीनच्‍या नुकसानीचे निर्धारण केल्‍याचे आपले शपथे वरील पुराव्‍या मध्‍ये नमुद केलेले आहे.

 

14.  जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते सदर प्रकरण निकाली काढण्‍यासाठी वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर श्रीडी.के.खेडकर यांनी दिनांक-04.08.2020 रोजी वि.प. क्रं 1 विमा कंपनीचे कार्यालयात दाखल केलेला सर्व्‍हे अहवाल तपासून पाहणे जरुरीचे आहे. त्‍या अहवाला मध्‍ये असे नमुद आहे की,  क्‍लेम फार्म मध्‍ये रुपये-8,50,000/- चा दावा केलेला असून नुकसानीचे निर्धारण रुपये-2,63,920/- चे केल्‍याचे नमुद केलेले आहे. सदर सर्व्‍हे दिनांक-04 फेब्रुवारी, 2020 रोजी केल्‍याचे नमुद आहे. तक्रारकर्त्‍याने जळालेल्‍या तिन्‍ही मशीन गुरु माऊली एन्‍टरप्राईजेस, नागपूर यांचे कडून दिनांक-14.04.2018 रोजी खरेदी केल्‍या बाबत बिलांच्‍या झेरॉक्‍स प्रती  दाखल केल्‍यात त्‍यावरुन तिन्‍ही मशीनची एकूण किम्‍मत रुपये-3,90,000/- अधिक जी.एस.टी. रुपये-70,200/- असे एकूण रुपये-4,60,200/- असल्‍याचे दिसून येते. परंतु तक्रारकर्त्‍याने भंडारा येथील श्री विनोद तांडेकर याचे मशीन दुरुस्‍तीचे अंदाजपत्रक  दाखल केले, त्‍यामध्‍ये तिन्‍ही  मशीन दुरुस्‍तीचा खर्च अनुक्रमे रुपये-1,71,000/-, रुपये-1,44,270/- आणि रुपये-1,22,490/- दर्शविलेला आहे जो खर्च खूप जास्‍त आणि बेकायदेशीर दर्शविल्‍याचे दिसून येते. मशीनच्‍या डिलरने सर्व्‍हीस उपलब्‍ध करुन देतात असे सर्व्‍हेअरला सांगितले. आगी मध्‍ये जळलेल्‍या स्‍टाकमुळे मशीन क्रं 1 जळलेली होती, मशीन क्रं 2 ला किरकोळ दुरुस्‍तीची आवश्‍यकता आहे. मशीन क्रं 3 दुरुस्‍ती मध्‍ये होती आणि सदर मशीनला आगीमुळे काहीही झाल्‍याचे दिसून आले नाही. पोलीस पंचनाम्‍या प्रमाणे नुकसान रुपये-8,50,000/- नमुद आहे. तक्रारकर्त्‍याने ट्रेडींग अकाऊंट पुरविले नाही त्‍यामुळे स्‍टाक रजिस्‍टर वरील नोंदी तपासल्‍यात, त्‍यामध्‍ये बरीच खोडतोड होती परंतु दुसरा पर्याय नव्‍हता. दिनांक-31 जानेवारी, 2020 रोजीच्‍या स्‍टाक नोंदी प्रमाणे रुपये-3,28,116/- एवढा माल असल्‍याचे दिसून आले. सर्व्‍हेअर यांनी फायनल समरी मध्‍ये  खालील प्रमाणे नमुद केले-

 

SALVAGE VALUE:

No Salvage Value for the stock. For Plant & machinery damaged parts will be of no use, being heated. Scrap Value can be taken @ Rs.1000/- only

 

Details

Assessed Loss

Loss of Plant & machinery as per Annex-A

157880/-

Loss of Stock as per Annex-B

161500/-

Total Loss

319386/-

Less Depreciation @20% on Plant & machinery only

31576/-

Loss Net of Depreciation

287810/-

Loss Salvage Value of only Plant & Machinery

1000/-

Loss Net of Salvage Value

277810/-

Less Policy Excess clause 5% of Claim Amount

13890/-

Loss net of Salvage & Policy excess

263920/-

 

सर्व्‍हेअर यांचे  अहवाला प्रमाणे दिनांक-31 जानेवारी, 2020 रोजी एकूण स्‍टाक रुपये-3,28,116/- एवढया किमतीचा होता असे नमुद आहे व त्‍यापैकी रुपये-1,61,506/- एवढया स्‍टॉकचे नुकसानीचे जवळपास 50 टक्‍के स्‍टॉक नुकसानीचे  निर्धारण केलेले आहे. जेंव्‍हा की, फोटो वरुन तसेच विरुध्‍दपक्ष क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंकेचे प्रबंधक यांनी दिलेल्‍या शपथे वरील पुराव्‍या वरुन संपूर्ण युनिटला आग लागल्‍याचे नमुद केलेले आहे, त्‍यामुळे तिन्‍ही मशीन संपूर्णपणे जळाल्‍याने तिन्‍ही मशीनची किम्‍मत तक्रारकर्ता परत मिळण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. त्‍याच बरोबर युनिट मधील उपलब्‍ध स्‍टॉकचे पूर्णपणे नुकसान झाल्‍याने तेवढी नुकसान भरपाई मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे जिल्‍हा आयोगाचे मत आहे. विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांचा शपथे वरील पुरावा दाखल केलेला नाही.

    ज्‍या अर्थी सर्व्‍हेअर यांनी रुपये-2,63,920/- एवढे नुकसानीचे निर्धारण केले त्‍याअर्थी तक्रारकर्त्‍या कडून आणखी दस्‍तऐवज मागणी करण्‍याचे कोणतेही प्रयोजन विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीला नव्‍हते. दुसरी अत्‍यंत महत्‍वाची बाब अशी दिसून येते की, सर्व्‍हेअर यांनी अहवाला मध्‍ये मान्‍य केलेले आहे की, आगीच्‍या उष्‍णतेमुळे युनिट मधील यंत्र सामुग्री, स्‍टॉकचे पूर्णपणे नुकसान झाले असून त्‍यांनी  एका मशीनची Salvage Value Rs.-1000/- हिशोबात घेतलेली आहे, एवढया नाममात्र सॉल्‍व्‍हेज व्‍हॅल्‍यु वरुन असे दिसून येते की, युनिट मधील मशीनरी, स्‍टाक, ईतर साहित्‍यजळून पूर्णपणे खाक झालेले आहे. परंतु आज पावेतो कोणतेही सबळ कारण नसताना तक्रारकर्त्‍याचा विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवल्‍यामुळे त्‍याला शारिरीक व मानसिक त्रास झाला व शेवटी ही तक्रार दाखल करावी लागली.

 

स्‍टॉकचे नुकसानी बाबत-

      सर्व्‍हेअर यांचे अहवाला प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे युनिट मध्‍ये  दिनांक-31 जानेवारी, 2020 रोजी स्‍टॉक रजिस्‍टर प्रमाणे एकूण् रुपये-3,28,116/- चा स्‍टॉक असल्‍याचे नमुद आहे. त्‍यांनी खालील प्रमाणे अभिप्राय दिलेला आहे-

Insured has not provided Trading A/c to work out the stock as on date of loss. Hence, I have considered the details of his stock register, which I feel fabricated with lot of overwriting, as there is no other option (Encl. No.04)

   Loss has taken place on 01/02/2020, hence I have considered the closing the stock of January, 2020.

 

   सर्व्‍हेअर यांनी अहवालात पुढे नमुद केले की, वि.प.क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंकेचे स्‍टॉक स्‍टेटमेंटची पाहणी करुन ओपनींग स्‍टॉक नुकसानीचे दिवशी रुपये-4,63,193/- एवढा आहे.  सर्व्‍हेअर यांनी  बॅंक  स्‍टॉक स्‍टेटमेंट बाबत खालील अभिप्राय दिलेला आहे-

Insured has also submitted Bank Stock Statements. Details are as follows. Bank Stock Statement copies provided are not signed anywhere by any of the Bank Officials, OR stamped it for the receipt of the same, hence not reliable at all. (Encl.No.11)

 

   सर्व्‍हेअर यांनी बॅंक स्‍टॉक स्‍टेटमेंटवर बॅंकेचे अधिकारी यांची सही व शिक्‍का नसल्‍याचे गृहीत धरुन सदर स्‍टेटमेंट विश्‍वसनिय नसल्‍याचे नमुद केले परंतु सर्व्‍हेअर बॅंक स्‍टेटमेंट खरे आहे किंवा खोटे या बाबत बॅंकेकडे विचारणा करु शकले असते वा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे अधिकारी यांचे मार्फतीने वि.प.क्रं 3 बॅंके मध्‍ये चौकशी करु शकले असते परंतु तसे या प्रकरणात झालेले नाही. सर्व्‍हेअर यांचे अहवाला  प्रमाणे वि.प.क्रं 3 बॅंकेच्‍या स्‍टॉक स्‍टेटमेंट प्रमाणे तक्रारकर्त्‍याचे युनिट मध्‍ये नुकसानीची घटना घडली त्‍या दिवशी रुपये-4,50,000/- चा स्‍टॉक होता असे हिशोबात धरण्‍यास जिल्‍हा ग्राहक आयोगास कोणतीही अडचण नाही. प्रकरणा मधील आलेले साक्षी पुरावे पाहता तक्रारकर्त्‍याचे युनिटला लागलेली आग मोठी असून त्‍यामधील संपूर्ण स्‍टॉक जळून नष्‍ठ झाल्‍याचे जिल्‍हा आयोगाचे मत आहे.

 

मशीनचे नुकसानी बाबत-

   सर्व्‍हेअर यांनी अहवाला मध्‍ये  मशीन खरेदी केल्‍याची देयके त.क. याचे कडून तपासल्‍या नंतर खालील प्रमाणे अभिप्राय दिलेला आहे.

Cost of Machine is Rs,.-1,30,000/- Insured has also submitted Xerox copy of original purchase bill of the Machines.  He has purchased these machines from a Dealer at Nagpur only from M/s Guru Mauli Enterprises, Nagpur at the cost of Rs.-1,30,000/- + G.S.T. (Encl No. 15)

     वर नमुद केल्‍या प्रमाणे सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार वि.प.क्रं 3 बॅंक स्‍टेटमेंट प्रमाणे नुकसानीचे घटनेच्‍या दिवशी स्‍टॉकची किम्‍मत रुपये-4,50,000/- आहे आणि वि.प.क्रं 3 बॅंकेचे अधिकारी यांनी शपथपत्रात आग मोठी असून संपूर्ण युनिट जळाल्‍याचे नमुद केल्‍याने संपूर्ण स्‍टॉकचे नुकसान झाले असे हिशोबात धरण्‍यास जिल्‍हा ग्राहक आयोगास काहीही अडचणीचे नाही. तसेच सर्व्‍हेअर यांचे अहवाला नुसार नुकसान झालेल्‍या मशीनरीची किम्‍मत  18 टक्‍के जी.एस.टी. सह एकूण रुपये-1,57,880/- दर्शविलेली आहे त्‍यामधून  मशीनरीचे 20% (Depreciation Value)अवमुल्‍यन घसारा याची रक्‍कम रुपये-31,576/- वजा केली तर  मशीनची येणारी रक्‍कम रुपये-1,26,304/- येते.  परंतु जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मते तक्रारकर्त्‍याचे संपूर्ण यु‍निटला मोठी आग लागल्‍याने त्‍याचे 03 मशीनरीचे नुकसान झालेले आहे.  त्‍यामुळे 03 मशीनचे नुकसानीचे निर्धारण आम्‍ही तक्रारकर्त्‍याने अभिलेखावर दाखल केलेल्‍या बिला वरुन करीत आहोत. तक्रारकर्त्‍याने तिन्‍ही मशीन्‍स या गुरु माऊली एन्‍टरपाईजेस,  नागपूर यांचे कडून दिनांक-14.04.2018 रोजी खरेदी केल्‍या बाबत बिलाची झेरॉक्‍स प्रत दाखल केली त्‍यावरुन तिन्‍ही मशीन्‍सची  किम्‍मत रुपये-3,90,000/- अधिक जी.एस.टी. रुपये-70,200/-  असे मिळून  एकूण किम्‍मत रुपये-4,60,200/- दर्शविलेली आहे, सदर तिन्‍ही मशीन्‍सची किम्‍मत रुपये-4,60,200/- मधून 20% घसा-याची रक्‍कम (Deprecation value) रुपये-92,040/- ची वजावट केली असता उर्वरीत रक्‍कम रुपये-3,68,160/- येते आणि  तेवढी तिन्‍ही मशीन्‍सची नुकसानीची रक्‍कम हिशोबात जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे घेण्‍यात येते .अशाप्रकारे  बॅंकेच्‍या स्‍टेटमेंट अनुसार संपूर्ण स्‍टॉकचे नुकसान रुपये-4,50,000/- तसेच 20% घसारा वजा जाता तिन्‍ही मशीन्‍सची येणारी नुकसानीची रक्‍कम रुपये-3,68,160/- हिशोबात घेतली तर तक्रारकर्त्‍याचे युनिटचे जवळपास रुपये-8,18,160/- नुकसान झाल्‍याचे जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे हिशोबात धरण्‍यात येते. सदर रकमे मधून सर्व्‍हेअर यांचे अहवाला  मध्‍ये  दर्शविल्‍या नुसार  5 टक्‍के  पॉलिसी एक्‍सेस क्‍लॉजची रक्‍कम  रुपये-13,890/- आणि  सर्व्‍हेअर यांचे अहवाला मध्‍ये दर्शविल्‍या अनुसार एका मशीनची सॉल्‍व्‍हेजची रक्‍कम रुपये-1000/- प्रमाणे तिन मशीनच्‍या सॉल्‍व्‍हेजी रक्‍कम रुपये-3000/-  अशा रकमांची वजावट करणे आवश्‍यक असल्‍याने अशी वजावट केल्‍या नंतर येणारी एकूण रक्‍कम रुपये-8,01,270/- एवढी येते.

 

15.  उपरोक्‍त वस्‍तुस्थिती, साक्षी पुरावे, दाखल दस्‍तऐवज, सर्व्‍हेअर यांचा अहवाल लक्षात घेता तक्रारकर्त्‍याचे युनिटचे प्‍लॅन्‍ट मशीनरी, स्‍टॉक याचे रुपये- रुपये-8,01,270/- एवढया रकमेचे नुकसान झालेले आहे असा निष्‍कर्ष जिल्‍हा ग्राहक आयोगाव्‍दारे काढण्‍यास कोणतीही अडचण नाही आणि तेवढया रकमेची नुकसान भरपाई वि.प.क्रं 1 विमा कंपनी कडून तक्रारकर्त्‍याला  मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे. तक्रारकर्त्‍याने नुकसान झाल्‍याने युनिट बंद असल्‍यामुळे प्रती माह नुकसानीची भरपाई देण्‍याची मागणी केलेली आहे परंतु आगीची घटना होण्‍यास विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचा कोणताही संबध नाही आणि सर्व्‍हेअर  यांनी दिलेल्‍या अहवालाचे दिनांका पासून तीन महिन्‍या नंतर (विमा क्‍लेम निश्‍चीतीसाठीचा कालावधी) पासून व्‍याज मंजूर केलेले आहे त्‍यामुळे युनिट बंद झाल्‍यामुळे नुकसानी संबधात  तक्रारकर्त्‍याने केलेली भरपाईची मागणी नामंजूर करण्‍यात येते. सर्व्‍हेअर यांनी दिनांक-04.08.2020 रोजी अहवाल दाखल केल्‍या नंतर तीन महिन्‍याचे आत विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने विमा दाव्‍या बाबत  निर्णय घेणे आवश्‍यक होते. त्‍यामुळे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या नुकसानी बाबत विमा रक्‍कम रुपये-8,01,270/- आणि सदर रकमेवर दिनांक-04.11.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदागी पावेतो द.सा.द.शे.-9 टक्‍के दराने व्‍याज मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल. तक्रारकर्त्‍यास झालेल्‍या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-15,000/- आणि प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- अशा रकमा विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनी कडून मंजूर करणे योग्‍य व न्‍यायोचित होईल असे जिल्‍हा आयोगाचे मत आहे. यातील विरुध्‍दपक्ष क्रं 2 हे विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीचे सर्व्‍हेअर आहेत व त्‍यांनी विरुध्‍दपक्ष क्रं 1 विमा कंपनीने त्‍यांना नियुक्‍ती केल्‍याने पाहणी करुन अहवाल दिलेला आहे यामध्‍ये त्‍यांनी तक्रारकर्त्‍यास कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली असे म्‍हणता येणार नाही या शिवाय तक्रारकर्त्‍याचा  आणि वि.प.क्रं 2 यांचेशी कोणताही संबध नाही आणि तक्रारकर्त्‍याने वि.प.क्रं 2 यांचे कडून कोणतीही सेवा घेतली नसल्‍याने तो वि.प.क्रं 2 यांचा ग्राहक होत नाही त्‍यामुळे वि.प.क्रं 2 सर्व्‍हेअर यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे. या शिवाय तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंकेला या प्रकरणात प्रतिपक्ष करुन त्‍यांचे विरुध्‍द मागणी केल्‍याचे दिसून येते परंतु वि.प.क्रं 3 महाराष्‍ट्र बॅंकेने तक्रारकर्त्‍याला कोणतीही दोषपूर्ण सेवा दिल्‍याचे दिसून येत नाही व तसे तक्रारकर्त्‍याचे  म्‍हणणे सुध्‍दा नाही त्‍यामुळे वि.प.क्रं 3 बॅंके विरुध्‍दची तक्रार खारीज होण्‍यास पात्र आहे असे जिल्‍हा ग्राहक आयोगाचे मत आहे.

 

16.   उपरोक्‍त नमुद सर्व वस्‍तुस्थितीचा विचार करुन जिल्‍हा ग्राहक आयोगा तर्फे प्रस्‍तुत तक्रारी मध्‍ये खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                                                              ::  अंतिम आदेश    ::

 

  1. तक्रारकर्ता श्रीनरेंद्र सुकाजी मंदुरकर यांची तक्रार विरुध्‍दपक्ष क्रं 1 युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, भंडारा यांचे विरुध्‍द खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं -1) युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, भंडारा   यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला विमा दाव्‍या बाबत विम्‍याची रक्‍कम रुपये-8,01,270/- (अक्षरी रुपये आठ लक्ष एक हजार दोनशे सत्‍तर  फक्‍त) आणि सदर रकमेवर दिनांक-04.11.2020 पासून ते रकमेच्‍या प्रत्‍यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% टक्‍के दराने व्‍याज तक्रारकर्त्‍याला  दयावे.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं -1) युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, भंडारा यांना आदेशित करण्‍यात येते की, त्‍यांनी तक्रारकर्त्‍याला  झालेल्‍या मानसिक व शारिरीक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-15,000/-(अक्षरी रुपये पंधरा हजार फक्‍त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-10,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्‍त) तक्रारकर्त्‍याला दयावेत.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं-2 श्री दिनानाथ के. खेडकर, विमा सर्व्‍हेअर यांचे   विरुध्‍दची   तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍दपक्ष क्रं 3 बॅंक ऑफ महाराष्‍ट्र, भंडारा तर्फे शाखा व्‍यवस्‍थापक यांचे विरुध्‍दची तक्रार खारीज करण्‍यात येते.

 

(06)  सदर आदेशाचे अनुपालन विरुध्‍दपक्ष क्रं -1) युनायटेड इंडीया इन्‍शुरन्‍स कंपनी लिमिटेड, भंडारा  यांनी प्रस्‍तुत निकालपत्राची  प्रथम प्रमाणित प्रत प्राप्‍त झाल्‍याचे दिनांकापासून 30 दिवसांचे आत करावे.

 

(07) निकालपत्राच्‍या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारानां निःशुल्‍क उपलब्‍ध    करुन देण्‍यात याव्‍यात.

 

(08)  तक्रारकर्ता व विरुध्‍दपक्ष यांचे तर्फे दाखल अतिरिक्‍त संच त्‍यांना  परत करण्‍यात यावेत.

 

 

 

 
 
[HON'BLE MR. BHASKAR B. YOGI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. VRUSHALI JAGIRDAR]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.